श्री.
लेखांक ९३.
१६९६ भाद्रपद वद्य १.
राजश्री चिंतो विठ्ठल स्वामी गोसावी यांसि :-
विनंति उपरी, हैदर नाईक याजकडे सालगुदस्त तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबीं ऐवज करार केला. त्यापैकीं राजश्री कृष्णाजी नाईक दातार यांस दोन लक्ष रुपये द्यावयाचा ठराव तुचे विद्यमानें आपाजी-राम याजवळ जहाला. त्याविसीं मागें तुमचें व नाइकाचें पत्र घेऊन आपाजी राम याजकडे पाठविलें होतें. त्याचे जाब साल आले ते पाहून, नाइकांस दाखऊन, राजश्री नारो. आपाजी याजकडे पाठविले आहेत. ते तुह्मासी बोलतील. त्याविसीं फिरोन कागदपत्र काय लागतील ते तयार करऊन, नाईक सांगतील त्याप्रमाणें ऐवज आणावयाची तर्तूद करून, ऐवज सरकारांत सत्वर येई तें करणें. जाणिजे. छ १३ रजब, सु।। खमस सबैन मया व अलफ. हे विनंति.