Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्रीशंकर.

लेखांक ८९.

१६९४ आषाढ वद्य ७.

श्रीमत् राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक भगवंतराऊ शंकर कृतानेक सां । नमस्कार विज्ञापना. भवानी नाईक राक्षे श्रीगोंदकर व गोपाळ नाईक राक्षे या उभयतांच्या भाऊपणाच्या वांटियाचा कजिया आहे. त्यास, भवानी नाईक यांस आम्ही जामीन जालों. मुदतीस न आला सबब त्याचें कर्ज मातुश्री सकुबाई सिंदे याजकडे आहे. रुपये ४०००० चाळीस हजार आहे. तो ऐवज उभयतांचा कजिया विल्हेस लागेतों. नाईकमजकूर यांस ऐवज देणार नाहीं. स्वामीची आज्ञा येईल तेव्हां देऊं. ज्यास ऐवज देवाल त्यास देऊं. मित्ती शके १६९४ नंदननाम संवत्सरे, आषाढ वद्य ७ सप्तमी. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

श्री मार्तंड भैरव.

लेखांक ८८.

१६९४ आषाढ वद्य ७.

श्रीमत् राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक भगवंतराऊ शंकर कृतानेक सां । नमस्कार विज्ञापना. भवानी नाईक राक्षे श्रीगोंदकर व गोपाळ नाईक राक्षे या उभयतांच्या भाऊपणाच्या वांटियाचा कजिया आहे. त्यास, भवानी नाईक यांस आम्ही जामीन जालों. मुदतीस न आला सबब त्याचें कर्ज मातुश्री सकुबाई सिंदे याजकडे आहे. रुपये ४०००० चाळीस हजार आहे. तो ऐवज उभयतांचा कजिया विल्हेस लागेतों. नाईकमजकूर यांस ऐवज देणार नाहीं. स्वामीची आज्ञा येईल तेव्हां देऊं. ज्यास ऐवज देवाल त्यास देऊं. मित्ती शके १६९४ नंदननाम संवत्सरे, आषाढ वद्य ७ सप्तमी. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

श्री.

लेखांक ८७.

१६९२ मार्गशीर्ष वद्य ५.

नकल.

राजामन्य राजश्री भास्कर बल्लाळ गोसावी यांसी :-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सु।। इहिदे सबैन मया व अलफ. तीर्थस्वरून राजश्री दादासाहेब यांजकडील अनुष्ठानें आनंदवल्लीस नेहमीं चालतात. त्यांपैकीं येक अनुष्ठानाची वर्णी वो राजश्री नारायणभट घैसास, वास्तव्य श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, यांजकडे नेहमी सांगणें. जाणिजे. छ १९ साबान. आज्ञाप्रमाण.

श्री.

लेखांक ८६.

१६९०.

यादी राजश्री दादासाहेबांकडे कर्ज आमचे मारफतीचें. सु॥ तिसा सितैन मया व अलफ.
रु.
१०००००     रुद्राजी गिरमाजी.
  ३००००     किता रुद्राजी गिरमाजी.
  ३००००     सदाशिव अंबादास.
    ९०००     दहीवेलीची मामलत अजमासें.
  १५०००     किता नांवाचें स्मरण नाहीं.
---------
१८४००
   २५०००    शिदाप्पाशेट वीरकर.
----------
२०९०००

श्री.

लेखांक ८५.

१६८९ कार्तिक वद्य १२.

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि:-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधाननमस्कार उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. शिंदे येतात येतात ह्मणून तुह्मी बोलत गेला व त्याचीं ही पत्रें च्यार महिने येतों येतों ह्मणोन येतात; परंतु हा कालपर्यंत त्यांचे येणें होत नाहीं. कारभार तो जाला पाहिजे. हिंदुस्थानांत फौजा जाऊन बंदोबस्त व्हावा लागतो. त्याणीं विलंब लाविला तर कोठवरी वाट पहावी ? जरी आठा रोजांत सत्वर येत असिले तर उत्तम. यावें. नाहीं तरी करणें तसें करावें लागेल. जाणिजे. छ २९ जमादिलाखर, सु।। समान सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? विसा दिवसांत त्यांनीं निघोन चालते व्हावें. तें जर जाहालें नाहीं. अद्याप निघावयाचें वर्तमान कळत नाहीं. यास्तव लवकर काय तें कळावें. दोहींकडून काम बुडवावें हें ठीक नाहीं. उत्तर रवाना सत्वर करणें. जाणिजे. छ मजकूर. बहुत काय लिहिणें ?

(लेखनसीमा.)

श्री.

लेखांक ८४.

१६८९ कार्तिक वद्य ११.

चिरंजीव राजश्री राय यांसि :-
रघुनाथ बाजीराव आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. मौजे साकोरें, पो माणिकपुंज, हा गांव राजश्री त्रिंबक सूर्याजी यांजकडे आहे. तो त्याकडे चालवावा, येविसीचा करार सालमजकुरीं सन समान सितैनांत झालाच आहे. तर, आपलेजवळ मानिलेचे गांवाविसीं कोण्ही घालमेल करील, तर त्याचें न ऐकावें. मारनिलेकडेच सुदामत चालत आल्याप्रों सुरळित चाले तें करावें. राजश्री चिंतामण हरि मौजेमजकुरास उपद्रव करितात. त्यास ताकीद करावी. रा। छ २४ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.

श्री.

लेखांक ८३.

१६८९ आषाढ शुद्ध १०.

राजश्री अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेह केदारजी सिंदे. दंडवत सु॥ समान सितैन मया व अलफ प॥ सिंदखेड येथील अंमल तुम्हाकडून दूर करून साल मजकुरापासून राजश्री यांजकडे सांगितला असे. तरी तुम्ही दखलगिरी न करणे. मारनिले अंमल करतील. पा। मजकूरची ठाणीं असतील तीं यांचे स्वाधीन करून कबज घेणे. जाणिजे छ. ९ सफर बहुत काय लिहिणे ? हे विनंती.

(मोर्तब सुद)

श्रीजोतिस्वरूपचरणि तत्पर तुकोजीसुत केदारजी शिंदे निरंतर

श्री.

लेखांक ८२.

१६८९ आषाढ शुद्ध १०.

राजश्री कमाविसदार पा। सिंदखेड यांसि:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। केदारजी सिंदे दंडवत. सु ।। समान सितैन मया व अलफ. पामजकूर येथील अंमल पेशजीचे कमावीसदाराकडून दूर करून सालमजकुरापासून तुह्मांकडे मामलत सांगोन रसदकरार २२००० बावीस हजार करार केले असेत. तरी माहालीं अंमल बसलियावरी भरणा करून कबज घेणें. यासो। मामलतसमंधे कलमें.

(श्रीजोतिस्वरूपचरणिं तत्पर तुकोजीसुत केदारजी शिंदे निरंतर)

रसदेचा ऐवज फि- व्याज एकोत्रा शिररेतों पर्यंत मामलत स्तेप्रो मजुरा प- काढूं नये कलम. १ डेल. १ आल्फ फितूर मुलूक सिबंदी माहालमार शिरस्तेप्रों मजुरा पेशजीप्रों मजुरा देऊं कलम. १ पडेल. कलम १ येणेंप्रों च्यार कलमें करार केले असे. तरी इमानेंइतबारें मामलत करून, कच्चा हिशेब समजावीत जाणें. जाणिजे. छ ९ सफर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

(मोर्तब सुद) बार.

श्री.

लेखांक ८१.

१६८८ ज्येष्ठ वद्य १.

राजश्री रामाजीपंत यांप्रति :-
बापूभट आशीर्वाद उपरी. लेह्यास कारण कीं, श्रीमंत चिंतो विठ्ठल तात्या यांनीं चादशीचायी राम आह्मांस दिल्हा. त्याचा चकनामा व नारो शंकर यांचें पत्र वेदमूर्तीस देणें, ह्मणून अलाहिदा तुह्मांस आला. त्यावरून तुह्मी दोन पत्रें आह्मांस पाठविलीं. कळावें ज्येष्ठ वद्य प्रतिपदा चंद्रवार, बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.

श्री.

लेखांक ८०.

१६८८ वैशाख वद्य ३.

राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि :-
उपरी मोरो नरहरी यांस जामीनाविसीं तगादा जाहाला आहे. त्यास, मारनिलेकडे गुंता नाहीं. तरी तीर्थरूपास विनंति करून सोडून देवणें. म्हणून तुम्हांस पूर्वी लिहिलेंच होते; परंतु त्यास अद्यापि सोडिलें नाहीं. जामीनाविसींच अटकाव असिलाच तर तुम्ही दरम्यान होऊन यांस सोडणें. कदाचित् यांजकडे मुद्दाच लागू जाला तरी याजपासून जाबसाल करून घेतला जाईल. हे मुलूख फोडून कोठें जाणार आहेत ? तरी तीर्थरूपाचा कागद देऊन सातारियास लाऊन देणें. हें पत्र कोणास न दाखविणें. लिहिल्याप्रों करून आपल्या जिम्मा करून घेणें. जाणिजे छ १७ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ?

(लेखनसीमा.)