श्री.
लेखांक ३५६.
नक्कल.
१६३० आषाढ शुद्ध ५.
मुख्यमुद्रा.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३५ सर्वधारी संवत्छरे आषाढ बहुल पंचमी रविवासरे क्षत्रियकुलावतंसश्री राजाशाहूछत्रपती स्वामी यांणी म॥ बापूजी सोनाजी परभू उपनाम दिघे देश-कुलकर्णी व गांव कुलकर्णी त॥ मुठेखोरें सुभा प्रांत मावळ यांसी इनामपत्र ऐसेजे स्वामी परराष्ट्रांतून स्वराज्यांत आले त्याप्रसंगी तुह्मी राजश्री परसोजी भोसले यांची जमिनीशी करून असता त्यांचे तर्फेने स्वामीचें दर्शनास आणिलें तें प्रसंगी तुह्मी सेवा बहुत एकनिष्ठेनें केली व पुढेहि निष्ठेनें वर्तणूक करिता तुमचे उर्जित करून वंशपरंपरेने चालवणें हे स्वामीस आवश्यक याजकरितां तुह्मी विनंति केली की आपण स्वामीचें राज्यातील वतनदार सेवक आहों जे उर्जित करणे तें वतनसंधावरी केलियाने परंपरागत चालेल त्यावरून स्वामी तुह्मांवरी कृपाळू होऊन नूतन इनाम देह ता।। मुठेखोरे पो।। २
मौजे भवली १ मौजे टेमघर १
ऐशी दोनी गांवे इनाम कुलबाबकुलकानू खेरीज हक्कदार व इनामदार करून चतु:सीमा भूमी पूर्व मयादेप्रमाणे देखील जलतरू- पाषाण-झाडझाडोरा निधिनिक्षेप सहित इनाम आजरामरामत करून दिल्हा असे तरी सदरहू दोहीगांवचा इनाम उपभोग तुह्मी व तुमचे बाप भाऊं जनाजीराम देश-कुलकर्णी पुत्र-पौत्रादि-वंशपरंपरेनें अनुभऊन सुखरूप असणें स्वामी व स्वामीचे वंशपरंपरेने तुह्मांस इनाम दोनीगाव चालवितील जाणिजे निदेश समक्ष मोर्तब आहे.
अस्सल पत्र जाडेबंद आहेत. मोर्तबसूद बार सुरू सूद बार.
तारीख छ १९ रविलावर सु॥ तिसा मया.