Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११७.
१६९७ मार्गशीर्ष वद्य ६.
पुाा राजश्री लक्ष्मण आप्पाजी गोसावी यांसि:-
सुाा सीत सबैन मया व अलफ. शहर सुरत येथील चौथाईचा अंमल सरकारचा येणें तो सुरतकर मोगल सुरळीत देत नाहींत. दिक्कत करितात. वाजबी चौथाईचे आकारपैकीं चौथाई ऐवज देऊन भरकबज सरकारचे कमाविसदारापासीं मागतात. ऐशास, सरकारांत वोडीचा प्रसंग ! हरकसेंहि च्यार रुपये घेऊन चालावें. त्यास, वाजबीचेच अमलास दिक्कत पडते. येविसीं जनरलास अलाहिदा पत्र लिहिलें आहे. तरी हें सविस्तर अर्थ तुह्मीं त्यासी बोलोन मोगलास व गंभीरास जनरालाचीं ताकीदपत्रें पाठवावीं कीं, वाजवी चौथाईचा ऐवज देत जावा. दिक्कत न करावी. याप्रों पत्रें सत्वर घेऊन पाठवणें. जाणिजे. छ १९ सवाल.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११६.
१६९७ मार्गशीर्ष वद्य ३.
राजश्री लक्ष्मण आपाजी गो यांसि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ.
सुरतकर मोगल याजकडून सरकारची चौथायी येणें. त्यास, तो सुधामत देत नाहीं. येविशींचा मजकूर पेशजी लिहिला आहे. त्याप्रमाणें जनरालास समजावून जनरालाचें पत्र गंभीरास पाठऊन, मोगलास ताकीद होय तें करणें. हुजूरोनही गंभीरास सांगूं. परंतु जनरालाचें पत्र जरबेनें आल्यास गुंता पडणार नाहीं. जाणिजे. छ १६ सवाल. बहुत काय लिहिणें ? येथें ऐवजाची ओढ आहे ते पत्रीं किती लिहावी ? तुम्हास वाकीफच आहे व जनरालही अर्धे वाकीफ जाहाले असतील. सांप्रतच्या प्रसंगीं बारभाईंचे फितुरांतून सर्वांस ओढावयास फावलें. इलाज चालत नाहीं. बारभाईशीं विरोध करावा कीं, हे किरकोळ लबाड्या करितात. त्यांशीं विरोध करावा, तेव्हां येकही सेवटास जात नाहीं. सारें विलग पडलें आहे. येक जनराल मात्र आमचे पक्षावर प्रबळ. याजमुळें आमची स्थित आबरू आहे. वरकड सारे लबाड्या करावयास तयार. यास्तव जनरालाचीं पत्रें कारनेलीस क्षेप-निक्षेप यावीं. फत्तेसिंगाकडील वसूल पडला. ऐवज देणें. तेरा लक्ष वसूल फत्तेसिंगाकडीलच कारकून सांगतात. दहा वसूल, करनेल म्हणतात. साडेसहा अलीकडे सरकारांत तफावत किती ? यास्तव कारनेलीस पत्र जरूर जरूर पाठवावें. व गंभीरास व सुरतचे मोगलास अशीं ताकीदपत्रें पाठवणें. हुजूरही पाठवावीं. व निराल्याही ताकिदा जाव्या. जाणिजे. छ १६ सवाल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११५.
१६९७ मार्गशीर्ष वद्य १.
पुाा राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यांसि :-
सुाा सीत सबैन मया व अलफ. पाा
हासोटचा मजकूर मेस्तर होम यासी बोलावा, व मेस्तर हाटली यासीहि बोलावा, म्हणोन तुह्मीं लिाा. ऐशास, मेस्तर होम दरबारास येणें तें कारनेलीबा। येतात. येकटयाची गांठ पडत नाहीं. परंतु त्याचे दुभाशास सांगोन त्याजकडून त्यास सांगविलें आहे. व मेस्तर हाटली तो दरबारास येतच नाहींत. बोलवावें तरी ठीक नाहीं. तथापि त्यास हा मजकूर कळावयाचा येत्न करितों. जाणिजे. छ १४ सवाल.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११४.
१६९७ मार्गशीर्ष शुद्ध १४.
पुरवणी. राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यांसि :- सुाा सीत सबैन मया व अलफ. जनरालासी बोलोन जाबसाल उगऊन घ्यावयाचीं कलमें. ताा :- पाा.
अंकलेश्वर येथील दरसाल पाऊण लाख रुपये कोपिनीकडे द्यावे, याप्रमाणें करार असतां, तेथें मेस्तर शहानीं ठाणें बसविलें. दरोबस्त वसूल घेतात. त्यास पाा मारीं सरकारचे कादार असावे. पाऊण लाख रुपये मात्र कादाराकडून देवविले जातील. याचा जाबसाल करोन घेणें. या माहालचा रुपया सालमजकुरीं झाडून घेतला. हा याचे दरमहाचे खर्चात पडेल. मग रदबदली करितील. तेव्हां ऐकावयाचें नाहीं. कलम १ पाा.
हासोटचा मा तुह्मांस पेशजी लिाा होता. त्यास, विश्वनाथ नारायण व नारो गोपाळ साक्ष देत ऐसें पक्कें असावें, ह्मणोन लिहिलेंत. यास, हे दोघें मध्यस्थ. याणीं सरकारचे जाबसाल उगवून घेऊं, मग सनद देऊं, याप्रों करार करोन घेऊन गेले. आणि सनद अटकाविली आहे. हे साक्ष देतील. व मेस्तर हो यासहि सांगितलें आहे. जाबसालांत तफावत नाहीं. मेस्तर इटलीसही सांगावें, ह्मणोन लिहिलें. तरी ते दरबारास येत नाहीं याची गांठच पडत नाहीं तथापि बनलें तरी सांगोन पाठवूं. कलम १
गायकवाडाकडील ऐवज दहा लक्ष किंवा चवदा लक्ष कारनेलीकडे आहे ऐसें ऐकतों. साडेसाहा सरकारांत याणीं दिल्हे. वरकड याजकडे आहेत. तो ऐवज घ्यावयाविसीं जनरालानीं कारभाऱ्यांस लि॥ आहे, म्हणून तुम्हीं दर्शविलें. त्यास यास विचारिलें. हे नाहीर म्हणतात. याजकरितां जनरालाचें पत्र घेऊन हुजूर पाठवाल तरी ऐवज देतील.
पाा भुतसर व बोहारी हे दोन्ही माहाल नेहमीं अगर दरमाचे ऐवजीं सरकारांतून दिल्हे नसतां तेथें जबरदस्तीनें मेस्तर राबगंभीर याणीं ठाणीं घातलीं आहेत. उठवावीं तरी ठाणी घालणार येकीकडे राहातील. जनरालाचे चित्तांत विक्षेप येईल. याजकरितां उपेक्षा केली. त्यास, हें बोलोन दाहा महाल सोडून घ्यावयाविसीं यास ताकीद व्हावी. पैकी बोहारीचा अंमल चंदररायाकडे चालला आहे. भुतसर मात्र बोलणें. बोहारीचा शोध करून लिहून पाठवूं. चिखली, वांसदें, बलसाड येथील जकाती गंभीरानें उठविल्या.
भाटे पाा चौऱ्यासी हा गांव गायकवाडाकडील. तेथें तूर्त ठाणें घातलें व त्याचे जकातीसहि विक्षेप करितात. हे गोष्ट नसावी. सरकाराकडून उपेक्षा मुर्वतीनें होती. गायकवाड कलह करितील तेव्हां आह्मास शब्द जनराल ठेवितील. यास्तव हरयेक गोष्ट करारमदाराखेरीज होऊं नये. येविसीं बोलणें.
हैदरअल्लीखान याजकडील लाख रुाा होन आले ते तुह्मीं जनरालापासून घेतलेच असतील. त्यांत शिसें व बंदुकाचे खरेदीस दहा हजारांचे ठेवून वरकड हुजूर पाठवणें. पेशजी सनद पाठविलीच आहे.
फत्तेसिंगास जितके रुजू करूं तितके रुपये देणें म्हणोन ताकीद पाठवणें तरी महिना पंधरा दिवस चालेल. सदरहू कलमें समजोन, व खतसीर बोलोन, जाबसाल करोन घेणें. वाजवीचे रीतीस चिंता नाहीं. तुम्हीहि युक्तायुक्त पाहून करीत असतां. जाणिजे. छ १२ सवाल. बहुत काय लिहिणें ? नरम तरी बोलावें परंतु स्पष्ट बोलत जावें. परिणामीं गोड वाटेल. खोटें येकंदर करूं नये, बोलूं नये हेंच, आमची मर्जी समजणें. तुम्हीं तेथें प्रसंग पाहून बोलणें व सत्यच बोलणें. जाणिजे छ मजकूर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीशंकर.
लेखांक ११३.
१६९७ मार्गशीर्ष शुद्ध १४.
राजश्री आण्णा स्वामीचें सेवेसी :-
विनंति. आपणास कळावें ह्मणून विस्तारें दोन बंद लिहिले आहेत. आपण देशांतीलहि साधनें केलीं. अपाजी साबाजीची खातरजमा करून रवाना केले. फार उत्तम जालें ! आण्णा ! हरतऱ्हेनें तूर्त मसलत सेवटास न्यावी, हेंच लक्ष लागलें आहे. आपणही त्या प्रेत्नांत आहेत. सारांश, हरतऱ्हेनें जनरालास पलटवर आणावें. कोपशदार व जनराल कोपीन त्यांचीही पातशहा आदिकरून सर्वांची इच्छा तृप्त करावी. परंतु आपली मसलत सेवटास न्यावी. हें लक्ष जाते समईं कितेक प्रकारें तुह्मांसी बोलिलों आहों. सारांश, अण्णा ! हरतऱ्हेनें लढाई सुरूची परवानगी येई ते गोष्ट करावी. रात्रंदिवस ध्यास तुह्मांकडे आहे. गायिकवाडाची कुलकट व कोणाचे कोण हें पहावयाचें तरी गोविंदरावानीं xxxxxxxxxxले. ते गंभीराजवळ कारकूनच राहिल्यामुळे xx ले. त्याची नक्कल आह्मांजवळ होती ते पाठविली आहे. त्यावरून सर्व ध्यानास येईल. तूर्त आपली मसलत साधे ते गोष्ट करावी. तुह्मांकडे निजध्यास लागला आहे. मेस्त्र इष्टोर इंग्रज कितेक आह्मासी उमेदीच्या गोष्टी सांगून गेले आहेत. रामसिंग त्याजपासीं आहे. त्याजला बलावीत जावें आणि यादीप्रें।। वस्तावनी जिन्नस देईल तो मागावा आणि इष्टोलापासीं तरवार येथें होती. आह्मी मागत होतों. त्यास चुकोन समागमें गेली. सईफ आहे ते तरवार जरूर रामसिंगास सांगून मागावी. आरबी एक घोडा चांगला आह्माकरितां त्यास सांगावा. परंतु तरवार रामसिंगास ठावकी आहे. येथें आह्मीं मागितली. तेव्हा मेस्त्र होमास दिली, म्हणून सांगितलें. परंतु येथें कोणाही इंग्रजाजवळ तरवार राहिली नाहीं. सर्वांचें सांगणें कीं मेस्त्र इष्टोलानींच माघारीं नेली आहे. त्याजवरून हें पत्र लिहिलें आहे. तरी ते तरवार ठिकाणीं लाऊन आणऊन पाठवणें. एक घडयाळ जबाबी चांगलें, जबाबी म्हणजे तास वाजतात तें जरूर त्याजला सांगून मागवावें आणि जिन्नस येईंसे करावें. आपण तेथें आहेत. कुटुंब आणविलें, म्हणून ऐकलें. फार उत्तम जालें. परंतु इकडील काळजी मात्र राखावी. आह्मी येथें सारी आणली ती मागती सुरतेस पाठवितों. तुमची परवानगी पुढें चालावयाची आली, ह्मणजे लाऊन देतों. वरकड वारंवार श्रीमंतांचीं पत्रें आपणास जातात. आह्मी लिहितों न लिहितों सर्व तुह्मांस माहीत आहे. तेव्हां वारंवार काय ल्याहावें ? आबा सरदाराकडे गेले होते. त्यांचीं वचनेंप्रों घेतलीं आहेत. सर्वांची नजर इंग्रजांचे अनकुलतेवर आहे. आबा गेलियानीं इतकें मात्र जालें जे सरदार दोघे सिंदे होळकर तिकडे जात नाहींत. तूर्त राहून, इंग्रजसह श्रीमंत आले तरी खानदेशांत येऊन मिळतात. ऐसेंच वचन घेऊन आबा येणार. गोविंदरायाकडील घडेलसें फार केलें. परंतु घडलें नाहीं. त्याचे मूळ व फळ तरी खामका येईल. नारोपंत येथें आहेत. मर्जीचे वगैरे सर्व ध्यान आहे तेंच आहे. देशांत तुह्मी केलें त्याचे व इकडील साधन जें पडेल तें पाडावें. येथेंही खटपट करीत आहों. खर्चाची मोठी ओढ आहे. कर्जवाम तरी दोन चार लाख मिळेसें करावें. हैदराकडील ऐवज मुंबईस आला आहे तोही सत्वर पाठवावा. दारू, सिसें व बंदुका एकंदर जरूर पाठवाव्या. लडाई सुरू जाली ह्मणजे इष्टोलास जरूर पाठवावें. परवानगी घ्यावी. आपण तेथें आहेत. प्रसंग पाहून करणें तें करावें. केवळ येथील अर्थ तुह्मांस सर्व माहीत आहेत. वारंवार ल्याहावें, ऐसें नाहीं. गोविंदरावबावाकडील देवळाचे संबंधाचा ऐवज हजार रुपये घेऊन पाठविता. त्यांचें कार्य बनविल्या मनोदयानुरूप अण्णा ! सर्व घडेल. चिंता नसावी. बनेल तैसें करावें. रां। छ १२ सवाल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११२.
१६९७ मार्गशीर्ष शुद्ध ७.
सर्व मसलतीचा जिम्मा आपला आहे, तेव्हां कमकसर आपणच ध्यानांत आणावें. मसलतीचा मोहरा माघार फिरविल्यानें लौकिकांत शौरत कैसें होईल ? व येणार नाउमेद होतील, ते फिरोन पल्ल्यावरी यावयास बहुत भारी पडेल. सबब आजी जलदीनें जबाब पाठवावा. येथपर्यंत आल्यानीं शत्रूवर बहुत दाब पडोन हतवीर्य जाहले आहेत. भोडगांवपर्यंत गेल्यानीं लढाईखेरीजच मसलत सुधरत आहे. आमचा भार सर्व आपणावर; तेव्हां ज्यांत या मसलतीचा उपयोग पडे, तेंच करावें; आणि येथील सरदारांत एकंदर परवानगी किरकोळ कामें दबावानीं होतील तीं करीत जावी ह्मणून व खानदेशांत जाण्याची परवानगी जरूर पाठवावी. इज्यानेब फौजसुद्धां व आपला सरंजाम तयार असलियानें फितुरी नाउमेद होऊन जमणार नाहींत, शरणच येतील. आणि एक जागा आपले माहालांत मुक्काम करोन राहिलों तरी आपले आमचे येक लासांत दरज पडलो, ऐसें समजाऊन उमेदवार होतील. याजकरितां पुढें चाललियानें सोय आहे. बहुतेक कामें जालियांत आहेत. इंग्रेजी सामान न लगतांहि स्वारी बराबर देशीं असलें ह्मणजे फितुरी सहजांत दाबानेंच फुटोन जातील. मुकाबल्यास यावयाचें होणार नाहीं. आह्मास सुचलें तें लिहिलें आहे. जसें तुमचे विचारें ठरेल तसेच अमलांत येईल. कोणेविसीं दुराग्रह नाहीं. परंतु चिखलीकडे गेल्यास मनसुब्यास वांकडें पडतें. सबब तपसीलवार लिहिलें आहे. उत्तर पाठवावें. कारनेलीस हुकूम पाठवावा. छ ३ सवाल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १११.
१६९७ मार्गशीर्ष शुद्ध ६.
राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यांस :-
सु।। सीत सबैन मया व अलफ. आलीकडे तुह्मांकडून विनंतिपत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. मेस्तर टेलर याजकडून आजपर्यंत पत्र यावें तें कांहीच दिसत नाहीं. खासा स्वारी इंग्रेजी सामानसुद्धां तापीवर सोनगडानजीक दाखल जाली. तमाम देशीहून राजकारणें आलीं आहेत. कोंडाईवारी चढतांच कितेक मुत्छदी व सरदार येऊन सामील होणार. त्याव, करनेल किटण म्हणतात कीं चिखली परगणियांत जाऊन रहावें. त्यास स्वारीचा रोख माघारा फिरलियानें मसलतीचा अनुपयोग, राजकारणें उठतात व परगणियांत राहिल्यानें शौरत येक प्रकारची जाती. सरकारचे व इंग्रेजाचे एखलासांत दरज पडली, ऐशा कल्पना करोन फितुरी उमेदवार होतील. कितेक हुजूर येणार ते नाउमेद होवून केलेली पैरवी सोडतील- इत्यादिक नकसानी. याजकरितां येथून माघारे कुच होत नाहीं, म्हणून करनेलीस साफ सांगितलें आणि जनरलास ये बाबेविसी तपशीलवार लेहून पाठविलें असे. यांची नक्कल तुह्मांस मजकूर कळावा येतदनिमित्य पा। आहे. तरी साद्यंत समजोन, जनरालासी बोलोन, बारी चढोन गुजराथ व खानदेश याचे दरम्यान भोडगांवावरी जावयाविसीं यास परवानगी घेऊन पाठवावी. लढाईखेरीज दाबानेंच हतवीर्य होवून मसलतीचा उपयोग पडतो. तें काय निमित्य न करावें ? बारीचे आसपास राहिल्यास चिंताही नाहीं. देशांत दहशत पडोन फितुरी जमणार नाहीं ही तर मोठी सोय आहे. सहजांत न लढतां काम होतें, तें काय ह्मणून न करावें ! जनरालाचे कुमकेनें मोठा आब वाढला. ऐसेंच न लढतां इंग्रेजी सामानसुद्धां पुढें गेलों तरी कोण्ही सन्मुख येत नाहीं. विरान जातात. ऐसा प्रकार असतां करनेल परवानगीचा उजूर करितात. माघें फिणावयाविसीं दुराग्रह करितात. यांत सारी मसलत बिघडती. मिळविल्या यशाचा दाब कमी पडतो व चिखलींत राहिल्यानीं माहालहि खराब होतो. ऐवजाची वोढ, येक जागा राहिल्यानें फौजेच्या पोटाची सोय नाहीं. हे सर्व अर्थ समजाऊन पुढें बोललों. बळें जावयाविसीं सत्वर यास परवानगी पाठवून देणें व तेथील वर्तमान अधिकोत्तर असेल तें लिहिणें, जाणिजे छ ४ सवाल.
(लेखनावधि.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११०.
१६९७ मार्गशीर्ष शुद्ध २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री लक्षुमणपंत आण्णा स्वामीचे सेवेसी :-
पोष्य बाजी त्रिंबक कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ताा मार्गसीर शुद्ध द्वितीयापर्यंत मुाा उ xxx येथें समस्त सुखरूप असो विशेष. तुह्मांकडून इतके दिवस वर्तमानकळत नव्हतें. त्यास, छ २० रमजानीचीं पत्रें आलीं त्याजवरून परम समाधान जाहलें. ऐसेंच निरंतर पत्र पाठवून साकलें वर्तमान लिहून पाठवीत जावें. विशेष, तेथचा मजकूर लिहिला. त्यास वोढ फार. मागें दोन तीन महिने हजारप्रमाणें देत होते. हालीं पांचप्रमाणें दरमाहा खर्चास देतात. त्यास, आपण लिहिलें कीं खर्चाचा अजमास पाठवून द्यावा. त्यास, खर्चास अजमासें साहा साडेसाहा हजार रुपये खर्च दरमाहा लागतात. तरी फार करून लोक दूर केले तरी इतका खर्च लागतो. आपणांस कळावें ह्मणोन लिहिलें असे. चिरंजीव यांस बरें वाटत नाहीं, ह्मणोन आपण लिहिलें. आतां बरें नाहीं. ज्वर निघाला ह्मणोन लिहिलें. त्यास सर्वश्व आपण तेथें आहेत. तरी समाचार त्याचा आपण घेत जावा. राजश्री विसाजीपंत आपणापासीं आहे तरी त्यांचा समाच्यार घेत जावा. खर्चाची हलाखी फार, ह्मणोन चिरंजीवांनीं लिहिलें आहे. तरी आपण श्रीमंतास विनंति करून चाळिस पन्नास रुपये द्यावे. यजमानानीं न दिल्हे तरी आपण द्यावे. आह्मीं ल्याहावें ऐसें नाहीं. परंतु सूचना मात्र लिहिली असे. आम्हीं येथें चाकरी केली ती रुबरु गांठ तुमची व श्रीमंत सौ॥ मातुश्री बाईसाहेबांची पडेल तेव्हां समक्ष सांगतील तेव्हां आपणांस कळेल. इतकें असोन चिरंजीव तेथें आहेत. उपरणें पांघरुणावांचून आबाळ. कारकुनाचा व त्यांचा वर्तमान आइकितों. तरी फार ल्याहावेंसें नाहीं. सर्व भरंवसा आपला आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १०९.
१६९७ कार्तिक शुद्ध १३.
पुरवणी राजश्री लक्ष्मण आपाजी गो यांसि :-
सु।। सीत सबैन मया व अलफ. कारनेल किटीण तुह्मावर बहुत श्रमी जाहाला व आह्मावर तसाच जाहाला. सारांश आपलें कामही नाहीं. व याचा दोष मात्र जाहाला. कित्तेक गोष्टी मेस्तर होमाचे रूबरू केल्या. तेव्हां त्यासारिखेंच बोलला. त्यांत कुचास मागत होते. तेव्हां कुच करीत होते हे तर गोष्ट त्याणीं केलीच नव्हती. मग आह्मीं कशी केली ह्मणावी? मजला निरोप देणार, दुसरा इंग्रेज कामावर आणणार, हेंही पुसिलें. तेंही नाकबूल गेलों. ऐसे किरकोळ मजकूर व काढावयाचा मजकूर कबूल जहालों. तेव्हा तुह्माकडे लटीक वाद येईल, हो त्यास स्पष्ट लिहील, तेव्हां तुमचें बोलणें तेथें प्रमाण पडणार नाहीं. हा मोठा दोष आला. परंतु गाइकवाडाचे कारभाराविसीं भीड धरली नाही. तेथे मात्र त्यास अर्धा ठास बसला. त्याविसीं त्यांणी बहुत पर्याय लाविले. जनरालाचा हुकूमच होता, ऐसेंहि सांगितलें. सारांश, जबरदस्तीमुळें आपलें वाजवीही बोलणे शेवटास जात नाहीं. डबईचे, उपद्रवाचे वगैरे किरकोळ मजकूर कांहीं नाकबूल गेलों; कांहीं कबूल गेलो. किरकोळ मजकुराचा वाद सांगितल्यास आपल्याकडेच लघुत्व येतें. त्याचे उपकार बहुत. तेव्हां किरकोळ बोलतांच येत नाहीं. सारांश, तुमचें बोलणें जनरालास केवळ प्रमाण पडणार नाहीं. होम खरें करावयास आले. त्याची माया त्याजकडेच दिसते. जातीत जात प्रमाण पडते. तथापि तुह्मी शाहाणे आहां व येथूनही गायकवाडाचे मजकुरांत काईल केलें, याजमुळें तिसरा हिस्सा प्रमाणिक- पण राहील. पुढें तुह्मी आलियास हे संतोषी, यास्तव यावें ह्मणोन अलाहिदा पत्रीं लिहिलें आहे परंतु जनरालाची मर्जी तुम्हांवर बहुत संतोषी असिल्यास तेथेंच रहावें. यांत गुण फार आहेत. यास भय मोठें आहे. रुष्ट तरी जाहालेच. परंतु भयही आहे. ज्यापक्षी राहणें त्यापक्षीं जनरालाचें पत्र आम्हांस यावें कीं, यास जाबसालाबद्दल आह्मीं ठेऊन घेतलें ह्मणजे तेंच पत्र कारनेलास दाखऊं. तेव्हां दोष पडणार नाहीं. जनरालाची मर्जी बहुंत तुह्मांवर प्रसन्न असलियास ऐसें घडेल. तुमचे विचारे जसें बरें दिसेल तसें करणें. तुमची नजरही बरीच चालते. येथील कच्चा मजकूर मात्र लिहिला असे. बडोद्याहून जलदीनें रणगडास रेवातीरीं आलों. तेथें इंग्रेज व चिरंजीव राजश्री बाळ वगैरे सारे आठा दिवशीं आले. पुढें दक्षणेस चलावें, हा मजकूर बोलण्यांत ठरला. त्यांत गावकवाडाचा कारभार ठीक न जाहला. दोघेही बराबर नाहींत व ऐवजही नाहीं. ऐसें जाहालें. यास्तव तो कारभार सुधरावयास आह्मी कारनेल यत्न करितों. होईल तें खरें. तपसील किती ल्याहावा ? कांहीं राजश्री रामचंद्र विठ्ठल चिटणीस लिहितील. अमीनखानाची नजर सुधी नाहीं. रा। सदाशिव महादेव पाठविलें, त्यासही उपद्रव जाहाला. प्रसंगावर नजर देऊन, आपाजी गणेशाची मामलत करार केली. च्यार रुपियांची नीशा ठरली. त्यांत अमीनखानानीं सिबंदीचें निमित्य ठेवून कारभार बिघडला. शेवटीं अमीनखानापासून च्यार रुपये घेऊन मामलत करार केली. सावकारी नीशा कांहीं दिल्हीं. तेही रुपये वसूल पडत नाहीं. सावकाराजवळ ऐवज थोडाबहुत मसलतींत पेंच पडेल. यास्तव खानदेशचे सरदेस भोडगांवपावेतों जावें, ऐसें ठहराविलें. कारनेल चलावें तर ह्मणतात हुकूम आणवितों ह्मणतात. क्षेपनिक्षेप तरी बोलत नाहीं. रेवातीरींही राहूं देत नाहींत. असें अर्धोदकीं आलों आहों. जनराल अंतस्त त्यास काय लिहितात, तेंही पूर्तें समजत नाहीं. परंतु जनराल वगैरे कोशलदार आमचे हितावर आहेत, हें जाणोन कुच करी करितों. आठा दाहा दिवशीं भोडगांवाजवळ जाणार, ऐसें योजिलें आहे. पुढें ईश्वरसत्ता प्रमाण. येकही निश्चय करवत नाहीं. तुह्मीं तेथील हरद्र मनास आणून लिहिणें. जसें ल्याहाल तसा डौल धरावा लागेल. येकही बोलणें इंग्रेजाचे शाश्वत दिसत नाहीं. काय करावें तें लिहिणें. जाणिजे. छ ११ रमजान.
(लेखनावधि:)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १०८.
१६९७ कार्तिक वद्य १२ वृद्धि:
राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यांसि, मु॥ सीत सबैन मया व अलफ.
तुह्मीं विनंतिपत्र व हैदर अल्लीखान यांचा खलिता पाठविला तो पावला. लाख रु॥ चे होन पाठविले आहेत ह्मणून मारनिलेनी लिहिले आहे. जनरालांनी तुह्मास सांगितलेंच असेल. तरी ते वीस हजार पाचसे एकोणतीस दोन लाख रुपयाचे आले आहेत ते जनरालापासून घेऊन हुजूर पाठवून देणें. इकडील मजकूर कलमें :-
इंग्रेजी सामान स्वारी बरोबर होतें तें तुह्मांस दखलच आहे. त्याप्रों जखमी व आजारी होऊन गेलें व दारूगोळा भडोचेस राहिला. खानदेशांत जावयाचें योजिलें आहे. घाट चढोन गेलिया उपरी फितुरी मुकाबिलियास येतील. सामान पोख्त असलें पाहिजे, याजकरितां जनरालासी बोलोन आणखी सामान रवाना करीत ते करणें. सामान पोहोंचेतों परवानगीही येईलच.
येथील कुच मुकामचा प्रकार याचे चित्तास येईल तेव्हां करावा, हें उपयोगी नाहीं. येथील मर्जीनें व्हावें, हें उत्तम असें. कांही मर्जीनें चालतात, कांही ओढितात, केवळ ओढीत नाही. प्रसंग पाहून बोलणें नाही तरी चालतें हेंही तूर्त बरेंच आहे.
मेस्तर इष्टोर सरकारचे ममतेचा आहे. येथें असलियानें उपयोग. याजकरितां त्यांस व वालीस यास जनराल हुजूर पाठऊन देंत ते करणें. फार न ओढितां मर्जीने होईल ते करणें.
खासा स्वारी रणगडास रेवातीरी आली. रेवेचेठायीं भक्ती व कलकत्त्याची परवानगीही येणें याजकरितां तेथेंच च्यार दिवस रहावयाचे चित्तांत होतें. परंतु कारनेलीनें पुढें चालावयाविसी आग्रह केला. ते समयीच त्यांस सांगितले की, येथून कूच करणें, तेव्हा घाट चढून गेलियाखेरीज सोय नाहीं. फौजेस पोटास मिळाले पाहिजे, खानदेशचे सुमारे गेलियावरी च्यार रुपये पोटास मिळतील. याप्रों सांगितलें, तेव्हां मान्य केलें. हाली तापीपार जालियावरी पुढें जावयास आंदेशा करितात. सामान यावयाचें आहे, ह्मणतात. परंतु परवानगीची वाट पाहतातसें दिसतें. याचें बोलण्याचें प्रमाण नाहीं. पुढें तुची सलाह येईल तसें करूं. येथें पोटाचा मोठा पेच. शत्रू जवळ आहेत.
गाइकवाडाचा कारभार त्यांणी बिघडला. उभयतांचाही उपयोग चाकरीचा नाही व पैकाही नाहीं. ऐसें असोन याचीच रुष्टता हरएक विषयीं वाढून खटे व्हावें याप्रों याची रीत आहे. उपाय नाहीं !
ऐकूण कलमें पांच तुह्मांस कळावीं याजकरितां लिहिली असेत. समजोन, समय पाहून, बोलावयांचें तेंच बोलणें. सरकारचा उपयोग नाहीं, बोलून नाश, ऐसें असलियास न बोलणें. संमंध याप्तीच पडला आहे. जाणिजे. छ २६ रमजान. हैदर अल्लीखान याचे पत्राची नक्कल तुह्मांस पाहावयाकरिता पाठविली असे. छ मजकूर
लेखनावधि.