श्री.
लेखांक २८१.
१६९७ कार्तिक शुद्ध १.
पार माहास्थल मौजे पाथरडी
दर्या बे॥ मोकदम मौजे हबळ सैदापूर, प्र॥ सेवगाव सु॥ सन ११८५ कारणें जामीनक॥ लिहून दिधला ऐसाजे. बीजमानत बो॥ मानको शामराज व बाबाजी मल्हार कुळकर्णी मौजे साकेगांव प्रां। म॥र. यांस आपण हजीर जामीन असूं. सबब कीं याचा व मौजे म॥रचे मोकदम व समस्त दाहीजन या उभयतांचा गाव नि॥ हिसेबाचा लढा आहे, यानिमित्य तुमचे थळास आले. त्यास तुह्मी आपले मायथळ करून मौजे टेंभुरणीचा पार दिल्हा. तेथें जाऊन म॥रनिले जाऊन हिशेबाचा फडच्या करितील. न करतां हजीर न जाले तर हजीर करूं. न करूं सको तर म॥रनिलेचे नसिबतीचा जाब करूं. हा जामीनकरार लिहिला. सही.
ब॥ भवानी येशवंत निशाणी नांगर
कुळकर्णी मौजे म॥र
त॥ छ. २९ माहे साबान