Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
प्रभावलीत हवालदारा जवल राहिले त्याचे पुत्र तीन गणोवा व विसोवा व नारोवा नारोवास पुत्रसतान नाही त्याणे रामभट सरवटे खारेपाटणकर त्याचा पुत्र विस्णु दतक घेतला तो गिर्ये गावी केशव नायकी आर्जविले सेत व आगर ते खाऊन तेथे राहिला त्याणे गिर्ये गावीचे ज्योतीस व धर्माधिकारण साधून तेथे च राहिला विसोवाने देशमुखीची मुद्रा दुसरी करावी निमे कारभार आपण करावा ह्मणौन गणोवा नायका पासी वेव्हार आरभिला तेधवा समस्त दायदानी व त्याचे पिते केशव नायकी विसोवास सागितले जे जो वडील त्यास च सिके इतरानी वडीलाचे आज्ञेत वर्तावे वडीलानी सर्वाचे चालवावे आमच्या वशात आजि पावे तो ऐसे चालिले यास अन्यथा वर्तेल जो त्याचे बरे होणार नाही मग विसोवा समजला गणोवा नायकी विसोवास अर्धे बुर्बाड दिले गणोवा नायकी देशमुखी चालविली त्यास पुत्र च्यार माहादोवा एक १ नरसोवा एक १ दामोवा एक १ विठोवा एक १ एकून च्यार ४ माहादोवा सरदेशमुखी करीत असता खिलण्यास किलेदाराने हुजरून नवद गाव तनखा मामल्याहून निराला केला तो कारभार निराला जाहालिया वर किलास नरसोवा राहिला त्याचा वश देवलेकर देसाई विठोवास पुत्र दोन हरी एक १ व पुर्षोत्तम एक १ एकून दोन पुर्षोतमाने विज्यापुरास जाऊन साडे च्यार हजार लाहारी खर्च करून सेतवाडे माहालची सरदेशमुखीचे फर्मान आणिले खर्च लागला तो माहादोवाने रीण घेऊन दिला मग माहादोवा जवल सरदेशमुखीचा वत पुर्षोत्तम मागो लागला वत द्या किंवा कर्ज वारा मग माहादोवाने सारे कर्ज आपण च वारिले आणि सरदेशमुखीच्या वतासी पुर्षोत्तमास पुत्रपौत्रादिकी सबध नाहीसा केला पुर्षोतमाचा वश सैतवडेकर दामोदर आपुत्रीक माहादोवास पुत्र तीन गोविंद एक १ अतोवा एक १ सिवाजी एक १ गोविंद देशमुखी करीत असता प्रभावली प्रात इजारा केला तव पर्ज्यन्य गेला वलटा पडिला टोलानी आगरे भक्षिली लोक देशातरास गेले गोविद नायकास महसुला बदल खेलण्यावर नेऊन घातले दुसरे वर्षी पर्जन्य
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
व रामराव कानडा यास यवनाही मारिले बेदराची पादशाही वरघाटे व तलकोकणात जाहाली बेदराहून काला खोजा व गोरा खोजा ऐसे दोघे जण आले याणी सर्व देशाची लावणी सचणी केली माहाल कसबे केले प्रभावली मामला करून अठरा माहाल मामल्यास दिले कृष्णाजी परभोलकर यास बारा गाव दुसरे कोकणात दिले रगोवाचा पुत्र सोमाजी नायक याणी पराक्रम फार केला चालके मवासपणे वर्तो लागले कुमारजी च्यालक्याचा पुत्र धारोजी त्याणे उष्णतीर्था जवल श्री केदाराचे देवालय बाधिले असुर्डे गाव केदारास इनाम दिला सोमाजी नायकाचा पुत्र राघोवा त्याचा पुत्र नरसोवा नायक बेदरी पादशाहास भेटोन सरदेशमुखीचा जीर्णोधार केला पत्रे हि घेतली व तेथील सेना व परभोलकर साह्य करून चालकेयासी युध केले धारोजी खोत चालके सगमेश्वरी युधी पडीले नरसोवा नायकी पहिल्याप्रमाणे सगमेश्वर वसविले नदिचे उतरभागी पेठ केली होती त संगमेश्वरा खाले घेतली मग काही काल बेदर लोपले विज्यापुरी पादशाही जाहाली नरसोवा नायकाचा पुत्र केशव नायक विज्यापुरी पादशाहास भेटोन बहुमान पावोन सरदेशमुखीचा जीर्णोधार व फरमान घेतले बुबार्ड गाव इनाम घेतला पादशाहा पासून प्रभावलीस हवालदार आणिला मग त्याचे व परभोलकराचे महद्वैर जाहाले कानोजी परभोलकर मवास जाहाला त्या वरी विज्यापुरीची फौज येऊन मोठे युध प्रभावलीत जाहाले सारे परभोलकर युधी पडिले कानोजीचा पुत्र चादजी त्याचे पुरोहित घेऊन गोवेलेयास पलऊन नेला चादजी देवगिरीस जाऊन पातशाहास भेटोन गोवेले तपा मोकासा घेतला मग तो सवा शत शिपाई सजून राजापूर पावे तो देशोपद्रव करी मग केशव नायक पातशाहा पासी विज्यापुरी मध्यस्त होऊन चादजीस कौल घेतला चादजीन सात शत माणसा निसी पातशाहा पासी चाकरी मान्य केली मग त्यास सगमेश्वरतर्फेस ०००० चास गाव मोकासा दिले श्रीगारपूर राहावयासी दिले केशव नायकी कोड असर्डे व गिर्ये गावी आगर सेत इनाम घेतले केशव नायक
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
त्याचा पुत्र सूर्याजी तो हि बलिष्ट जाहाला मग रगोवा नायक याचा पुत्र गणोवा नायक त्याणे विद्यानगरीहून साह्य आणून स्वयें युध करून सूर्याजीस मारिले तेधवा गणोवा नायकास धामापूर इनाम दिले गणोवा नायक याचा पुत्र गोपाल त्याचा पुत्र विसाजी तो देशमुखी करी तेव्हा हणमतराउ चादा मराठा मवास होऊन डिगणीच्या रानात राहोन देश मारी तेव्हा विसाजीने परभोलकर हिरोजी प्रतिष्ठित होता त्यासी घरोबा करून विद्यानगरीचे साह्य आणून चाद्यास मारिले तेव्हा कुभारखणी खुर्द इनाम घेतली विसाजीस पुत्र नृसिह नायक देशमुखी करीत असता विद्यानगरीहून आणापा खारेपाटणास देशाधिपति करून आला त्याचे व परभोलकराचे महद्वैर जाहाले परभोलकर विठोजी देश मारी मग नृसिह नायक याचा पुत्र गणोवा नायक विद्यानगरास जाऊन राजदर्शन घेऊन परभोलकरास सवा शत गाव वरघाटे व कोकणात देऊन नेमावर ठेविले काही काल गेलेया वरी धाकोजी चालका मराठा माहासूर तीन शत लोकाचा सरदार त्याणे सेवाधर्मे राजकृपा सपादून गडनदीपासून बाबननदीपर्यत नवद गाव मोकासा घेतले सगमेश्वरी दुर्गाश्रयें राहिला नृसिह नायकाचा व चालक्याचा माहा विरोध जाहला मग नृसिह नायकी सगमेश्वरसोडून नदीचे उतरभागी दो नदीमध्ये दुर्ग बाधोन दुग्धगणपतीपासून नूतन पेठ केली हाट बाजार केले जाखमातेचे पूर्वभागी दुसरी पेठ वसविली मग नृसिह नायक यास पुत्र गणोवा नायक धाकोजीचा पुत्र रामाजी याचे माहा वइर जाहाले चालके च्यार पिढ्या होते गणोवाचा पुत्र रगोवा तो पराक्रमी होता रामाजीचा पुत्र कुमारजी त्याचे व रगोवाचे वइर होते च मग रगोवाचा मुतालीक यादव नायक त्याणे मध्यस्त होऊन रगोवाचे व कुमारजीचे सख्य केले रगोवा नायक विद्यानगरास जाऊन बहुत राजमान्य पावला साहा गाव मोकासा घेतले वेकापा अधिकारी खारेपाटणास आणिला रगोवा नायकाचे पुत्र च्यार जेष्ट सोमाजी त्याणे विद्यानगरास जाऊन सात शत गावची सरदेशमुखीची पत्रे घेतली
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
कार्यपुरुष धर्मात्मे होते त्याणी आपल्या नावे देवस्थापना केल्या त्याच्या वशपरपरेने राजे राज्य करीत असता पनालयच्या राज्याचे सेनाचक्र येऊन कर्णवशज्याचे राज्य घेतले गाव उछिन च बहुत दिवस होता मग यवनानी वस्ती बहुत दिवस केली कालेकरून ते हि उछिन जाहाले काही यवन नदीवर राहिले होते नरसीभटी येऊन राजाज्ञेप्रमाणे गावी सता केली वीसटके वार्षिक कर घेत नृसिहभटास पुत्र कृष्णाजी बहुत पराक्रमी जाहाला त्ये काली सिगणापुरीच्या राज्याचा वलीबेग- नामक सहस्र अश्वाचा सरदार होता त्यास राज्याने गडनदीपासून बावन नदीपावेतो सतर गाव मोकासा दिले यवन सता जाहाली मग नरसीभट पुत्र कृष्णाजीने बलीबेगाची सेवा करून सतर गावचा इजारा केला आपली च सत्ता केली सगमेश्वराची रचना करून गावात ब्राह्मणादि सर्व जाती आणिल्या हाट बाजार रचून पान मान मर्यादा केली मावलगेयात श्रीवर देवालय बाधिले राजपुरुष वश्य करून सतर गावची देशमुखी व सरदेशमुखी वतन साधिले मावलगे गाव इनाम घेऊन मावलगकर उपनामक व कृष्णाजी नायक हे नाम प्रसिद्ध केले कृष्णाजीस पुत्र दोघे गोविंद एक व विठल एक विठलास पुत्र नाही गोविंद नायकास पुत्र नृसिह नायक नृसिह नायकास पुत्र तीन १ केशव १ वामन १ कृष्ण वामन राजसेवक जाहाला कृष्णाजी मावलगेयात राहिला केशव नायक देशमुखी करीत असता विद्यानगरीचा राजा बुकण याची चढाई कोलापुरीचे राज्यावर होऊन राज्य घेतले सिगणापूर उछिन जाहाले नर्मदेपर्यंत सर्व देश विद्यानगरकराही आक्रात केला मग केशव नायकी विद्यानगरास जाऊन राजदर्शन घेतले तलकोकणात सात शत गावीची राजसत्ता केली तीमापा ब्राह्मण खारेपाटणास आणिल खारेपाटणी कारभार होय या देशाचे पाटण देश नाव जाहाले केशव नायकाचा पुत्र रगोवा तो देशमुखी करीत असता धर्मोजी चवाण मवास त्याणे धामापुरी दुर्ग बाधोन देशास उपद्रव करी राजसत्ता चालो ने दी
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५] [१६०६ श्रावण शुद्ध १
श्री
स्वस्ति श्रीशके १६०६ रक्तक्षिनामसवत्सरे श्रावणसुधप्रतिपदा सौम्यवासरे तदिने रगोवा नायक व नरसोवा नायक व सोमाजी नायक मावलकर याणी मातुश्री कृष्णाबाई व विस्णुभट सफरे व वासुदेवभट सफरे पुरोहित यासी पुसिले जे देशमुखी व सरदेशमुखी सगमेश्वर माहालची व मामले प्रभावली व मामले दाभोल या वतनाची वडिलामध्ये अर्जक कोण पुरुष त्या पासून वशावलि कैसी चालिली त्या वरून कृष्णाबाई याणी व उभयता भटगोसावी याणी सागितले जे पूर्वील वशावली वडिलाचे वेलेची सोमोवा नायक याणी लिहिली होती ती वशावली सेतवडेकर सोमाजी नायक या कडेस आहे हे आणवणे त्या वरून सोमाजी नायक या कडील वशावलीपत्र आणिले मग त्या पत्राचा उधारा वरून व कृष्णाबाई व उभयता भटगोसावी याणी सागितले त्या वरून वशपरपरा ऐसी आहे जे पूर्वी नरसीभट सत्यवादी गोदातीरी नृसिहभक्त होते ते देशाठणप्रसगे तलकोकणात धवमापूर समीप मावलगे नामक गावास सहकुटुब आले येथे श्रीनृसिहाची मुहूर्त बहुत ज्यागृत पाहोन देवासनिध राहोन देवताराधन त्याणी बहुत काल केले त्याचे पुत्र गोविदभट त्याणी हि देवताराधन फार केले त्याचे पुत्र मागती नृसिहभट ते हि देवताराधन बहुत करीत असता त्यास स्वप्न जाहाले जे तू नीरानरसीपुरास जाऊन माझे भजन करणे तेणेकरुन माहा सिधी पावसील मग नरसीभट नीरानरसीपुरास जाऊन पध्रा वर्षे तेथे राहोन सामराज मत्रोपासना बहुत केली या वर त्यास स्वप्न जाहाला जे तू सेवा केलीस ते सपूर्ण करणे या उपरी तुज देव साध्य आहे त्ये काली राजा कोलापुरी विजय नामक धर्मात्मा होता त्याचे राज्य तुगभद्रेपासून गोदातीर व समुद्रकुलपर्यत होते तो राजा कौतुकास्तव सनिध सिगणापुरी राहोन नरसीभटी शिगणापुरास जाऊन दानाध्यक्षानुमते राजदर्शन घेतले राज्याने ब्राह्मणाची शिष्टता देखोन तलकोकणात सगमेश्वर ग्राम निधिनिक्षेप ज्यलतरुपर्वतारण्यसमेत उदकपूर्वक दान दिला मग नरसीभट सगमेश्वरास आले गावीची स्थित पाहाता सगमेश्वरी धर्मात्मा कर्णराज व सोमाजी प्रधान व इतर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४] [१५९७ श्रावण वद्य ६
श्री तालीक
सिवाजी राजे अनाजी पडीत सुरनीसी
सिका
कौलनामा अज दिवाण ठाणे तपे सगमेस्वर मामले प्रभावली ताl वेदमुहूर्ती नीलकठभट बिll सोमनाथभट कात्रे वस्ती कसबा तपे मजकूर सुहूर सन सीत सबैन अलफ दादे कौलनामा ऐसा जे तुह्मी येऊन मालूम केले की आपला कसबा घरठाव पुरातन आहे त्यास रामभट सफरे बिढरी ठेविले होते ते हाली कथला करिताती याचा निवाडा केला पाहिजे घरठाव याची हकीकत तरी आपले पिते सोमनाथभट हे पूरवी गोमातकात वैद्यपणाचा वेवसाव करीत असता राजश्री सोमनाईक बिन विठल नाईक सरदेसाई मामले प्रभावली हे दिवाणकार्या निमित्य फोडियास गेले तेथे त्याचे शरीरी आसवस्त जाहाले त्यास वैद्य पाहिजे ऐसा जाहाला त्या वरून सोमनाथभट यास यत्न करून फोडियास गोमातकाहून आणिले उशदउपच्यार करिता वैद्यपणाची साक्षता कलो आली त्यावरून तेहि सोमनाथभटास आग्रह केला की तुह्मी गोमातकी राहोन आधीक काय केले ठावे आहे सगमेस्वरास तुह्मी येणे जे काय येथे उत्पन असेल ते देऊन ऐसे कितेक प्रकारे बोलोन परिवारा निसी आपणा समागमे आणून सगमेस्वरी ठेविलें काही दिवस हरिभट पित्रे याच्या घरी बिढरे होते त्या वरी काही दिवस देशमुखाच्या वाड्यात होते त्या वरी सोमनाथभटी देशमुखआ पासी विनति केली आपल्यास श्नानसध्या कारणे सचतर जागा दिला पाहिजे त्या वरी बरा जागा पाहाता एक सोनार आपले घर जागा विकत होता तो त्याच्या राजीनामा१++++++ राजीपणाचा घेतला की लक्षुमबाई सागेल त्यास उभयता मान्य त्या वरून तीस लिहून पत्र आणविता तिच साक्षपत्र दिले की सोमनाइकी सोमनाथभटास स्थल दिले हे खरे हे साक्ष हरीभट वझे वस्ती कसबा यास हि ठावकी आहे ह्मणौन पत्र लिहिले त्यावरून हरीभट वझे आणून सागितले की तुह्मी सकल भले वित्पन्न बैसोन निवाडा करून देणे यास आनीथा करील तो गोब्राह्मणद्रोही त्यावरी ब्राह्मण बैसोन केला बिll हरीभट वझे नारो पाध्ये धर्माधिकरणी गोविंद जोसी हरिभट पित्रे वासदेवभट देव हे सर्व ब्राह्मणाही निवाडा केला की सोमनाइकी व सोमनाथभटी घरठा रामेश्वरभट सफरे यास दिलाहा नाही भोगवट्यानिमित्य रामभटे घर बाधिले आहे ते रामभटाचे रामभटास द्यावे भूम सोमनाइकी सोमनाथभट यास दिली ही खरे ह्मणौन त्यासी द्यावी ऐसा निवाडा वेदमूर्ती नीलकठभट व रामेश्वरभट सफरे या उभयताचा जाहाला या वरी तुमास कौल सादर केला आहे भूम ठाव देखील झाडे परसू व तुह्मी आपली कमावीस करणे जुने काजाणु आहे ते रामभटाचे रामभटास देणे तुह्मी नवे बाधोन सुखरूप आसणे पुत्रपौ तुह्मास जागा मुकरर आहे सुखे आसणे दरीबाब कौल आसे छ १९ माहे जावल मार्तब सूद मार्तब आसे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३] [१५८४ वैशाख शुद्ध १४
श्री
मसुरुलहजरत राजश्री पिलाजी नीलकठराव सुभेदार नामजाद मामले प्रभावली यासी सिवाजी राजे दंडवत सुहुरसन इसने सितैन अलफ सालगुदस्ता तलकोकण मुलकाची कबजादत बदल खासास्वारी तलकोकणात होउनु मुलूक कबज जाहाला ते वक्ती श्रृगारपूरकर सुर्वे व कोकणातील पातशाई अमलदार याणी बेमानी केली ते नतीजा पोहचोन उधलोन गेले मुलकातील रयतीस सरजामा बदल वतनदार व रयत यास सरकारातून कौल सादर जाहाले वर केसो नायक बिन राधो नाईक मावलगकर व सारे वतनदार मामले मजकूर सरकारी खिजमतीस हाजीर जाहाले सालमजकुरी रगो नाईक बिन केसो नाईक मावलगकर सरदेसाई मामले माl याणी किले राजगडच्या मुकामी हुजूर येऊन अर्ज केला जे आपले सरदेशमुखीचे वतन मामले माl व मामले दाभोल पिडी दर पिडी मातकदम इस्तकबिल पासून ताl सालगुदस्ता पावे तो चालत आले हाली तलकोक(ण) साहेबास अर्जानी जाले वर साहेबी सेवका वर मेहेरबान होऊन कौल सादर केले या वर आ++ वतनाचे बाबे खिजमतीस हाजीर जाहालो हाली दिवाणातून सारी वतने दिवाणातून अमानत जाली आपले कबिजा हक व लवाजिमा व इनामती अमानत जाल्या आपण तो साहेबाचे खिजमतीस एकसान असो साहेबी मेहरबान होऊन सेवकाची वतनावर स्थापना केलिया व कुटुबास अन देऊन उस्तवारी केलिया उमेद धरून एकसान चाकरी करू व ये बाबे तुह्मी इलतिमास लिहिली बाl इलतिमास खातरेस आणून व रयत मामुरी वर नदर देऊन बेकदीम वतनदार याबदल नायक माl यास दोनी मामले माl सरदेशमुखी वशपरपरेने करार करून नाईक माl यास मामले प्रभावलीचे जमाबदीवर पटी पछोडी हाक लारी २००० दोन हजार रयतनिसबत करार केली असे तरी तुह्मी माl माl जमाबधी वर रयतनिसबत सदर्हू लारी २००० दोन हजारची सीस्त बसऊन दर साल नाईक माl देवीत जाणे दर साल ताजा सनदेचा उजूर न धरणे मामले दाभोलची पटी पछोडी हक याची सीस्त होणे त्यास माl माlचे अमलदार व वतनदार हुजूर आणविले आहेत ते आलेया वर होईल या पत्राची नकल घेऊन असल नाईक माlजवल परतून देणे जाणिजे मोर्तब सूद
तेरीक १२ माहे रमजान सुरु सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २] [१५८३ श्रावण वद्य ४
श्री
ll मशरुल रा l हवालदार व कारकुनानी व देशमुखानी देशपाडियेनानी व मोकादमानी व सेटियें व माहाजनानी व बाजे यानि माहालनिहाय मामले प्रभावली यासि पिलाजी नीलकठराव सुभेदार नामजाद माl माl सूरसन इसने सितैन अलफ नरसोबा नाईक बिन कान्होवा नाईक मावलगकर गुमस्ते सरदेसाई मामले माl याही राजगडच्या मुll हुजूर जाऊन माहाराज राl साहेबाची सनद घेऊन सुभा माl आले राl छ २ माहे जिलकाद पौ छ १७ माहे माl तेथे हुकूम जे नरसो नाईक बिन कान्हो नाईक मावलगकर गुमस्ते सरदेसाई मामले प्रभावली याणी किले राजगडच्या मुll हुजूर येऊन अर्ज केला जे रंगो नाईक बिन केसो नाईक मावलगकर सरदेसाई माl माl हे पेसजी किले माl साहेबाचे भेटीस आले होते तेव्हा अर्ज केला जे सदरहू देशमुखीचे वतन आपले पिढी दर पिढी मातकदम इस्तकबिलपासून ताl साल गुll पावेतो चालत आले हाली तलकोकण साहेबास अर्जान जाहालेया वीर साहेबी सेवकावरी मेहरबान होऊन कौल सादर केलिया वरी आपण वतनाचे बाबे खिजमतीस हाजीर जाहालिया वरि दिवा णातून सारी च वतने अमानत जाहाली आपले कदीम हक व लवाजिमा इनामती दिवाणातून अमानत जाहाल्या आपण तो साहेबाते खिजमतीस येकसान असो साहेबी मेहरबान होऊन कुटुबास अन्न देऊन सेवकाची उस्तवारी केलिया उमेद धरून येकसान चाकरी करू त्या वरी साहेब मेहरबान होऊन सेवकास पटी पछ्योडी लाहारी २००० दोन हजार मामले माl जमाबदी वरी रयत निसबत सीस्त करून द्यावी ह्मणोन सुभा माl नायक पाl माl सनद सादर केली ते घेऊन सुभा आले सदरहू प्राl सीस्त करून घ्यावी तो राl सुभेदार हुजूर आले सेवकास काही पावले नाही या मुले सेवक हइरान आहे पेस्तर सेवकास पोटभर अन्न देऊन उस्तवारी करणार साहेब धनी आहेत बराय इलतिमास खातरेस आणून रयत मामुरी वरी नदर देऊन सरदेसाई माl यासि हक व लवाजिमा पटी पछयोडी लारी ३००० तीन हजार व इनामत बागाइत मौजे कोलबे ताl पावस माl माl या प्रमाणे करार करून देऊन हे सनद सुभा सादर केली असे सदरहू लारी ३००० तीन हजार मामले माlचे जमाबदी वरी रयत निसबत सीस्त करून सरदेसाई माl त्यासि देत जाणे व बाग माlची बागाईत व जिराईत जमाबदी होईल ते सरदेसाई माl याजकडेस इनामत खर्च साल दर साल लिहीत जाणे दर साल ताजा सनदेचा उजूर न धरणे या पत्राची नकल घेऊन असलपत्र सरदेसाई माlजवल देणे ऐसे पत्र घेऊन सुभा आलिया वरी मामले मजकूरचे व माहालानिहाय माl माl वतनदार सुभा आणून याच्या हुजूर ऐन जमाबदी वरी लारी ३००० तीन हजाराची रयतनिसबत सीस्त करून गावगना पटी बसऊन सुभाहून दर माहालास सनदा आलाहिदा सादर केल्या आहेत त्याप्राl हक व लवाजिमा व इनामत दर साल सरदेसाई माlयास तुह्मी बिलाकुसूर देत जाणे जाणिजे छ १७ माहे जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
१ प्रभानवल्ली-सरदेसाई
लेखांक १] [१५८१ कार्तिक शुद्ध
हु
फर्मान हुमायून शरफ सुदुर याफ्त बज्यानेब इजरी बसु.......अत दस्तगा मुजानीब जकार आगा अहुदेय उजुराय उज्जाम मशारनुले किराम निहग दर्यायमर्दी व मर्दानगी गव्हर फेरोजबदी व फर्थनगी फारीस मुजमार सुज्याअत .....महजरम बशाहामत् शाइस्त... अतीफत खत हसीन सजावर परगणे म-हामत वा फीरीखान अलीशान इखबालनिशान फरजद रसीद सुभा दारद दरागर अर्ज कुनदसी देहर अमीन फजली फदला व फजली अफजल खुलासे नेखाबाब मुलूकगीर कीस्वर सीता अफजलखान महमदशाही सरहवालदार व इजत व रफअत दस्तगाह अबुल कादीर सरवरखा रखवालदार व कारकूनानी हाल व इस्तकबाल मामले मुजफराबाद आकी अज सुहूरसन सितीन अलफ दरीविला मशहुरूल अनाम केसो नायक व रगबा नायक फरजद ओ सरदेसाई मामले मजकूर व बदर मैमून मुस्तफाबाद बदर्गा मुअला इलतमास नमूदा की खुद बमसलीहत् पादशाही बमा फर्जदानी व बिरादर जादगा मशगुल शुदा खिजमत बतकदीम मेरसानेम व बिशियार अहवाल दिरेशा नेक खुदरा इनाम मुजारेआ कुली कर्यात मुतकवाना मामले मजकूर दरवज्याह इनाम बुजरगानी खुद कुरसी दर कुरसी माअकुल बाब ज्यारी बूद दरीइसना मुजारेआ मजबूर दरवज्यह मुकासाये अबदुल नबी फर्जद फरवरुदीन ठाणेदार रवानस्त नजर इनायत फरमूदा मुजारी आ मजकूर बरहुकुम साबीक मुकरर व म-हामत फर्मायद बिनाबरा इलतमास नायक मशारनुले बरवातर मुबारक आला आउर्दा खुसरवान ये मनारे आ कुली कर्यात मुतकवाना मामले मजकूर बाबत अबदुल नबी मोमील ये केशव नायक व रगबा नायक मामले बदर मजकूर माकुलबाब माहासूल व नकदियात व जमाअ लवाजिमात भेट व बेगार व फरमाइश व रवानगी व पापोश मीजवानी व नवसीलमहल व ज्यगबेटी व बेकसी व हम सिके हुमायून व कार इमारत बेठ मनउसूरूर कुल बाब व कुल ज्यादात व साही कानुनात इसमी व रसमी व कलमी व कदीमी व नकदी व जिनसी आचे दर दफ्तरे आला साबित सव पेस्तर जिकर नओखाहद शूद मुकरर व म-हामत् व फर्मूदादे बनीदा सूदास्त मेबायद की मुजारे बाब बायेदाखील मानसूत व तगा नात व दरक्तानी नारगील व जगल ताल खगा व देहानी वगैर दुम्हाला सरदेसाई मशारनुले साजन बद अवलाया व अतफाल ए बदसदा ज्यारी दारद व हरसाल फर्मान मज्यदीदान तलबद दारह मिफर्मान खा दारद तालीक निविस्ता गिरिफ्ता असल फर्मान बाज गुजारद ता दानद बर हुकूम फर्मान तकदुस अशरफ रवद तहरीर दफी तारीख दुयेम........ माहे सफर बिल मुजफर सन एक हजार सात परवानगी खुरसैद जु........ अशरफ हुमायून अला*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीरामचंद्र.
लेखांक ३८०.
गजश्रिया-विराजित-राजमान्य-राजश्री चिंतोपंत स्वामी गोसावी यांसि
पो।। सदाशिव चिमणाजी सचिव नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें विशेष पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. किल्ले राजगड येथील असामीच्या वेतना-विशीं लिहिलें त्यास सालगुदस्ताचें किल्ले- मजकूरचें देणेंच राहिले आहे या अन्वयें हेही राहिलें सालमारचा अर्थ तरी हा कालपर्यंत किल्लेमारचा तहबंद जाला नाहीं ठराव होऊन तह-बंद जाला म्हणजे निमेसिमे ऐवज पाववावयाचा तो पावल *रा।। छ २२ रबिलाखर बहुत काय लिहिणें हे विनंती.
********************************************** समाप्त ****************************************