श्री.
लेखांक २८२.
१६९७ कार्तिक शुद्ध १.
श्रीमंत राजश्री तात्यासाहेब.
दर्या बे॥ देवजी प॥ मे॥ मौजे काळेगांव प्र॥ सेवगांव सु॥ सन ११८५ कारणें. जामीनकदबा लेहून दिधला ऐसाजे. बीजमानत घो। नागोजी येकसिंग मौजे साकेगांव प्र॥ म॥र यांस आपण हजीर जामीन असो. आजी सबब कीं म॥रनिलेकडे सरकारची बाकी आहे. सबब म॥रनिले हजीर राहून फडच्या करितील. फडच्या न करितां गैरहजर जाहाले तर हजीर करूं. न करूं तर म॥रनिलेच्या नि॥ जाब करूं. हे जामीनकदबा लेहून दिल्हा. सही.
गाही नि॥ नांगर
मकाजी प॥ आंबवे वि॥ चिंतो
मौजे चितळी. नागेश जोसी
गोमा महार बादल कुळकर्णी
मौजे माार. मौजेम॥र.