Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक १४६.


१६९८ चैत्र शुद्ध १०.

राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि :-
सुाा सन सीत सबैन मया व अलफ. फितुरी व धवशाजवळ कारनेल किटिण कूच करून जातात. धवशाकडील राजकारण लागलें आहे. त्याची वाट आठ दाहा दिवस पाहावी लागते. तिकडील राजकारण होतें न होतें. याजमुळें फौजेचा जथ राखिला पाहिजे. इंग्रज तरी कूच करून जातात. मुंबईचा हुकूम यांस एका महिन्याचा. त्यास, महिन्याचा दिवस तीन चार बाकी आहेत. दोन चार दिवस आह्मीं यांजवळ रजबदल करून मागितलें. येकूण सात आठ दहा दिवस आह्माजवळ राहावें, अैसा करार करून घेतला असतां, मध्येंच कूच करून जाऊं लागतात. कारण कीं, फत्तेसिंगाकडील ऐवज यांजकडे दाहा लक्ष पैकीं सरकारांत सवासाहा लक्ष पावला असतां दाहाची पावती मागतात. न द्यावी तरी दबावून कूच करून जातात. पेंचामुळे उपाय नाहीं. दहा दिवस राहावें ऐसा करार करून घेतला असतां, पावतीची अडणूक दाखवून मध्येंच कूच करून जातात. सबब पावती देणें प्राप्त जाहालें. अडऊन पावती घेतली. जनरालास व तेथील कोशलदार तुमचे मायेचे असतील त्यांस समजाऊन ठेवावें. अद्यापि पावती दिल्ही नाहीं. परंतु आज उद्यां निकडच पडली तरी द्यावी लागेल. जोंपर्यंत चुकेल तोपर्यंत देतच नाहीं. इलाज नाहीं तेव्हां द्यावी लागेल. कांहीं तपसील लाऊन देऊं. यास तरी फत्तेसिंगाकडून तेराची भरती ह्मणोन फत्तेसिंगाकडील कारभारी दोन तीनदां बोलले होते. हे दाहाच पावले ह्मणत होते. तीन वरते घेतले असतील. दाहांत साडेसाहा आह्मांस पावले. साडेतिहीची तफावत. लाख पन्नास हजारही नव्हेत. किती रुपये आह्मी द्यावे. आमचे लस्कर उपाशीं मेलें. आह्मांस व आमचें जनावरांस देखील चंदी मिळतां संकट. सांप्रत पाव चंदी देतों. ऐश्या समयांत हेही रुपये हातीं येत नाहीं. रुपयाविसीं दैवयोगच नाहीं. असो ! येविसी तोड कशी करावी तें तुह्मींच विचार करून लिहिणें. तेथें प्रयत्न होईल तो करणें. हजुर आल्यापेक्षां तुचें तेथें रहाणें बहुत उपयोगी आहे. सांप्रत आह्मांस जनरालाचें येथें येणें. जें देतील तेंच समजून राहाणें. नर्मदातीर भडोच आहे. तेथें राहाण्याचें मानस आहे. शहरापासून पावकोस अर्धकोस राहावेंसें मानस आहे. अथवा पेठेंत बनल्यास राहूं. सर्व भरंवसा त्याचा आहे. काय करितील ते करोत. सर्व हकीकत त्यांस जाहीर करावी. त्यासी प्रतारणा करावयाची नाहीं. जर धवशाकडील राजकारण सिध्द जाहालें तरी श्रीकृपेनें जाहालेसें समजतों. व्हावेंसें दिसतें. परंतु होईल तेव्हां खरें. आतां सर्व आशा सोडून तीर्थवास तरी करावा. जितकें खर्चास मिळलें तितक्यांत संवसार करावा. व्याप करून फळ नाहीं, तेव्हां कशास करावा ? फिरंगी गोवेकर यांजकडीलहि राजकारण आहे. बनलें तरी करितों. हाही मजकूर त्यांचे कानावर घालणें. परंतु सर्वांध्ये श्रेष्ठ अंगरेज. त्यांस सामील करून शत्रूची पारपत्येंहि निमे जाहलीं असतां, फिरोन हिसका बसला. तेव्हां वैराग्य ही प्राप्त जाहालें. तुह्मी ल्याहाल तसें केलें जाईल. शत्रूचें हातीं न जावें इतकेंच पुरें. तीर्थवास, उत्तम स्थल, इतकें मात्र पुरें. जाणिजे. छ ८ सफर.

श्रीसांब: सपुत्रो ४.

लेखांक १४५.


१६९८ चैत्र शुद्ध ६.

राजश्री लक्ष्मण आपा :-
सु॥ सीत. आजपर्यंत पत्रें लिहीत गेलों. तुह्मांस पावलीच. उत्तरेही आली. सेवटी निदानीं हे फळ दृष्टीस आलें. आतां काहीं तोड दिसत नाहीं. आपटणानें आमची व जनरालाची व कोशलदारांची आबरूच घेतली. आह्मी तरी सर्वस्वें बुडालों. गुजरात अमदाबादेखेरीज सोडविली होती तेहि हातची गेली. परम दु:ख ! काय ल्याहावे ? असो ! सांप्रत येकदोन पर्याय लिहिले आहेत. त्यांची उत्तरें जलद यावी. याप्रों तऱ्ही निदानी जनराल कोशलांनी करावें. पत्रीं काय लिहावे ? तथापि लिहिले असे. तूर्त जनरालाचे भेटीसच येतों. जनरालाची पूर्ती ममता व पुढे जनरालास भांडेस पाडून आपले काम करून घ्यावें. त्यास, त्याचे हाती कांही दिसत नाही. जप्ता आपटणानें ठराव केला तसेंच त्याणीं लिहिलें. तोडमोड देखील नाहीं. पुढे आह्मीं तेथें राहिलों तेव्हां दुसरा हुकूम आला कीं यास चौकीची माणसे देऊन पुण्यास पाठवणें. तेव्हा याणीं त्यास साफ ल्याहावें कीं, आमचे घरी जो येईल त्यास दुसऱ्याचे हातीं देणेंच नाहीं. हा दस्तुर इंगरेजी नाहीं. तरी आमचा बच्याव होऊन भडोचेसच चार साहा महिने विलायतेचा हुकूम येई तोपर्यंत पोटाची बेगमी करून ठेवावी, शागीर्दपेशा व हत्ती, घोडे मिलोन दरमहा तीस हजार तऱ्ही पाहिजेत. यांत त्यांची मर्जी. खर्चाविसी काय ओढावें ? परंतु शत्रूचे हातीं परिछिन्न देऊंच नये. निदानी यांचा उपायच नाहीं. लक्ष दोन लक्ष. निदानी कर्जवाम तरी देऊन हैदराकडे तऱ्ही पोहचतें करावें. हरयेक बहाना करावा. मागें बळ राहील त्यासही पोहाचाऊन द्यावें. पुढे कपालीं असेल ते होईल. कलम १ आंगरेजाप्रों थोर बलकट नाहीं ह्मणोन त्यांचा पक्ष केला. सेवटी आमचें कपाळानें घालविलें ! येविसी जनरालास काय शब्द ठेवावा ? दैव आपलें ! वारंवार जनरालास छळू नयें. दैव असेल तसे होईल. कलम कित्ता.

दहा लक्ष सिबंदीसुद्धा बारभाई देतात. इतक्यांचेच परगणे डबाई वगैरे रेवातीरी द्यावे. तेव्हा त्यांतच गुजराण करूं. दुसरा काय इलाज ? निदानीं काशी प्रयागाकडे लाऊन द्यावे. याप्रों आपटणास लेहून करवावें. कपालीं नसल्यास मग लटके हव्यास कशास करावे ? पण शत्रूचे कबजात राहणे यापेक्षा जीव जाईल तर बहुत उत्तम ! कलम १

आज मारवाडांत निघोन गेल्यास वाट फुटेल. हजार पांचशे दोनसें चाकरीस तऱ्ही येतीलच. परंतु तुमचे लिहिल्यावरून यांकडेच आलों. यांणी स्वस्थता करून ठेवावें. निदानीं हैदराकडे खर्चास देऊन पोहचवावें. कलम १.

सवासहा लक्षाचे जवाहिर गाहाण पूर्वी ठेविलें ते माघारे आमचें आह्मांस द्यावें. यास खर्चासही द्यावयाचें न होय, तरी साहा लक्ष गाहाण घेऊन, पांच चार लक्ष खर्चास देऊन, हैदरखानाकडे पोहचतें करावें. काम न जाहलें तेव्हां जवाहीर आमचें माघारे देतील. बेईमान नाहीत हे तर खातरजमाच आहे. कलम १.

निदानींचे पक्ष लिहिले आहेत. वाचून प्रसंगानुरूप बोलणें. आह्मांस परम भय सांप्रात जाहालें कीं, याच्याने किमपी हुकूम आपटणाचा मोडवत नाहीं. पुढें हे तरी परस्वाधीन. काय करितील न कले. तेव्हां आबरूवर आलें, त्यापेक्षा प्राण जातील तरी बरें. आबरू शत्रूचे हाती न जावीं. वरकड जे दैवी असेल तसेच समजून राहूं. सर्वस्वें बुडालों ! आता इतकीच इच्छा राहिली. जाणिजे. छ ४ सफर, चैत्र शुध्द शष्टी, सोमवार.

(लेखनावधि:)

लेखांक १४४.

१६९८ चैत्र शुद्ध ६.

निदानीचे पक्ष लिहिले आहेत. वाचून प्रसंगानुरूप बोलणें. आह्मांस तर भय प्राप्त जाहले कीं, याच्यानें किमपि हुकूम अपटणाचा मोडवत नाहीं. पुढें हे तरी परस्वाधीन. काय करतील न कळे. तेव्हां आबरूवर आलें, त्यापेक्षां प्राण जातील तरी बरें. आबरू शत्रूचें हाती न जावी. वरकड जें दैवो असेल तसेच खाऊन राहूं. सर्वस्व बुडालों.आता इतकीच इच्छा राहिली. लौकर बोलून पक्के करणें. त्याची हिंम्मत काहींच नसली तरी भेट घेऊन, लागलेंच खर्चाची काही बेगमी करून, होनावराकडे हैदराकडे पावते करावे. बोलून ठेवणे. रूबरूही येविसीं बोलणें होईलच. जाणिजे. छ ४ सफर.

(लेखनवधि:)

श्रीसांब: सपुत्रो ४.

लेखांक १४३.

१६९८ चैत्र शुद्ध ६.

अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसी:-
सेवक रघुनाथ बाजीराऊ प्रधान नमस्कार. सु॥ सीत सबैन मया व अलफ. 

फत्तेसिंग गायकवाड याजकडील ऐवज सरकारांत द्यावयाविसींचा मजकूर जनरालाजवळ बोलिलों. त्यांणी ऐवज द्यावयाविसी किटिणीस लिहितों ह्मणून कबूल केलें. लिहिलें असेल. त्यास, फत्तेसिंगबाबतचा ऐवज जिन्नस व नख्त जें असेल तें किटिणीजवळ मागोन घ्यावे. न द्यावयाविसी जनरालाचा आग्रह नाहीं, ह्मणून लिहिलेंत. त्यास, येथे किटिणीकडून गाईकवाडाबाबत नख्त तो एक पैसा देत नाहीं. कापड व जवाहीर मिळोन चाळीस पन्नास हजारांचे आले आहे. त्यास, जवाहिरास विकून फौजेस पोटास द्यावे, तरी जवाहीर कोणी साहुकार घेत नाहीं. चाळीस पन्नास हजाराचें जवाहीर व कापडे याणें फौजेस दुजोरा पुरणार नाहीं. जवाहीर गाईकवाडाबाबत गाहाण ठेवून कोणी ऐवज देईल तरी पाहूं. एकंदर ऐवज देत नाहीं. फार पुसिलें तरी दिक्क होऊन परवानगी आणवितों, अथवा खर्च जाहला, ह्मणतो. शुद्ध बोलतच नाहीं. ++ येथें सरकारचा ++ सरदार असावा. इंग्रज ++++ पाऊण लाख ++ घ्यावें. नाहीतरीं ++ पाऊण लाख रुपये घेऊन सर ++ लाख रुपये द्यावें.++ सरकारचा कमावीसदार ठेविला नाहीं. महाल पावणेदोन लाखांचा. यास इंग्रजांनीं लाख रुपये सरकारांत द्यावे. साल-मजकूरचें येणें. हा मजकूर जनरालासी बोलोन ते लाख रुपये मागोन घेऊन हुजूर पाठवणें. अगर, येथें किटिणीकडून देवावे ह्मणून परवानगी जनरालाची पाठवून देणें.

असो. अंकलेश्वर काहीं अंग्रेजास दिल्हें नाहीं. पाऊण लाख रुपये मात्र दरसाल द्यावें, असा करार आहे. तोटानफा सरकारचा. हेंच आह्मांस पुरवलें. त्याचा आग्रहच असल्यास एक लक्ष रुपये सरकारांत मागावें. कलम १

सारांश खुलासा मजकूर. हरप्रकारें पांच चार, तीन, तरी लक्ष रुपये पाठवावे. कांही कुमक तोफा माणूस देऊन इष्टूर पाठवावा व लढावयाची परवानगी यावी ह्मणजे सत्वर कार्यसिद्धी होईल. सरकारची कामें व जनरालाचीं. दुहेरी नफे होतील. आमची सर्व मदार जनरालावर आहे. सविस्तर बोलणें जसें पुढें सांगतील तसें करूं. परंतु खर्चाशिवाय फौज रहात नाहीं. नाकर्तेपण येते. कळावे हे विनंति.

सुरतकर मागलाकडून चवथाईचा ऐवज येत नाहीं. याविसी जनरालासी बोलणें त्यावरून जनरालाजवळ बोलिलो. तयास जनराल बोलिले कीं, मोगलाचा मुलूक लष्करामुळें चोळटला, त्यास भक्षावयाचें मानसीक; याप्रमाणें बोलिलें, ह्मणून लिहिलें त्यास येथें खर्चाची वोढ, फौजेस पोटास नाहीं, सबब दिलगीर. गाईकवाडाकडील ऐवज हि इंग्रजांकडून येईना. सुरतकराचा हा तपशील. फितुरियांची फौज बारी उतरली. हरिपंतास ज्याबीतजंग घौशा मिळाला. तेव्हां ते जमलें. त्यांची फौज बारी उतरली. सबब, सुरतअठावीशींतील अंल झाडून उठला. रुपयास ठिकाण नाहीं. पोटाचा विचार काहीं सुचत नाहीं. सुरत अठ्ठावीशीतील सरकारचे परगणे व गायकवाडाकडील परगणे येथे ऐवज नेहमी नेमणूक आहे त्याप्रमाणें परगणियांतून पावला. ज्याजती व यंदा घेतला. १

दोन लाख रुपये येथें इंग्रजांनी कर्ज देतों ऐसें इंग्रेजांनी किटीण व हो दोघांनी हि- कबूल केले आहे, ह्मणोन तुह्मास लिहिलें. परंतु बोलिलें मात्र, पैसा एक दिल्हानाहीं. पुढेंहि मिळत नाहीसें दिसोन आलें. कलम १

सुरतेतील मोगलांने सालमजकुरी जाजती व ऐवज दर परगण्यांत घेतला. कोठें नेमणुकेप्रमाणें घेतला. कमी तरी कोठेही घेतला नसेल. परगरे चोळटले तरी त्यांस काही तोटा नाहीं. सरकारची व गायकवाडीची मात्र नुकसानी. त्याचा ऐवज गुंतला आहे तो घेऊन जाजती व घेतला. याप्रमाणें रुजू करून देऊं. जनरालांनी इतबारी पाठविल्यास होईल. गंभीर मात्र त्याजविसी लिहीत असतील. त्याचा अर्थ तर्काने समजावा. ऐवजाचा नफाच त्यास जाहाला. सरकारचा व गाईकवाडाकडील चौथाईचा अंमल सुरळीत होत नाहीं. पन्नास रुपये देऊन शंभराचे कबज मागतो. यास्तव आह्मी ऐवज घेत नाहीं. अगदी वसूलच पडला नाहीं.

श्री.

लेखांक १४२.

१६९८ चैत्र शुद्ध २.

राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यासि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. धौशाकडील राजकारण आलें आहे. हा मजकूर पहिलाही तुह्मांस लिााच आहे. व हालीहि अलाहिदा पत्री लिाा आहे.कळेल, तात्पर्य, मोगलाचें राजकारण अंगरेजाचे मध्यस्तीखेरीज बनत नाहीं. याविसीं मागें कच्ची खातरजमा अंगरेजाकडून जरूर आली पाा. याचा प्रकार जनरालासी फार समजोन बोलणें. जनरालाकडून कार्य आमचें सेवटास जाईना. आपटणानें गुंता पाडिला ह्मणून मोगल अनुकूल करून घेणें प्राप्त जालें. व मोगल मागेल ते देणें प्राप्त. याचा संशय कदाचित जनरालाचे मनांत येईल कीं, आपले मध्यस्तीनें मोगल अनकूल करून देविल्याने श्रीमंत व मोगल येकत्र होऊन फितुरियाचें पारिपत्य करितील, आपण अभिमान धरिला असतां आपल्याच्यानें काहीं जाले नाहीं, तेव्हां आपल्यास श्रीमंतांनींजें देऊं केलें आहें तें प्राप्त होणारनाहीं,कंपनीचे सरकारचा नफाआपटणांनी फितुरिरयापासोन ठाऊन घेतला असले तोही बुडेल, तेव्हा मोगल अनुकूल श्रीमंतांस करून देणें वाईट. असे चित्तांत आणून मोगलाचे खातरजमेविसी जनराल आमचे अनुकूल होणार नाहीं. अशी उगीच आशंका चित्तांत आली. ह्मणून हा मा।र तुह्मांस कळवयाकरितां लिाा असे. तरी असी आशंका तरी जनरालाचे चित्तांत न ये आणि मोगलाचे राजकारणाचे खातरजमेस जनराल अनुकूल होत, तसे तऱ्हेनें बोलोन धौशाची व निजामअल्लीची खातरजमा अलाहिदा लिाा प्रमाणें करीत तें करणें. तुह्मी शहाणे व आमचे यख्तीयारी आहां. न तुटतां तोडजोड होईल तें करणें. जाणिजें. छ ३० मोहरम. ब्रहस्पतिवार.

(लेखनावधि:)

श्रीसांब: सपुत्रो ४.

लेखांक १४१.

१६९८ चैत्र शुद्ध १.

राजश्री लक्ष्मण अपा :-
सु॥ सीत. लौकर वाचून जनरालासी व आणिक मायेचे कोशलदारासी व इष्टोरासी बोलावे याविसीं मनन करून बोलणें.

इंगरेजी सरंजाम लढाईचा बंद. याजमुळें मनसुबा रुतणीस पडला. यास्तव नबाब निजामअल्ली व धवशाचें राजकारण आह्मीं तयार केलें. त्याचीही अर्जी आहे. परंतु त्यास संवशय इंगरेजाचा आहे कीं, आह्मी श्रीमंताकडे जालों आणि बारभाईकडे अपटणाचे हुकुमावरून मुंबईकर इंगरेज जाहाले तरी मनसुबा सेवटास जाणार नाही. यास्तव जनरालांनी खातरजमा करावी कीं, आह्मीं रघनाथरावाचा पक्ष करूं, निदानीं बहुत संकट पडले तरी उगेच राहू. परंतु बारभाईचा पक्ष धरणार नही. असे लेहून द्यावें, ह्मणजे काम होते. विलायतेच्या हुकुमाचा पेच नाहीं. तो यावयास वर्ष पाहिजे. तोपावेतों बारभाईचीं पारपत्यें होऊन दौलत कायम होईल. सविस्तर बोलून पक्कें करून ठेवणें. येविसीं सुरतकर मोगलाकडून धवशाची खातरजमा करावी लागेल व देऊं, करूं तें देतील. येविसीही खातरजमा करावी. पुढें त्याजकडून तफावत होईलच, तेव्हां माघारे यावयास येईल. येविसी सविस्तर बोलणें. कलम १

खर्चास नाहीं, ह्मणजे वारंवार तुह्मांस लिहिलें. फत्तेसिंगाकडील ऐवजाविसीं लिहिलें. त्यावरून जनरालासी ताकीद करणें आली की पावती पाठवून देणें. त्यावरून गळीं लागले आहेत. सा। लक्ष भरणा कमपेश जाहाला, आणि दहाची पावती मागतात. इतके दिवस मनास येईल तसा रुपया उखळला. सारे इंगरेज एकमत होऊन एक साक्ष देतील. आह्मी तरी परिछिन्न पावती देत नाहीं. मनसुबा तरी, उरावर शत्रु. तशांत यासी वाद सांगणें प्राप्त. पावती द्यावी तरी च्यार लक्ष रुपये बुडवावे. येविसीं तोडजोड बोलून त्याचा कोणी इतबारी आल्यास आह्मांस चैन पडेल व च्यार रुपये मिळतील नाहींतरी नित्य कटकट कोठप रिंयत करावी ? त्यास तरी लोभामुळें सुचत नाहीं. दुसरा कोशलदारांतील अथवा गारडीन कोणी येता तरी आह्मांस पेच न पडता. तूर्त दुहीरी पेचांत आहों. येविसीं वारंवार किती ल्याहावें ? कलम १

सर्व भरंवसा जनरालावर आहे. परंतु त्याच्या बंदीमुळें दुसरी राजकारणें करावी लागतात. येविसीं हस्ते परहस्तें आमचें काम करूं, ऐसें पूर्वी जनराल तुह्मांसी बोललेच असतील. त्याच्या दस्तऐवजावर धरून बोलणें. जाणिजे. छ २९ मोहरम.

(लेखनावधि:)

श्रीसांब: सपुत्रो विजयते.

लेखांक १४०.

१६९७ फाल्गुन अखेर.

राजश्री लक्ष्मण आपाजी यांसि :-
सुहूर-सन सीत सबैन मया व अलफ. अपटणानें तह केला, हा शेवटास जाणार नाहीं. श्रीमंतांचा तह पडल्यासिवाय साऱ्या दौलतीस चैन नाहीं. बारभाई थकले. फौजे द्यावयास रु।। नाहीं. बहुत हैराण जाहाले. यास्तव कांही तह पाडावा, ऐसें, हरि फडके व आपा बळवंत वगैरे फौजेसमीप आहेत, या सरदारांचे मनांत आलें आहे. बातमी खरी आहे. अमदाबाद द्यावी, निदानीं सारी गुजराथ द्यावी, आणि तह पाडावा, ऐसें आंत घाटतात. येविसीं त्यांनी पुणियाकडेही लिहिले असेल. अपटणाचें संमत घेऊन आह्मासी बोलतील, ऐसें तह-कीक बातमींत वर्तमान आलें. त्याजवरून हें आगाव पत्र तुह्मांस लिहिलें असे. गुजरातेवर तह करावा किंवा न करावा ? गुजरातेपैकी दोघे गायकवाडांचा कारभार पुणियास ठेवितील. सरंजाम्यांचे महाल आहेत. त्याविसीहि सलोखा करतील. तेव्हा थोडकेंच राहील. बहुतकरून इंग्रेजांनी निवडक परगणे घेतलेच आहेत. तेव्हां दहा पांच सात कोठें निव्वळ राहतील हें कळत नाहीं. आमचा भाव कीं, इंग्रेजास हुकूम बंगालियाचा अर्धा तरी आलाच आहे, बाकीहि श्रीकृपेनें येईल. विलायतेचाहि येईल. याणीं सारीच दौलत आमची कायम करून द्यावी, ह्मणजे आमचे नफे व इंग्रेजांचेही नफे आहेत. पुढें मोगलाचें पारपत्य करावें. त्यांत चवथाई देऊं. आमचे सरंजामी हरामखोर आहेत. त्यांचे पारिपत्यास अनकूळ असावें. तेथें दहला देऊं. एकूण इंग्रेजाचे बहुतच नफे. आमचे तरी आहेतच, कदाचित तूर्त (पुढे गहाळ).

श्री.

लेखांक १३९.

१६९७ फाल्गुन वद्य ७.

पारसी पत्र.

कारनेल अपटण यांस पत्र लिहिलें आहे त्याची नकल :-
तुह्मीं पत्र पाठविलें त्यांत तहाचा मजकूर लिहिला तो सर्व कळएला. ऐशास, आमचा व इंग्रजाचा तह जनराल व कोसल मुंबईकर यांचे मारुफातीनें कुंपनीचे मोहरेनसी करारमदार जाहाला तोच सर्वा इंग्रेजांनी सेवटास न्यावा. आह्मी कुंपनीचे सरकारांत करारमदार करून दिल्ह्याप्रो आमलांतही आणून दिल्हें. त्याजकडील आमचें कार्य राहिलें तेही तहनामियाप्रों सेवटास नेतील हाच भरंवसा आहे. कदाचित् तफावत दिसोन आलिया विलायतेस जाणें प्राप्त आहे. पेशजी परस्परें तह ठरला आहे, त्याखेरीज दुसरा मजकूर कसा घडेल ? तुह्मीं बंगाल्याहून आलेत, ते परस्परें फितुरियाकडे जाऊन त्यांचे सांगितल्याप्रों मनमानेसें लिहिलें, तेव्हां कबूल कसें करावें ? आह्मांजवळ येऊन, आमचेंही वर्तमान मनास आणून, मग जाबसाल करितां, तरी तुमची दूरदेशीं व वाजवीची चाल नजरेस येती. येक- पक्षींच ऐकोन, आह्मांकडील कांहीच मनास न आणिता लिहिले. त्यावरून अपूर्व दिसोन आलें ! त्यांणीं तहाचे मजकूर तुह्मांस सांगितले, त्यांतील दगाबाजीचे कुन्हे आहेत ते तुह्मांस समजले नसतील. सबब असें आह्मांस लिहिलें ते गोष्ट मंजूर पडणार नाहीं. छ २१ मोहरम.

श्रीसाब सपुत्रो ४.

लेखांक १३८.

१६९७ फाल्गुन वद्य ६.

पुाा रााा लक्ष्मण आपा :-
सु॥ सीत. आपटण व बारभाईकडून सलूखाचा पैगाम आला तो अलाहिदापत्रीं लिहिला आहे. त्यावरून कळेल. केवळच एक-कल्ली आहे. कैदेचा मजकूर आहे, हा आपटण समजला असेल किंवा नसेल. हजार राऊत व शागीर्द पेशा दोन-सें माणूस ते ठेऊन देणार. खर्च ते चालविणार. म्हणून उपकार. दाहा लक्षांतच सारें. परंतु त्याचीं माणसें ह्मणजे कैद, हें ते समजलेच नसतील. जनरालास सांगितल्यानें समजतील. त्यांचे मतें इंगरेजी काइद्याप्रों तीं माणसें आमचे हुकुमांत राहातील. तरी तसें नाहीं. कैदेचा प्रकार स्पष्ट दिसतो. दरमहा पंचवीस हजार ते धर्मादायाप्रों देतील तेव्हां देतील. ऐसा सलूख करून आम्हांस काय कर्तव्य आहे? दौलत करावी ह्मणोन अंगेराजाच आश्रय धरिला. त्यास, कैद ! तेव्हां दैव ह्मणावें ! तेव्हां हा प्रकार आह्मी कबूल करीतच नाहीं. जनरालही करणार नाहींतच. त्याची चर्चाच नाहीं. परंतु तहच करणें, तेव्हां भीमा, दुसरा गोदावरी, तिसरा गुजरात व तापी-उत्तर-तीर, देखील माळवा, ऐसें उत्तम, मध्यम, कनिष्ट प्रकारचा तह होईल तरी करावा. चवथा प्रकार तीन- ही होईनात, आह्मांजवळ तरी मसलत करावयास खजाना नाहीं, हैदर तरी पाठवीत नाहीं. चो महिन्यांनीं लक्ष आले तरी काय होणार ? तेव्हां एकटी गुजरात तरी निवळ आम्हांकडे असावी. परंतु हा तह पक्का नाहीं. गुतरातेंत गुजराण करून वर्ष दोन वर्षें राहूं. सारें दवलतीचा दावा आहे. तेव्हां याचा काट जनरालाचे हातून विलायतेस पक्का करावा. पातशाहा व कंपनी राजी करून, त्यांचा हुकूम हिंदुस्तानचे सारे जनरालास आणून मग आपले मनोरथ सिद्धीस न्यावे. गुजरात तरी फौजेचें व आमचें पोट भरावयास काल गुदराणीस पाहिजे. वरकड त्याणीं लिहिला प्रकार हा तर होणेंच नाहीं. याबद्दल मरण कबूल ! परंतु कैद पुरवत नाहीं ! निदानीं दहा लक्ष अंगरेज जनरालांनीं घेऊन आह्मांस रेवातीरीं भडोचेजवळ ठेवावें. रणगड बहुत मर्जीची जागा, तेथें राहून दाहाच घेऊं. परंतु त्यांचे कैदेंत राहाणें नाहीं. भडोचेजवळ रणगाडास राहूं. तेथे वर्ष दोन वरीस स्नानसंध्या करून काल नेऊं. राजकारणें विलायतेंतीलव हिंदची ज्यारी असतील, त्यांस अंगरेजांनीं मना करूं नये. अंगरेजाचे आश्रयानें राहाणें, ह्मणोन त्यांचे संमत पाहिजे. रणगड भडोचेहून सतरा कोस आहे. तेथेंच नेहमी राहूं. भडोचेहून साहित्य यावें. आह्मीही मजबुतीनें राहूं. दरमहा लक्ष रुाा ह्मणजे बारांत खर्च चालवूं. गुदराण करून राहूं डबाई वगैरे माहाल आहेत तो ऐवज बारांतच. हे केवळ कनिष्ठाहून कनिष्ठ प्रकार. परंतु तुटोंच लागले तरी जडावें, ह्मणोन तुह्मांस लिहिले आहेत. हे प्रकार जनराल त्यांसी पाहिल्यानें बोलतील तरी कांहीच होणार नाहीं. ते खचतील. यास्तव निदानींचा विचार होईल तरीच बोलावा. नाहीं तरी तोंडाची वाफ गमाऊं नये. याखेरीज सिबंदीचें कम-तरीन पन्नास साठ लक्ष देणें आहे. याची वाट जाहाली पाहिजे. याचा विचार जाहला पाहिजे. कळावे ह्मणोन सविस्तर लिहिलें आहे. हा प्रकार कोणासींच बोललों नाहीं. तुह्मांस मात्र च्यार पांच पर्याय सलुखाचे लिहिले आहेत. तेही खजाना नाहीं, लाचार आहों, स कमतीचा सलूख करावा लागतो. नाहीं तरी हे गोष्टच बोलणे उचित नाहीं. जाणिजे. छ २० मोहरम.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १३७.

१६९७ फाल्गुन वद्य ६.

राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यांसि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. अपटणाचें पत्र आलें. त्यांत भाव, गंगातीरीं यावें, ऐसा आहे. त्यास, जनरलाचे विचारास आली तरी नाजूक मसलत आहे. त्यास, पक्केपणें जनरालांची व मुंबईकर सारे इंग्रजाची अनुकूलता मात्र असली पाहिजे. त्याचा कटकणा ऐसा करावा जे, दारमदाराचें बोलणें हें केवळ येक पक्ष समजोन होत नाहीं. तेव्हां अपटण याणीं त्यांचें वर्तमान ऐकिलें, तैसेंच येथें येऊन आमचें ऐकावें. त्यास, पल्ला लांब, याजमुळें दिवसगत लागती. सबब, ऐसीं तोड काढावी कीं, आह्मीं सारें इंग्रजसुद्धां फौजसह कुच करून खानदेशांत श्रीगंगातीरपर्यंत जावें, तेथें अपटण यांनीं तिकडोन यावें, आणि सर्व मजकूर समजावे, उपरांतिक त्याचे आमचे बिचारें होईल तैसें करूं; नाहीं तरी आम्हांस मुंबईस पोंहचवावें. ऐसें असासें. इतकियांत आह्मी इंग्रजसह घाटावर गेलों ह्मणजे देशांतील कितेक सरकारांचीं वगैरे राजकारणें आहेत त्यांचीं साधनें करून मेळऊन घेऊं. फौजहि जमा होईल. मुलूक मारून पोटासहि मिळेल. आमची मजबुदी जाली, ह्मणजे फितुरी सहजांतच पेचांत येतील. इंग्रजांसहि मेहनत पडणार नाहीं. मसलत सिद्धीस जाईल. परंतु या गोष्टीस इंग्रजांची अनुकूलता पक्की पाहिजे. कितेक राजकारणें येतील, त्यांत मातबरांची खातरजमाहि आंतून करावी लागेल. ही येक मसलत आहे. आमचा अभिमान धरून मसलत सेवटास नेणें व कांहीं अपटणांचेंहि मान्य करणें. त्यासहि साधन आहे. हा प्रकारहि बोलोन पाहाणें. फितुरी लबाड, कृत्रिमी, आह्मांस कैदेदाखल ठेवावयाची योजना करून अपटणांस अनेका प्रकारें समजावलें आहे. त्यांचा आंतील भाव बारीक अर्थ अपटणाचे ध्यानास आले नाहींत. सबब तुम्हीं जनरालापासून त्यास सुचवावें आणि या प्रकारची मसलतहि जनरालास कळवावी. हे अपटणास समजों न द्यावें आणि मसलत मारावी. हाहि कटकणा आहे. तूर्त अपटणानीं लिहिलें, हें तरी प्रत्यक्ष डौल कैद करावयाचा आहे. तेव्हां इंग्रजाचे घरीं आह्मी आलों असतां त्याचे श्वाधीन आह्मांस करून कैद करवितात हे गोष्ट त्यांचे अभिमानास उचित की काय ? फितुरियांनीं कृत्रिम करून बाह्यात्कारें दाहा लक्षांचा खर्च चालवितों, ऐसें समजाविलें. इंग्रज आम्हांपासून गेले ह्मणजे ते आपले खेळास चुकणार नाहींत. हे सर्व अर्थ तुम्हांस माहीत आहेत. येविसीं विस्तर कोठवरी ल्याहावा ? सर्व मदार जनरालावर आहे. प्रसंगास तुह्मी तेथें आहां. कळतील तैशा तोडजोडी बोलाव्या. इकडेहि वरचेवर कळवीत जाणें. जाणिजे. छ २०
मोहरम.

(लेखनावधि:)