Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २७२.
१६९६ मार्गशीर्ष शुद्ध १.
राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ अनावल गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहंदर रामराम. सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें शिलेदार बाबूराव काशी याची रुकसतीचे ऐवजी रुपये १५० दीडसे
प॥ म॥रचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ. २९ माहे रमजान.
बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २७१.
१६९६ मार्गशीर्ष शुद्ध १.
राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर रामराम सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें शिलेदार बाबूराव काशी यासी रुकसतीचे ऐवजी रु. ७०० सातशे प्र॥ मजकूरचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ. २९ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २७०.
१६९६ मार्गशीर्ष शुद्ध १.
राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ आंतापूर. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर रामराम सु॥ खमस सबैन मया अलफ बदल देणें शिलेदार बाबूराव काशी यासी रुकसतीचे ऐवजी रु १००० येक हजार पे॥ मजकूरचे ऐवजी देऊन कबज घेणें. जाणिजे. छ. २९ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २६९.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६८.
१६९६ कार्तिक वद्य ३०.
चिरंजीव राजश्री त्र्यंबकराव गायकवाड प्रे॥ वलवाडे यांसि :-
गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर आशिर्वाद. सुहूर सन खमस सबैन मया अलफ बाबूराव काशी नि। राजश्री चिंतो विठ्ठल याची वरात तुह्मांवर सादर आहे. त्यास म॥रनिले रुस्कत होऊन देशीं जातात यास वराते प्रें॥ ऐवज तूर्त देऊन पावलियाचा कबज घेणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. र॥ छ० २८ माहे रमजान. बहुत काय लिहिणें ? हा आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६७.
१६९६ कार्तिक वद्य ३०.
राजश्री भगवंतराव गायकवाड. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समसेर बाहंदर रामराम. सुहूर सन खमस सबैन मया अलफ राजश्री बाबूराव काशी नि। चिंतो विठ्ठल याची वरात तुह्मावर सादर आहे. त्यासि मशारनिले रुस्कत होऊन देशी जातात त्यासि वराते प्रे॥ तूर्त ऐवज देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. रा॥ छ० २८ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६६.
१६९६ कार्तिक वद्य ३०.
राजश्री रतनजी पारसी परगणें घणदेवी गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समसेर बाहंदर रामराम. सुहूर सन खमस सबैन मया अलफ बाबूराव काशी नि। राजश्री चिंतो विठ्ठल याची वरात तुह्मांवर सादर आहे. त्यास म॥रनिले रुस्कत होऊन देशीं जातात. यांस वराते प्रें॥ ऐवज तूर्त देऊन पावलियाचा कबज घेणें. फिरोन बोभाट येऊं न देक्षणें. छ० २८ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६५.
१६९६ कार्तिक वद्य ३०.
राजश्री भगवंतराव गायकवाड पे॥ आंतापुर गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेना खासखेल समशेर बाहंदर रामराम सुहूर सन खमस सबैन मया अलफ बाबूराव काशी नि॥ राजश्री चिंतो विठ्ठल याची वरात तुह्मावर सादर आहे त्यास मशारनिले रुस्कत होऊन देशीं जातात. त्यास वराते प्रें॥ तूर्त ऐवज देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. छ० २८ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६४.
१६९६ कार्तिक वद्य ३०.
गंगा भागीरथी मातुश्री भवानी बाई गायकवाड वडिलांचे शे॥.
अपत्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर. दंडवत विनंती उपरी राजश्री बाबूराव काशी याची वरात तुह्मावर सादर आहे. त्यास म॥रनिले रुस्कत होऊन देशीं जातात. यांस वराते प्रें॥ ऐवज तूर्त देणें आणि पावलियाचा कबज घेणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. रा॥ छ० २८ माहे रमजान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक २६३.
१६९६ कार्तिक वद्य ३०.
राजश्री सिदो तुकदेव पे॥ चिखली गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य गोविंदराव गायकवाड सेनाखासखेल समशेर बाहदर. दंडवत सु॥ खमस सबैन मया अलफ. राजश्री बाबूराव काशी याची वरात पेशजी सादर आहे. त्यास वराते पे॥ ऐवज पत्रदर्शनी देऊन कबज घेणें बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ० २५ माहे रमजान.