Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक ३०२.

१७०५ ज्येष्ठ वद्य १४.

विद्यार्थी सदाशिव भगवंत सां।। दंडवत विनंति त॥ ज्येष्ठ व॥ १४ रविवार पावेतों मु॥ सातारा येथें असों विशेष येथील वर्तमान पेशजी लिहिलेंच होतें त्याचें उत्तर आलें नाहीं तेथून ग्रहस्त आले त्याणी मात्र पत्रांतील भाव खुणेचे सांगितल्यावरून कळले येथील वर्तमान तरी श्रीमंताचा काल होतांच दुसरे दिवशीं भिंती मोकळ्या जाल्या त्याजवर राजश्री त्रिंबकराव आलियावर विचार होऊन मातुश्री सखाबाई यांस पुण्यास न्यावी हा आग्रह पडोन सखाबाईंनीं एक उपोषण केलें ते वेळे धोंडो गणेश व नारो भगवंत याणीं फडनिसाचे कानावर घालोन इत्यर्थ ठराविला कीं, श्रीमंत तात्या याणी हळोंच हाती धरून खोलीत घालावी ही ही बातमी कळलियावर तो विचार राहिला फडनिसांचा आग्रह वस्त्रें देण्याचा आहेच परंतु बाबूराव याणीं तें काम परवानगीचा उजूर करून उभयतानी ही पत्रें पाठविलीं आहेत ते परवानगी आठ दिवसांत आणून देणार राजश्री परशराम पंतभाऊ यांस लिहिलें आहे. लोणीस यांचे व्याही चिंतोपंत लिमये आहेत त्यांस पत्रें पाठविली आहेत ते भाऊंजवळ रदबदली करून पत्र घेणार याजकरितां आपण त्वरा करून त्यांचे कानावर घालावें की वाटणी होऊन फारखित जाली असतां बळेंच घरांत शिरोन त्याचे स्त्रीस अटक केली आहे याजकरितां दहा हजार रुपये नजर घेऊन सरकारांतून दत्तपुत्र घ्यावयाची परवानगी देऊन पदाची वस्त्रें द्यावीं ह्याजप्रमाणें बोलोन वस्त्रास अडथळा पडे ते केलें पाहिजे आह्मीं घरास जाण्यास निरोप मागत होतों त्यास फडनिसाकडून अडथळा करून राहवलें आतां पळोन यावें या विचारायंत आहों यावयास च्यार दिवस अधिक उणे लागतील याजकरितां पत्र पावतांच वस्त्रास अडथळा पडें तें करावें चिदरावर जमिनीची चिठी आपणास दिल्ही याजमुळें फडनिसास फारच विषाद आला आहे भेटीनंतर सविस्तर कळेल तात्यांचें पत्र आपलयस शिवाजीबराबर आहे तें दस्ताऐवजीच आहे जिजीबाई एत असतां येऊ दिल्ही नाहींत ऐसें आहे तें दाखऊन वस्त्रास अडथळा पडे तें करावे आह्मीं तूर्त कारागृहातच आहों पुढे त्रिंबकरायास बाह्यात्कारें करावें पत्र मागील व हे वाचून फाडून टाकावे सविस्तर राजश्री गणपतराव वैद्य सांगतां कळेल त्यास विचारावें हे विनंति.

श्री.

लेखांक ३०१.

१७०५ ज्येष्ठ वद्य.

चिरंजीव राजश्री त्रिंबकराव यासि :-
पार्वतीबाईचा आसीर्वाद उपरी. तुह्माकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तर असे नसावें येणाराबरोबर पत्र पाठवीत जावें. सखाबाईस द्यावयाविसी लिहिले त्यास तेथे आल्यावर पारससिाचे वाड्यांत जावें लागतें त्यास तेथें जावयाची सोय नाहीं त्यास पुढें सोय पाहून यावयास येईल यास्तव द्यावयाची अडचण पडती. तुमच्या कामकाजाविसी देवास विचारिलें त्याविसी गोप्रदान देवयाचें करार जालें त्यास रुो। पाठवून देणें ह्मणजे गाय घेऊन पाठवून देऊं. आह्मी येथून पाठवित होतों परंतु ती आमची गाय घेत नाहीं तर आणीखी भवास विचारून काय लागेल ते रु।। पाठवून देणें जमना इनें डबे करावयास दिल्हेत आरघ्या जाहला असेल प॥ देणें. त्याची मेहनत काय होईल ती लेहून पाठवणें ह्मणजे पाठवून देऊं कळावें हे आशीर्वाद.

श्री.

लेखांक ३००.
नकल

१७०२ आश्विन वद्य ५.

चिरंजीव राजश्री त्रिंबकराव यांसि विठ्ठल आशिर्वाद उपरी आह्मी रजाबंदीनें खरिदी केली त्यापैकी तुह्मास वतनें वगैरे दिल्ही बितपसील.

१          कानगोचें वतन प्रां।। खानदेश सरकार पैकी निमे खंडो गंभीरराव निमे आह्मी तो आह्मीं आपले निमे तुह्मांस दिल्हें इनामें वगैरे सुध्धा.
२         मौजे रेहें व मौजे लालवावली येथील भट कुळकर्ण पोनमावळची
२         पुण्यांतीलवाडे वोंकारेश्वराजवळचे व बाग
-------


एकूण पांच पैकी एक कानगोचें वतन व दोन कुळकर्णे ज्योतिषवृत्ती दोन गावची व दोन वाडे तुह्मांस दिल्हे आहेत सुखरूप अनभवणें यास कोण्हासी संमध नाहीं कोण्ही भाऊबंद दिक्कत कदाश्चित् काल देश जाणून करतील त्यास आमची शफत असे तुह्मी सरकार लक्षानें वर्तणूक करून सुखरूप वंशपरंपरेनें अनभवणें मिती आश्विन वद्य ५ शके ७०२ शार्वरी संवत्छरे हें आशिर्वाद सरर्हू वतनास व घरास कोण्हा भावबंदास समंध नाहीं कोण्हाचा लढा यांत नाहीं हे आशिर्वाद.

श्री.

लेखांक २९९.

१७०१ मार्गशीर्ष.

हिशेब भगवंतराव अनंत जवारकर
५०          मुदल शक १६९७
              २५ भाद्रपद शुद्ध ५
              २५ आश्विन वद्य १३
             ------
              ५०
             सरासरी मिती आश्विन शुद्ध १
६           व्याज त॥ भाद्रपद वद्य ३०
             रोख
             माहे १२ कचे ६००
-----
५६
   ६॥।        व्याज त॥ शक ९९ भाद्रपद
                 वद्य ३० माहे १२
--------
६२॥।
   ७॥          व्याज त॥ शके १७०० भाद्रपद 
                      वद्य ३० माहे १२
-----------
७०॥
  ९॥            व्याज त॥ शके १७०१ कार्तिक वद्य ५ माहे १३॥
------
८०



श्री.

लेखांक २९८.

१७०१ ज्येष्ठ वद्य १३.

298 1

म॥ अनाम दशमुख व देशपांडे सरकार बिज्यागड यासी नाराकृष्ण सुभेदार प्रांत खानदेश सु॥
समानीन मया व अलफ सरकार-मजकूर येथील कानगोईचें वतन राजश्री चिंतो विठ्ठल यांचे आहे. त्याची जप्ती सरकारातून पेशजी झाली होती ती हाली मोकळी करून हें पत्र तुह्मास सादर केले असें तरी तुह्मीं कानगोईची जप्ती उठवणें ह्मणोन छ ४ रबिलावल-तिसा-सबैनची सनद सुभास सादर झाला त्यावरुन हें पत्र तुह्मांस सादर केले असें तरी सरकार मजकूर येथील कानगोईचे वतनाचा भोगवटा चालत आल्या प्रें॥ मशार- निले-कडे चालवणें जाणिजे छ २६ जमादिलावल मोर्तब सूद.


298 2    बार


श्री.

लेखांक २९७.

१७०१ ज्येष्ठ शुद्ध १४.

अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री धोंडो महादेव गोसावी यांसि :-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु॥ तिस्सा सबैन मया व अलफ आबाजी माहादेव याची मुलें मनुष्यें त्रिंबकास आहेत त्यांस उंटें व घोडीं व तट्टें माणसें देऊन पुणियास राजश्री चिंतो विठ्ठल यांजकडे पोंहचावून देणें. जाणिजे छ १२ जमादिलोवल आज्ञा प्रमाण.

297

श्री.

लेखांक २९६.

१७०० फाल्गुन वद्य १०.

यादा चिंतो विठ्ठल सु॥ समान सबैन मया व अलफ. तैनात सालिना रु. ३०००० पे॥ नाडगौडेपणाचे वतनाचे ऐवजी वजा रु. ७८०० बाकी तैनात सालिना करार २२२०० रुपये.

यास ऐवज म॥रनिलेकडे इनाम गांव व जमिनी व असाम्या चालतात. व सालम॥रापासून लाऊन द्यावयास मिळोन.

296 1

296 2

येकूण बावीस हजार दोनसे तैनांत सालिना सदरहूप्रमाणें असाम्या सात लिहिल्या आहेत. त्या पै॥ पेशजीपासून चालत होत्या त्या प्रें॥ चालवाव्या. न चालत त्याचा ऐवज वेतनांत बाकीस उतरून
हुजरून पावेल येणें प्रें॥

सन अर्बा पासून छ २३ सफर सन राहिले वेतन द्यावे तिस्सा सबैन फालपै ॥ दोन साले गुन मास. वजा करून बाकी वेतन घ्यावे रुपये

१    एक साल सर-कारांतून घ्यावें.
१    एक साल पै॥ ऐवज मुच्छदगिरीनें मेळवून घ्यावा
---

होत नाहीं.

असल यादी दप्तरी आहे त्याची नकल हे असे.

श्री.

लेखांक २९५.

१६९९.

यादि चिंतो विठ्ठल यास सालमजकुरापासून जातीस तैनात देखील पालखी व शागीर्द पेशा वगैरे कुल पडलें पान सुध्धां सालिना सु॥ समान सबैन मया व अलफ.

रुपये ३००००

यासी ऐवज म॥रनिलेकडे गांव व जमीन व वतन व असाभ्या चालतात त्याचे रु॥ व हाली लाऊन द्यावयाचे मिळोन. रु॥

295 1

295 2

295 3

295 4

श्री.

लेखांक २९४.

१६९९ आश्विन शुद्ध ७.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री विसाजी केशव स्वामी गोसावी यांसी पे॥ माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें विशेष सुरसुभा प्रां। कोकण येथील फडणिसी र॥ गोविंद विठ्ठल यांजकडे होती ते दूर करून र॥ बलवंतराव माहादेव कोलटकर यांजकडे सांगितली होती ते हालीं दूर करून पेशजी प्रमाणें गोविंद विठ्ठल यास सांगोन वेतन पेशजी प्रमाणें.

294

येकूण सोळासे साडेसत्यासी रुपये सालीना मोईन करार केली असे तरी मशालनिल्हे यांजपासून फडणीसीचे काम काज घेऊन वेतन सालीना सरकारांतून सोळासे साडेसत्यासी रुपये पावित जाणें जाणिजे छ ५ रमजान सु॥ समान सबैन मया व अलफ बहुत काय लिहिणें हे विनंती.

श्री.

लेखांक २९३.

१६९९ ज्येष्ठ शुद्ध १५.

राजेश्री सिवराम रघुनाथ स्वामी गोसावी यांसि :-
विनंती उपरी. रत्ना फरास दिमत फरासखान याची जागा पेठ बुधवार शहर पुणें येथें रुंद हात १५ पंधरा व लांब हात ३० तीस याप्रे॥ होती. ती सरकारांत घेऊन माहादाजी बल्लाळ कारकून सिलेदार यास दिल्ही. याचे मुबदला छटू फरास याची जागा लांब हात तीस व रुंद हात २४ चोवीस इमल्यासुधां गणेश पेठेंत सरकारांत जप्तीस आहे व नूरखान गाडदी याची जागा खुली रुंद हात १५ छेटू फरास याचे जागेचे पुढे आहे ती ऐसें प्रें॥ फरासम॥र यास देविली असे. तरी देणें.

जाणिजे छ १३ जमादिलावल सु॥ समान सबैन मया अलफ. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.