श्री.
लेखांक ३५४.
१७२५ वैशाख शुद्ध १५.
राजमान्य राजश्री राघो नारायण दि॥ पंतसचिव गोसावी यासि :-
सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार. सु॥ सलास मयातैन व अलफ मौजे अंबवली त॥ मुठेखोरें हा गांव रो।। त्रिंबकराव चिंतामण याजकडे इनाम आहे तेथे फौजेचे दंग्यानें लूट होऊन गाव बेचीराख रयत उठून गेली. त्यास हाली मारनिलेनीं कौल व तगाई देऊन गावांत रयत आणून वस्ती करवून लावणी संचणी करितात ऐसें असतां तुह्मी रायगड तोरणा व किले तिकोना येथून व भोराहून मन माने तैसे रोखे करून वस्ती होऊ देत नाहीं. तुमचा संमंध कांहीच नसतां उपद्रव करितां ह्मणून हुजूर विदित जहालें त्याजवरून हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मी कोण्हेविसी मौजे मजकुरास उपद्रव येकंदर न करणें. रोखे केले असतील ते मना करणें. फिरून बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ १४ मोहरम. आज्ञाप्रमाण.
लेखनसीमा.