Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक १०७.

१६९७ कार्तिक वद्य ४.

राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यासि :- सु॥ सीत सबैन मया व अलफ. नबाब निजामअल्लीखान यांचे सूत्र हुजूर आहे. परंतु फितुरीयांकडे त्यांचे लक्ष. त्यास जनरालाचें पत्र नबाबास जावें कीं, आह्मी श्रीमंतांचा प्रतिपक्ष करितो, तेव्हां तुह्मी श्रीमंतांचे नोकरांसी मिळोन जुंजास येणें हे गोष्ट उचित नाहीं, याजकरितां आपण फुतरि यांचा पक्ष सोडून श्रीमंतांचा उपयोग तें करावें, यांत उत्तम आहे, असें असोन आपण त्यासी मिळोन जुंजास येतील तर आह्मांस जुंजणेंच प्राप्त आहे. चिंता नाहीं, उचित ते ध्यानांत आणावें. याप्रों पत्र गेलियानी कांही उपयोग पडला तरी पडेल. फितुरि यांचा पक्ष सोडतील, ऐसें दिसतें. याजकरितां याप्रों ल्याह्याचें जनरालाचे सेलस येत असलियास युक्तीने पुसणें. त्याचे सलेस येत नसलियास, अगत्य नाहीं, जाणिजें. छ. छ १७ रमजान.

लेखनावधि:

येथें कोसलदार :- 
१ मेस्तर द्रेपर १ मेस्तर मास्टम १ मेस्तर फ्लेचर, १ आशबर्नर १ मेस्तर रामसी १ गारडीन बसऱ्याहून आला त्यासही कोसलांत घेतात.

यास पत्रें सरकारांतून बहुमानाचीं यावीं. पत्रें आल्यानें यांस संतोष होतो व जनरालास ही फार गोड ममता पुरस्कर वारंवार येत असावीं.

इष्टोल यांस हजार माणसाची सरदारी जनरालानीं सांगितलीं. तें माणूस तयार होत आहे. पुर्ते तयार करावयासाठीं त्यास येथें बलाऊन घेतलें. अद्यापि येऊन पोहचला नाहीं. पोहचेल. तेथें जनरालाचे ममतेचे आखणी दोघेजण आहेत. 

१ मेस्तर हो १ मेस्तर हाटली हे दोन आहेत. यांजपासीं अधिक उणें आज्ञा करणें असेल ते करीत जावी. उभयतां आपले प्रीतीचे ह्मणून जनराल सांगत होते. त्यांत मेस्तर हटली शाहाणा, खबरदार, मातबर आहे. हजार माणसाचा सरदार आहे.

गोवेंवाले फिरंगी याजवळ सरंजाम तयार आहे, ह्मणून ऐकिलें. त्यास, त्याजकडे युक्तीनें गुप्त पत्र पाठवून त्याचा शोध करितां त्यांजला सरकारचे एक पत्र पाठवावयाची आज्ञा कीं, कितेक आज्ञा लक्ष्मण आपाजी यांस केली आहे, हे तुह्मांस कळवितील, उत्तर लौकर पाठवून द्यावें. व याअन्वयें पत्र पाठवावयाची आज्ञा. पत्रांत स्नेहभाव बहुत असावे. १

राजश्री बापू व रामचंद्रजी आशिर्वाद उपरी. दर कुचास व दर लढाईस कारनेलींनीं अडवून मागावें तेव्हां कूच करावें. लढाईस कमी केली ऐसे, ऐसी नाना प्रकारे नालिश जनरालास कोणी समजाविले ह्मणोन मास्तर होमाचे गुजारतीनें किटणीने श्रीमंतास विनंती केली, ह्मणोन विस्तारपूर्वक लिहिलें त्यास, कारनेल किटीण यांणी बावापिराचें पुढें मात्र माईकवाडाचे कारभारसमंधें जातखत लेहून दिल्हें असतां, करारप्रों निकाल न केला हे गोष्ट लहान मोठ्यास ठाऊक. हें मात्र जनरालासी बोलिलों. वरकड दरकुचांत अडवून मागितलें अथवा लढाईत कमी केली, हें किमपी आपण जनरालापासी बोलिलों नाहीं. कारनेलीची नालिश मात्र तिळमात्र केली नाहीं. जनराल व कारनेल व मी तिघेजण स्वस्तिक्षेम आहों. जनरालास पुसावें. त्यांणी नालिशी केली असें ह्मटल्यास कारनेलीनीं नाहक आमचा संशय धरून वाईट मानोवें ऐसें नाहीं. 

सखाराम हरीकडील जासुदासमागमें पत्रें रवाना केली असत.

श्री.

लेखांक १०६.

१६९७ कार्तिक वद्य ३.

शेवेसी लक्ष्मण आपाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान ता। कार्तिक वा। २ शुक्रवारपर्यंत मु।। मुंबई स्वामीचें कृपेंकरून यथास्थित असे. विशेष बंगाल्याचा जाब अद्यापि आला नाहीं. जनराल कोसलदार रात्रंदिवस प्रतीक्षा करीत आहेत. मुदतीची अवधि तरी जाली. परंतु पत्र येऊन पोहोंचलें नाहीं. प्रस्तुतचे दिवस मुदतीपेक्षां अधिक जात आहेत. साऱ्यांचे लक्ष पत्राकडे लागलें आहे. आठ रोजांत पत्रही येईल. इकडील विशेष वर्तमान पूर्वी सेवेसी लिहिलें आहे. अधिकोत्तर ल्याहावेसें नाहीं.

महाराजांची स्वारी नर्मदा-दक्षणतीरास आली हें वर्तमान रा। बज्याबा, चिंतो विठ्ठल, व बाळाराव नि॥ सिंदे, यांसि सेवकानें व त्याकडील आपाजी साबाजी येथे आहेत. त्यांणी लेहून पाठविलें आह कीं, तुमचे संकेताप्रों श्रीमंत नर्मदातीरास आले, सोनगडास पोचल्या दाखलच. अत:पर तुह्मी विलंब न करतां सत्वर जाऊन सामील व्हावें. इंग्रजाचा पक्का भरंवसा आहे. ऐसीं दोन पत्रें पाठविलीं आहेत. महाराजानींही तिकडून याचअन्वयें पाठवावयाची आज्ञा करोन, ते लवकर येऊन सामील होत तें केलें पाहिजे. बाबूजी नाईक चौघेजन गावल्यानें दहा हजार फौज येईल. गुंता नाहीं. आपाजी साबाजीस शरिरीं समाधान नाहीं, याजमुळें राहिलें नाहीं तरीं, यांसच पाठविलें असतें. अद्यापिही दोन चार दिवसांत किंचितसा उतार पडला ह्मणजे पाठवितो. जनराल यांची खातरजमा उत्तम प्रकारें करितील.

मुंबई सफा बारभाईचे हाती लागेल, ह्मणोन बहुत दिवस वार्ता आहे. सत्य मिथ्या न कळे. माहाराजांजवळ बातमी, असेल ते खरी, श्रीं करोत कीं, हे गोष्ट खरी न होत.१

बंगाल्यांतून काम होऊन येतें हा मोठा भरवसा यांस. हे सेवकाची खातरजमाही करितात. व सेवकासही याचे ह्मटल्यावरून भरंवसा वाटतो. परंतु हुकूम बंगालेवाले याचे हाती आहे. यास महाराजांनी फौजेचा जम पडेल तितका पाडावा. राजकारणानें येतील ते लौकर येतले करावें.

गोविंदराव गायकवाड यांस कसेंही करून समजून आणावयाची आज्ञा व्हावी. सरकारचे सरदार व फौज आहे ते न फाटल्यानें आणखी राजकारणानें बहुत येतील. जुने रुसोन गेल्यानें येणार मागेंपुढें पाहातील. यास्तव गोविंदरावसुद्धां सारे फौजेची एकत्रता राहेसी आज्ञा व्हावी. १

बज्याबा सिंदे वगैरे यांची राजकारणें. १

मेस्तर मास्तिनानें वस्त्रें घेतली नाहीं, बहुत आग्रह केला, तथापि पादशाही व कंपनीची आज्ञा नाहीं, ह्मणोन घेऊन मग सेवकाचे बिराडास पाठविलीं. बारभाईकडे लक्ष यामुळें न घेतलीं, ऐसा अर्थ नाहीं. सरकारचेंही ममतेत आहेत. १

श्री.

लेखांक १०५.

१६९७ कार्तिक शु. १

पु॥ राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यांसि :-
सु॥ सित सबैन मया व अलफ. 

अलाहिदा लिहिलें आहे तें जनरालाचे दुभाशास दाखऊन, त्याणें इंग्रेजी लिहिले त्यास दाखविल्यास तुमचे सांगितल्याचे दोष उडतील. लटीकवाद येणार नाहीं. व सरकारची मातबरी पोख्ती राहती. कारनेलीबराबर वाद केल्यास मातबरी राहात नाहीं, यास्तव पत्राची इंग्रेजी नकल करून त्याचे नजरेस पडे तें करणें. सुचक विचार लिहिला आहे, परंतु तुमचे युक्तीस येईल तसें करणें. तुमचे पत्रावर मोहर करून पाठविली दुभासियास प्रमा +++ सबब केली असे. जाणिजे. छ २९ शाबान.

(लेखनावधि:)

   श्रीसांब: सपुत्रो
(श्रीमत् रघुनाथराव)

लेखांक १०४.

१६९७ आश्विन वद्य ९.

रा। लक्ष्मण अपाजी यासि :-
सु॥ सीत.

मिस्तर होम आला. हा दोहींकडे समजाऊन
डाक बसवीलसें दिसोन येतें. यास्तव
कारनेलीची वाईट गोष्ट पत्त्याशिवाय
बोलूं नये. सांप्रत कारनेलावर वज्रहोम
आला आहे. आतां याच्यानें वेडें वांकडें
ओढवणार नाहीं. इतके दिवस ओढिलें,
तेव्हां कोणी दुसरा मुदई नव्हता. आतां
चिंता नाहीं. परंतु, मिस्तर होम त्याचे 
हि बरेंच च्याहातो व सरकार चे 
कामावर हि नजर आहे. यास्तव
कारनेलीसी वाद करूं नये. आपल्यास 
कामासी गरज.

खरी हि गोष्ट असाक्ष असिल्यास बोलूं नये.
तिची पंचाईत पडल्यास लटीक-वाद येईल.
पत्तेवार मात्र बोलावी.

कितेक तपसील रामचंद्र चिटणिसाचे
पत्रावरून कळतील. कारनेलीसी ओढूं
नये, म्हणोन लिहिलें. त्यास, आम्हीं 
गैरवाजबी तरी ओढीतच नाहीं. वाजबी 
हि कांहीं बोलतों. कांहीं किरकोळ बोलतच
नाहीं. सालढालीखालीं घालितों.

एकूण पांच कलमें लिहिलीं आहेत. जाणिजें. छ २१ साबान.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १०३.

१६९७ आश्विन वद्य ७.

पुरवणी राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसी :-

सु॥ सीत सबैन मया व अलफ.

कारनेल कीटिण याजकडे पहिली सरकारची उंटे दोनसें होती. त्याजवरी मनस्वी वोझें लादून खराब केलीं. ती मेलीं. हालीं बडोदियाहून कूच करोन यावयाकरितां पन्नास उंटे व साहासे बैल दिल्हें. ऐसे असोन, हाली शंभर गाडे प॥ डबाई येथील आणावयाकरितां दोनसे माणसें पाठविली आहेत. अगोदर तेथे राहून परगणा खराब केला. प्रस्थुत याप्रों। करितात. काहीं रीतीचा प्रकार राहिला नाहीं. कजीया करावा तरी दूर पहावें लागतें. याजकरितां तेथून यास पत्र येऊन सरकारचे हुकुमासिवाय वर्तणूक न करीत तें करणें. सर्वविषयीं वोढकता. तुह्मांस वाकफगारी आहे. दिवसेंदिवस अधिक ओढितात. इलाज नाहीं ! येविसी जनरालास पुसावें. मसलत काय सांगील त्याप्रों करावें. तूर्त मसलत तोंडीं येऊन बैद जाहाली. फौज व सिपाई दळ आहे, त्यास दरमहा पांच लक्ष रु।। पाहिजेत. येथें तरी लक्षाची प्राप्त नाहीं. मोठें संकट पडलें आहे. कोठें इलाज चालत नाहीं.सिबंदीची नित्य कटकट पडली आहे. कसें करावें, तो विचार लिहिणें. जाणिजे. छ १९ शाबान. बहुत काय लिहिणे ?

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १०२.

पो छ २६ साबान
१६९७ आश्विन वद्य ५.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री लक्ष्मणपंत अण्णा स्वामीचे सेवेसी :-
पो रामचंद्र विठ्ठल कृतानेक दंडवत प्रणाम विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. आपण गेल्यादारभ्य पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी ऐसें नसावें. सदैव आपलेकडील वृत्त लिहीत जावें. इकडील वर्तमान तरी श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांची स्वारी बडोदियाहून निघोन छ ११ शाबानीं रणगडास रेवातीरीं येऊन दाखल जाली. श्रीमंत राव व सखाराम हरि गायकवाडाचे कारभाराकरितां मागेंच आहेत. आजपर्यंत खासा स्वारी या प्रांतें रहावयाचें कारण, सुरत अठ्ठाविशींत चिखल भारी, तोफा चालावयाचे संकट.

दुसरा प्रकार : गुजराथ निर्वेध करावी. बडोदे-अहमदाबाद घ्यावी, मसलती पुढे जाण्यास पृष्ठी बल, या अर्थे राहिलों. त्यास फत्तेसिंग गायकवाड याचा कारभार कारनेल किटीण यांचे विद्यमाने जाला. पंचवीस लाख ठरले. एक महिन्यांनी पंधरा द्यावे. दुसरे महिनियांत दहा द्यावे. जर पहिल्या हप्त्याचे पंधरा न आले तरी बडोदे घेऊन द्यावें. याप्रमाणें करार होऊन कारनेलीचें जातखत लेहून घेतलें. त्यास पहिले हफतियाचे रुपयेन आले. ऐवजाचे लोभास्तव केलें होतें तें न जालें. बडोदें घेऊन द्यावें, तेंहि किफायतच. त्यास, बडोदें घेऊन देईनात. तयाचा पक्ष करूं लागले. राजश्री गोविंदराव यासी करार केला होता कीं, पहिल्या हफत्याचे न आले ह्मणजे बडोदें घेऊन देऊं. त्यासही भरंवसाच होता कीं, फत्तेसिंगास रु॥ मिळत नाहींत, दिवस काढितो, वाइद्यास जिंकोन बडोदे घ्यावें, याप्रमाणें होता. त्यास दोन्ही गोष्टी कराराप्रमाणें न जाल्या. दुसरा हप्ता होऊन गेला; पहिल्यास ठिकाण नाहीं ! तुह्मीही माहीत या गोष्टीस आहां. आजपर्यंत साडेसहा लक्ष मात्र अजमासें सरकारांत आले. वरकड ठिकाण नाहीं. तेव्हा इकडून निकड होत गेली. रुपया न मिळे. तेव्हां गोविंदरायास हिस्सा दौलतेचा तिसरा देतों, तिसऱ्या हिशाचे रुपये त्याजकडे सोळा लक्ष सासष्ट हजार सासे ऐशी देऊं. याप्रमाणे मध्यस्ताचे तर्फेनें त्रिंबकजी भालेराव बोलून गेले. पट्टण वगैरे ठाणी, सलूकसुद्धां, सरकारांत द्यावीं, गोविंदरायाची समजावीस करावी, बोलिले. त्यास, गोविंदराव मान्य नाहीं. सरकारांतूनही दोन तीन लाखांची कबूल केली असतां, त्याणीं वोढून, कूच करोन महिपार गेले. फत्तेसिंगाकडून ठाणीं सरकारांत यावी, मग थोडेंबहुत सरकारांतून देऊन गोविंदरायास दाबून दबावून समजावीस करावी, तरी ठाणींही फत्तेसिंगाकडून येत नाहींत, हाली गोविंदरायाचेच हवाली करार, ऐसी दिक्कत करितात. सरकारचे रुपये दोहिशाचे ह्मणावे तरी, गोविंदरायानीं वसूल घेतला ह्मणून पर्याय लावितात. ऐवजास ठिकाण नाहीं पाहासोट हा महाल दरमहाचे ऐवजीं इंग्रजाकडे दिल्हा आहे. तो बक्षीस कोपिनीचे सरकारांत घ्यावा ह्मणजे फत्तेसिंगाकडील ऐवज व तिजाई वांटणी व चाकरी वगैरे जावसालाचें फडशे करोन देतों, ह्मणून कीटणीनें दरम्यान आड घातली. तेव्हां परगणेजकूरची सनदहि करोन, मध्यस्त बोलणार त्यांजवळ दिल्ही असतां रुपये देत नाहीत व गोविंदरायाचा विभाग देऊन त्याची समजावीस होत नाहीं. ऐवजाचे लोभास्तव व मसलतीचा उपयोग पाहून कारभार केला. त्याची गत ही केली ! हालीं आणखी अडीच लक्ष एक महिन्यानीं देऊं, ह्मणतात. गोविंदराव गेलेच आहेत. त्याणीं मुलकांत उपद्रव केला ह्मणजे तेहि ऐवज त्यांचे वसुलांत गेला, ह्मणतील. एवंच ऐवज नाहीं. पदरचे गोविंदराव फौजसुद्धा गेलें. फत्तेसिंगाचे चाकरीचा उपयोग नाहीं. कीटणीचा आश्रय करून बसले. चहूंकडून मसलतीस पेंच पडला. खर्चाची वोढ, लोकांचा गवगवा, तो लिहितां पुरवत नाहीं. अहमदाबाद घ्यावी, त्यास इंग्रजाचे नेट कमी पडलें. गोविंदराव उठोन गेला, तो शहरात गेला ह्मणजे भारी पडेल, याजकरिता आपाजी गणेश यांनी आपलेकडेच मामलत ठेवावी ह्मणून संदर्भ लाविला. तें कबूल करणें प्राप्त झालें. चार पांच लक्ष रुपये त्यांनी द्यावेसें केलें आहे. परंतु ठाणियांत सरकारचें माणूस नाहीं. तेव्हा त्याचा अर्थ कळतच आहे. ऐसें चहूंकडून गायकवाडाचे कारभाराचे वोडढण्यामुळें मसलत फसली. उपाय याजपुढें नाहीं. याजकरितां हे मजकूर जनरालासी बोलोन काय करावें तेसला पुसणें. ऐवज येत नाहीं त्यापक्षीं फत्तेसिंगाच महाल जप्त करून ४ रु. घ्यावयास येतील. फौजेचे पोटाची सोय पडेल. याजकरितां त्याचे विचारास कसें येतें तें पुसणें. कारनेल सरकारचे उपयोगाचें ते करितो, ह्मणतात. परंतु ऐसे प्रकार आहेत, समजत नाहीं. आजपर्यंत सोशिले. हालीं लोक उठोन जावयाचे विचारावरी आले. पैक्यास दर्शन नाहीं. भाषणाचेच प्रकार. बोलण्याचा धरच नाहीं. ऐसे आहे. रवाना. छ १७ शाबान. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति. कोणताही कारभार विल्हेस लागेना. बडोद्याजवळ खराब होत बसावें, याजकरितां श्रीमंतांनीं कूच करोन रेवातीरास यावयाचेंकेलें. चार दिवस श्रीमंत रायास मागें ठेविलें. कांही सोय पडली तर पाहावी. ह्मणून ठेविलें. परंतु कोणतेंही घडत नाहीं. याजकरितां जनरालास सला पुसोन ल्यावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. जरी इंग्रेज श्रीमंताचे हुकुमांत असता, तरी फत्तेसिंगाचे कारभाराचा बखेडा न होता. गोविंदरायांसहि दाबून सांगावयास येतें. येथील गृहस्थाचे वोढण्यामुळें मसलतीची घाण झाली. तुह्मांस कळावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

श्री.

लेखांक १०१.

१६९७ आश्विन वद्य ३.

पु।। राजश्री लक्ष्मी आप्पाजी गोसावी यांसि :-
सु।। सीत सबैन मया व अलफ. पा। हासोट हा माहाल कोपनीकडे दरमाहाचे ऐवजांत दिला होता. त्यास फत्तेसिंगाकडील ऐवज व राजश्री गोविंदरायाची वांटणी व फत्तेसिंग चाकरीस स्वारी-बराबर वगैरे जाबसालाचा फडशा करोन देतों. माहाल बक्षीस द्यावा, ह्मणून कारनेलानीं आड घातली. तेव्हा ऐवज सध्यां उपयोगास यावा वगैरे जाबसाल बोलून यावें या अर्थे पा। मारची सनद मध्यस्थाजवळ दिल्ही. ती सनद घेऊन ठेविली. जाबसाल तैसेच राहिले. ऐसी याची रीत आहे. व पा। अंकलेशर येथील पाऊण लाख रुपये मात्र सरकारचे कमाविसदाराकडून देवावे. त्यास, तेथें मेस्तर शाहानीं ठाणें घेतलें तें उठवावें. तरी जनराल विरुद्ध मानितील. याजकरितां तुह्मांस त्याचे जाबसालाकरितां सांगितलें होतें. त्यास, येविसींचा जाबसाल करोन पाठवणे. पाचे ठाणे सरकारचे सरकारांत घ्यावयाविसी तेथून पत्र पाठऊन देणें. जाणिजे. छ १५ शाबान. बहुत काय लिहिणे ? तुह्मी प्रसंग पाहून करावें. येथून वरचेवर लिहितों हें सूचना मात्र समजणें. छ मजकूर.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक १००.

१६९७ आश्विन वद्य ३.

राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यासि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ येथील सारी माहितगारी तुह्मांस आहेच. सारांश फत्तेसिंगास आश्रय जबरदस्ताचा सांपडला, सबब ऐवज हातास येत नाहीं व शेवाहि नाहीं. गोविंदराव तरी जातीनें वोढक व कोणाचे आश्रयानेंहि छंद करितो ऐसें दिसोन येतें याचे तपसील पत्री कशास ल्याहावें ? तुह्मी माहीतच आहा. असो ! बहुत लेहून फल काय ? खुलासा मजकूर :-

येथील इंग्रेज आमचे हुकुमांत असिल्यास उभयतां गायकवाड आज्ञेंत वर्ततील व ऐवजहि मिळेल. पुढील मसलतेस उपयोगी पडेल. थोरले मसलतीस इंग्रेज सामान तूर्त बंद आहे. परंतु गुजरातचे बंदोबस्तास तरी उपयोगी असावें. उफराटा फत्तेसिंगास आश्रय त्याचा. मग फत्तेसिंगानें कां न ओढावे ? गोविंदराव आपला. त्यास मात्र दाबल्यानें लोक हंसतील. उत्तम पक्ष, फत्तेसिंगासच दाबावें. निदानी दोघांसहि दाबून सरकारकाम करावें. सांप्रत कांहीच होत नाहीं. सबब आह्मी रेवातीरास आलो. पुढे काय मसलत करावी ते लिहिणें. जसें जनराल कोशल सांगतील तसे केलें जाईल. तूर्त च्यार दिवस रेवातीरी पाणी पिऊन स्वस्थ आहो. परंतु फौजेस व पाईदळास पोटाचें संकट पडलें आहे. देशची राजकारणें बहुत लागली होती व सांप्रतही आहेत. परंतु बंगाली खबरा ऐकोन कांही दबली; कांहीं आहेतच. तुह्मास कळावे. इकडील मजकूर सविस्तर राजश्री रामचंद्र विठ्ठल यास आज्ञा केली आहे, त्याचे लिहिल्यावरून कळेल. तें समजोन त्याप्रे॥ बंदोबस्त करणें. जाणिजे. छ १५ शाबान बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक ९९.

१६९७ आश्विन शुद्ध १५.

शेवेसी लक्ष्मण अपाजी कृतानेक सां नमस्कार विज्ञापना ऐसीजे. येथील वर्तमान ता। आश्विन शुद्ध पौर्णिमा रविवारपर्यंत महाराजाचे कृपेंकरून यथास्थित असे. विशेष. मुंबईस पोहचल्यावर जनरालाची भेट होऊन बोलणें जालें. त्या मजकुराची पत्रें दोन सेवेसी पूर्वी पाठविली आहेत. पावोन वृत्त कळलेंच असेल. जनरालास अभिमान मोठा पडिला आहे. मेस्तर टेलर खामखा काम करून येतो, हा भरंवसा यांस आहे. त्याचें पत्र यावयास पन्नास दिवसांची मुदत जनरालानीं सांगितली होती. त्यास, तेरा दिवस जाले. बाकी सवा महिन्याची प्रतीक्षा आहे. आज्ञेप्रों खर्चाविसीचे मार बोलिलों, परंतु ते गोष्ट घडत नाहीं. तपसीलवार पूर्वी लिहिलेंच असे. हालीं नवीन मजकूर बातमी :-

बारभाईची काही जमीयत चार हजारपर्यंत साष्टीचे रोंखावर तळोजे म्हणून गांव आहे, तेथें खाडीपलीकडे आली. तेव्हां जनरालानीं आपली जमीयत साष्टीचे कुमकेकरिता हजार माणूस मदरासी पाठवून ठाण्याचा बंदोबस्त केला व पुरंधरास पत्रें पाठविलीं कीं, लढाई बंद बंगाल्यांतून जाली असतां साष्टीवर तुमची जमीयत आली हें काय, तैसेंच तुमच्या मनात असिले तरी सांगणे. या अन्वयें पाठविली असेत. हे गोष्टीस बारा दिवस जाले. अद्यापी बारभाईंची जमीयत तळोज्यासच असे. बारभाईकडून अंतर पडावें ह्मणजे बंगालेवाल्यास जाबसाल करावयास येईल. याप्रों कलह निर्माण जाला आहे. परंतु विस्तार होतां दिसत नाहीं. कलम १ जलदीनें खुषकीनें पत्रें स्वामीकडे पाठवावीं तरी, सांप्रत बारभाईंनीं बंदोबस्त फार केला आहे. कासीद निभणार नाहीं. यास्तव जलमार्गें रवाना करितों. हीं पोंचावयास च्यार दिवस अधिक लागत असतील, परंतु खुषकीनें उपाय नाहीं. जहाजांतून रवानगी परतंत्र म्हणून विलंब लागतो. कलम १

पु।। मर्जी प्रसन्नसी दृष्टीस पडिल्यापासून कांहीं कांहीं युक्तीचे वाटेनें बोलोन, येथें तीन कोशलदार १ मेस्तर द्रेपर १ मेस्तर रामसी १ मेस्तर आसीलेबारहन येकूण तीन आहेत, यांची भेट घेतली. वस्त्रें दिल्हीं. यांत द्रेपर मात्र सरकारचे लक्षांत विशेषसा नाहीं. उभयतांत तरी पेंच आहेत. त्याचेहीं म्हणण्यांत कीं, खासा बंगाल्यास मेस्तर टेलरानें सारा मजकूर समजाविल्यानंतर लढाईच ठरत्ये. चिंता न करणें. असें वारंवार समाधान करितात. येथें पुणियाहूनही पत्रें कांहीं कांहीं येत असतात. त्याचा अर्थ मनास आणून मागाहून सेवेसी लिहितों.

करनेल अपटण बंगाल्याहून पुरंधरास रवाना जाला होता तो निजाम अल्लीखान याचे मुलकांतून बारभाईचे अमलाचे सदरेस येऊन पोंहचला. इंदोरी म्हणून गांव आहे. त्या सुमारास कोणी दगा करून मारून टाकिला. बहुतशी जमीयत समागमें नव्हती. होते त्या साकर्तो मारिलें. बारभाईचें अमलांत मारिलें. याप्रों येथें खबर मात्र आहे. पक्की असली तरी दुणावेल. लिहिलीं येतील. शोध करून मागाहून सेवेसीं लिहितों. कलम १.

चेनापट्टणाहून कासीदपत्रें घेऊन मुंबईवाल्याकडे येत होते. ते पत्रें कल्याणास यांनी धरून पुण्यास पाठविली. कासीद कैदेंत होते, त्यांतून येकजण पळोन आला. त्यावरून बारभाईचे कारकून येथे आहेत, त्यांस पत्रें आणून देणे ह्मणून ताकीद केली. तथापि अद्यापी पत्रें इंग्रजाचे हातास आलीं नाहीत. याप्रों किरकाली गोष्टी होऊन, इंग्रजास विषाद येत असतो. कलम १

जनरालास बंगालवाले आपले ऐकतीलसा भरंवसा बहुत आहे. यास्तव हे म्हणतील तैसें तूर्त ऐकावे. मलाह उचित आहे. स्वामींनी कोणेविसीं जलदी करू नये. यांणी अभिमान सोडिल्यास खोटी थोडी महिन्यांची राहिली आहे. इंग्रजाचे सोबतीचा गुण व्यर्थ होणार नाहीं. काही येक प्रकारे चांगलेच होईल. जनरालास पत्रें तुमचे लिहिल्यावरून व लक्ष्मण अपाजी बोलिला तो मजकूर त्याणीं हजूर लिहिला आहे त्याजवरून तुमचे भरंवशावर मुदतीची प्रतीक्षा करीत आहे. याअन्वयें मर्जीस आल्यास पत्रें पाठवावयाची आज्ञा केली पाहिजे. वरकड मार हसोट आंकलेश्वर व तेती लक्षामध्ये व वसई साष्टीचे वतनामध्ये बोलावयाचे आहेत. परंतु समय नाहीं. पुढे लडाई सुरू जाल्यावर ठीक पडेल. यास्तव जलदी करीत नाहीं. याचा