Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीसर्वेश्वर.
लेखांक ३१०.
१७१४ ज्येष्ठ शुद्ध १०.
पौ जेष्ट शु॥ त्रयोदशी शके १७१४ परिधावी संवत्सरे
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्र्यंबक रावजी स्वामीचे शेवेसी:-
सेवक मोरो त्र्यंबक गोडबोले साष्टांग नमस्कार विनंति विशेष. तिर्थरूप बाबांस वैशाख वद्य एकादशीस देवाज्ञा जाली. हें वर्तमान मजला ब्राह्मणवाडे येथें समजलें. उपरांत घरीं आलों. कळावें. ईश्वरसत्ता प्रमाण. त्यांचे सर्व प्रकारें बरें जालें. आपलें छत्र गेलें. असो. तुम्हीं आपणाकडील सर्व वर्तमान लिहीत जावें. राजेश्री त्र्यंबकराव परचुरे यांस सा॥ नमस्कार सांगावे. र॥ मिती जेष्ट शुद्ध १० गुरुवार. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.
सेवेसी रामाजी केशव पळनिटकर सा॥ नमस्कार विनंति लिहिली परिसोन सदैव पत्रीं संतोषवीत असावे. या योगें स्नेह जाहाला यास अंतर नसावें. बहुत काय लिहावें ? कृपा लोभ करावा हे विनंति. सेवेसी चिंतो रामचंद्र पळनिटकर कृतानेक सा।। विनंति लिहिलीं परसोन कृपेंत अंतर नसावें. भेट होईल तो सुदिन. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३०९.
नकल
१७११ कार्तिक शुद्ध ७.
राजश्री राघो विश्वनाथ गोसावी यांसि:-
सुमा तिसैन मया व अलफ. दुल्लभशेट गोविंदजी यांनीं पेठ रविवार शहर पुणें येथें श्री गोपालकृष्णाचा ठाकुरद्वारा केला आहे. तेथें शेजारीं चांभारांची छपरें आहेत. त्यास दुसरेकडे ठेवावे तरी त्यास जागा पाहिजे. याजकरितां त्यांचे दक्षणेस शेजारीं छटु फरासाची जागा सरकारांत जप्तीस आहे ती मजला देवावी. मी त्यांस देऊन त्यांची जागा ठाकुरद्वाराकडे घेईन. सरकारचे जाग्याचे मोबादला माझी जागा पेठमारीं आहे तीं सरकारांत घ्यावीं म्हणोन विनंति केली त्याजवरून शेटीची जागा पेठमारीं लांबी हात २३ व रुंदी हात १४ त्यांत इमला अजमासें अडीचशें रुपयांचा आहे. ती सरकारांत घेऊन मोबादला छटू फरासाची जागा चांभाराचे लगती दक्षणेंस सरकारांत जफ्तीस आहे ते लांबी हात ३० व रुंदी हात २६ त्यांत इमला अजमासें रु।। शंभराचा आहे ती जागा सेटी मार यांस देणें छ ५ सफर बार कीर्दीस आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३०८.
नकल
१७११ आषाढ शुद्ध ६.
यादि दुलभशेट गोविंदजी यांणीं सरकारांत विनंति केली कीं रविवार पेठेंत श्रीगोपालकृष्णाचे ठाकुरद्वार केलें आहे, त्यालागतीं चांभाराची जागा च्यार छपरें आहेत त्यास तेथून काढून चांभाराची जागा ठाकुरद्वाराकडे द्यावी त्यास सरकारची आज्ञा कीं चांभारास राजी करून काढावें. त्या चांभाराचे छपराचे दक्षणेस छटू फरासाची जागा सरकारांत जफ्तीस आहे ती तान्हाजी येवला खिसमतगार याचे तसलमातीस दिल्ही आहे त्या जाग्यांत चांभार रहावयास राजी आहेत म्हणोन त्याजवरून छटू फरासाची जागा आहे तिचे मोबदला जागा सेटजीकडून दुसरेकडे घेऊन छटुची जागा पहावयाची आज्ञा. सु॥ तिसैन मया व अलफ.
छटू फरास याची जागा रविवार पेठेंतील सरकारांत जफ्तीस आहे.
३० लांबी पूर्व पश्चिम हात
२६ रुंदी दक्षण उत्तर हात
-------
या जाग्यांत इमला कैलार
२५ लांबी खण ७ येक हात
९ रूंदी हात
-------
हाली किंमत रुो।. १००
फरास मार याचे जाग्याचे मोबदला दुलभशेट याची जागा इमला कौलार दीढ मजला पेठ रविवार
२३ लांबी हात
१४ रुंदी हात
इमल्याची किंमत अजमासे रु।। २५०
दुलभशेट गोविंदजी यांणीं रविवार पेठेंत ठाकुरद्वार केलें आहे तेथें शेजारीं चांभाराचीं छपरें आहेत त्यास दुसरेकडे ठेवावे तर त्यास जागा पाहिजे याकरितां त्यांचे दक्षिणेस शेजारीं छटू फरास याची जागा सरकारांत जफ्तीस आहे ती मजला देवावी मी त्यास देईन. आणि त्याचे मोबदला माझी जागा पेठ मारी आहे ती सरकारांत घ्यावी म्हणोन विनंती केली त्याजवरून शेटजीची जागा पेठ मारी लांबी हात तेवीस रुंदी हात चौदा त्यांत इमला अजमासें अडीच शें रुपयाचा आहे ती सरकारांत घेऊन त्याचे मोबदला छटू फरास याची जागा चांभाराचे लगतीस दक्षणेस आहे ती सरकारांत जफ्तीस आहे ती लांबी हात तीस व रुंदी हात सवीस त्यांत इमला अजमासे शंभर रुपयांचा आहे ती जागा दुलभशेट गोविंदजी यास देणें म्हणोन सदरहू अन्वयें राघो विश्वनाथ याचें नांवें पत्र देवावें देणें.
सनद लिहीणें.
छ ४ सवाल सन तिसैन आशाढ मास.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३०७.
नकल
१७१० ज्येष्ठ शुद्ध १०.
राजश्री दुलभशेट गोविंदजी मु॥ के॥ पुणे गोसावी यांसी :-
छटु फुरास याची बायको खानम तुह्मांस हें बेदावेपत्र लेहून दिल्हे कारण ऐसें जे :-
आमचा भर्तार छटू फरास श्रीमंत नारायणराव साहेब यांच्या दंग्यांत सरकारचे गुनेगारींत आला; सबब मजला चाकणचे किल्यांत मुलाबालासुधा कैदेंत ठेविले. भर्तार श्रींमत दादासाहेबांबराबर होता. तिकडे मयत झाला. साडेतीन वर्षे मी कैदेंत होतो. त्यास सन समान सबैनांत तुह्मी सरकारांत विनंती करून माझा खंड ठराविला रुपये ३०० तीनशे; आणि आदितवार पेठेंत आमचे कामाठी महल्यांत खपरेल अकरा खण सरकारांत जफ्ती होते, त्यापैकी साहा खण सरकारांतून मजल बक्षीस राहावयास दिल्हे. त्याची सरकारची चीटी घेतली. त्याजवर सरकार खर्च वगैरे खर्च पडला; तो मजपासी द्यावयास नाहीं. तेव्हां सदरहू सहा खण तुह्मांकडे गाहाण ठविलें त्याचें गहाणपत्र पेठ म॥रचे चावडीवर आमचा जातवाला दाऊदभाई याचे साक्षीनें लेहून देऊन तुह्मांकडून सरकारचे रु॥ देविले. व खर्चाचे रोख घेऊन दिल्हे. त्याजवर घरांत भाडेकरी घातला आणि भाड्याचे दहावीस रुपये आले, ते तुह्मांस दिल्हे. पुढें तुमचे रुपये व्याजसुधां देऊन खण सोडवावें त्यास, आपली नादारी, अन्न भक्षावयास नाहीं, आणि भाडेकरी कोणी राहीना. अशांत बाहादरखान गाडदी सरकार आज्ञा घेऊन जबरदस्तीनें येऊन घरांत राहिला. भाडें पैसा येईना. त्याजवर मा।। पोरेबालें मेली. अन्नासाठी खेडेगांवी जाऊन राहिलें. त्याजवर तुह्मीं गहाणवटाची हकीकत व पत्रें सरकारांत दाखऊन परवानगी घेऊन मोठया सस्तीनें बाहादरखानास घरांतून काढून खण साहा आपले कबजेत ठेविले; त्यास वरीस दीढ वरीस जाहाले. हालीं केवळ नादार, अन्नवस्त्र नाहीं, म्हणोन फते- महमद वल्लद शेख महमद व फते-आली वल्लद मिरजा मोमीन बेग दि॥ चाकर तोफखाना यांस घेऊन तुम्हांकडे आलें का सदरहू खण तुम्हांकडे आहेत ते तुम्हास बेदावाखत लेहून देतें आणि मजला साहा च्यार महिने अन्न पोटास द्यावें. त्यास तुम्हीं उतर केलें कीं, तुजला सोडविली, पदरचा पैका दिल्हा, त्यास दाहा वर्षें गुजरलीं, पैशास ठिकाण नाहीं, घर बाहादरखान यांणीं घेतले होते ते आम्हीं जबरदस्तीनें सोडविलें, त्यास व्याजसुधां पैका देऊन सोडवावें, निदान जें तुझ्या खातरेस येईल ते व्याज व मुद्दल देऊन आपला जागा घर चित्तास येईल त्यास विकणें, अथवा गहाण ठेवणें, आणि पैका देणें, आपले सोईचे घर नाहीं. म्हणोन बहुत प्रकारें सांगितलें. परंतु त्या घरास कोणी खरीददार होत नाहीं, आणि माझ्यानें गहाण ठेविल्यास कोणी ठेवीत नाहीं. मी आपले खुश-रजाबंदीनें तुम्हांस बेदावा लेहून दिल्हा आहे. तर आगवाडा पिछवाडा पूर्वेकडील रिकामा जागा व बांधलेला इमलासुधां साहाखण तुम्हाकडे गाहाण होतें तें तुम्हांस खंडून तुमच्या ऐवजांत दिल्हें. मागेंपुढें कोणी या खणाविशईं वाद सांगावयाचा सबंध राहिला नाहीं. मिती शके १७१० कीलकनाम संवछरे जेट वा ७ वार बुधवार सु॥ तिसा समासीन मया व अलफ. हस्तअक्षर महिपत मल्हार महाजन पेठ भातखळें सरकार जुन्नर
सदरहू निशाणी पांच बोटें करंगळीनें खानम छटु फरास याचे बायकोनें केली.
साक्ष
१ फते महमद वलद शेख महमद दि॥ तोफखाना असामी जेजालंदाज खानमचा जांवई यांनीं रुबरु साक्ष ल्याहावयास सांगितली कीं सदरहू घराचा बेदाबा आपण मध्यस्ती करून केला असे. हस्ताक्षर लक्ष्मण फटकाळे वर लिहिलेप्रमाणें खानम यास पुसोन लिहिलें असे.
निशाणी शेख-अदम खानमचा पालक लेक याची पारसी असे.
साक्ष भत्य आलीबेग वलद मीरजा मोमीनबेग दि॥ तोफखाना. आपण मध्यस्ती करून बेदाबा करून दिल्हा असे हस्ताक्षर सदाशिव वाईच नि॥ घोले मंगलवाडेकर.
निशाणी नांगर.
१ पत्रप्रों। साक्ष सखाराम धोंडाजी. उभयता धणी रुजू.
१ पत्राप्रों। मनोहर अनंत किरकसे. उभयतां धणी रुबरु.
१ पत्राप्रों। साक्ष नंदापा वाळेकर दोघे धनी रुबरु.
१ शादतराम मोतीचंद शाखधणी बोई हजूर.
साक्ष जोत्या नष्टे.
---------------दोघे
धणी उरुबुरु.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीशंकर.
लेखांक ३०६.
१७०८ कार्तिक वद्य १०.
खरीदीखत शके १७०८ पराभव नाम संवत्सरे माहे कार्तिक व॥१० दशमी ते दिवसीं राजश्री विठ्ठल मोरेश्वर इ॥ गोपाळ नाईक उपनाम गोळे महाजन साकीन वेलेदूर त॥ गुहागर प्र॥ आंजणवेल सरकार सुभे दाभुळ हाली व॥ क॥ पुणें यासी त्रिंबकराव चिंतामण जोसी राईरीकर साकीन उरवडे त॥ मुठेखोरें हाली व॥ क॥ पुणें सु॥ समानीन मया व अलफ. सन ११९६ कारणें आपण आपले स्वसंतोषें खरीदीखत लिहून दिल्हें ऐसेंजे. क॥ नासीक येथें श्रीक्षेत्र पंचवटीत घर आमचें श्रीरामचंद्रजीचे पश्चमेस आहे दक्षणेचे आंगे पीछावड्याचे दरवाज्यावर दुघई साया दुमजला खपरेल तख्तपोसीमुधां व पुढे उत्तरेस खुली जागा च्यार दिवाळीं घालून पुढील दरवाजा उत्तरसंस्थ लाविला आहे, त्यासुधां तुह्मांस फरोख्त दिल्हा असे. त्याची किंमत रुो।
शाहानाजी पंचमेळ तमाम वजन पुरें आपण आपले पदरीं घेऊन घर व जागा तुह्मांस दिल्ही असें. त्याचे हमशाई पूर्वेस बाळं ठाकूर जटाळ, व पश्चमेस रस्ता, दक्षणेस गल्ली. श्रीरामचंद्रजीस जावयाची, उत्तरेस रस्ता. जाग्याची मोजणी त॥.
दक्षण उत्तर लांबी रुंदी पूर्व पश्चिम गजगज इमारतीसिवाय दिपाये दिवाल गज वाला गज सुमार सुमार गज येकंदर मोजणी इमारतसुधां येणेंप्रो। असे. घराचे दरवाजे आगवाडियाचा उत्तराभिमुख. पिछवाड्याचा दक्षणाभिमुख. त्याणें वागत जावें. घराचे पाणी आगवड्याचे उत्तरेचे रस्त्यांत जातें तैसे जात जाईल. व पिछवाड्याचें पाणी दक्षणेकडे जातें तैसें जात जाईल. सदरहूप्रों। तुह्मांस हदमहदूद मिरास करून दिल्ही असे. सुखें तुमचे मनास येईल त्याप्रें॥ इमारत बांधोन वंशपरंपरा नांदत जावें. यासी कोणी आमचे वंशीचा अथवा पर कोणी मुजाईम होईल त्यास आह्मी वारूं. तुह्मासीं समंध नाही. हे खरीदखत तुह्मांस लि॥ दिल्हें. सही.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३०५.
नकल.
सिका.
ज्येष्ठ शु. ८ शके १७०८.
कबालेपत्र कोतवाली शहर पुणे विद्यमान घाशिराम सावलदास त॥ ताराचंद व॥ धरमचंद जोहोरी व हरीकचंद व॥ हिराचंद वखारी व पाणाचंद व॥ भुकण व मूळचंद व॥ रायचंद जोहोरी व आसाराम व॥ भुदरजी शेट व॥ कसबें शहर-मजकूर सु॥ सीत समानीन मया व अलफ सन हजार ११९५ शके १७०८ पराभव नाम संवच्छरे दिल्हे कवालेपत्र ऐसे जे माणिकविजे जती गुरू हरकविजे गछविजे अनसूर व॥ पेंठ वेताल याची जागा पेंठ-मजकुरीं घर कवलार एक मजला खण सुमार ३ होते. ती देवालय पारसनाथाचें बांधावयास आगवड्या पिछवड्या सुव्धां इमल्यासमेत तुह्मांस विकत दिल्हीं. त्याची किंमत रुपये १५० दीडसे तुह्मांपासून घेऊन जागा स्वसंतोषे देऊन खरेदी पत्र करून दिल्हें. तें तुह्मीं चैत्रा आणून दाखवलें. त्याजवरून चैत्रांहून गणेश रंगनाथ कारकून व कृष्णाजी बिन सुभानजी गवड्या चाकर नि॥ सरकार यास पाठवून जाग्याची मोजणी वगैरे चौकसी करून कलमें करार करून दिल्हीं बि॥ बि॥
लांबी पूर्व पश्चिम आगवड्यास पश्चिमेस गल्लीचे हाद्देस भिंतीचे आसार सुध्धां पिछवड्यास पूर्वेस गल्लीचे हाद्देस घराचे भिंतीचे आसार सुधा गज १९॥ सुमार. यासी चतु:सीमा: सेजार १ पूर्वेस मधी गल्ली, उत्तरेकडील सेजारी दामोदर कोठारी वगैरे याचे घरापासून दक्षिणेस रस्त्याकडे जात असे. रुंद पूर्व पश्चिम गज सुमार २॥ अडीच पलीकडे बाळा बल्लद जयराम कुंभार याचे घर कवलार.
१ पश्चिमेस मधीं गल्ली दक्षिण-उत्तर जात असे. रुंद पूर्व पश्चिम गज ४॥ साडेच्यार. पलीकडे कृष्णाजी बहिरव थत्ते यांचे घर कवलार.
१ दक्षिणेस सुकलाल परदेसी रजपूत याचे घर कवलार.
१ उत्तरेस इछी गुजराथीण व दामोदर कोठारी व केशवजी व बनेश्वर ब्राह्मण गुजराथी याचें घर कवलारी.
----
४
रुंदी दक्षिण उत्तर गज सुमार
६१॥ ऐन गर्भी गज
.।१॥। चांदई दक्षिणेकडील ऐन रुंद गज .॥३॥ पैकीं निम्मे सुकलाल परदेसी रजपूत याची गज सुमार .।१॥ बाकी तुमचे घराखाली.
.॥. चांदई उत्तरेकडील खुद्द तुमचे जागा खाली गज
-------
६॥।३।
घरास शेतखाना जागा नाहीं स॥ दखल बाद कलम ०
घराचे पाणी मोरी बांधोन सिरस्ते-प्रों। रस्त्याचे मोरीस मेळवावें. कलम १.
पिछवड्यास पुर्वेस घराचे भिंतीस दर्वाजा गल्लींतून वागावयास पुर्वुख असे. कलम १.
एकूण लांबी साडे एकूणीस गज व रुंदी पावणेसात गज सवातिन तसू व कलमें सात येणेंप्रमाणें जागा तुह्माकडे करार करून देऊन किमतीच्या रुपयांवर सरकार सिरस्ता दरसद्दे रुपये १० प्रमाणें रुपये १५ पंधरा तुह्मांपासून घेऊन कबालेपत्र तुह्मांस भोगवटियास करून दिल्हे असे. तर सदर्हू जाग्यांत देवाल- याची इमारत बांधोन मूर्तीची स्थापना करून तुह्मी व तुमचे पुत्र पौत्रादी वंशपरंपरेनें पारसनाथाचा उत्छाव करीत जाणें. जाणिजे. छ ७ साबान. मोर्तब सूद. मोर्तब.
बार रुजू.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३०४.
नकल
१७०६ भाद्रपद वद्य १.
यादी सदाशिव गणेश काळकर ब॥ वाडा फणसें मौजे वाडें ता। विजेदुर्गे वि॥ सटबाजी बिन कचोजी लाड हुजरे नि॥ सरकार.
३ भांडी वगैरे.
१ तपेलें तांब्याचें शेराचें.
१ तपेलें आच्छेराचें.
१ पळी लोखंडी.
० खुर्द टके १॥९
------
३
९ पांगुरणें जुनीं
१ पागोटे
१ शेला
१ अंगरखा छिटी
१ ऐरंडे सोवळयाचे
३ धोत्रें
२ धोत्रें
१ आंगवस्त्र
----
३
१ पासोडी छिटी पांघरुण अंगावरील
-------
९
१ पितळेची डबी तपकिरीची
१ बेडी लोखंडी पाई सरकारांतून पुण्याचे मुकामची
१ डोली बास सुद्धां
----
१५
येणें प्रे॥ पुण्यांतून किल्ले वंदन येथें म॥रनिलेस अटकेस पाठविलें सनद सरकार छ २३ जावल सन अर्बा समानीन पै॥ किल्ले मजकुरीं छ १४ सवाल भाद्रपद वद्य प्रतिपदा सन खमस समासीन मुक्काम
बेलमाची.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
माई ब्राह्मणीन इचें घरी पोथ्या वस्तवाणी भिकाजी मोरेश्वर यांनी ठेविली ते आणिली बाकी कांही राहिली असेल त्याची चवकशी करोन लेहून पे॥ ह्मणोन आज्ञा त्यास ब्राह्मणीनीचें घरी बाळबद पोथ्या गाठोडें दोन होतीं ती बाबू गणेश यांनी नेली पावती घेतली आणिखी चीज वस्त कांही माईचें घरी नाहीं. कदबा लेहून घेतला कीं चिंतोपंताचा याखेरीज सुतळीचा तोडा आंगीं लागल्यास हजार रु॥ गुन्हेगारी देऊं ह्मणोन लेहून घेतलें. कलम १.
खंडोपंत देशपांडे यास व्याजाचें फडच्याच पो। ह्मणोन आज्ञा त्यास धापेचा उपद्रव वृध जाला. चिरंजीव येक होता तो मृत्यु पावला देशपांडे यास घोड्यावर बसावयास शक्त नाही श्रीमंत हरीपंत तात्यांनी आज्ञा केली होती की खंडोपंतास व्याजाचा तगादा न करावा. त्याचे आज्ञेवरोन दोन महिने त्यास आह्मी तगादा केला नाहीं आपली आज्ञा प्र॥ परंतु त्यास आराम जाल्यावर पाठवून देतों. खताची मित्ती पाहोन हिसेब लेहून पाठविला तरी येथे फडच्या करोन घेऊं. तेथेंच पाठवावें असी आज्ञा जाल्यास डोली भाड्यानें करोन आराम झाल्यावर पाठवून देतों. राजश्री धोंडोपंत सुभेदार यांनी आह्मांस सांगितले आणखी येक वेळ स्वामीस पत्र लिहून हिसेबाची याद आणिल्यास उत्तम. नाहींतरी जाईन. स्वामीस विनंती लिहिणें हेंच की देशपांडे वृध फार तरी खताची मितीप्रे॥ याद लेहून पे॥. खत पे॥ ह्मणजे फडच्या करोन घेतों. कलम१.
राणोजी देशमुख पिंपळकर याजकडे येके चाळीस व रीतीप्रे॥ ऐवज घेतला. राणोजी पळोन गेला. त्याचे बायकोनें रुपये दिल्हे. व्याजाची हि निकाल कर्ती तरी स्वामींनीं रोखा व व्याजाचा हिसेब लेहून पे॥. येथें फडशा करोन घेतों. राणोजी असता तरी पाठवून देतो. रोखा हिसेब व्याजाचा जो होईल तो पाठवून द्यावा. कलम १.
राजश्री भिकाजी मोरेश्वर याचे वाड्यांत कोकणचे वऱ्हाडकरी राहिले त्यास आह्मी तसदी दिल्ही ह्मणोन लिहिलें त्यास आह्मी तसदी दिल्ही नाहीं. येथून लिहिणार लबाडीनें पत्रें लिहितात तीं स्वामींनी ध्यानास न आणावी. कलम १.
बाबू कोटवाला याचा चुलता मृत्यू पावला यास अवरोध आला याकर्ता पाठविला नाहीं. बाबूभट मठकर याची पुरसीस करावयाची व त्याचे घरी चीजवस्तू असेल ती बाबूचे गुजारतीनें आणायाची मटकर गावीं नाहीं तो आला ह्मणजे कदन घेऊन रुजुवात करोन बाबूस आज्ञेप्रे॥ पाठवितों वर्ते पाठवला ह्मणोन लिो। परंतु अवरोधामुळें राहिला. च्यार पांच रोज जाले ह्मणजे सेवेसी पे॥ ता. कलम १.
सदरहू कलमें दाहा ध्यानास आणोन आज्ञापत्र येईल त्याप्रे॥ वर्तणूक करूं हे विज्ञापना.
पे॥ छ २७ जिल्काद सन अर्बा समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
गंगाधर मोरेश्वर यास तगादा करोन वरातेप्रे॥ ऐवज घेऊन फडच्यास पुण्यास पे॥ ह्मणोन आज्ञा त्यास मारनिले धोंडोपंत कादार याजकडे चाकर आहेत. आह्मी आपले आज्ञेवरोन तगादा केला सुभेदारांनी आठा दिवसाचा करार केला की आह्मी पत्रें पुण्यास स्वामीस लि. हे रुपये व येस ठाकर याजबद्दल रुपये लखाकडे आहेत. तेथें लखानें तोड पाडिली तरी उत्तम. नाहीं तरी आमचें पत्राचें उत्तर आलें ह्मणजे गंगाधरपंतानें लरुपये द्यावे असें जाल्यास तोड पाडूं. तरी स्वामीनीं सुभेदाराचें पत्राचें उत्तर पाठवून द्यावें. त्याप्रे॥ कर्तव्य करूं. कलम १.
येस ठाकराकडे वरातीबद्दल फडा करोन व्याजाचे फडशास पे॥ ह्मणोन आज्ञा त्यास लखा जेव्हा आह्मी पुण्यास पाठविला ते येस ठाकर त्यानें आपले जिमेस करोन घेतला तो अद्याप घरास आला नाही. आपले पत्रावरोन येस ठाकर याचे चिरंजीवास तगादा आठ रोज रात्रंदिवस आणोन बसविला परंतु येक पेस्याचे दर्शन न जाले. पराकाष्टा जे करावयाची ती केली तेव्हा त्या मुलाजवळ जामीन घेऊन त्या मुलानें लखाकडे आपला चुलता शामजी ठाकर लखाकडे प॥ आहे कीं तेथें लखाने रुपयाची तोड पाडिली तरी उत्तम नाहींतरी स्वामींनी पत्र आपलें धोंडोपंतास द्यावे ठाकराकडोन सरकारचा ऐवज यावयाचा आहे त्यास ठाकराची कुळें वाजवी असतील ती कारकून वसूल करील त्यास दिमत न करावी. येथें कुळें हिमायती फार. ठाकरापासी कुळासिवाय एक कपदिकहि निघावयाची नाहीं घरें मात्र आहेत. नित्य माध्यानीचें संकट जाणोन स्वामीस विनंती लि॥. मान्य करणार स्वामी समर्थ. कलम १.
केसो ठाकर याजकडे वजनी जिन्नस होता किती व भिकाजी मोरेश्वर यांनी नेला किती. बाकी जिनस वगैरे राहिले तो (त)पसील लिो। ह्मणोन आज्ञा त्याप्रे॥ चवकसी करोन केसो ठाकर वाणी याचे घरीं जिनस बाकी राहिला. व भिकाजी मोरेश्वर यांनी नेला त्याची याद येकंदर पाठविली. जिनस त्याचे घरी तसाच राहूं द्यावा किंवा चिंतोपंताचे वाडियांत नेऊन ठेवावा किंवा पुण्यास रवाना करावा ? नाहींतरी वाणी याचेच जिमेस करोन येवज निरखाप्रे॥ घ्यावा याची आज्ञा येईल त्याप्रे॥ वर्तणूक करूं.
कलम १.
बापूभट मठकर
याजकडे भांडी होती ते भिकाजी मोरेश्वर यांनी नेली त्याची याद म॥रनिलेचे घरी आहे यादीची नकल घेऊन पाठवावी. भटजीस पुरसीस करावी त्यास भटजी तर मृत्यू पावले तयाचे बंधु आहेत ते सप्तश्रृंगास अनुष्ठानास गेले. घरीं बायेका व बाबू भटजीचा चिरंजीव लहाण आहे तो कांही माहीत नाहीं. त्या मुलापासी जामीन घेऊन बापू भटाचा बंधु आणविला. तो आला ह्मणजे आज्ञेप्रे॥ पुरसीस करितो. भटजीचे घरी भांडी ठेविलीं याची याद बाबू गणेश कोटवाले यास विचारलें त्यांनी उत्तर केलें. भांडी आणिलीं परंतु याद नाहीं. येकंदर याद मात्र बाबूचे रुमालांत होती ती सेवेसी पाठविली असे. कलम १.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३०३.
१७०५ आश्विन शुद्ध १५.
श्रीमंत राजश्री जेयरामपंत दादा स्वामीचे सेवेसी :-
आज्ञांकित येसाजी सिताराम मु॥ नासीक साष्टांग नमस्कार विज्ञापना. त॥ छ २० जिलकादपर्यंत वर्तमान येथास्थीत असे. यानंतरी चिंतोपंताचे वाडियांतील वस्तवाणी मोजदाद करोन व गावांत मठकर व केसो ठाकर व माई ब्राह्मणीन याचें घरी ठेविलें त्यापे॥ भिकाजी मोरेश्वर यांना नेलें काय बाकी राहिले त्याची चवकशी करून लेहून पे॥. उत्तर येईल त्याप्रे॥ वर्तणूक कर्णे ह्मणून आज्ञा त्यावरोन
चिंतोपंतांचे वाडियांतील मोजदाद केली त्याची याद तपसीलवार व वस्ता येक वेगळाच होता. त्यांत पांघुर्णे लुगडें व पोशाक वस्तवाणी सोन्याचे दागिनेव रुप्याचे व मोत्यें कंठा येक रुजु यादि दोन पाठविल्या वस्तवाणी भांडी वगैरे यादिप्रो।। चिंतोपंताचे च वाडियांत कोठडींत ठेवून आज्ञेप्रो ।। त्याचे व जिमेस लाविले. आज्ञा येईल त्याप्रो वर्तणूक करूं. कलम १.
धोंडाजी नो रेघे याचें घरीं चिंतोपंताची वस्तवाणी वतनी कागद चाळीस पन्नास आहेत. रेघे मजकूर याचे घरींहून कागदपत्र वस्तवाणीची चवकशी करून मुचलका घेऊन च्यार तट्टे भाडियानें करोन पांच गार्दी व नाइकास पुण्यास रवाना करावे ह्मणोन आज्ञा त्यास रेघे मजकूर यास आपले पत्राचे पूर्वी पुण्याहून मुजरत जासूदच आला होता. आह्मासहि पूर्वी स्वामीनीं पत्र लि।। होतें कीं धोंडाजी नोरेघे याजकडे चिंतोपंताचे मुदे पुसावयाचे आहेत तर नाईक मार यास पा देणें. आह्मी नित्य नाईकास तगादा करीतच होतो. नाईकाचा करार की विजयादशमी जाल्यानंतरी जावें पुण्याहून जासूद येथे तिसरे दिवशीं आला हें वर्तमान नाईकास कळल्यानंतरी आमचा निरोप घेऊन च्यार पांच दिवस गावांतच लपोन राहिले तेव्हां स्वामीचीं पत्रें येथें आली हें वर्तमान कळतांच नाईक पुण्यास आले मागें चिरंजीवास पळविले मुलें माणसें झाडोन वाडियातोन गेली. घरास कुलपें लाविली. आह्मी घरीं चवकीं बसविली नाईकाचा भाऊ त्याच वाड्यांत विभक्त आहे. त्यास तगादा केला आहे. धोंडाबा नाईकाकडे वस्तवाणी व कागदपत्र खरे आहेत. बाबू गणेश याचे रुमालांत यादी निघाल्या त्या सेवेसी पाठविल्या आहेत. वतनी कागद आहेत त्यापो भिकाजी मोरेश्वर यांनीं धोंडाबा नाईकास पत्र लेहून मखमलाबादचे इनामाबद्दल महजर व सरकारचे पत्रे व महजर मिळोन ११ आकरा नाईकांनी बाबू गणेश याजला देऊन पावती घेतली. वरकड वस्तवाणी कागदपत्र वस्तवाणीचे वस्त्यांत रेघेमजकूर यानें ठेविलें तयास तीन बार जाले थोडके दिवसाचा कारभार आहे. स्वामींनीं बाबू काटेवाले यास समक्ष पुसावें. रेघे याचे घरी चवकी तसीच असो द्यावी किंवा उठवावी ! आज्ञा येईल प्रो वर्तणूक करूं. कलम १.