श्रीनाथसाह्य.
लेखांक ३५७.
१७३१ भाद्रपद शुद्ध १.
अजसुभा राजश्री दौलतराव शिंदे ता।। मोकदम मौजे बिडकीन गांव पो।। पैठण सु॥ अशर मया तैन व अलफ चिंतो विठ्ठल याणी मौजे मजकूरचे पेठेचे शेटे यांसी ऐवज देऊन त्यांचे शेटेपणाचे वतनापैकी निमे वतन खरेदी करून महजर करून घेतला नंतर मशारनिलेचा काळ जाला हाली त्यांचे पुत्र राजश्री त्र्यंबकराव चिंतामण यांनी शेटेपणाचे निमे वतनाचे वहिवाटीस मौजे मजकुरास कारकून पाठविला त्यास तेथील शेटे यांनी दिक्कत केली आहे. ह्मणोन विदित जालें त्यांजवरून ही ताकीद सादर केली असे तरी तुह्मी शेट्यास निक्षून ताकीद करून त्यांनी चिंतो विठ्ठल यांसी महजर करून दिल्हा असेल त्याप्रमाणें त्रिंबकराव चिंतामण यांजकडील हाली कारकून मौजे मजकुरास निमे शेटेपणाचे वतनाचे वहिवाटीस आला आहे त्यांजकडे वतनाची वहिवाट सुरळींत चाले असें करवणें जाणिजे छ २९ रजब मोर्तब सूद.