Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीपांडुरंग.
लेखांक ३५९.
१७३१ फाल्गुन वद्य ८.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्रिंबकरावजी स्वामीचे शेवेसी.
पो।। श्रीधर कृष्ण सां।। नमस्कार विनंती. येथील कुशल तां।। छ २२ सफरपावेतों श्रीकृपेकरून वर्तमान येथास्थित जाणोन स्वकीये कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आह्मी पुणियाहून क्षेत्र पंढरीस आल्याता।। पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तर सविस्तर लिहीत असिलें पाहिजे. यानतंर राजश्री विठोबा नाईक तांबवेकर याजकडे श्रीमंत नाना फडणीस याचे दरबारखर्चापों।। बाकी येणे ह्मणोन कोणी आकसांमुळें गैरवाका समजाविल्यावरून हुजरे वगैरे आपल्या विद्यमानें बसोन आह्माकडील कारकून कृष्णाजी रघुनाथ तेथे आहे त्यास व घरी बायकास वगैरे उपद्रव बहुत जाला. व आद्यापि हि होत आहे त्याकरितां आह्मी यावें. त्यास पेशजी तेथे नेहमी असतां सिंदे याजकडील घाटगे याजकडून वगैरे दररोज तांबेकर याचे देण्याचे धणी वगैरे फिर्याद जाऊन मनस्वी उपद्रव परिणामी तेथें कांही उत्पन्न व्हावे असी बाकी राहिली नाही दिनचर्यासुधां कठीण ऐसी खातरजमा होऊन बहुत श्रमाअंती परिहार व्हावा व श्रीमंत राजश्री रावसाहेब यांणी समक्ष समजोन घेऊन कृपा करून युक्तीच वाटें परिहार करीत आले तत्राप नेहमी उपद्रव कोठवर व चिरंजीवाचा वृतबंध हि करणें जरूर जाणोन क्षेत्री घरास आलो तों येथें हि घाटगे याजकडील आंमल आजपावेतों पुरविला होता. निवळपणें कामकाज सरकारांतून वगैरे समजोन व्हावे, असे स्वस्ततेचे दिवस आद्याप तेथे नाहींत. ना शरीरप्रकृत हि ठीक नाही जाणून राहिलों इतकियावर मार्गाची व तेथील सुपथेचे उत्तर आपले आलियावर येतो त्यास तांबवेकर याजकडे तगादा बसोन फल नाही व तगादा करावयाजोगा जाबसाल हि नाहीं येविसी पत्री तपसील कोठवरी लिहावा ? समजणारांनी आपल्यास समजाविलें त्यांतील कारण व आकस आह्मी प्रसंगी नाही जाणून उगवावा तें किमर्थ हें समक्षतेअंती कागदपत्रसुधां पक्की खातरजमा होईल येविसीं संवशय पडणार नाहीं. तूर्त अनुमानें ध्यानी आणावें. जैसा प्रतदिनचर्येसुधा विच्यार कठीण. परंतु कैलासवासी सदासिव नाईक तांबवेकर याचे वेळेस सरकारांत नजरा वगैरे पडोन खराबी होऊन दुकानें बंद जालें तथाप यातून काही काळ बरा होता ऐसें असोन नानाचे खाजगीचा ऐवज देणार घेणार समक्ष असतां यावयाजोगा असोन आज दाहा बारां वर्षे बाकी राहील न राहील हें ध्यानीं आणावें. पूर्वी च आपण या कामांत इतके नांव मात्र ऐकिले परंतु वलखपूर्वक समजले नव्हते. हाली लिहिल्यांत येऊन कळले त्यास आपले वडिलांचा व तांबवेकर याचा घरोबा व देवघेव व बाकीसाकी आद्याप काय हे आह्मी लिहावें तर आह्मांपेक्षा आपले ध्यानी सर्व आहे. परिणामी तांबवेकर याचे उणे व तुमचे. आपला आमचा त्याचा दुसरा विचार नाही जाणून लि॥ आहे तर आपण प्रसंगी असतां इतके दिवस लांबले हे च अधिक तर इत:पर तगादा उठऊन कारकून आमचा आहे तो च आपला ऐसें जाणून त्याजवर तांबवेकर याचे बायकामुलावर वडिलार्जित ममता तें ध्यानीं येऊन हरयेकविसी दिनचर्या चालावी येविसी वगैरे साहित्य जाहालियाचे उत्तर येऊन संतोष होय ऐसे करणे आपल्याकडे आहे इतकियावर हरतऱ्हेनें गैरवाका आणखी समजावितील त्यांतून समक्षतेअंती येक हि जाबसालास ठरणार नाहीत व त्याजकडे गुंते त्यामुळे आकस धरून समजावणेचे कारण काय ते समक्ष प्रत्ययासी येईल तर पुढे त्याचे ध्यानी न घेता मागे समजाऊन खराबी केली ते मात्र गैरवाका आकसामुळे असेल ठरले असतां भरून द्यावी येविसी खातरजमा तिराइतांची मागावी. यथाज्ञानें विस्तारपूर्वक लेखन केलें. इतिकियावर वडिलार्जित स्नेह व याचे देहप्रारब्धानरूप मर्जीस येईल तैसें व्हावें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीनाथसाह्य.
लेखांक ३५८.
नकल
१७३१ भाद्रपद शुद्ध १.
राजश्री जनार्दन बल्लाळ ठाणें जामगांव गोसावी यांसि :- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो।। दौलतराव सिंदे दंडवत.
अशर मया तैन व अलफ मौजे बीडकीन गांव प्रो।। पैठण येथील पेठेचे शेटे यांनी आपले निमें वतन शेटेपणाचें चिंतो विठ्ठल याजपासून ऐवज घेऊन तयास खरीदी पत्रें करून पेशजी दिल्हे. नंतर त्यांचा काल जाला. हालीं मारनिलेचे चिरंजीव त्र्यंबकराव चिंतामण यांनी शेटेपणाचें वतनाचे वहिवाटीस मौजें मारास कारकून पाठविला असतां त्यास तेथील सेट्यांनी दिक्कत केली आहे ह्मणोन विदित जालें. त्याजवरून हें पत्र तुह्मांस लिहिलें आहे. तरी तुह्मीं मौजे मारचे शेटे यांसी निक्षू(न) ताकीद करून पेशजी चिंतो विठ्ठल यांसी खरीदी पत्र करून दिल्हें असेल त्याप्रों।। त्र्यंबकराव चिंतामण यांजकडील कारकून मौजे मारीं आला असेल त्याजकडे तेथील निमे शेटेपणाचे वतनाची वहिवाट सुरळीत चाले ऐसे करवणे. जाणिजे. छ २९ रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मो।।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीनाथसाह्य.
लेखांक ३५७.
१७३१ भाद्रपद शुद्ध १.
अजसुभा राजश्री दौलतराव शिंदे ता।। मोकदम मौजे बिडकीन गांव पो।। पैठण सु॥ अशर मया तैन व अलफ चिंतो विठ्ठल याणी मौजे मजकूरचे पेठेचे शेटे यांसी ऐवज देऊन त्यांचे शेटेपणाचे वतनापैकी निमे वतन खरेदी करून महजर करून घेतला नंतर मशारनिलेचा काळ जाला हाली त्यांचे पुत्र राजश्री त्र्यंबकराव चिंतामण यांनी शेटेपणाचे निमे वतनाचे वहिवाटीस मौजे मजकुरास कारकून पाठविला त्यास तेथील शेटे यांनी दिक्कत केली आहे. ह्मणोन विदित जालें त्यांजवरून ही ताकीद सादर केली असे तरी तुह्मी शेट्यास निक्षून ताकीद करून त्यांनी चिंतो विठ्ठल यांसी महजर करून दिल्हा असेल त्याप्रमाणें त्रिंबकराव चिंतामण यांजकडील हाली कारकून मौजे मजकुरास निमे शेटेपणाचे वतनाचे वहिवाटीस आला आहे त्यांजकडे वतनाची वहिवाट सुरळींत चाले असें करवणें जाणिजे छ २९ रजब मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३५६.
नक्कल.
१६३० आषाढ शुद्ध ५.
मुख्यमुद्रा.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३५ सर्वधारी संवत्छरे आषाढ बहुल पंचमी रविवासरे क्षत्रियकुलावतंसश्री राजाशाहूछत्रपती स्वामी यांणी म॥ बापूजी सोनाजी परभू उपनाम दिघे देश-कुलकर्णी व गांव कुलकर्णी त॥ मुठेखोरें सुभा प्रांत मावळ यांसी इनामपत्र ऐसेजे स्वामी परराष्ट्रांतून स्वराज्यांत आले त्याप्रसंगी तुह्मी राजश्री परसोजी भोसले यांची जमिनीशी करून असता त्यांचे तर्फेने स्वामीचें दर्शनास आणिलें तें प्रसंगी तुह्मी सेवा बहुत एकनिष्ठेनें केली व पुढेहि निष्ठेनें वर्तणूक करिता तुमचे उर्जित करून वंशपरंपरेने चालवणें हे स्वामीस आवश्यक याजकरितां तुह्मी विनंति केली की आपण स्वामीचें राज्यातील वतनदार सेवक आहों जे उर्जित करणे तें वतनसंधावरी केलियाने परंपरागत चालेल त्यावरून स्वामी तुह्मांवरी कृपाळू होऊन नूतन इनाम देह ता।। मुठेखोरे पो।। २
मौजे भवली १ मौजे टेमघर १
ऐशी दोनी गांवे इनाम कुलबाबकुलकानू खेरीज हक्कदार व इनामदार करून चतु:सीमा भूमी पूर्व मयादेप्रमाणे देखील जलतरू- पाषाण-झाडझाडोरा निधिनिक्षेप सहित इनाम आजरामरामत करून दिल्हा असे तरी सदरहू दोहीगांवचा इनाम उपभोग तुह्मी व तुमचे बाप भाऊं जनाजीराम देश-कुलकर्णी पुत्र-पौत्रादि-वंशपरंपरेनें अनुभऊन सुखरूप असणें स्वामी व स्वामीचे वंशपरंपरेने तुह्मांस इनाम दोनीगाव चालवितील जाणिजे निदेश समक्ष मोर्तब आहे.
अस्सल पत्र जाडेबंद आहेत. मोर्तबसूद बार सुरू सूद बार.
तारीख छ १९ रविलावर सु॥ तिसा मया.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३५५.
१७२८ ज्येष्ठ.
यादी माधवराव मल्हास यांसी तैनात सुहूर-सन सवा मया तैन व अलफ रुपये ५०० एकूण जातीस पाचशे रुपये तैनात सरकारांतून सरदारीचीं वस्त्रें आलियावर येणेंप्रों।। करार शिवाय कलमें येणेप्रो।।
घोडें व तटू सरकार विजयादशमीस
पैकी निसबतीस वस्त्रें पोशाख
येणेप्रों।। करार सनगे २ किंमत
रुपये ५०
येणप्रो।। करार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३५४.
१७२५ वैशाख शुद्ध १५.
राजमान्य राजश्री राघो नारायण दि॥ पंतसचिव गोसावी यासि :-
सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार. सु॥ सलास मयातैन व अलफ मौजे अंबवली त॥ मुठेखोरें हा गांव रो।। त्रिंबकराव चिंतामण याजकडे इनाम आहे तेथे फौजेचे दंग्यानें लूट होऊन गाव बेचीराख रयत उठून गेली. त्यास हाली मारनिलेनीं कौल व तगाई देऊन गावांत रयत आणून वस्ती करवून लावणी संचणी करितात ऐसें असतां तुह्मी रायगड तोरणा व किले तिकोना येथून व भोराहून मन माने तैसे रोखे करून वस्ती होऊ देत नाहीं. तुमचा संमंध कांहीच नसतां उपद्रव करितां ह्मणून हुजूर विदित जहालें त्याजवरून हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मी कोण्हेविसी मौजे मजकुरास उपद्रव येकंदर न करणें. रोखे केले असतील ते मना करणें. फिरून बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ १४ मोहरम. आज्ञाप्रमाण.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३५३.
नकल
१७२४ फाल्गुन वद्य ७.
राजमान्य राजश्री गोपाळ हरी पंतसचिव गोसावी यांसी :-
सेवक अमृतराव रघुनाथ नमस्कार. सु॥ सलास मया तैन व अलफ. मौजे कळंबोली त॥ पौन मावळ हा गांव राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांजकडे सरकारांतून इनाम आहे तेथें तुमचा संबंध नसतां एक साल ऐवज घ्यावा ह्मणोन पाटलास व याचे प्याद्यास व गांवचे बायकास मारहाण करून धरून किल्ले तिकोणा येथें नेलें आहे. ह्मणून हुजूर विदित जालें त्यावरून हे पत्र सादर केलें असे. तरी मौजे म॥रचे पाटील व बायका व मारनिलेकडील प्यादा धरून नेला आहे ते सोडून देऊन या उपर मारनिलेचे गावांस कोणेविशी उपद्रव न करणें. जाणिजे छ २० जिलकाद. आज्ञा प्रमाण मोर्तब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३५२.
१७२४ आश्विन वद्य २.
पो।। छ १६ जमादिलाखर सु॥ सलास मयातैन व अलफ.
शेवेसी विनंती शेवक गोपाल हरी पटवर्धन चरणावरी मस्तक ठेऊन शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना. तागाईत छ १५ जाखरपावेतों शेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. दंगियामुळें आपण मुलामाणसांसुध्धा इकडे येणार. समागमें श्रीमंताकडील येक दोन शास्त्रज्ञांची कुटुंबे येतील त्याची बरदास्त व्हावी ह्मणोन आज्ञा. त्यास रावजी ! आज्ञेप्रमाणें बरखास्त थोडी बहुत होईल. चिंता नाहीं. परंतु पुणियांतील पलणकरी आले आहेत. त्यांणी दाटी फारच केली ती आपलेकडून बापोजीपंत दाजी आले त्यांणी पाहिलीच आहे. तशात आपलें व शास्त्रीबाबाचें येणे जाल्यास जाग्याची सोय थोडी बहुत होईल. कळावें. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विज्ञाप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३५१.
१७२४ श्रावण शुद्ध ९.
श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसी.
विनंती सेवक कृष्णाजी बाबूराव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना येथील कुशल ता।। श्रावण श्रु।। ९ नवमी रोज रविवार पावेतों मुक्काम शहर बऱ्हाणपूर येथे वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामीनीं कृपा करून आषाढ वद्य ५ चें पत्र पाठविलें तें श्रावण श्रु।। ५ अस्तमानी पावले लिहिला मजकूर कळला पत्री आज्ञा जे राजश्री गणेश शिवराम वकील राजेबहादार यांचे पत्र लष्करांतून आले जें वतन समंधी ताकीदपत्रें व सोड-चिठीची सरकाराची जाली आहे राजश्री बापू चिटणीस यांजकडे परवानगी जाली आहे तर मागाहून लवकरच ताकीद पत्रें व सोडचिठी पाठवून देतों. ठराव जाला आहे त्याचे ऐवजाची तजवीज करणे ऐसें पत्र आषाढ वद्य त्रितीयेस आलें पूर्वी हजार रुपयांचा करार जाला होता हालीं चार रुपये कमजास्ती पडतील तरी मोतीराम वगैरे यांसी ताकीद करून ठेवणें पत्रें दाखल जाहाली ह्मणजे ऐवज देणें लागेल सोडचिठी येऊन काम सुरळीत चालू जालें ह्मणजे खासा स्वारीसमंधी हजार दीड हजार रुपये खर्च पडेल तरी याची तरतूद करणें व पालखीचा सरंजाम करावयाचा आहे तें लिहून पाठवू त्याप्रमाणें करणें अडीच तीन हजार रुपये लागतील याची तजवीज करणें ऐसी पत्रीं आज्ञा सुचवली त्यासी एक बऱ्हाणपुरचा आकार सालाबाद पांच साहासे रुपये त्यांत महाल मजकूर खर्च जाऊन बाकी दीड दोनशें रुपये राहातात ते जप्तीवाला नेतो यास्तव इतके ऐवजाची सोय येथें होणार नाही सोड-चिठी आलियावर कोणाचे माथा काम मारिलें तरी हजार बाराशे रुपये देईल त्यासी स्वामीचें अभय पत्र लागेल आमचा विश्वास तरी कोणास नाही पूर्वी राजश्री अमृतरावजींनी कारभार केला त्याचे फडशा अद्याप जाले नाहींत याजकरितां सावकारमंडळी अनमान करितील हाली कामावर हरकोणी रुपये स्वामीचे खोतरेवर देईल चिंता नाहीं गुमास्ते मंडळीचा भ्रममात्र आहे घरांत पाहावे तर नकार घंटाच आहे बाहिर पाहावे तरी श्रीमंतांचे पदरचे कारकून यास्तव यजमानाचे नांवासारीखें राहावे लागतें गुमास्ते मंडळीत तरी चांगला माणूस कोणी राहिला नाही की तोडजोड करील हाली सरकारची आज्ञा त्यासी तेही आपले आज्ञेखेरीज नाहींत त्यांचे शक्तीप्रमाणें आज्ञा जालियास हाजर आहेत परंतु वर कड माहालयाकार्यास सामल जाले पाहिजेत त्याची तजवीज स्वामीचे स्वारी इकडे आली ह्मणजे सहजांत होऊन येईल भुसकुटे यांसी विचारले त्यांनी उत्तर केले कीं तूर्त आह्मीं आपले घोरांत असो आह्मांकडे ऐवज मिळणार नाही हालीं त्याजकडील मामलती निघाल्या आहेत आपल्याकडील काम कबूल करीत नाहींत आपले आज्ञेवरून मशारनिल्हेस दाहा पांच वेळा विचारलें त्यांचे मर्जीस येत नाही दुसरियास बोलावे तरी ऐवजाशिवाय पैसा देत नाही यास्तव खानदेश सुध्धां ऐवजाची तजवीज होईल स्वामीची स्वारी या प्रांती आलियावर गुंता पडणार नाही पालखीचा सरंजाम करावयासी आज्ञा त्यासी तेथून याद येईल त्याप्रमाणें केला जाईल व लष्करांत काय खर्च पडेल त्याची व पालखीचे सरंजामाची येथे सरबराईकडील सिंद्याकडील महालावर होईल चिंता नाही वरकड स्वारीचा खर्च खानदेशप्रांती महालनिहाय गुमास्ते मंडळीस पत्र दाखविले त्यासी सेवेसी विनंति-पत्र लिहिले आहे त्यावरून कळों येईल श्रावण श्रु॥ १ प्रतिपदेची विनंतिपत्रे डोंकेसमागमे पाठविलीं आहे तें पावलें असेल लष्करांत मशारनिल्हेकडे पत्र रवाना करून सत्वर बंदोबस्त होय तें जालें पाहिजे येथें खंडेराव मोरेश्वराकडील कारकून जप्तीवर आहेत त्यासही परभारें वर्तमान कळलें त्यास मशारनिल्हेचे बोलणे जे खंडेराव मोरेश्वरयाची सोड-चिठी आल्याशिवाय काम सोडणार आणवावें याउपर जप्तीवाल्याकडील वसूल नजाय तें जालें पाहिजे सिंद्याकडील माहाल यांची याद पाठविली आहे ते पावेल लष्करांत पत्रें परभारे रवाना करावी आणि इकडेही लष्करांत पाठवावयास दीक्षितांचे नांव व गणपतरावजीचे नावें ऐसी दोन पत्रें पाठविली पाहिजेत ह्मणजे येथून लष्करांत पाठऊं उत्तर आणवून सेवेसी पाठवून देऊं बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३५०.
१७२३ पौष वद्य ९.
राजश्री सखाराम घाटगे सर्जेराव गोसावी यांसि :-
आसीर्वाद उपरी. उदाजी जाधव कुरण्या को।। खेड नि॥ तोफखाना याचा व तुलसाजी साडभर या उभयताचा का।। मजकुरीं सेताचा व घराचा X X X कजीया होता त्याची पंचाईत सरकारांतून नेमून देऊन पंचाईत मतें फडशा होऊन X X जामीन घेऊन फारखत्या हरदु जणाच्या X ल्या त्याजला सात आठ वर्ष जाहालीं असे असतां हाली तुह्माकडील बहिरजी सिंदे याजला साडभऱ्यानें गैरवाका समजाऊन जाधवपाशी सरकारचे गवत कापणावळीचा ऐवज होता त्यापैकी मसाला वगैरे दोनशे रुपये घेऊन कुरण्यास खेडाहून पुण्यास आणिल्यावर साडभराचे सांगितल्यावरून तुह्माकडील कारखान्याचे बैल कुरणांत जाऊन गवताची तसनस केली ह्मणोन विदित जाहालें तरी तुह्मी राजश्री दौलतराव सिंदे अलीजा बहादूर यास सांगोन बहिरजी सिंदे यास ताकीद करऊन मसाला वगैरे दोनशे रुपये घेतले आहेत ते माघारा देवऊन तुळसाजी साडभर यास हुजूर पाठवून देणें. जाणिजे. छ १२ रमजान. बहुत काय लिहिणें ?