Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६२.
१६९६ कार्तिक वद्य ३०.
चिरंजीव राजश्री त्र्यंबकराव गायकवाड प्रे॥ खडक धामोडी यांसि गोविंदराव गायकवाड आशिर्वाद सुहूर सन खमस सबैन मया अलफ बाबूराव काशी नि॥ राजश्री चिंतो विठ्ठल याची वरात तुह्मावर सादर आहे. त्यास म॥निले रुस्कत होऊन देशीं जातात. त्यास वराते प्रें॥ ऐवज तूर्त देऊन पावलियाचा कबज घेणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ २८ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६१.
१६९६ कार्तिक वद्य १४.
गंगाभागीरथीं मातुश्री भवानीबाई गायकवाड वडिलांचे सेवेसी :-
अपत्य गोविंदराव गायकवाड शेना खासखेल समशेर बहादर दंडवत विनंति. उपरी बदल देणें राजश्री बाबूराव कासी नि॥ चिंतो विठ्ठल यांस सोनगड जिल्हेचे सुकडीचे ऐवजी रु ॥ १००० एक हजार देऊन पावलियाची कबज घेणें. हिसेबी मजुरा असे जाणिजे. छ० २७ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६०.
१६९६ कार्तिक वद्य १२.
राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ आंतापूर. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर रामराम. सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें सिलेदार बाबूराव काशी यासी रुकसतीचे ऐवजी रुपये ११५० साडे अकरासें पे॥ म॥रीचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५९.
१६९६ कार्तिक वद्य १२.
चिरंजीव राजश्री त्रिंबकराव गायकवाड पो।। वलवडे या प्रती गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समशेर बाहदर आशीर्वाद. सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें शिलेदार बाबूराव काशीं याची रुकसतीचे ऐवजी रुपये १५०० दीड हजार पे॥ म॥रीचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५८.
१६९६ कार्तिक वद्य १२.
राजश्री जिवाजी रघुनाथ पे॥ कामरेज गोसावी यांसि :- अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर दंडवत. सु॥ खमस सबैन मया अलफ बद्दल देणें शिलेदार बाबूराव काशी यांसि देणें रुपये २००० दोन हजार पे॥ म॥रीचे ऐवजीं देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५७.
१६९६ कार्तिक वद्य १२.
राजश्री सिदो तुकदेव पो।।. चिखली गोसावी यांसि:- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर दंडवत. सु॥ खमस सबैन मया अलफ बद्दल देणें सिलेदार बाबूराव कासी यासी रुसकतीचे ऐवजीं रुपये ११५० साडे अकरासे पो।। मजकूरीचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे छ० २५ माहे रमजान.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५६.
१६९६ कार्तिक वद्य १२.
चिरंजीव राजश्री त्र्यंबकराव गायकवाड प्र॥ खडक धामोडी याप्रति गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर आशिर्वाद सु॥ खमस सबैन मया अलफ बद्दल देणें शिलेदार बाबूराव काशी यासी रुकसतीचे ऐवजी रुपये १५०० दीडहजार प॥ मा।। रीचे ऐवजीं देऊन कबज घेणें जाणिजे छ २५ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५५.
१६९६ कार्तिक वद्य १२.
राजश्री जिवजी रघुनाथ पे॥ कामरेज गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर दंडवत. सु॥ खमस सबैन मया अलफ र॥ बाबूराव काशी याची वरात पेशजी तुह्मावरी सादर आहे. त्यास वरातेचा ऐवज अद्यापि दिल्हा नाहीं तरी हालीं पत्रदर्शनी देऊन कबज घेणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ २५ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५४.
१६९६ कार्तिक वद्य १२.
राजश्री बाळाजी विश्वनाथ पे॥ मोहे गोसावी यासी-: अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर. दंडवत सु॥ खमस सबैन मया अलफ राजश्री बाबूराव काशी याची वरात दर्शनीं तुम्हावरी सादर आहे. त्यास वराते प्रे॥ ऐवज पत्रदर्शनीं देऊन कबज घेणें. बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ०२५ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५३.
१६९६ कार्तिक वद्य १२.
राजश्री आनंद शंकर वैद्य जकात किल्ला कटोदरें गोसावी यांसि:- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य. गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहंदर दंडवत. सु॥ खमस सबैन मया अलफ राजश्री बाबूराव काशी याची वरात पेशजी सादर आहे. त्यास वराते प्रों। ऐवज पत्रदर्शनीं देऊन कबज घेणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.