श्री.
लेखांक २७९.
१६९७ चैत्र शुद्ध ६.
राजश्री त्रिंबक बाबूराव कमाविसदार सरकार बिज्यागड गोसावी यांसि :-
स्ने॥ अहिल्याबाई होळकर दंडवत सु॥ खमस सबैन मया व अलफ. र॥ गणेश शिवराम निसबत राजश्री चिंतो विठ्ठल यांजकडील देशास जात आहेत. त्यास खरगोणास आल्यावर याजबराबर माणसें देऊन आपली हद्दपार करून देणें. असे रीस पावते करून देणें. जाणिजे छ० ७ सफर. बहुत काय लिहिणें ?