Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
मग कारभारी बोलाऊन बाडांत च पत्रें वाचून पाहिली. नंतर सईनाधुरंधर यांनी आपल्या तोफा साहा व येत्रा पुढें चिंचवडास लाविलें. साहेबास कळावें. छ १७ रोजी च्यार घटका दिवस राहता बालापुराहून सलाबत खान याची पत्रें आली मग कारभारी बोलाऊन पत्रें वाचलीं. पत्रीं वर्तमान कीं, पेंढारियांनीं बहुत उपद्रव केला आहे. मग कारभारी आपले डेऱ्यास गेले. प्रहर रात्रीस सईनासाहेब यांनी अंगावर चोर पानी घेतलें. छ १८ रोजी दोन घटका दिवस येता कारभारी बोलाऊन वाडांत च आपण व उभयता कारभारी ऐसे बसून छ ८ रोजी माथनी माहौज्याच्या मुकामीं कृष्णराज याची पत्रों आली होती त्याची उत्तरे लेहून व बालाजीपंत कोण्हेरे यांस पत्रें लेहून दोघे हुजरे व जासूद जोडी रवाणा केली. छ १९ रोजी स्नान केले. कारभारी हि होते. ब्राह्मणास येक गाई व वीस रु।। दिल्ही व आणखीहि दोघे ब्राह्मण होते त्यांस पांच पांच रु।। दक्षणा दिल्ही मग दीड प्रहर दिवस आल्यानंतर आपण व उभयता कारभारी व पांडुरंग ऐसे बसून ज्यापाळचा राजा दरेसिंग कासीपलीकडे दोनसे कोस आहे त्यास पत्रें लेहून एक चंदमिरधायाची जोडी रवाना केली. व हेशनदेसन बाबास पत्र लेहून भयली करून सांडणीस्वार याची जोडी रवाणा केली. नंतर कलकत्त्याच्या फिरंगियास पत्रें लेहून जासूदजोडी रवाना केली. नंतर अडचा प्राहारा दरबार बरकास जाला. साहेबास कळावें. साहेकाळीं दो घटका रात्रीस कारभारी बोलाऊन आपण व साईनाधुरंधर व उभयता कारभारी ऐसे बसून मातोश्री चिमाबाई व सई यांनी कुच करून नवकोसावर चिंचगड आहे तेथील मुकाम नेमला व सईनासाहेब यांनी ऐका कोसावर माघारी जाऊन राहावे ऐसा ठराव होऊन च्यार घटका रात्रीस दरबार बरकास जाला. साहेबास कळावें. छ २० रोजी दीड प्रहर दिवस आल्यानंतर मातोश्री व सईनाधुरंधर याचें कुच जालें. बराबर बाबा उपाध्ये श्रीमनशास्त्री व नारायन बाबा चवफुलें व येत्रा पांच हजार वगकैरे सावकार मंडळी येकोबा नाईक पीदडी व मुऱ्हार नाईक गडकरी व गंगाजी नाईक गडकरी व दरगदार बळवंतराव भवानी व चिटणिसाकडील शामराव व फडनिसाकडील कारकून व खासगीकडील सितारामपंत व मुनसीकडील कारकून वगैरे लोक रघुनाथराव मुटे पाटोळे ऐसे दोघा मिळोन लोक पांचसे व चवकी पाहाऱ्यास कुंपणी गारद्याची एक साईनाधुरंधर याच्या घरपागा व सिलेदार दोन हजार व हाती अंबारीचे व मुले मिळोन पंधरा व बानाच्या कैच्याचे उंट भुमारी १६ याजप्रमाणें सरंजाम देऊन बंदोबस्त केला. साहेबास कळावें. दीड प्रहर दिवस येतां कुच जालें. सईनासाहेब गोटाबाहेर जाऊन मातोश्री व सईनाधुरंधर यास घालऊन माघारी डेऱ्यास आले. नंतर भवानी दादू कटकचा सावकार यास बोलाऊन सांगितलें कीं कांही श्वारी खर्चास मदत करावी. मग त्याजला कबूल केले नंतर त्यास वस्त्र सेला पागुटें पैठणी व मलमलीचा झगा एक व पायजामा एकूण साडेतीन सनगे दिल्ही व घोडी सरंजामसुधां एक दिल्ही. नंतर सदाशिव राजाराम यांस शेला पागुटें पैठणी व घोडी एक व कटका तयाचे हाती आहेत त्याजपैकीं हाता एक देविला. आन त्याचें काम त्यास सांगितलें. नंतर विडे देऊन त्याची रवाणकी केली. साहेबास कळावें. मग सईनासाहेब यांनी कुच करून मुकामास आले. दोन घटका रात्रींस कारभारी बोलाऊन माघारी पांच कोस कवडु प॥ याचा वाद होता तेथील मु॥ नेमून दरबार बरकास जाला. साहेबास कळावें. छ २१ रोजी सवा प्रहर दिवस येतां नागपुराकडोन डाकची पत्रें आलीं. नंतर कारभारी बोलाऊन पत्रें वाचून कुच जालें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
गढी आहे. कमावीसदारानें मेजमानी दाणा वगैरे सरंजाम दिल्हा. च्यार घटका रात्रीस कारभारी बोलाऊन आपण व कारभारी बसून तेथून साता कोसावर मौजे कहनी प्रां।। चांदगढीचा मु॥ नेमून दरबार बरकास जाला. छ १० दो प्रहरी आपण व उभयतां बंधु व परसोजी भोसले व उभयेता बंधु व परसोजी भोसले व उभयेता कारभारी ऐसे स्वारी तयार करून किला पाहावया गेले तों जागजागी पडला आहे. किला पाहून कमावीसदारास डागडुजी करावयास सांगितली. यावर स्वार जाले तों दोन घटका दिवस राहाता मु॥ मजकुरीं दाखल जाले. यावर च्यार घटका रात्रीस कारभारी बोलाऊन आपण व सईनाधुरंधर व उभयेता कारभारी ऐसे बसून तेथून साता कोसावर चांदगढीचा मु॥ नेमून दरबार बरकास जाला. साहेबास कळावें. छ ११ रोजी भिकाजी गोपाळ यास विडे देऊन वराड प्रांतांत रवाणा करीत होते. परंतु दीड प्रहर दिवस आलियावर कुच जालें. तो साहा घटका दिवस राहता मु॥ मजकुरी दाखल जालियावर पांच घटका रात्रीस कारभारी कृष्णराव यादव व श्रीधर लक्ष्मण आले यावर आपण व उभयता कारभारी व बाळाजीपंत कालेकर ऐसे बसून भिकाजी गोपाळ यास बोलाऊन एक प्रहरपरयंत वराडप्रांतीचा हिसेब पाहिला. नंतर तेथून चवाकोसावर कवडु पा।। याचा वाद होता. तेथील मु॥ नेमून दरबार बरकास जाला. छ १२ रोजी दो पाहारा पुण्याकडोन व विठल बलाळ सुभेदार याजकडून डाकचीं पत्रें आली तीं वाचलीं नाहींत. तसीं च ठेविलीं. नंतर मातोश्रीकडे जाऊन दोन घटका बोलून कुच जालें. च्यार घटका दिवस राहता मुकामास आले. यावर साहेंकाळी कारभारी बोलाऊन आपण व सईनाधुरंधर व उभयेता कारभारी ऐसे बसून दो पाहारा डाकची पत्रें आली होतीं ती वाचून पाहिलीं. यावर भिकाजी गोपाळ यास बोलाऊन पांच घटका रात्रपरयंत वराडप्रांतीचा हिशेब पाहून छ १३ रोजीं विडे देववयाचें ठरलें. मग आपण व कारभारी बसून तेथून पांचा कोसावर देरगांव आहे. प्रांत प्राताबगडचा मु॥ नेमून दरबार बरकास जाला. छ १३ रोजी प्राथकाळीं कारभारी बोलाऊन आपण व कारभारी बसून दोन घटका बोलून भिकाजी गोपाळ यास विडे देऊन वराडप्रांतींत रवाणा केला. साहेबास कळावें. व दारकोजी खिसमतगार यास विडे देऊन आनंदराव वैद्य याजकडील कारकून खंडोपंत पुण्याकडोन कामकाजाकरितां आला होता. त्याजबराबर रवाणा केला. दो पाहारा कुच जाले. साहा घटका दिवस राहाता मु॥ आले. यावर च्यार घटका रात्रीस कारभारी बोलाऊन वाड्यामधें बोलाऊन मोहुर्त पाहात होते. मग दरबार बरकास जाला. छ १४ रोजीं प्राथकाळीं च पुण्याकडोन डाकचीं पत्रें आलियावर कारभारी बोलाऊन पत्रें वाचून पाहिलीं. यावर प्रांत बगडचा कमावीसदार यास बोलाऊन रागें भरले कीं रानांत झाडी फार आहे. प्रगान्याची लावणी जाली नाहीं. हें काय? मग बाळाजीपंत यांस सांगितले कीं मारनिले याचा झाडा पाहून कमावीस दुसऱ्यास द्यावी, ऐसे ठरलें. साहेबास कळावें. साहा घटका दिवस राहतां भवानी दादू यास बोलाऊन सांगितलें की, तुह्मी आपली जोडी पुढें जगनाथावर रवाणा करावी. कारण की सरंजाम करवावा. मग कृष्णराव माधव यास बलाऊन पत्रें लेहून मारनिलेयाची जोडी रवाणा केली नंतर छ १३ रोजीं दारकोजी गायकवाड रवाना केला परंतु कागदपत्र राहिले होते ते लेहून जासूद जोडी रवाना केली. साहेबास कळावें. छ १६ रोजी च्यार घटका रात्र राहाता सईनासाहेब यांस ज्वर आला. मग दरबार जाला नाही. छ १६ रोजी ज्वर होता. दो पाहारा पुण्याकडोन डाकची पत्रें आलीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीपांडुरंग.
लेखांक ३२१.
१७२० आषाढ वद्य १२.
पो।। छ २४ शवाल
सुहूर सन तिसा तिसैन मया व अलफ.
श्रीमंत राजश्री रावसाहेब साहेबाचे सेवेसी. आज्ञाधारक तुकोजी लकोबा व बाळासाबत कृतानेक दंडवत विज्ञापना त॥ छ २९ मोहरमपावेतों साहेबाचे कृपावलोकन करून सु॥ नागपूर येथें शेवकाचा वर्तमाण यथास्थित असे. यानंतर राजश्री सेनासाहेब सुभा याजकडील वर्तमान छ ४ राजपावेतो साहेबाचे सेवेसी लिहिले च आहे. यानंतर छ ५ रोजी नागपुरापासोन चवकोसावर कापसी ह्मणून गांव आहे तेथें मु॥ होता. तिसरे प्रहरीं आपण व कृष्णराव व माधव श्रीधर लक्षुमण ऐसे बोलत बसले होते. साहा घटका दिवस राहाता आपल्याकडील वकील गढे मडम्याकडे जाववयाकरितां राजनी आपाजी रघुनाथ यास रवानकीचे विडे दिले. व बराबर स्वार पंचवीस देववायाची नेमणूक जाली. नंतर सायंकाळी सईनासाहेब व परसोजी भोसले याचे कुटुंब नागपुरास रवाना केले. साहेबास कळावें. मग आपण व कारभारी बसून तेथून आठा कोसावर माथनी मोहोन प्रगाना नजरइन प्रांत रामटेकचा मुकाम नेला. साहेबास कळावें. छ ६ रोजी कुच करोन मुकाममजकुरी दाखल जाले. सायंकाळी पुण्याकडोन डाकची पत्रें आली नंतर कारभारी बोलाऊन पत्रें वाचून साहा घटका खलबत जालें. साहेबास कळावें. छ ७ रोजी मु॥ जाला. गुज्याबा गुजर याजकडे गांव आहे, त्यांनी मेजमानी केली. तिसरे प्रहरी विठ्ठल बल्लाळ सुभेदार व रघुनाथराव घाटग यांस पत्रें लेहून सांडणीस्वार रवाना केले. साहेबास कळावें. साहेकाळी येसुभाई सिलेदार याचा घोडा बोर बहुत चांगला होता तो आणून सरकारांत लाविला. साहा घटका रात्रीस कारभारी आले. यावर आपण व भवानी कृष्ण व उभयता कारभारी ऐसे बसून च्यार घटका बोलनें जालें. यावर भवानी कृष्ण याचा जावयास फार सखा आहे ह्मणून ते निरोप घेऊन घरास आले. साहेबास कळावें. छ ८ रोजी मु॥च होता च्यार घटका दिवस येता कटकाहून फिरंगियाची पत्रें व किष्णमराज याजकडील पत्रें आलीं होती. मग कारभारी बोलाऊन पत्र वाचून च्यार घटका खलबत जालें. दोप्रहर स्वारी तयार करून आपण व सईनाधुरंधर व परसोजी भोसले व उभयेता कारभारी ऐसे जाऊन सबदागराचे उंट सुमारी १७२ आले होते ते जाऊन खरीद केले. पु रु।। २५००० याचे वीस हजार त्यांत बटा कापला दर सेकडा रु।। पंधरा. याप्रमाणें बटा वजा करून सवदागरास वीस रु।। खर्चास देविले. आन रुपयाचा वाईदा आठा महिन्याचा केला. साहेबास कळावें. चंवऱ्यागडावर राजश्री बगाजीपंत भातवने व राघोपंत चीटणीस होते. त्यास राघोपंतास किलेदाराने सोडून दिले. याचें व याचें बोलनें लागलें. येसोबा याजपासी आहे. साहेबास कळावें. पांचा घटका रात्रीस कारभारी आलें. यावर कचेरीच्या डेऱ्यांत आपण व कारभारी आनंदराव वैद्य याचे कारकून पुण्याकडोन खंडोपंत आला होता, त्यास निरोपाची वस्त्रे सेला पागुटें पैठणी व मंदीली येक व किनखाबाचे ठाण अर्ध येकूण साडे तीन सनगें दिल्ही नंतर आपण व कारभारी बसून तेथून दाहा कोसावर क॥भडार ह्मणून गांव आहे तेथील मु॥ नेमून दरबार बरकास जाला. छ ९ रोजी प्रहर दिवस येतां कुच जालें. पुढें एका कोसावर आले तों पुन्याकडोन डाकची पत्रें आलीं. यावर आपण व सईनाधुरंधर ऐसे एका अंबारीत बसून पत्रें वाचीत मुकामा पावेतों आले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३२०.
१७१९ फाल्गुन वद्य १२.
पो।। छ ७ सवाल सु॥ समान तिसैन मया व अलफ.
साहेबाचे सेवेसी आज्ञाधारक मल्हारजी वरदे कृतानेक विज्ञापना ऐसीजे येथील क्षे ता।। छ २५ माहे रमजान प्रों मु॥ लष्कर जागा शिंदी प्रगणे पळसगाव साहेबाचे कृपावलोकने करून आज्ञा-धारकाचें वर्तमान यथास्थित असे यानंतर ता।। छ १९ रमजानीं साहेबाचे सेवेसी विज्ञापना लिहिलीच आहे त्यानंतर ता।। छ २० रोजी सप्तमीस चंद्रपुराहून कुच करून मजल दर मजलीनें वद्य १३ बुधवारीं नागपुरास जावें त्यास राजनी सेनाधुरंधर यांनी प्रां।। चंद्रपूर येथील बंदोबस्त करून वद्य १० सोमवारी हिंगणघाटास मागाहून येऊन दाखल व्हावें येणें न जालें ह्मणोन मु॥-म॥री मुकाम केला आहे वरकड कारखाने आले आहेत मागाहून सडे एणार त्यांची मार्गप्रतीक्षा करीत आहेत नेमल्या मुकामा प्रों।। जाणें झालें नाही उपरांतीक ठरेल त्या प्रों।। सेवेसी विज्ञापना लिहितो ता।। छ २२ रोजी राजश्री दवलतराव शिंदे याजकडून पत्रें आली ती त्यांचा वकील नेमतराव कायत यानें आणून गुजरली ती उभयता कारभारी व आपण बसून वाचली नंतर हिंगणघाटच्या मुकामास आले तेव्हां वाघाची बातनी आली शिवसिंग हजारी भगवंतराव सालतकर कृष्णाजी मुगुटराव व बुरानशाचे चिरंजीव ऐसे पुढें पाठविले कीं तुह्मी जाऊन वाघाची बातनी मनास आणून वाघरालाऊन आह्मांस सांगून पाठवावें त्यानंतर त्यांनी जाऊन बंदोबस्त करून सांगून पाठविलें की वाघोलीच्या रानात वाघीण आहे तेथून निघोन उभयता श्री व ठकुबाई व त्यांची सून व कन्या बन्याबाई व आपण वाघरा लाविल्या होत्या तेथे येऊन आत हत्ती व सांडणी घालून वाघीण भडकाविली वाघरांत जाऊन पडली पडतांच वरते वासे टाकून बळकट पच्ची केली जीत धरून गोटास आणिली उभयता कारभारी व भवानी माळो व आनंदराव वैद्य होते यांसी दाखविली नंतर पुण्याची डाक आली ते वाचून पाहिली त॥ छ २४ रोजी हैदराबादेकडून नबाबाकडील सांडनीस्वार यांची जोडी पत्रें घेऊन आली ती उभयतां कारभारी व आपण बसून, वाचिली यांनी आपलीं पत्रें व रामचंद्र दादो यांच्या पुत्राची पत्रें आपल्या सांडनीस्वारी याजसमागमें मशारनिलेकडे रवाना केली आळसपुरास पाठविली राजश्री गुंडो शंकर नागपुराहून एऊन भेटला एक मोहर नजर केली दुसरे दिवशी वाघ एक मारला साहेबाचे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
नंतर दीड प्रहर दिवस येता श्नान देवपूजा करून सिवा बाला हाजारी यास सांगितलें कीं, तुह्मी शेहराबाहेर जाऊन रारू. मग भोजेन करूण कचेरीस बैसले तो मारनिले जागा पाहून आले. यावर त्यास सांगितलें की डेरे बाहेर द्यावेत, मग कारभारी बोलाऊन, आपण व उभयेता कारभारी व पांडुरंग गनएश यैसे नदींत जाऊन, डोगयावर बसून प्रहर दिवसापासून दोन घटका रात्रपरयंत खेलत होते मग श्वारी गोटास आली. छ २६ रोजी च्यार घटका दिवस येतां पुन्याकडोन डाकची पत्रें आलीं नंतर कारभारी बोलाऊन, आपण व उभयेता कारभारी बसून, पत्रें वाचून पाहिली. नंतर च्यार घटका खलबत जालें. साहा घटका दिवस आल्यानंतर श्नान देवपूजा करून, सिवरात्र होती, दो पाहारा श्वारी तयार करूण, आवघ्या देवाची दरशेन घेऊन, साहेकालीं श्वारी डेऱ्यास आली. नंतर श्नान करूण, फराल करूण, निद्रा केली. छ २७ रोजी प्रथकालीं बालापुराहून सलाबतखान याची पत्रें आलीं. मग कारभारी बोलावून पत्रें वाचून पाहिलीं. व तेथें नदीया गांव आहे, नदीत मांडव घातला आहे, तेथेच सईपाक करविला होता. प्रहर दिवस येता नदीत जाऊन, श्नान देवपूजा करूण, ज्वर येत होता त्याचें दान केलें. तांबडा बैल येक ब्राह्मणास दिल्हा. त्यास पांच रु।। दक्षना दिल्ही. व येका ब्राह्मणास ताबा व यकास पवल व येकास खारवा व मसुरू दिल्हा. पांच ब्राह्मणास पांच रु।। दक्षना दिल्ही. नंतर पावने दो पाहारा ह्ममद आली व ह्ममद मोहोशेम वराडचा कमावीसदारव दोघास रवाणा केले. कारण की कलकत्त्याच्या फिरंगी याजकडील वकील रतनपुरास येऊन दाखल जाला. याजकरितां या दोघांस पुढें रवाणा केले. मग सवा दो पाहारा भोजेन करूण निद्रा केली. साहा घटका दिवस राहता कारभारी बोलाऊन, आपण व कारभारी वगैरे माणकरी यैसे नदीत डोगयावर बसून, दारूचें तोटे खेळत होते. मग दो घटका रात्रीस बाहेर येऊन नदीत बैसले. नंतर परसोजी भोसले वगैरे माणकरी दाहा वीस येकीकडे व लिज्यावा गुजर व कृष्णाजी मोहीता वगैरे लोक येकीकडे होऊन, दारूचे तोटे वाटून घेऊन, साहा घटका खेळत होते. मग प्रहर रात्रीस श्वारी डेऱ्यास आली. छ २८ रोजी प्रथकाली कारभारी बोलावून, विठ्ठल बल्लाळ सुभेदार याजकडोन डाकची पत्रें आली होती ती वाचून पाहिली. पत्रीं वर्तमाण कीं, र॥ बगाजीपंत भातवेटीचे चवण्या गडावर होते ते सुटून खाली येसावा पानतठाणें याजपासी आला आहे व तेथील कमावीसदार आहे त्याच्या याच्या भेटी जाल्या. ह्मणोन पत्रें आलीं. साहेबास कळावें. प्रहर दिवस येतां रामराव गुजर याजकडे भिवपूर आहे तेथे ते गेले आहेत. त्यांनी परसोजी भोसले यास मेजमानी केली ह्मणोन मारनिले लोक सुमारीं से दीडसें गेऊन भोजेन करूण यास वस्त्र परसोजी भोसले व गुज्याबा गुजर व कृष्णाजी मोहिता यास सेला पागोटी दिल्ही. प्रहर दिवसा येतां नदीत जाऊन श्नान भोजेन करूण निद्रा केली. साहा घटका दिवस राहता नदीत तोफा बोलाऊन, कारभारी व आपण बसून, पुढे पासोडीचे निशान लाऊन, साहेंकाल परयंत गोळ्या मारीत होते व कांही वराडपाड्या व पासरपाड्या बोलाऊन मालोमामलतीचा कारभार हि जाला. नंतर साहेंकाली श्वारी डेऱ्यास आली व परसोजी भोसले भिवपुरास गेले होते ते हि आले. मग आपण व कारभारी बसून च्यार घटका रात्रपरयंत बोलनें जालें. नंतर दरबार बरकास जाला. छ २९ रोजी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
छ २० रोजीं दीड प्रहर दिवस येतां कूच जालें. बराबर बाबा उपाध्ये व श्रीमन शास्त्री व नारायन बाबा चत्रफुले वगैरे शावकारमंडली येकोबा नाईक पिदडी व मुऱ्हार नाईक गडकरी व गंगाजी नाईक गडकरी व दरगदार बलवंतराव भवानी व चिटणिसाकडील शामराव चीटणीस व फडनिसाकडील कारकूण व खासगीकडील सितारामपंत व मुनीकडील कारकूण याजप्रमाणें बंदोबस्त करूण दिल्हा. व बराबर पतक रघुनाथराव मुढे व पाटोळे दोघे मिलोन स्वार पाचसे व चवकी पाहाऱ्यास येक कुंपणी गारद्याची दिल्ही वगैरे सईनाधुरंधर याच्या घरपागा वगैरे लोक मिळोन दोन हजार व हाती पंधरा व बानाच्या कैच्याचे उट पंधरा व येत्राबराबर पाच हजार आहे. दीड प्रहर दिवस आल्यावर कूच जालें. सईनासाहेब गोटाबाहेर घालवून डेऱ्यास आले. यावर भवानी दादू यास बोलावून वस्त्र शेला पागुट्ये पेठणी व मलमलीचा झगा व पायजमा येकूण साडेतीन सनगे दिल्ही व घोडी येक दिल्ही. नंतर सदासिव राजाराम यास सेला पागुटें पेठणी दिल्हे, व घोडी येक दिल्ही व हाती येक कटकांत देवविला, आन त्याचें काम त्यास, सांगितलें, नंतर विडे देऊन बिद्यागिरी केली. यावर यात्रेंत त्यांना घालून दरगावर आले. च्यार घटका दिवस होता. तेथें नदी आहे. आपण व कारभारी बसून तेथून माघारी. च्यार कोस कबडू पाटील याचा बाद आहे तेथील मुकाम नेमून दरबार बरकास जाला. छ २१ रोजीं प्राथकालीं श्नान देवपूजा करूण भोजेन जाले. सवा प्रहर दिवस येतां नागपूराकडोन डाकची पत्रें आली. यावर कारभारी बोलाऊन पत्रें वाचून पाहिली. दीड प्रहर दिवस येतां कुच जालें. प्रहर दिवस राहतां मुकाममजकुरी दाखल जाले. यावर दोन घटका डेऱ्यास बसून, कारभारी बोलावून, आपण व परसोजी भोसले व उभयतां कारभारी वगैरे मानकरी येस तबवावर जाऊन, तोफा दोन बोलाऊन, तळ्यांत गोळे दाहा टाकले. नंतर साहेंकालीं श्वारी डेऱ्यास आली. यावर आपण व उभयता कारभारी व परसोजी भोसले यैसे बसून, दोन घटका बोलून, मुकामाचा गाव पाच कोस चांदगढी नेमून, दरबार बरकास जाला. छ २२ च्यार घटका दिवस आल्यानंतर श्वान देवपूजा करूण, भोजेन करूण, पावने दो पाहारा कूच जालें. तों साहा घटका दिवस राहतां मुकाममजकुरी दाखल जालें. नंतर दोन घटका डेऱ्यास बसून, श्वारी तयार करूण, आपण व उभयेता कारभारी वगैरे मानकरी यैसे तेथून येका कोसावर सिवनगावचा तलाव आहे तेथें गेले. नंतर तेथे जाऊन दोन घटका तलाव पाहून दोन घटका रात्रीस श्वारी डेऱ्यास आली. यावर आपण व उभयता कारभारी व पांडुरंग गनएश व बापू हाळ्या व बाळाजी पंत काळेकर यांच्या मारफतीनें कमावीसदार आहेत त्यांस प्रगादार कोण्ही भेटावयास आले नाहीत, याजकरीतां म॥रनिले याजवर बहुत रागे भरले होते. मग आपण व कारभारी बसून तेथून साहा कोसावर तई ह्मणून गांव आहे. तेथे मुकाम नेमून दरबार बरकास जाला. छ २३ रोजी प्रथकाली आपण व परसोजी भोसले यैसे बसून, कारभारी बोलावून, बकरदसिंग सिकाकूर राजदरबारी यास पत्रें लेहून साडनीस्वार रवाणा केला. नंतर श्नान देवपूजा करूण, भोजेन करून, दीड प्रहर दिवस येतां कुच जालें. आन आपण चांदगढीचा किला पहावयास गेले. किलेदारांनी हि बैठक केली होती. तेथें दोन घटका बसून विडे घेऊन कुच केलें. च्यार घटका दिवस राहतां मुकाम मजकुरीं दाखल जाले. नंतर तेथें नदीत आपण व कारभारी बसून च्यार घटका दिवसापासोन च्यार घटका रात्रपरयंत गवई याचे गायेन जालें. नंतर आपण व कारभारी बसून तेथून आठाकोसावर क॥ देवनीचा मुकाम नेमून डेऱ्यास आले. दरबार बरकास जाला. छ २४ रोजी गावची रयेत फिरयाद आली होती. त्याजवऱ्होन मर्जी दिक्क होती. प्रहर दिवस आल्यानंतर श्नान देवपूजा करूण, भोजेन करून, दीड प्रहर दिवस येतां कुच जालें, तों तीन घटका दिवस राहता मु॥ मजकुरी दाखल जाले. बालाजीपंत काळेकर याजकडे कमावीस आहे त्यानें डेरे किल्यांत दिल्हे. मग मारनिले याजवर रागे भरले कीं, आवघे लशेकर व घोडी बाहेर राहिली आन आह्मी किल्यांत राहिलों. ह्मणोन च्यार घटका रागे भरोन, कारभारी बोलावून,आपण व उभयेता कारभारी बसून, येक प्रहर बोलने जालें. नंतर दरबार बरकास जाला. छ २५ रोजी प्रथकालीं कराभारी बोलाऊन मातोश्रीस व सईनाधुरंधर यांस पत्रें लेहून डाक रवाणा केली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
मग श्नान देवपूजा करूण, भोजेन करून, निद्रा केली. साहेंकाली निजून उठले. नंतर आपण व सईनाधुरंधर यैसे बसून भवानी दादू यास बोलाऊन सांगितले, तुम्ही आपली जोडी जगननाथास रवाना करावी, कारण कीं पुढें जाऊन सरजाम करावा. याजप्रमाणें बोलून, कृष्णराव माधव यास बोलाऊन, पत्रें लेहून मारनिलें याची जोडी रवाणा केली व पुन्याकडे दारकोजी कोरका रवाना केला आहे. पत्रें व जासूदजोडी रवाणा केली. नंतर साहा घटका रात्रीस दरबार बरकास जाला. छ १५ रोजीं च्यार घटका रात्र राहतां सईनासाहेब- सुभा यास ज्वर आला. दरबार जाला नाहीं. छ १६ रोजी ज्वर होता. दो पाहारा पुन्याकडोन डाकचीं पत्रें आलीं. कारभारीं बोलाऊन बाडांत च पत्रें वाचून पाहिलीं. सईनाधुरंधर यांनीं आपल्या तोफा साहा व येत्रा पुढें चींचगडास लाविली. मग दरबार जाला नाहीं. प्रहर रात्रीस सईनासाहेब यांनीं फराल केला. छ १७ रोजीं च्यार घटका दिवस राहतां बालापुराहून सलाबतखान याजकडोन सांडनीस्वार पत्रे घेऊन आला. मग कारभारी बोलाऊन पत्रें वाचून पाहिलीं. पत्रीं वर्तमाण कीं पेंढारियांनीं बहुत उपद्रव केला आहे. मग दोन घटका बोलून कारभारी आपले डेऱ्यास आले. प्रहर रात्रीस सईनासाहेब यांनीं आंगावरचे ++++ घेतलें. छ १८ रोजीं दोन घटका दिवस येतां कारभारी बोलाऊन, आपण व उभयतां कारभारी बसून, छ ९ रोजी कृष्णराज याजकडोन जोडी पत्रें घेऊन आले होते त्या पत्राची उत्तरें लेहून व येकाजी सकदेव व बालाजीपंत कोण्हेरकऱ्यांत आहेत यास पत्रें लेहून, दोघ हुजरे व जासूद जोडी रवाणा केली. दीडप्रहर दिवस येतां दरबार बरकास जाला. भोजेण करूण निद्रा केली. च्यार घटका दिवस राहतां कारभारी बोलाऊन, आपण व सईनाधुरंधर व उभयेता कारभारी व पांडुरंग गनएश व येकोजी भोसले येसे बसून भवानी दादू याचे कटकचे काग(द) वगैरे ताकीदी च्यार घटका दिवसापासोन प्रहर रात्रपरयंत कागद लेहून दिल्हें. नंतर दरबार बरकास जाला. छ १९ रोजीं च्यार घटका दिवस आल्यानंतर श्नान करून कारभारीही होते. ब्राह्मणास दक्षना रु॥ वीस व येक गाई दिल्ही. व आनखी दोघ ब्राह्मण होते त्यास पांच पांच रुपये दक्षना दिल्ही. नंतर दीड प्रहर दिवस आल्यानंतर आपण व उभयता कारभारी व पांडुरंग गनएस यैसे बसून न्यापालचा राजा देरसिंग कासी पलीकडे च्यारसें कोस आहे त्यास पत्रें लेहून टेकचंद मिरधा याची जोडी रवाना केली. व हैद्राबादेस नबाबास पत्रें लेहून थईली करून साडनीस्वाराची जोडी रवाणा केली. नंतर कलकत्याच्या फिरंगियास पत्रें लेहून जासूदजोडी रवाणा केली. यावर सवा दो पाहारा भोजेन करूण निद्रा केली. तों दोन घटका दिवस राहतां श्वारी तयार करूण, कारभारीसुधां गावाबाहेर कलकीची झाडी फार आहे तेथें जाऊन, सालकरतां बास तोडविले. नंतर नदीत दोन घटका बसून घटका रात्रीस स्वारी डेऱ्यास आली. यावर कारभारी बोलाऊन बाडांत च मातोश्री व आपण व सईनाधुरंधर व उभयता कारभारी यैसे बसून मातोश्री व सईनाधुरंधर याचा मुकाम, नवा कोसावर चापगडचा मुकाम, नेमला. नंतर च्यार घटका रात्रीस दरबार बरकास जाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
वाघाच्या बातमीवर बडे राजे व सिवा बाला हाजारी गेले होते. ते दो पाहारा बातमी आली कीं वाघ कोठे नजरेस येत नाहीं. मग दो पाहारा आपण व कारभारी मिळोन किल्ला पाहावयास गेले. जागजागीं पडक आहे. त्याची डागडुजी करावयास सांगितली. सवा दो पाहारा घोड्यावर स्वार होऊन साहेकालीं मुकामास आले. नंतर श्नान करून भिकाजी गोपाळ व उभयेता कारभारियास फराळास पाठविलें. नंतर आपण फराळ करून निद्रा केली. छ ११ रोजीं कुच करून सात कोसावर चांदगढी तेथें मुकाम नेमला होता व भिकाजी गोपाळ याची रवानगी वराडांत होत होती. विडे देण्हार होते. परंतु वय-धुरुत होता. भोजेण करुण कुच केलें. तों साहा घटका दिवस राहता मुकामास आले. बाडास येतां च मातक्यान स्वारी तयार करूण आपण व सईनाधुरंधर व तातोश्री यैसे ऐका कोसावर शिवनगांवचा तलाव चांगला मोठा आहे तो पाहावयास गेले नंतर पाहून साहेंकाली श्वारी बाडास आली. च्यार घटका रात्रीस कारभारी आले. यावर भिकाजी गोपाळ यास बोलावून येक प्रहरपरयंत वराडप्रांतीचा हिशेब पाहिला. नंतर तेथून साहा कोसावर कवडु पाटील याचा बाद आहे तेथें मुकाम नेला. दो पाहारा रात्रीस दरबार बारकास जाला. छ १२ रोजी स्नान देवपूजा करून श्वारी तयार करून मातक्यान सिबनगांवचा तलाव पाहून साहा घटका दिवस येता स्वारी बाडास आली. नंतर पावणे दोन पाहारा स्नान करूण मातक्याने सिबनगांवचा तलाव पाहून साहा घटका दिवस येता स्वारी वाडास आली. नंतर पावणे दोन पाहारा स्नान करूण, भोजन करूण बैसले, तों पुन्याकडील डाकची पत्रें व विठ्ठल बल्लाळ सुभेदार याजकडील पत्रं आलीं तीं वाचलीं नाहींत तसीं च ठेविली. मग मातोश्रीकडे जाऊन, येक घटका बोलून, भिकाजी गोपाळ यास व दारकोजी गायेकवाड यास विडे सईना- धुरंधर यांनीं दिले. दो पाहारा कुच केलें. भिकाजी गोपाळबराबर च होता. पाच घटका दिवस राहतां मुकामास दाखल जालें. प्रांत प्रतापगड. साहेकालीं कारभारी बोलावून, आपण व कारभारी यैसे बसून, दो पाहारां पुन्याकडोन डाकची पत्रें आलीं होतीं तीं वाचून पाहिलीं नंतर भिकाजी गोपाळ यास बोलावून वराडप्रांतीचा हिशेब पाच घटका पाहून, छ १३ रोजीं विडे देववावयाचें ठरलें. मग आपण कारभारीं व सईनाधुरंधर यैसे बसून दोन घटका बोलनें जालें. नंतर तेथून साहा कोसावर देरगांव आहे, प्रांत प्रतापगड, तेथें मुकाम नेमला. च्यार घटका रात्रीस दरबार बरकास जाला. छ १३ रोजीं प्रथकालीं कारभारी बोलावून, आपणव कारभारी बसून, भिकाजी गोपाळ यास विडे देऊन खंडोपंत आणंदराव वैद्य याचा कारकूण याजबराबर पुन्याकडे रवाना केला. नंतर दो पाहारा श्वान देवपूजा करून भोजेन करून कूच जालें. साहा घटका दिवस राहता मुकामास आले. यावर बाडांतच होते. दोन घटका रात्रीस कारभारी बोलाऊन, भवानी दादू हि होता, मारनिले याचें च बोलणें दीड प्रहरपरियंत होत होतें. पावणे दो पाहारा रात्रीस दरबार बरकास जाला. छ १४ रोजी प्राथकालीं च पुन्याकडोन डाकचीं पत्रें आलीं. नंतर कारभारीं बोलाऊन, आपण व सईना धुरंधर व उभयता कारभारी बोलाऊन, पत्रें वाचून दाखविलीं. नंतर बाहेर आलेयावर आपण व बाळाजीपंत कालेकर व व्यंकोजी भोसले नि॥ पीलखाना यैसे बसून, प्रतापगडचा कमावीसदार यास बोलावून रागे भरले कीं, रानांत झाडी फार आहे, तुझ्यानें, लावनी प्रगान्याची होत नाहीं. त्यास बालाजीपंत कालेकर यास सांगितलें कीं मारनिलें याचा झाडा पाहून कमावीस दुसऱ्यास द्यावी. हें च बोलनें दीड प्रहर दिवस येई तोंपरयंत होत होतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
छ० ७ रोजी मु.॥ जाला गुज्याबा गुजर यांनी मेजवानी केली. सेना साहेब व सईना धुरंधर व परसोजी भोसले वगैरे दोनसे लोक जेवले व उंट व घोड्यास दाना दिल्हा. च्यार घटका दिवस येता श्नान देवपूजा करून, प्रहर दिवस येता आपण व भवानी काळो व उभयता कारभारी बसून विठ्ठल बल्लाळ सुभेदार व रघुनाथ गोप-घाटणे यास पत्र लेहून सांडणीस्वार केले. दो पहारा दरबार बरकास जाला. नंतर भोजेन करून निद्रा केली. साहेंकालीं निजून उठले. नंतर कचेरीच्या डेऱ्यांत बसून येसू सुभाबा सिलेदार याचा घोडा करडा बोर बहुत चांगला होता तो आणून सरकारांत पागस लाविला. च्यार घटका रात्रीस भवानी काळोबा येऊन बोलत बसले. साहा घटका रात्रीस कारभारी आले- यावर आपण व कारभारी बसून येक प्रहर बोलनें जालें. नंतर भवानी काळो याच्या जावयास बेमार च वाखा होता म्हणून निरोप घेऊन पावने दो पाहारा रात्रीस कुच करून नागपूरास गेले. आपण व कारभारी बसून दोन घटका खलबत जालें. दो पाहारा रात्रीस (खजिन्याचे उंट च्यार) दरबार बरकास जाला. छ ८ रोजीं मुकाम च होता. प्रथकालीं स्नान देवपूजा करूण प्रहर दिवस येतां कलकत्त्याचा फिरंगीं करमारटिश साहेब याजकडोन मुजरद जाडी पत्र घेऊन आले- यावर आपण व कारभारी बसून तीं पत्रें वाचून पाहिली. नंतर च्यार घटका खलबत जालें. दीड प्रहर दिवस येतां दरबार बरकास जाला. दो पाहारा भोजन करून श्वारी तयार करून, आपण व सईना-धुरंधर व परसोजी भोसले वगैरे मानकरी व उभयेता कारभारी यैसे जाऊन सवदागराचे उंट सुमारीं १२७ आले होते ते खरेदी केले. त्यानें नजर दाहा डब्या केल्या. नंतर सेना-धुरंधर याजबराबर बानाच्या कैच्याचे उंट सुमारीं १५ जातात त्या बानाची परीक्षा पाहिली. दाहा बान सोडले. दोन बान येक येकां कोसावर गेले. नंतर दोन घटका बोलून साहा घटका दिवस राहतां श्वारी डेऱ्यास आली. यावर निद्रा केली. दोन घटका रात्रीस निजून उठले. नंतर घोडे दोन घटका पाहून कचेरीच्या डेऱ्यांत गेले. पाचा घटका रात्रीस कारभारी आले- यावर आपण व उभयता कारभारी व आनंदराव वैद्य याजकडील कारकून बाळाजीपंत व खंडोजीपंत यैसे बसून च्यार घटका बोलनें जालें. यावर खंडोपंत पुन्याकडून आला होता यास रवानकीचीं वस्त्रें सेला पागुटें पैठणीं व महमुदी येक व किनखाबाचे ठान अर्ध येकून साडेतीन सनगें दिल्हियावर च्यार घटका बोलून, पावणें दो पाहारा रात्रीस दरबार बारकास जाला. छ ९ रोजीं श्वान देवपूजा करुन, प्रहर दिवस येतां कुच केलें. पुढें येका कोसावर येऊन जगननाथाचे यात्रेस लोक जातात, त्याचे घरचे कोण्ही घालवावयास आले होते, त्यास निरोप दिल्हा. मग आपण व सेना- धुरंधर यैसे येका अंबारींत बसून चालले तों पुन्याकडून डाकचीं पत्रें आलीं. नंतर तीं पत्रें वाचीत मुकामापेवेतों आले. दाहा कोस कसबा भंडारे होतें. मुकाम जाला. तेथें गढी आहे. कमावीसदारानें मेजमानी केली. च्यार घटका रात्रीस कारभारी बोलावून तीं पत्रें वाचलीं. तों गांववाले येऊन बोभाट सांगितला कीं, आम्हास वाघानें बहुत उपद्रव केला आहे, मानसें मारितों. यांनीं हि बातमीवर जासूद पाठविले. मग आपण व कारभारी बसून येथून आठा कोसावर मोजलाखी म्हणून गांव आहे. प्रांत चांदगढीचा मुकाम नेमिला. मग प्रहर रात्रीस दरबार जाला. छ १० रोजीं प्रेथकालींच आपण व उभयेता कारभारी व बालाजीपंत काळेकर यैसे बसून च्यार घटका दिवस येईतोंपरियंत बोलनें जालें. यावर स्नान देवपूजा करूण बेसले. लशेकरचे कुच जालें. आन आपण व सईना-धुरंधर व उभयता कारभारी यैसे बैसले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीपांडुरंग. लेखांक २
लेखांक ३१९.
१७२० फाल्गुन शुद्ध १.
पे॥ छ २४ शाबान सुहूर सन तिसा तिसैन मया व अलफ.
श्रीमंत राजश्री रावसाहेब साहेबाचे सेवेसी.
आज्ञाधारक तुकाजी लकोबा व बाला सावंत कृतानेक दंडवत विज्ञापना त॥ छ माहे रमजानपावेतों साहेबाचे कृपालोकनेंकरून मु॥ नागपूर येथें सेवकाचा वर्तमान येथास्थित असो. यानंतर राजश्री सईना साहेब सुभा याजकडील वर्तमान छ ४ रोजी पावेतो साहेबाचे सेवेसी लिहिला च आहे. यानंतर छ ५ रोजी नागपूरापासून चवा कोसावर कापसी म्हणून गांव आहे तेथें श्वान देवपूजा करून भोजेन करून बाडालगत च विचोबा होता तेथें आपण व कृष्णराव माधव श्रीधर लक्षुमन ऐसें बोलले प्रहर दिवस होतां आपल्याकडील अप्पाजी रघुनाथ आले- यावर त्यासी दोन घटका बोलून त्यास रवानकीचे विडे दिले व बरोबर स्वार देववाविसी नेमणूक जाली. नंतर च्यार घटका दिवस राहतां सईनासाहेबसुभा व परसोजी भोसले याचे कुटुंब नागपुरास रवाना केलें. यावर आपण व कारभारी बसून साहा घटका बोलणें जालें. नंतर च्यार घटका रात्रीस दरबार बरकास जाला. कारभारी डेऱ्यास गेले. छ ६ रोजीं कुच जालें आपण स्नान देवपूजा करून भोजन करून दीड प्रहर दिवस येतां कुच जालें. आठा कोसावर माथनी मोहोन म्हणून गांव आहे, प्रगाना नजरधन, प्रांत रामटेक. साहेंकाळीं मुकामास आले. गांव गुज्याबा गुजर याजकडे आहे. पुन्याकडून डाकची पत्रें आलीं होतीं. मग च्यार घटका रात्रीस कारभारी बोलावून आपण व उभेयता कारभारी बसून डाकचीं पत्रें वाचून पाहिलीं. नंतर साहा घटका खलबत जालें. सवा पाहार रात्रीस नागपुराहून भवानी काळू मागें राहिले होते ते आले. नंतर दोन घटका बोलून सवा दो पाहारा रात्रीस दरबार बरकास जाला.