Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५२.
१६९६ कार्तिक वद्य १२.
राजश्री रतनजी पारख* पो। घनदेवी गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहंदर रामराम सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें शिलेदार बाबूराव काशी याची देणें रुपये २००० दोन हजार पो। म॥रीचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २५१.
१६९६ कार्तिक वद्य १३.
राजश्री भगवंतराव गायकवाड पो। व्यारें गोसावी यास :- अखंडित लक्ष्मी आळंकृत राजमान्य स्ने॥ गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर दंडवत रामराम. सु॥ खमस सबैन मया व अलफ बदल देणें सिलेदार बाबूराव कासी यासि रुसकतीचे ऐवजी रु॥ ११५० साडे अकरासे प्र॥ म॥रीचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे छ० २५ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीशंकर.
लेखांक २५०.
१६९६ कार्तिक.
हिसेब बाबूराव कासी सिलेदार सु॥ खमस सबैन इे॥ छ १४ साबान गुदस्त त॥ छ १५ रमजान सालमजकूर येणें माहे १३ तैनात बारमाही नकी रु॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २४९.
१६८९ कार्तिक शुद्ध ७.
राजश्री------------------------
------------------------------- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ तुकोजी होळकर दंडवत. मु॥ समान सितैन मया व अलफ राजश्री माहादाजी गोविंद यांची बोली सरकारांत सालमजकुरी करून त्यांच्या पथकाच्या सरंजामांत प॥ मजकूर ऐवजीं जागा रुपये १४२४८॥ चौदा हजार दोनशें साडे अठेतालिस रुपयाची करार करून हें पत्र सादर केलें असें. तर तुह्मीं प॥ मजकूर पै॥ सदरहू चौदा हजार दोनशें साडे अठ्ठेचाळिस रुपयाचे तनखियाचे गांव मशारनिलेस नेून देऊन चालविणें. जाणिजे. छ० ५ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे ?
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २४८.
१६९६ भाद्रपद वद्य १.
राजश्री चिंतो विठ्ठल स्वामी गोसावी यांसि विनंति उपरी हैदर नाईक याजकडे सालगु॥ तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबीं ऐवज करार केला त्यापैकीं राजश्री कृष्णाजी नाईक दातार यांस दोन लक्ष रुपये द्यावयाचा ठराव तुमचे विद्यमान अप्पाजीराम याजवळ जाहाला त्याविसी मागें तुमचें व नाईकांचें पत्र घेऊन अप्पाजीराम यांजकडे पाठविलें होतें. त्याचे जाब आले ते पाहून नाईकांस दाखवून राजश्री नारो अप्पाजी याजकडे पाठविले आहेत ते तुह्मांसी बोलतील. त्यास येविसी फिरोन कागदपत्र काय लागतील ते तयार करवून नाईक सांगतील त्याप्रमाणें ऐवज आणावयाची तर्तूद करून ऐवज सरकारांत सत्वर येईं तें करणें + जाणिजे छ० १३ रजब सु॥ खमस सबैन मया व अलफ* हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २४७.
१६९६ श्रावण वद्य १३ वृद्धि.
राजश्री भिकाजी यादव प्रे॥ चिखली गोसावी यांसि:- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर. दंडवत सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें. शिलेदार बाबूराव काशी याची रोजमरा व अर्जबाबेचे ऐवजी रु. २००० दोन हजार प्रे॥ म॥र येथील सालमजकूरचे रसदेचे ऐवजी देऊन पावलियाचा कबज घेणें. हिशेबी मुजरा असे. श्रावण अखेर निम्मे भा॥ अखेर निम्मे देऊन कबज घ्यावें. जाणिजे. छ० २७ जमादिलाखर.
बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २४६.
१६९६ श्रावण वद्य १३.
राजश्री जिवाजी रघुनाथ प्रो। कामरेज गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समशेर बहादर दंडवत. सु॥ खमस सबैन मया अलफ बद्दल देणें शिलेदार बाबूराव काशी याचा रोजमरा व अर्जबाबचे ऐवजी रुपये २००० दोन हजार प्रों।। म॥र येथील साल मजकूरचें रसदेचे ऐवजीं देऊन पावलियाची कबज घेणें. हिशेबी मुजरा असे. श्रावणअखेर निमे भा॥ अखेर निमे देऊन कबज करून घ्यावें. जाणिजे. छ २७ जमादिलाखर.
बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २४५.
१६९६ श्रावण वद्य १३ वृद्धि.
राजश्री रतनभाई पारसी प्रो। बाणदेवी गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समशेर बहादर. रामराम सुहूर. सन खमस सबैन मया व अलफ. बद्दल देणें सिलेदार बाबूराव कासी यांसि रोजमुरा व अर्जबाबचे ऐवजी प्रें॥ मजकूरचे रसबेचे ऐवजी रु।। ४००० च्यार हजार देऊन पावलियाची कबज घेणें. हिसेबी मजुरा असे. जाणिजे. छ २७ जमादिलाखर श्रावणअखेर निमे. भा।। अखेर निमे द्यावे. छ०. मार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २४४.
१६९६ श्रावण वद्य १३ वृद्धि.
राजश्री आनंद शंकर वैद्य जकात गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समशेर बहादर दंडवत. सु॥ खमस सबैन मया अलफ बद्दल देणे शिलेदार बाबूराव काशी याची रोजमरा व अर्ज बाबाचे ऐवजी रु. ६८.
सालमजकूरचे रसदेचे ऐवजी देऊन पाव- लियाचा कबज घेणें. हिशेबी रोज मरा असे.
श्रावण अखेर निम्मे भा॥ अखेर निम्मे देऊन कबज घ्यावें.
जाणिजें. छ. ०२७ जमादिलाखर.
बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २४३.
१६९६ श्रावण शुद्ध १३.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाळाजीपंत आपा स्वामीचे शेवेसी :-
पो। कृष्णाजी सिवदेव सां।। नमस्कार विनंति. उपरी. येथील कुशल ता।। श्रावण शुध १३ मुकाम अवंतिकापुरीं येथें स्वामीचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असो. विशेष. बहुत दिवस स्वामीकडून पत्र येत नाहीं तर ऐसें न करावें. सदैव पत्रीं परामर्ष करीत असावें. आह्मीं येथें रबीचे वरातेकरितां पेचांत पडलों. निदान कोठें ठिकाण लागेना तेव्हां मामलत करणें प्राप्त जाहाली. बाकीची रुजुवात करून निघेल ते वसूल करून पाठवितों. आणि मीहि लौकरच स्वामीचे भेटीस येतों. कार्तिक मासीं कांही ऐवजाची तोड पाडून लौकरच येतों. इतके दिवस श्रम केले त्यासारखे ऐवज वसूल करून पाठविला ह्मणजे सार्थक. नाहीं तरी व्यर्थ रिकामें येऊन काय सांगावें ? यास्तव याचा निकाल करून घेतल्यावरी येतों. कळावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.