Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक ७९.

१६८७ .

राजश्री नारोपंत नाना गोसावी यांसि :-
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित महादजी सिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. पूर्वी दोन च्यार पत्रें आपणास पाठविलीं त्यांचें उत्तर आलें कीं, दरबारचा बंदोबस्त करितों. आणि देशींहून वर्तमान आलें कीं, लोकांचे घरीं चौकिया बसऊन उपद्रव केला आहे व महालींहि जप्ती केली. एशियास, पूर्वी कच्चे वर्तमान इकडील जें जालें तें लिहिलेंच आहे. तरी आपण व राजश्री विष्णु महादेव एकत्र होऊन दरबारचा बंदोबस्त करावा. आपण उभयतां करितील ते आह्मांस मान्य आहे. प्रस्तुत इकडील वर्तमान कोटेयाजवळ मुक्काम आहे. कोट्याची खंडणी जाहली व मारवाडचीही खंडणक्ष होऊन विल्हेस लाविलें. अत:पर राजश्री मल्हारजी होळकर यांजकडे जात आहों. त्यांचा मुक्काम प्रस्तुत दतियानजीक आहे. ते आह्मीं एकत्र होऊन कितेक सरकारी कामें मातबर करावीं, हाच अर्थ चित्तांत धरिला आहे, दुसरा प्रकार नाहीं. लोकांचे घरीं चौक्या बसल्या आहेत, याजमुळें लोक दिलगीर आहेत. परंतु, कांहीं आह्मांस सोडून जातात, ऐसा अर्थ नाहीं. तशाहीमध्यें लोक दिलगीर जाहलियानें साहेबकाम निखालस होत नाहीं. याजकरितां उभयतां आपण चित्तावर धरून, जेणेंकरून चोकिया व जप्ती उठोन सरदारीचा बंदोबस्त होय, तो अर्थ करावा. आमची धणियाचे पायांपाशीं एकनिष्ठता आहे. दुसरा अर्थ कांहीं नाहीं. ऐसें असोन, देशीं हा उपद्रव करावा यांत धणियाची किफायत आहे कीं काय, येंविसीं श्रीमंतांसही पत्रें लिहिलीं आहेत. प्रविष्ट करून, उत्तरें पाठवावीं. सर्व प्रकारें भरंवसा आपला. असें असतां लोकांचे घरीं उपद्रव होतो व माहलची जप्ती केली त्याचा अद्यापि कांहींच बंदोबस्त आपण करीत नाहींत, यावरून अपूर्व आहे. याउपरी तरी श्रीमंतांची मर्जी काय हें मनास आणून ल्याहावें. त्याप्रों वर्तणूक केली जाईल. आज पंचवीस हजार फौज आह्मांपाशीं असोन, माघील बखेड्यामुळें मोठ्या मनसब्यास उपयोगी पडत नाहीं. याकरितां लि॥ असे. र॥ छ.२२ सफर. बहुत काय लि।। ? लोभ असो दीजे. हे विनंति.

(मोर्तब सुद.)

श्री जोति:स्वरूप चरणिं तत्पर जया- जीसुत जनकोजि सिंदे निरंतर

॥श्रीराम॥

लेखांक ७८.

१६८७ माघ शुद्ध १४.

ह्माळसाकांतचरणीं तत्पर खंडोजीसुत मल्हारजी होळकर.

॥ सिध श्रीसुबेदार मलारराव होलकर बचनात्. चतुरसींग वा भीमसींग दिसे सुप्रसाद मालुम होय. आगे तुमकों सरकारके षैरशाहजान तालुका इंदुर षीका समय १८१७ के सालकी जमां हजुरसुं करार करदई सो करार मोजीब् रुपया आदाकीया नहीं और पंडत राघो लछमन इनकी चीजबस्त तुने लइये बात अछी न करी. हाल देष ते परवाना पंडत मसारनीलेका राजीनामा और सतराके सालके कबुलीयत माफक रुपया ले सीताब हजुर आवनां. ढील न करणां. मिती माह शुध १४ समत् १८२२.

(मोर्तब सुद +)

॥श्रीराम॥

लेखांक ७७.

१६८७ माघ शुद्ध १४.

श्री
ह्माळसाकांत चरणी तत्पर खंडोजीसूत मल्हारजी होळकर

॥ सिध श्रीसुबेदार मलारराव होलकर बचनात. बिसालसिंग तालुका लाहर दिसेसु प्रसाद मालुम होय. नामे अमृतसिंग हजुर आय समत् १८१७ के सालकी कबुलीयत सरकारमें लीपदइ है. सो रुपया सरकारमे आदा कीया नहीं. और समत् १८१६ के सालकी बाकी पंडत राघो लछमनके मारफत की रही है. सोवा सालकी कबजा मुकासदारांकी और सतराके सालका रुपया. ले सीताब हजूर आवना. ढील न करणा मीती माह शुद्ध १४ समत् १८२२.

(मोर्तब सुद +)

॥श्रीराम॥

लेखांक ७६.

१६८७ माघ शुद्ध १४.

श्री
ह्माळसाकांतचरणी तत्पर खंडोजीसुत मल्हारराव होळकर.

॥ सिध श्रीसुबेदार मलारराव होलकर बचनातू. बषतावरसींग तालुका गोपालपुर दिसे सुप्रसाद मालुम होय. आगे समत् १८१६ वा.सं. १८१७ दोवो साल बाबुराव कोनेरके अमलमें पंडत राघो लछमनके मारफात बाकी रुपया रह्या है. सो हीसाब कबजमोजब सरकारमें रुजुवात कर बाकीका फैसला कीया चाहिये. तो तु कुल हीसाब दोना सालका और कबजे मुकासदारोकी होय सो ले सीताब हजूर आवना ढील न करणा. मीती माह सुध १४ समत् १८२२.

(मोर्तब सुद + )

श्री.

लेखांक ७५.

१६८७ कार्तिक शुद्ध ७.

अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री हरबाजीराम दि॥ सिंदे गो॥ यांसि :-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ सीत सितैन मया व अलफ प॥ शाहाजापूर व बडवंदे व उमरगड वगैरे महाल तीन सिंद्याकडून तुह्मांकडे कमाविसीस आहेत. त्याची जप्ती सरकारांत करून रसद घ्यावी लागती. याजकरितां तुमचें प्रयोजन हुजूर असे. तरी देखत आज्ञापत्र हजूर येणें, दिरंग न लावणें. या कामास स्वार दि॥ गणोजी कदम पाठविले आहेत. तर यास मसाला रुपये १००० येक हजार देविले असत. तर आदा करणें. जाणिजे. छ ५ जमादिलावल. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

श्री.

लेखांक ७४.

१६८७ कार्तिक शुद्ध ७.

मिर्जाआदलबेग खुशवखा बाशद: तहवर व जलालत दस्त-गाहा. सु॥ सीत सितैन मया व आलफ. पा। मंदोसर व उज्जनवासे व सुखेड हे महाल तुह्मांकडे शिंद्याकडून आहेत. त्याची जप्ती सरकारांत करून रसद हुजूर घ्यावी लागती. याजकरितां तुमचें प्रयोजन असे. तरी पत्र-दर्शनीं हुजूर येणें. दिरंग न लावणें. या कामास स्वार, दिम्मत गणोजी कदम यांस पाठविले आहेत, मसाला रुपये एक हजार देविले असेत. तर आदा करणें. जाणिजे. छ ५ जमादिलोवल. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)
बार.
(सांब.)
पत्कंजलीनस्य मुद्रेयमपरा- जिता बाजीरायतनूजस्य रघु- नाथस्य राजते.

श्री.

लेखांक ७३.

१६८७ भाद्रपद वद्य ११ प्रथम.

राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि :-
उपरी. तुम्हीं पूर्वी पत्र राजश्री भिकाजी नाइकाबा। पाठविलें तें पावलें. त्यावरून सविस्तर वृत्त कळलें. त्या पत्राचें उत्तर पूर्वींच रवाना जहालें त्यावरून सर्व तुम्हांस इकडील भाव कळलेच अस्तील. प्रस्तुत बलरामानें पत्र लिहिलें होतें. त्यांत आशय होता कीं, विठ्ठलरायाबा। निराळीं पत्रें तीर्थस्वरूपांस येतात हें काय ? म्हणून तुमचा आशय बलरामानें लिहिला. त्यास, पत्र कांहीं निराळें राजकारण राखावें, आशय कळावा, याअर्थें पत्र येथून गेलें नाहीं. येथील इतबार सर्व तुम्हांवरच आहे. पत्र द्यावयाचें कारण हेंच कीं, पहिले लहानमोठा निरोप सांगून पाठविणें तरी याजबा। पाठविण्यांत येत असे, त्यावरून त्याणेंच होऊन पत्र येथून नेलें आहे. आणिक कांहीं प्रकार नाहीं. दुसरें, तेथें तरी येथील खातरजमेचा मनुष्य कोण आहे त्यास पत्र लिहावें ? सारांश गोष्ट हेच कीं, संदेह वारंवार न घेणें. जाणिजे. छ २३ रबिलोवल. बहुत काय लिहिणें ?

श्री.

लेखांक ७२.

१६८७ श्रावण शुद्ध १३.

राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसि :-
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ महादजी शिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. अलीकडे आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास सविस्तर अर्थ लिहित जावें. श्रीमंत राजश्री रावसाहेब देशास आले. त्यांची आपली भेट झाली असेल. त्यास, सविस्तर वर्तमान लिहून पाठवावें. येथील वर्तमान तपसीलवार कारभाराचें वगैरे राजश्री बाळाजीपंत यांनीं आपणास लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. सारांश जातेसमई आपण आह्मांस सांगितलें कीं, वरीस भरेपर्यंत स्वहित किंवा अनहित मनास न आणावें; त्याजप्रों आपले वचनाचें दृढतर धरून त्याअन्वयें आहों. दुसरा मार मातुश्रीबाईकडून पत्रें आलीं. त्यांत मजकूर कीं, घरीं पंच्यवीस हजार रु।। खर्च काढून भक्षिले, त्यास कर्जदार ऐवजाची निकड करितात, याची तरतूद करून पाठवणें ह्मणोन. त्यास, आह्मांपासीं ऐवज आहे किंवा नाहीं, आणि येथें तरतूद होती अथवा नाहीं, आणि येथें तरतूद होती अथवा नाहीं, हा अर्थ सर्व आपणास ठावकाच आहे. याजकरितां हें पत्र आपणांस लिहिलें आहे. तरी आपण पंच्यवीस हजार रु।। कर्ज मातुश्रीस देवावे. आम्ही व्याजासुद्धां ऐवज जेथें सांगाल तेथें पावते करूं. मुख्य आपणांस लिहिल्यावरून ऐवज पावेल हा भरंवसा जाणून लिहिलें आहे. तरी लिहिल्याप्रों। कार्य करून उत्तर पाठवावें. वरकड सर्व गोष्टी आपण बोलले आहांत त्याजवरी कायम आहों. कळावें रा। छ ११ सफर.

मातुश्रीस रहावयास जागा पेडगांव द्यावें ह्मणून करार होता. परंतु अद्यापिवर तें काम जालें की न जालें हें लि॥ नाहींत. कार्य करून द्यावें. हे विनंति.

श्री.

लेखांक ७१.

१६८७ आषाढ शुद्ध ११.

यादी सु॥ सीत सीतैन छ १० मोहरम.

सौ। पार्वतीबाई यांजकडील
फरमास रा। महादूजी तात्या 

खिजमतगार पुसोन आज्ञा
करितील. तेणें प्रमाणें करावें

१२५ मोत्ये पाटल्यांस
       खरीदी करून द्यावी म्हणून

  ७६ पाचमणी.
         २ बांळ्यांस
            थोर दर, प्रोा
            पेट्या गळ्यांतील यांसी
       १०  मांळेस पांच मणी.
      ६४ चिंचपेट्या गळ्यांतील
      ------
      ७६ लहान
--------
२०१
राजश्री दादासाहेब यांकडील
नथा ४ करविल्या त्यांस
मोत्यें ४ माणीक मणी 
दर १ प्र।। ४ दर रु।।
२५ अगर शंभरा अलिकडे
रु. १०० सोने.
त्याजपैकींच 
६ पानड्या बिंदीच्या ३ यासी
    ३ चुणी
    ३ पाचाकिडे
   ---
   ६
राधाबाई यांसि नथ थोर मोत्यांची
करून द्यावी म्हणून परवानगी 
घेऊन करून द्या म्हणतात.



 

श्रीगजानन.

लेखांक ७०.

१६८७ आषाढ शुद्ध २.

श्री.

रमाकांत चरणीं
तत्पर नारो शंकर
राजेबहाद्दर.

॥सनधि करि दई श्री महाराजा श्रीराजा नारो संकर बहादुरजीकी सरकार तै हजुर राजश्री पंडितराव विस्वासरावजीके एैते सिधि श्रीठाकुर मोहेकम- सिंधको आपर मौजे लगधामौ १ तुह्मारी जागीरमै तीर्थरूप लछमन संकर कैलासवासी नै दयौ हतौ सु अवै तुमसे बाचा करि मै हाजिर होइ अर्जविंती करित व मैहरवानगी करि हाल सनधि करी दई सु पाऐ जै ही सरकारकी सेवा सुभचिंतकी करै रहनौ अस्वन सुदि सात संवत १८१८ मुकाम करहरा.

सदरहूप्रों मौजे मजकूर जागीर करार करून दिल्ही असे. घेऊन सरकारचाकरी रुजू राहणें. जाणिजे. छ ४ रविलावल सन सलास. मोर्तब सुद.

(मोर्तब सुद.)

सनदेप्रमाणें करार सरकार रो महमद मीरखान टोके हजूर इनायेतखानी व बाबुराव गणेश छ १ मोहोरम संमत १८२१ मोर्तब सुद.

(मोर्तब सुद.)