Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

गुलाल पाहिला. मग मसरनमुळूक दोन प्राहर येक घटिकास निघाले ते आपले हवेलीस दाखल जाहले ते अर्ज जाहली. खढरसला. संध्याकाळीं मसरनमुळूक बंगलेमधें बरामद जाहले. रघोत्तमराव रोसेनराय व मामुली इसम याचा सलाम जाहला. मग मसरनमुळूक रघोत्तमराव रोसेनराय यासी गोस्टमात जाहली. यांनीं कागदपत्र दाखविले ते पाहिले. येक प्राहरास बारखास जाहले. मग नवाब च्यार घटकास पच-पहालांत बरामद जाहले. सेख उमरखां व मीरदेतार-अलीखां मामुली याचा सलाम जाहला. रेजेपूरजेवाले व आदळे याचें गायेण होतें ते ऐकत बसले. दीड प्राहरास बरखास जाहले. रात्रीस खैरसला. ता छ २७ माहे शाबान रोज बुधवारीं नवाब साहा घटकास जागले. मग मसरनमुळूक जागले. मग नवाब येक प्राहर तिसरीमधें खाबागामधें बरामद जाहले. मसरनसुळूक मीर एकजतदबला व मामुली इसम यास बोलावून घेतले. याचा सलाम जाहला. मग नवाबासी मसरनमुळूक यासी गोस्टमात जाहली. येक प्राहर साहा घटकास बरखास जाहले. नासरमुळूक याचा नातू लहान मूल निवरतल्याची अर्ज जाहली. मग मसरनमुळूक बंगलेमधें बसले. रघोत्तमराव रेणूराव रोसेनराय यास बोलावून घेतले. याचा सलाम जाहला. गोस्टमात यासी जाहली. यांनीं कागदपत्र दाखविले ते पाहिले. तीन प्राहरास बरखास जाहले. गोदड-आबडाबादेहून येक तोफ आली ते जीनसीमधें दाखल जाहली ते अर्ज जाहली. संध्याकाळीं मसरनमुळूक बरामद जाहले. मुनीरनमुळूक व अज्यावणमुळूक व मामुली याचा सलाम जाहला. गोस्टमात अवघेयासि जाहली. दिल्लीचें पत्र अकबारीचें आलें होतें तें पाहिलें. मग मुसारईमु फिरंगियास खमम ताळुका दिल्हे. साहा घटकास पच- माहलांत बरामद जाहले. शाहगरितपेशा याचा सलाम जाहला. शैध अदळेयाचें गायेण ऐकत बसले. ते येक प्राहर तिसरीमधें बरखास जाहले. रात्रीस खैरसला. ता छ २८ माहे शाबन रोज गुरुवारीं नवाब साहा घटकास जागले. मग मसरनमुळूक जागले. नवाबाचे दरबारची खैरसला. मसरनमुळूक याचे दरबारास जाब जाहला. दरबारची खैरसला. महमदहुसेन अलीखां भोपाळवाला आला होता. जमादार यास पन्नास स्वारानिसी चाकर ठेविले. येक मोगल यास पंचवीस स्वारानिसी चाकर ठेविले. रघोत्तमराव काटकर वगैरे तीन ईसम यास दीडसेहे स्वारानिसी चाकर ठेविले. आरब पन्नास पुण्याकडून आले त्यास चाकर ठेविले. आणखी आले ते लोक ठेवितात. कळावें. धारुराकडे कांहीं जमीयेत पाठविणार म्हणून बोलतात. कळावें. जाहलें. वर्तमान सेवेसी लिहिलें आहे. जाहलें वर्तमान सेवेसी लिहिलें आहे. आणखी जें होई तें सेवेसी लिहीणे. कळावें. सेवेसी सुर्त होय हे विज्ञापना.

कागदपत्र दाखविले ते पाईले मग तीस इसम अरब याची मिसल पाईली. मग तेथून तीन प्राहरास निघाले ते आपले हावेलीस दाखल जाहले. ते अर्ज जाहली. रे॥ नरसिंगराव अमील मसेुदळास गेला त्याची अर्ज जाहली. मग नागपुरास भोसले याजकडे नबाबाकडील येक सुर्तुस्वार व रे॥ माधवराव वकील भोसले याचा याजकडील येक मुर्तस्वार यैसे दो मुर्तुस्वार नवाबाकडील कागदपत्र व माधवराव वकील याजकडील पत्र घेऊन नागपुरास गेले त्याची अर्ज जाहली. येलजपुराहून इसमालखां याजकडील पत्र घेऊन जासूदजोडी आली ते अर्ज जाहली. आणखी नागपुराहून येक सुर्तुस्वार पत्र घेऊन रे॥ माधवराव वकील भोसले याचा याजकडे आला. त्याची अर्ज जाहली. रात्रीस येक घटकास मसरनमुळूक बंगलेमधे बरामद जाहले. मीर अलम व मुस्तकीमजंग व रघोत्तमराव व मामुली इसम याचा सलाम जाहला. मग एकलतदवला धाकले खममहूंन एक त्याची मुलाजमात जाहली. नजर गुजरली. मग मसरनमुळूक मीर-आलम व मुस्तकीमजंग रघोत्तमराव व एकलतदवला यासी एकांत गोष्टमात जाहली. मग एकलतदवला यानें खममेचें पत्र दाखविलें तें पाहिलें. व मग मीरअलम यानें चिनापटणचे कागदपत्र दाखविले ते पाहिले. मग रघोत्तमराव यानें पुणेचे डाकेचे पत्र आलें होतें तें दाखविलें तें पाहिलें मग धारूराकडील डाक आली ते गुजरली ते पाहिले. येक प्राहरास बरखास जाहले. रात्रीस नवाबाचे दरबारची खैरसला. ता छ २५ माहे शाबान रोज सोवारीं नवाब साहा घटकास जागले. मग मसरनमुळूक जागले. व मग मसरनमुळूक येक प्राहरास बंगलेमधें बरामद जाहले. मीर आलम व मुस्तकींमजंग रघोत्तमराव रेणूराव व मामुली ईसम याचा सलाम जाहला. मग मसरनमुळूक मीर आलम मुस्तकीमजंग रघोत्तमराव यासी येकांत गोस्टमात जाहली. यांनीं कागदपत्र दाखविले ते पाहिले. मग येलजपुराहून इसमालखां याचें पत्र आलें होतें तें गुजरलें तें पाहिलें. मग चवथे-यासी गोस्टमात जाहली. तीन प्राहरास बरखास्त जाहले. ते अर्ज जाहली. नबाबाचे दरबारची खैरसला. चिनापटणाहून मिस्तर इसमीनसाहेब फिरंगी व आणखी येक फीरंगी ऐसी दोघे फिरंगी आले. त्याची आर्ज जाहली. संध्याकाळीं मसरनमुळूक बंगलेमधें बरामद जाहले. मुनीरन मुळूक व रोसेनराव व मामुली इसम याचा सलाम जाहला. गोस्टमात रोशेनराय व मुनीरनमुळूक यासी जाहली. यांनीं पत्र दाखविलें तें पाहिलें. येक प्राहरास बरखास जाहले. रात्रीस नवाबाचे दरबारची खेरसला. ता छ २६ माहे शाबान रोज मंगळवारीं. नवाब साहा घटकास जागले. मग मसरनमुळूक जागले. मग मसरनमुळूक सात घटकास जाऊन नानकराम याचे हवेलीमधें बसलें. तेथें रघोत्तमराव व मुनीरनमुळूक व मामुली इसम यास बोलाऊन घेतलें. याचा सलाम जाहला. गोस्टमात अवघेयासि जाहली. मग नवाब जनानेयाचे बंदोबस्तीनें मसरनमुळूक याचे चवकांतील हवेलीमधें आलें तेथें बसले. नाचकंचन्याचा होता. गुलाल पाहिला. मग तेथून नवाब दोन प्राहरास निघाले ते जनानेयाचे बंदोबस्तीनें आपले हवेलीस दाखल जाहले. मग मसलनमुळूक व तमाम अमीर उमराव दिवानखानेमधें येऊन बसले. तेथें मसरनमुळूक रघोत्तमराव व मीर अमजतदवला यासी गोस्टमात जाहली.

श्री.                                                                            लेखांक १

लेखांक ३१८. 

१७१९ माघ वद्य ३०.

पे॥ छ ४ रमजान सुहूर सन समान तिसैन मया व अलफ मु॥ पुणें.

श्रीमंत महाराज राजश्री अमृतरावसाहेब साहेबाचे सेवेसी.

विनंती सेवक आज्ञाधारक व्यंकोजी नींबाजी मुकाम कारवान दोनी कर जोडून कृतानेक सां।। दंडवत विज्ञापना येसीजे:-

ता छ २८ माहे शाबान रोज गुरुवारीं अस्तमानीं डाक रवाना केली. येथील बातमी नवाब बंदगानअलीचें वर्तमान त॥ छ २३ माहे शाबान रोज सेनवारीं तिसरे प्रहरास डाक रवाणां केली ते सेवेसी प्रविस्ट जाहली असेल. छमजकुरीं मिस्तर छोटे कीरीकपात्रीक फिरंगी वकील याचें येथें वर्तमान आलें कीं बंदराकडे इंगरेज फिरंगी व फरासीस फिरंगी याची लडाई जाहली. इंगरेज फिरंगी यांनीं फरासीस फिरंगियाचे सात झाज पडव करून आणलें म्हणून वर्तमान आलें. सबब त्यांनीं खुसी केली. त्याजवरून नवाबांनीं इकरामत-दवला भाऊसिंगचा उपरि यास हुकूम केला कीं नवे तोफा तकतवार च्यार चडविल्या आहेत त्या तोफाचे अकरा बार फिरंगियाचे खुसीचे करवणें. आणखी नवे तोफाचा पला पाहणें, म्हणून हुकूम केला. मग भाऊसिंगचा उपरी व इकरामतदवला यांनीं जाऊन नव तोफाचे अकरा बार खुसीचे केले. नवे तोफाचा पला पाईला, ते अर्ज जाहली. खिलबत्तीतील लहान च्यार तोफा तेरा जजाला तयार करावयास जीनसीमधें पाठविलें. ते तयार करून बाडनपेठेस पाठवणें म्हणून हुकूम जाहला. संध्याकाळीं मसरनमुळूक बरामद जाहले. भाऊसिंगचा उपरी व इकरामतदवला मामुली इसम याचा सलाम जाहला. गोस्टमात अवघे-यासि जाहली. इकरामतदवला यानें नवे तोफाचा पला पाहून आले ते सांगितलें. येक प्राहरास बारखास जाहले. इकडे नवाब च्यार घटका रात्रीस पच-माहलांत बरामद जाहले. सैद उमरखां व मीरदेतारअलीखां व मामुली इसम याचा सलाम जाहला. गोस्टमात अवघेयासी जाहली. रेजेपुरजेवाले व दोघ आदळे याचं गायण होतें तें ऐकत बसले. ये येक प्रहर पांच घटकास बारखास जाहले. रात्रीस खैर सला. ता।। छ २४ माहे शाबान रोज रविवारीं नवाब साहा घटकास जागले. मसरनमुळक जागले. मग नवाब दोन प्राहरास पच- माहलांत बरामदा जाहले. कलण हज्याम व सेख उमरखां व मीरदेतारअलीखां व मामुली इसम याचा सलाम जाहला. गोस्टमात अवघेयासी जाहली. मग नवाबानें हज्यामत घेतली. दोन प्राहर तिसरीमधे बरखास जाहले. मग इकडे मसरनमुळूक येक प्राहर साहा घटकास बंगलेमधें बरामद जाहले. मीर अमजरांदवला समसेरजंग रघोत्तमराव रेणुराव व मामुली इसम याचा सलाम जाहला. मग मसरनमुळूक रघोत्तमराव रेणूराव रोसेनराव यासी गोस्टमास जाहली. यांनीं कागदपत्र दाखविले तें पाईले. मग मीर अमजरांदवला समसेरजंग यासी गोस्टमात जाहली. मग मसरनमुळूक अडीचा प्राहरास पालकीमधें स्वार होऊन चवकांतील आपली हवेलीमधें गेलें तेथें बसले. मसरनमुळूक रघोत्तमराव रेणूराव रोसेनराय यासी एकांत गोस्टमात जाहली.

श्री.

लेखांक ३१७. 

१७१९ फाल्गुन वद्य ६.

छ ७ सवाल चैत्र मास सुहूर-सन समान तिसैन मया व अलफ.
साहेबाचे सेवेसी पुरवणी त॥ छ १९ रोजीं सेना-धुरंधर यांनीं समारंभ दिवाणखाण्यांत करून सर्व मुछद्दी मंडळी व मानकर वगैरे यांसी बोलाऊन राजश्री भवानी माळो व त्याची मंडळी बळवंतराव भवानी सुध्धां श्रीधर लक्ष्मण रामचंद्र माधव कृष्णराव माधव माधव अनंदराव वैद्य व नेमतराव कायत शिंद्याक डील व केशवराव व्येंकटेश होळकारा-कडील वकील व नरशिंगराव अनंत नबाबा-कडील बुऱ्हानशाचे चिरंजीव असामी दोन गुजर मंडळी व्याही जावई व भासे वगैरे मिळोन पाऊणशें इसम यांसी वस्त्रें शेला पागुटीं योग्यायोग्य पाहून बराणपूर ज्याहनाबाद येणेप्रे॥ दोन सनगें सर्वांस देऊन राजश्री परसोजी भोसले यासी शेला पागुटें पैठणी अबासी दिल्हे व मुधोजी भोसले यांसी कुंचडेंटोपडें झगा दिल्हा बादलीपोशाख दिल्हा राजश्री सेनासाहेब सुभे यांसी बसंती वर्खी कच्या रंगाचे सेलापागुटें दिल्हें नंतर अत्तरदान पानदान गुलाब होऊन सेनासाहेब सुभे यांनीं आपल्याकडून वर्खी कच्या रंगाचा पोशाख दिल्हा सर्वांस निरोप दिल्हा. साहेबाचे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

हु

लेखांक ३१६. 

१७१७ चैत्र वद्य १२.

रणमस्तखान दावेदार-खान टोके खुशवख्त बाशद.
छ तहवर व जलादत दस्तगाहा सु॥ खमस तीसैन मया व अलफ. राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांचे कर्ज तुम्हाकडे येणें त्याचा फडशश वाजवीचे रीतीनें करून देत नाहीं म्हणोन हुजूर विदित जालें. त्याजवरून हें पत्र सादर केलें असे तरी मारनिलेचे कर्जाचा फडशा वाजवी खता प्रें॥ करून देणें. जाणिजे छ २५ रमजान. जादा काय लिहिणें ?

316         297

श्री.

लेखांक ३१५. 

१७१४ मार्गशीर्ष.

पैबस्ती मार्गशीर्ष वद्य १३ शके १७१४ परिधावीं संवत्सरें.

श्रीमंत राजश्री रावजी स्वामीचे शेवेसी:-
सेवक आबाजी भास्कर ठकार कृतानेक सा० नमस्कार विज्ञापना ल्याहावेया जे आपले थोरले कामाविशीं माहदजी रानवडे याचे कानावर घातलें आहे कीं पाटील बावाकडून करून घेणें त्यांस त्यांनीं मान्य केलें आहे ते म्हणतात कीं त्यांची आमची भेट जाली म्हणजे बंदोबस्त करून देऊं त्यास आपण पंचमीस मुळखेडास यावें म्हणजे ते तिकडे येणार बेत केला आहे तर आपण अगत्य यावें कार्य करावया जोगे आहेत मी श्री कोल्हापुराहून आल्यापासून शरीरास समाधान नव्हते. बायकोस व आम्हास उभयतांस समाधान नव्हतें. आताशीं समाधान वाटत आहे. चिरंजीव बाळास त्याचे मागें लाविलें आहे. त्यांनीं मान्य केलें आहे. पंचमीचा करार केला आहे. आपण यावयाची चिटी त्यांचे नांवें द्यावी. मोघम द्यावी कीं आम्ही येतों. कळावें बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विनंति.

आवंदा आडचण फार आहे. रुपयाची मात्र तजवीज करितों. माघ अखेरपर्यंत रु॥ १०० शंभा देतों. कळावें. हे विनंति.

श्री.

लेखांक ३१४. 

१७१४ आश्विन शुद्ध १.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकरावजी स्वामीचे शेवेसी:-
पो। बाळाजी रामचंद्र सांवरकर कृतानेक स॥ नमस्कार विज्ञापना. येथील कुशल त॥ आश्विन शु॥ १ मु॥ जनस्थान जाणून स्वकीयार्थ लिहीत असले पाहिजे. कृपा करून पत्र पाठविलें तें सुसमयीं प्रविष्ट होऊन परमानंद जाला. परंतु स्वकीय प्रकृतीचा मजकूर कांहीं लिहिला च नाहीं व राजश्री खंडेराव दादाजीस सरदारीची वस्त्रें जालीं म्हणोन येथें दाट खबर ऐकतों, त्याचें हि कांहीं लि॥ नाहीं. या खेरीज राजश्री भिकाजी मोरेश्वर यांची जप्ती मोकळी जाली म्हणोन येथें त्यांनी वदंता घातली आहे. हें हि कांहीं समजलियांत येत नाहीं त्यास कृपा करून आप्त जाणोन सर्व म॥र लेखनीं कळविला पाहिजे. यानंतर राजश्री लक्ष्मणपंत लेले यांचा मार लि॥ यास मारनिलेस मी निघालीयाचे पाठीमागें ज्वर जाला त्याजमुळें त्यास कोणाची फुकट घोड्याची सोबत लागतांच आपला निरोप देखील न घेतां गंगापुरास आले. येथें आलियावर हि मला समजलें नाहीं. आतां समजलें. येथें येऊन हि बरें वाटत नाहीं. असो. परंतु आपला तर निरोप घ्यावयाचा होता ? अशाच्यानें कामें जर होतीं तर नोकर पृथ्वीवर कोणीच न राहाते. राजश्री धोंडोबा नाईक रेघे यांस साडेचौशाविशीं तगादा केला. ते समयीं बोलले कीं, देतों. त्यास वायदा केला. त्याजवर फिरोन बदलले कीं, रावजीचें पत्र कोठें आलें ? त्याजवरून शिपाई बसविले. इतकियांत आपलें पत्र आलें कीं, सव्याज रुपये घ्यावे. हें त्यांस दाखविलें. तेव्हां प्रयत्नानें वाटेवर येऊन आजचा च वायदा केला आहे. हे रु।। आज्ञे प्रों। सध्याज घेतों. परंतु पुढील रुपयाविशीं तंटा पडलेसें दिसतें. तगादा सख्त करीतच आहों. हे रुपये वसूल साडेच्यारशें जालियावर दिंडोरकर देशमुखास तगादा करितो; कळावें. धोत्रजोडे बेता प्रों।। तयार करविले आहेत. पीतांबराचा माग्या गांवास आमचे वोळखीचा गेला आहे. एका दोहों दिवशीं आलियावर तो हि उद्योग होईल. मध कोणी प्रमाणीकसा जासुद येऊं लागला म्हणजे जरूर पाठवितों. रा।। मोरोपंत भाऊ दसरियास यावेसें केलें होतें, परंतु येथें ऐकिलें कीं, रा।। दादाजीस वस्त्रें सरदारीचीं जाली. त्याजवरून दीपवाळी करून निघावें ऐसें केलें आहे. मी हि शेवेसीं समागमें येतों. आतां पुणियांत येण्यास भरंवसा एक आपले पायाचा वाटतो. तेणेंकरून वारंवार दर्शनापेक्षा होते. भेट होय तो सुदिन आहे. रा। भाऊजी र॥ दादाजीस व आपल्यास पत्र लि॥ आहे. याचे त्याजकडील मी हि त्यांस पत्र लि॥ आहे. त्या सुद्धां उत्तरें घेऊन प॥. त्यांचे उत्तर आणवावें म्हणोन रा। भाऊंनीं आपलियास लिहावयास सांगितलें आहे. शेवेसी श्रुत होय. दयावृद्धि करीत च आहेत. तसी निरंतर करावी. हे विज्ञप्ति. र॥ विनायकपंतास नमस्कार प्र॥ करावे.

श्रीसर्वेश्वर.

लेखांक ३१३. 

पैवस्ती श्रावण व॥ १३ शके १७१४ परिधावी संवत्सरे.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्र्यंबकरावजी स्वामीचे सेवेसी
सेवक मोरो त्र्यंबक गोडबोले कृतानेक स॥ नमस्कार विनंति. येथील कुशल त॥ श्रावण वद्य ३ त्रितिया पर्यंत जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. आपण एकदोन पत्रें विस्तारें लिहिलीं तीं पावोन सविस्तर कुशलार्थ कळले. चिठी यजमानाकडे द्यावयाची ती बराबर गेली असेल. कामास अडथळा पडला याजमुळे दुसरी दिली म्हणोन लि॥ त्यास चिठी आम्हांबराबर आलीं नाहीं. यजमानाजवळ प्रविष्ट जाली आहे. खासगीकडे शोध करावा. थांग न च लागला तर दुसरी चिठी आपण दिली असेल तिजमध्यें पहिली चिठीचा आशय आणिला असेलच. त्यापक्षीं चिंता नाहीं सरकारचे ऐवजाच्या मुदती-भरत आल्या म्हणोन घोरांत आहों ऐसें विस्तारें लिहिलें त्यास जे वेळेस करार जाला ते समयीं गावचा वगैरे एकदम फडशा करावा ऐसा विचार करून च आपण कबूल केलें ऐसी गोष्ट जाली च आहे त्याजप्रमाणें पैरवी करून भरणा करावा. वचनांत करारांत अंतर पडलें तर पुढें विशेष कृपा संपादून घ्यावयाची त्यांस वाकडें पडेल याजकरितां रावजी करारसमयीं विचार करून जो नेम केला त्याजप्रमाणें पार पाडावें घर मोकळे करून घ्यावयाचें तें जें चित्तांत होतें तें च सुटलें तेणें करून बहुत संतोष जाला. यजमानास पत्र द्यावें म्हणोन लिहिलें त्यास करार आहे त्यांत कोठें गुंतले- यास कानावर पडलें म्हणजे ते क्षणीं च उलगडा पडतो. ऐसे कृपेचा प्रकार आपण लिहिला त्या पक्षीं उगेंच पत्र ल्याहावें ऐसी रीत नव्हे, म्हणोन लिहिलं नाहीं. कळावें. बहुत काय लिहिणें? कृपा लोभ करावा. हे विनंति.

श्रीसर्वेश्वर.

लेखांक ३१२. 

१७१४ श्रावण वद्य ३.

पैवस्ती श्रावण व॥ १३ शके १७१४ परिधावी.

राजश्री त्र्यंबकरावजी स्वामीचे शेवेसी:-
विनंति. राजश्री त्र्यंबकरावजीस पत्र आपलें लिहिल्यावरून पाठविलें आहे. ते कृपा करीतच आहेत. राजश्री बळवंतराव सावरकर यांस पत्रें आमचे लाखोट्यांत होतीं तीं पावती केलीं. त्यांनीं उत्तरें दिली आहेत. पावतील. आमचे येण्याचा योग कधीं म्हणोन लिहिलें त्यास चातर्मास जालियावर विचार करावयाचा आहे. तुम्हीं फार सावधपणें वर्तणें. व मर्जी संपादन युक्तीनें करून घ्यावें. दर्शनास जात च असाल. सारांश प्रमाणीकतेची आवड यजमानास फार आहे. आपण हि तसेंच आहां. कसें वर्तावें हें ल्याहावें म्हणोन लि॥ त्यावरून लि॥ आहे. विशेष ल्याहावें नलगे. निरंतर वरचेवर होईल तें कळवाल. तेणें करून संतोष असे. बहुत काय लिहिणें ? तीर्थस्वरूप राजश्री बाजीपंत दादा काकिडर्यस स॥ नमस्कार आपण जाऊन सांगावें त्याकडे आठा चोहों रोजीं जात जावें. समागम योग्य आहे. लोभ करावा. हे विनंति.

सेवेसी रामाजी केशव पळनीटकर कृतानेक स॥ नमस्कार. विनंति. येथील क्षेमश्रावण वद्य ३ पर्यंत जाणोन स्वकीय कुशललेखन करीत असावें. विशेष. आपण दोन पत्रें पाठविलीं तीं पावोन कुशलार्थ कळला. आपले पत्राचे अर्थे राजश्री भाऊसी बोलोन उत्तरें पाठविलीं आहेत, त्याजवरून सर्व अर्थ ध्यानांत येईल. सर्वदा पत्र पाठवून सांभाळीत असावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

श्री.

लेखांक ३११. 

१७१४ श्रावण.

विनंती विशेष. राजश्री मोरोपंत भाऊ आम्ही मेजवानीस बोलाविले होते. आपली गोष्ट श्रीमंताजवळ निघाली ते सहजात येथें काहाडली होती. तदनंतर असें हि बोलले कीं राजश्री बालाजीपंत सावरकर याजवर हि कृपा बहुत करितात. आम्ही जनस्थानीं गेलों तें समई बालाजीपंत यास उद्योगाकरितां राहून घेतलें. राजश्री खंडेरावजी याचें बरें व्हावें म्हणोन उद्योग केला. त्याचें फल आतां असावें त्यावरून मीं बोललों कीं ते ममता करितात यांत बाळाजीपंताचें उर्जित करण्यास अगाध नाहीं. ते थोर. त्यांणीं सहज यांजकडे बरें दृष्टीनें अवलोकन केल्यास कूर्मबालकापरी यांचे कल्याण होईल. जें आपलें म्हणविलें त्याचे चालवावें हे थोराचें लक्षण. यास्तव बाळाजीपंत कुलीण. थोर शहाणपणाची जात. अनुभवजन्य आहे. आपली दौलत थोर. संग्रह मनुष्यांचा असावा. श्रीमंत नानासाहेबी जो मनुष्य गुणी आढळला, स्वराज्य परराज्यांतील, तो संग्रहोन ठेविला. बाळाजीपंत बुध्दीमान आहेत. याचा संग्रह आपल्याजवळ ऐसे भाऊचें हि मानस. त्यांत जे समईं मारनिल्हेस हातीं धरून सांगितलें कीं आमचें कल्याणाविसीं आम्हांजवळ असावें. त्यास थोरांनीं ज्यास हातीं धरलें त्याचे अभिमानपुरस्कार चालवितील च ते च आपण कोणे समईं कोणी येक वस्तु संग्रहीं काय गुण. हे सुज्ञ सुक्ष्म दृष्टीनें अवलोकितात. मारनिल्हेस नेमणूक त्या समयानरूप खर्चाची चालती करून आपले पदरीं ठेविलें असतां याचा हि पायगुण आपल्यास अनभवलाच आहे.