Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८२.
१६९७ कार्तिक शुद्ध १.
श्रीमंत राजश्री तात्यासाहेब.
दर्या बे॥ देवजी प॥ मे॥ मौजे काळेगांव प्र॥ सेवगांव सु॥ सन ११८५ कारणें. जामीनकदबा लेहून दिधला ऐसाजे. बीजमानत घो। नागोजी येकसिंग मौजे साकेगांव प्र॥ म॥र यांस आपण हजीर जामीन असो. आजी सबब कीं म॥रनिलेकडे सरकारची बाकी आहे. सबब म॥रनिले हजीर राहून फडच्या करितील. फडच्या न करितां गैरहजर जाहाले तर हजीर करूं. न करूं तर म॥रनिलेच्या नि॥ जाब करूं. हे जामीनकदबा लेहून दिल्हा. सही.
गाही नि॥ नांगर
मकाजी प॥ आंबवे वि॥ चिंतो
मौजे चितळी. नागेश जोसी
गोमा महार बादल कुळकर्णी
मौजे माार. मौजेम॥र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८१.
१६९७ कार्तिक शुद्ध १.
पार माहास्थल मौजे पाथरडी
दर्या बे॥ मोकदम मौजे हबळ सैदापूर, प्र॥ सेवगाव सु॥ सन ११८५ कारणें जामीनक॥ लिहून दिधला ऐसाजे. बीजमानत बो॥ मानको शामराज व बाबाजी मल्हार कुळकर्णी मौजे साकेगांव प्रां। म॥र. यांस आपण हजीर जामीन असूं. सबब कीं याचा व मौजे म॥रचे मोकदम व समस्त दाहीजन या उभयतांचा गाव नि॥ हिसेबाचा लढा आहे, यानिमित्य तुमचे थळास आले. त्यास तुह्मी आपले मायथळ करून मौजे टेंभुरणीचा पार दिल्हा. तेथें जाऊन म॥रनिले जाऊन हिशेबाचा फडच्या करितील. न करतां हजीर न जाले तर हजीर करूं. न करूं सको तर म॥रनिलेचे नसिबतीचा जाब करूं. हा जामीनकरार लिहिला. सही.
ब॥ भवानी येशवंत निशाणी नांगर
कुळकर्णी मौजे म॥र
त॥ छ. २९ माहे साबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८०.
१६९७ कार्तिक शुद्ध १.
रोखा शके १६९७ मन्मथनाम संवत्छरे कार्तिक शु॥ १ ते दिवसी खत लिखिते धनकोनाम राजश्री चिंतोपंततात्या यासी रिणकोनाम मल्हार खंडेराव कस्तुरे आत्मकार्य-परत-संमंधे तुह्मापासोन घेतले कर्ज म॥ भिवजी न॥ येवलेकर मु॥ रुपये १२०९१ अक्षरीं बारा हजार येक्याण्णव यासी व्याज दरमहा दर सद्दे रुपये १ येकोत्रा प्रमाणें देऊं हे खत लिहिलें सही बि॥ ३० बिनसुट देऊं.
साक्ष.
१ पत्राप्रमाणें साक्ष पत्राप्रमाणे
केसो महादेव सिबारे साक्ष राघोपंत
क॥ पुणतांबे जनार्दन
दाऊदखानी
क॥ पुणतांबे
सरकार संगमनेर
१ साक्ष शुक्लंभट गणेश तुळजी दि॥
चित्राव पत्र-प्रें॥ म॥रनिले
बाबा वैष्वव
मांडवगणे
त्र्यंब(क)कर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २७९.
१६९७ चैत्र शुद्ध ६.
राजश्री त्रिंबक बाबूराव कमाविसदार सरकार बिज्यागड गोसावी यांसि :-
स्ने॥ अहिल्याबाई होळकर दंडवत सु॥ खमस सबैन मया व अलफ. र॥ गणेश शिवराम निसबत राजश्री चिंतो विठ्ठल यांजकडील देशास जात आहेत. त्यास खरगोणास आल्यावर याजबराबर माणसें देऊन आपली हद्दपार करून देणें. असे रीस पावते करून देणें. जाणिजे छ० ७ सफर. बहुत काय लिहिणें ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २७८.
दस्तक सरकार राजश्री तुकोजी होळकर त॥ कमाविसदारान व राहादारान व ठाणेदारान व जमीदारान व जकाते बाजे लोक महालनिहाय सु॥ खमस सबैन मया व अलफ. र॥ गणेश सिवराम नि॥ राजश्री चिंतो विठ्ठल हे कसबें महेश्वरींहून देशीं जात आहेत. समागमें घोडीं रास पांच व माणसें सात असेत यांसीवाय बटीक एक अशीं जात असते त्यांजला कोणेविशीं मुजाहीम न होतां आपलाली हद्दपार करून देत जाणें. जाणिजे छ० ४ सफर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीशंकर.
लेखांक २७७.
१६९६ माघ
ताळेबंद राजश्री बाबूराव काशी सिलेदार पतक दि॥ राजश्री गोविंदराव गायकवाड सेना-खासखेल समशेर-बाहदर इ॥ छ० १५ रजब अश्विनमास सु॥ अर्बा सबैन ता॥ छ० ३० जिल्काद पौशमास सु॥ खमस सबैन मया अलफ जमा रुपये.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २७६.
१६९६ मार्गशीर्ष शुद्ध २.
राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ गोसावी यांसि :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर रामराम. सु॥ खमस सबैन मया अलफ रा. बाबूराव काशी याची वरात तुह्मावरी सादर आहे. त्यास याची रुसकती जाली आहे तरी पत्रदर्शनी ऐवज देऊन कबज घेणें. जाणिजे. छ ३०* माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २७५.
१६९६ मार्गशीर्ष शुद्ध २.
राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ कोंढ गोसावी यांसी :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर. रामराम सु॥. खमस सबैन मया अलफ. र॥ बाबूराव काशी याची वरात तुह्मांवरी सादर आहे. त्यास वरातेचा ऐवज पत्रदर्शनी देणें. मुशारनिलेची रुकसती जाली आहे तरी ढील न करणें. देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० ३० माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २७४.
१६९६ मार्गशीर्ष शुद्ध २.
राजश्री भगवंतराव गायकवाड आंतापूर. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर रामराम. सु॥ खमस सबैन मया अलफ राजश्री बाबूराव काशी याची वरात तुह्मांवरी सादर आहे. त्यास मुशारनिलेची रुकसती जाहली आहे. तर पत्रदर्शनी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० ३० माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २७३.
१६९६ मार्गशीर्ष शुद्ध १.
राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ कोंढ गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहंदर रामराम. सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें सिलेदार राजश्री बाबूराव काशी यासी रुकसतीचे ऐवजीं रु. १५०
दीडशे पे॥ मा॥रीं ऐवजीं देऊन कबज घेणें. जाणिजे. छ. २९ माहे रमजान.
बार.