Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २९२.
१६९९ ज्येष्ठ शुद्ध १०.
राजश्री बाबूराव रामचंद्र क॥दार मौजे साकारे पे॥ माणिकपुंज गो॥ यासी
सु॥ समानसबैन मया व अलफ. तुह्माकडे रसदेचा ऐवज येणें तो ब॥ देणें दिंमत चिंतो विठ्ठल याजकडून सिलेदारास
आठवड्या पै॥ रुपये
१५०० साल मजकूरचें येणें ते
१५०० पेस्तर सालचे रसदेचे रुपये
-------
३०००
एकूण तीन हजार रुपये देविले आहेत तरी पावते करून कबज घेणें. जाणिजे छ ८ जमादिलावल.
बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीपांडुरंग.
लेखांक २९१.
चैत्र शुद्ध ७ शके १६९९.
राजश्री महादजीबाबा सिंदे गोसावी यांसि :-
सकल-गुणा-लंकरण-अखंडितलक्ष्मी -अलंकृत-राजमान्य श्रे॥ त्र्यंबकराव महादेव आशिर्वाद विनंती येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जावें विशेष आपणाकडे आमचा कर्जाचा ऐवज येणें त्या पे॥ आपणाकडून देविले रुपये
३१००० रदकर्ज देणें चिंतो विठ्ठल
३०००० देणे सदाशिव केशव ब॥.
---------
६१०००
एकसष्ठ हजार रु॥ पावते करून कबज घ्यावें तेणें-प्रें॥ कर्जाचे ऐवजी मजुरा पडतील छ ५ रबिलावल बहुत काय लिहिणें चैत्र शुद्ध ७ हेलंबी सवंत्छरे कृपा लोभ किजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २९०.
१६९८/९९.
यदि हिशेब गैरमजरा मौजे साकेगांव प्रें॥ सेवगांव सु॥ सन ११७७ इ॥
आवलसाल ता॥ अखेर जमा. रु॥.
१०६४ बाबती सरदेशमुखीपैकीं.
२०० मुरडपट्टी श्रीमंत र॥ सखारामपंत बापू यांचे गावाबाबद.
४९॥ कारकुनी बाबती सरदेशमुखी तिसाला तीस-गांवकरपैकीं.
१३॥ बेलदार चावडी गांवामधें.
२५ रामराय मैराल जप्तीवाले करमलकर.
३२ बईल तोफखाना श्रीमंत रे॥ पंत प्रधान.
३०॥ राघोपंत व भास्करपंत कारकून जागीर.
११६॥ बांकी कचे जमेपैकी.
९ बाजार बाबा.
१४० मोकासी सन ११७५ साल ब॥.
९६।।। गांवखर्च उचापत वगैरे.
-------------
१७७६।।।
५० कारकुनी घेतली रोखा रामचंद्र कासी पुणियांत.
-----------
१८२६।।।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८९.
राजश्री जीवनाजी कोठवळे मु॥ सेहर बऱ्हाणपूर यासि प्रति केशो गंगादास व जैराजबाई सु॥ म॥र रामराम विनंती उपरी. रे॥ मोतीलाल देसावल याकडे सरकारची ताकीदपत्रें श्रीमंती।। हजीर. त्यास मोतीलालकडील रुपया जो येईल त्याची चवथाई पुण्याची श्रीमंताची व सेहर बऱ्हाणपूर सुभेदाराची चवथाई रु॥ येकूण रु॥ निमे सिवाय हजारीं तुह्मांस खाजगत रु १०० संभर देऊं. याप्रमाणें देऊं. यासी अनउत्तर न करूं. हें लिहून दिल्हें सहीं. वि॥ मकूदराज धनी दोघे हजूर लिहिलें सही.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८८.
१६९७.
श्रीमंत राजश्री तात्या साहेब
दर्या ब॥ भिकाजी डांगे चौगुले मौजे सांकेगाव प्र॥ सेवगांव सु॥ सन ११८५ कारणें जामीनकतबा लेहून दिधला ऐसा जे बिजमानत ब॥
नावजी डांगे मौजे म॥र यांस आपण हजीर जामीन असो. आजी सबब कीं म॥रनिलेकडे सरकारची बाकी आहे. गैरहजीर राहून फडश्या करतील. फडच्या न करितां गैरहजीर जाहले तर हजीर करून हजीर न जाले तर म॥रनिलेच्या नि॥ जाब करून
नि॥ नांगर.
मकाजी प॥ आहवे
मौजे चितळी. ह॥ चिंतो नागेश
देवाजी प॥ मौजे जोशी कुळकर्णी
काळेगांव. मौजे मजकूर.
२२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८७.
१६९७ पौष.
र॥. चिंतो विठ्ठल यांजकडे बातमीकरितां माणसें पाठविलीं होतीं त्यांतून एक माणूस त्यांनी आपलेजवळ ठेवून घेतला ते सासवडानजीक आणि एक माणसासमागमें निरोप सांगोन पाठविले कीं माचीवाल्यांनीं बंगालेवाल्यास समजाविलें कीं हा मूल जो आहे हा वडील घरचा टिक्याचा खावंद आहे. श्रीमंतास पेशवाईचा संबंध नाहीं. त्यावरून येथें आपठण आलियावर आपटणानें म्हटलें कीं मूल तरी लहान दौलत चालवावयास योग्य श्रीमंत दादासाहेब ते आहेत. थोर कृतकर्मे... हजर आहेत ते दौलत करितील. बारभाईंनीं उत्तर केलें कीं त्यांनी नारायणारायास चांगले न पाहिलें ते या मुलास व आह्मांस चांगले काय पहातील याची पाठ आह्मी घेतली याची मुलूक घेऊन असावें राज्याची गोष्ट तो घडणार नाहीं त्यांसी गुजराथेचा मुलूख देतों तेथें त्यांनी असावें. किल्ला देणार नाहीं. किल्ला दिल्यानें खूळ करितील. थोरले श्रीमंताचा व इंग्रजाचा पूर्वीपासोन स्नेह तो एकीकडे ठेवून इंग्रजांनी साष्टी वगैरे किल्ले घेतले हे नीत की काय ? तेव्हां आपटणानें उत्तर केलें की साष्टी वगैरे घेतली ही गोष्ट आह्मीं चुकलों तुमची माघारी तुह्मांस देतों. त्यासंबंधें जो खर्च लागला असेल तो तुह्मी द्यावा. बारभाईंनी कबूल केले कीं साष्टीचा खर्च माघारा देतो साष्टी द्यावी व चंदावरचें राज्य आमचें भोसल्याचें आहे तें सोडावें तेथील राजा कैदेस घातला आहे तो सोडावा. श्रीमंताचा पक्ष करूं नये. ते व आह्मी समजोन घेऊं हा उत्तम पक्ष. मसलतसंबंधें जो खर्च मागतां तो ही देऊं बखारीस जागा पुण्यांत मागतां ती देऊं याप्रमाणें कबूल जाहालें. त्याविषयीचा मजकूर बोलावयाकरितां दोन इंग्रज मुंबईस पाठविले आहेत. तेथेंच निश्चय ठरणे तो ठरेल. निदान गुजराथ खेरीज किल्ले देऊं याप्रमाणें ठरोन मुंबईस इंग्रज पाठविले आहेत. आपटणाचे म्हणणें मुंबईवाले चुकले असले तरी चाकरीवरून दूर करूं याप्रमाणें येथील मजकूर आहे. आपटणाच्या भेटी व माचीवाल्याच्या दोन वेळा जाहल्या. आपटणाकडे निरोपी माधवराव जाधवराई केले आहेत ते निरोप सांगतात त्याचे ऐकोन येतात याप्रमाणें जाहलें आहे. श्रीमंताचें मतें आह्मीं या कूटांत आहों परंतु आह्मांस येथें कोणी पुसत नाही ज्या कालीं अनीनीस अनीन लागेल त्या कालीं जितकें आमच्यानें घेऊन ठेवितील तितके घेऊन ठेवूं. आतांच निघोन यावें तरी श्रीमंताचा पक्ष इंग्रज सोडत नाहीं ऐसा तरी निश्चय कोठे आहे ? तथापि यावें तरी तूर्तच मुलालेकरांस प्रतिबंध होणार तेथें राजश्री सखाराम बापूचे मनांत श्रीमंत नसावे ऐसे नाहीं परंतु पुण्यांत कामाचे नाहीत येथे असल्याने आपणास दगा करितील. बाहेर मुलूख घेऊन असावें परंतु हरएक प्रकारे सलूख करून बखेडा तोडावा ऐसें मानस आहे. भगवंतराव प्रतिनिधीची उभारणी बापूंनीच केली. नाना फडणीसाचें लक्ष भगवानरायाकडे सर्वात्मने. त्याचे कुमकेस फौज पाठवावयास नानांनीं योजिली होती परंतु बापूनें मना केली. या उभयतांचें अंतर्याम शुद्ध नाहीं. बाह्यरंग एक आहे. माचीवाल्याचें ह्मणणें की याप्रमाणें सलूख होत असला तर उत्तम नाहीं तरी आह्मी युध्दास सिद्ध आहों. मसलतीचा खर्च व साष्टीचा खर्च देऊ ह्मणतां व बखारीस जागा वगैरे आमची कामें तुह्मी करून देणार त्यास कबूल आह. परंतु तुह्मीं श्रीमंतास हाती द्या ह्मणाल तर आह्मी देणार नाहीं. गुजराथचे पार करून देऊं मग तुह्मीं व ते समजोन घेणें. श्रीमंतांनीं गुजराथेवर ऐकलें तरी उत्तम जाहलें. न ऐकलें तरी याप्रमाणें तुह्मी आह्मांस देणें ह्मणजे आह्मी मुंबईवाल्यांस सांगोन श्रीमंतास गुजराथेवर समजावितों. मुंबईवाल्याचे वोढून धरिलें तरी मुंबईवाल्यास चाकरीवरून दूर करूं. मुंबईवाल्यांनी ऐकिलें आणि श्रीमंतांनी न ऐकिलें तरी गुजराथ पार करून देऊं वडील घरचा मूल ह्मणतां तरी तीन पिढ्या नाना माधवराव व हा मूल तीन पिढ्या दौलत केली हे बाजीराव याचे पुत्र असतां मुलास दौलत द्यावी हें ठीक नाहीं दादासाहेबच योग्य आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८६.
१६९७ कार्तिक वद्य ४.
श्रीमंत राजश्री तात्यासाहेब.
दर्या बे॥ मकाजी प॥ आहेर मौजे चीतळी प्र॥णें सेवगांव. सु॥ सन ११८५ कारणें जामीनकदबां लेहून दिल्हा-ऐसाजे. बिजमानस बे॥ भिमाजी डांगे चौगुले मौजे साकेगांव प्र॥ म॥र यांस आपण हजीर जामीन आहों. तर म॥रनिले हजीर राहून फडच्या करितील. फडच्या न करितां गैरहजीर जाहाले तर हजीर करूं. हजीर न करूं तर म॥रनिलेचा जाब करूं. हे जामीनकदबा लेहून दिधला. सही.
गाही नि॥ नांगर
देवजी प॥ मौजे
काळेगांव
ब॥ चिंतो नागेश जोसी मौजे चीतळी
गोमा माहार बादल मौजे म॥र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८५.
१६९७ कार्तिक वद्य ४.
तात्यासाहेब दर्याब॥ मोकदम मौजे जिवडगे प॥ सेवगाव सु॥ सन ११८५ कारणें साहेबाचे सेवेस जामीन कदबा लेहून दिधला ऐसाजे. बीजमानत बे॥ बाबाजी मल्हार व माणकोजी शामराज कुळकर्णी मौजे साकेगाव यास आपण जमान असूं. आजि सबब कीं साहेबाच्या स्वारापासून म॥रनिले गैरहजीर जालें. याजनिमित्तें साहेबाच्या स्वारांनीं जामीनतलब केली. त्याजवरून म॥रनिलेस आपण हजीरजमन असूं. गैरहजीर जाले तर हजीर करूं. हजीर न करूं तर म॥रनिलेचे नि॥ जाब करूं. एक दिवस गैरहजीर जाले तर कार्यास येणार नाहीं. हा जामीनकदबा लि॥ सही.
नि॥ नांगर.
बें॥ माहादाजी माणकेश्वर कुलकर्णी
मौजे म॥र. छ०
१७ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८४.
१६९७ कार्तिक शुद्ध १३.
राजमान्य राजश्री राजो लक्षुमण यासी माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु॥ सीत सबैन मया व अलफ राजश्री बाबूराव कासी याणी हुजूर विदित केलें की आपल्यास जामीन देऊन राजो लक्षुमण याणीं कर्ज घेतले त्याजवर आपण गुजराथी-प्रांतीं गाइकवाडाकडे चाकरीस गेलों तेव्हां मशार-निल्हे आपल्याबराबर बळेंच चाकरीस आले त्या वर्षी श्रीमंत कैलासवासी रावसाहेब भोसलेयावर स्वारीस गेले ते समयीं गाइकवाडांनीं फौज कुमकेस श्रीमंताकडे पाठविली त्या बराबर आपण कारकून करून दिल्हा होता त्याणीं राजश्री गोपाळन॥ तांबवेकर याजपासून तलबेचा निकाल करून घेऊन न पुसतां घरास गेला त्याजवर राजो लक्षुमण वगैरे आपणाजवळ तलबेचा पैका मागों लागले त्यास त्या कारकुनास घेऊन येणें त्याजपासून निकाल करून देवितों असें सांगितलें त्याजवर त्या कारकुनाकडे कोण कोणी गेले ते ते काये समजलें हें कळलें नाहीं त्या उपरांत तो कारकून वारला त्यास आपण कर्जाचा तगादा करितो त्यामुळें त्या तलबेचा लढा सांगून कर्जाचा निकाल करीत नाहीं त्यास ताकीद जाली पाहिजे ह्मणून त्याजवरून हें पत्र तुह्मास सादर केलें असें तरी तुह्मी चाकरी केली त्याचा फडशा तया कारकुनापासून करून घ्यावा तो न घेतला त्याचा कझ्या बाबूराव कासी याजकडे काय या उपरी याचे गुजरातीचें कर्ज तुह्मी घेतलें आहे तें दस्ताप्रमाणें व्याजसुद्धां निकाल करून देणें येविषयीं फिरोन बोभाट येऊं न देणें जाणिजे छ० ११ रमजान.
आज्ञा प्रमाण. (लेखनसीमा)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २८३.
१६९७ कार्तिक शुद्ध १.
श्रीमंत राजश्री चिंतोपंत तात्यासाहेब.
दर्या बे॥ लछीराम परदेशी मु॥ मौजे साकेगांव प्र॥ सेवगाव सु॥ सन ११८५ कारणें जामीनकदबा लेहून दिधला ऐसाजे. बीजमानत रो। रामजी गीगे मौजे म॥र यांसि आपण हजीर जामीन असो. आजी सबब कीं सरकारबाकी त्याजकडे आहे. त्याचा फडच्या करील. फडच्या न करिता गैरहजीर जाहाला तर हजीर करूं. हजीर न करूं तर याचे नि॥ जाब करूं. हे जामीनकदबा लेहून दिधला सही.
गाही नि॥ नांगर.
साबाजी माळी बि॥ चिंतो नागेश
माहावळ जोसी कुळकर्णी
मौजे म॥र. मौजे मजकूर.
धोंडी माहार.
मौजे म॥र.