Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३७९.
विनंति उपरि. आपण मुलामाणसांस पाठवावयाचा निश्चय केला होता त्यांत कांहीं विपर्यास ऐकतो. त्यास चित्तांत विपर्यास काडीमात्र न आणितां सुखरूप मार्गस्थ करावीं. येथें आल्यावर दुसरा अर्थ किंवा किंत चित्तात न आणावा. वारंवार काय ल्याहावें ? दुसरा अर्थ घडावयाचा नाहीं. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३७८.
आशिर्वाद विनंति उपरि. आपण मजला येण्याविशीं च्यार पत्रें पाठविलीं त्यास मी पत्राची वाट न पाहावी. निरोपाबरोबर आपली भेट घ्यावी. परंतु घरांत दोघी मुलींस समाधान फार नाहीं आ ती अवस्था राणुजी मातरे यांस पुसावी. ईश्वरू कांहीं आरोग्य पडलें म्हणजे सेवेशीं येतो. कांहीं दुखण्याचें श्वेत कृष्ण जालें म्हणजे मजला कांहीं गुंता नाहीं. रागें न भरावें. मी आपला काय नाश केला असेल तो समक्ष विनंती करीन. मी कांहीं चोरी एक पैशाची केली नाहीं. चोरी ऐसी माझे आंगी लागली, तरी मनास येईल तैसें पारपत्य योजावें आणि चोरी च केली ऐसें पारपत्य योजावें आणि चोरी च केली ऐसें असतें तर मजला अन्नावस्त्राची तारांबळ कशास व्होती ? जितका गांवचा हिशेब मजला ठाऊक आहे तितका दाखवीन. कळावें. पत्रें आपली फार आलीं म्हणोन रागें न भरावें. फार काय लिहिणें ? लोभ करावा
हे विनंति. रा।। माघ शु।। ३.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३७७.
अजम राजश्री सेख हसन शेख इसमाईल सुभेदार मा।। बाणकोट यांसि:-
मोईबान मुखलिशान-दस्तगा अजदिल एकलास-रामभट आगाशे खोत कुलकर्णी मौजे राहाटगर हालीं वस्ती पुणें दुवा आं की येथील खुशी जाणून आपले कडील हकीकत लिहीत जावी. दिगर तुम्हीं पत्र पाठविलें पावलें व हयात खान जमातदार यांनीं सांगितले वरून सर्व अर्थ कळला. व आपण पत्र पाठविलें तेंच बजिन्नस श्रीमंत राजश्री नानास दाखविलेंवरून श्रीमंत संतोष जाहाले. इकडील मजकूर तुम्हांस कळावा या अर्थे हयातखान जमातदार यांस पाठविलें आहेत. हे खुद जबानीं सांगतील त्याजवरून कळों येईल. राजहंसाचा मेळा पाहून आम्हीं मुरंबीपणा केला ते पक्षीं मोत्याचा च चारा खात आहेत. जमेदारीचे रीतीनें कांहीं खिजमत घ्यावयाची असलिया- लिहीत जाणें म्हणून लि।।. त्यास इकडील जमीदारीचें आम्हांकडें आहे च. आपले तर्फेची इनाम जाहाल्यास आपल्याकडील ही जमीदारी होईल. दोस्तीचे जागा ज्यादा काय लिहिणें ? लोभ करावा. बारीक मोठया गोष्टी कित्येक तुमच्या मनांत असतील त्याच आमच्या मनांत आहेत. त्या अन्वयें सूचना मात्र आम्हांस करावी. श्रीमंतांच्या कानावर घालून बंदोबस्त केला जाईल.आपण इनाम आम्हांस करून देविणार म्हणून हयातखान यांनीं सांगितलें त्यास कुटुंबाचा योगक्षेम चाले असें करून देविल्या फार उत्तम आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीभवानीशंकर
लेखांक ३७६.
राजश्रियाविराजितराजामान्यराजश्री भाष्करपंत स्वामी गोसावी यांसि:-
पोष्य दादो नरहर सां।। नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय स्वानंदवैभव लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपण स्मरणपूर्वक कृपापत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. एसेंच निरंतर पत्रीं संतोषवित असावें. यानंतर राजश्री संताजी अंबाल्याबद्दल बाकीचा मजकूर लिहिला त्यास अवघे गांवकरी मिळोन पट्टी करून दिधली. त्याजमध्यें संताजीवर दोनशें रुपये लिहिलें. त्याजवरोन संताजी ह्मणो लागला कीं आपल्याकडे चौघा भावाबरोबर जमीन नाहीं. आपण इतका रुपया कोठून द्यावा. जमीन मोडून द्यावी चौघाभावाप्रमाणें जमीन असलिया पट्टीचा रुपया लिहिल्याप्रों।। देऊं मग करार ठरला कीं जमीनीची वाट जालिया अधिक उणें पाहून घेऊं. मग पट्टीपैकी रुपये १५० दीडशें वसूल दिधला. बाकी रुपये ५० पन्नास त्याजकडे तैशीच राहिली पुढें जमिनीची समजावीस व्हावी. तों तितक्यामधें आपल्याकडून कामकाज निघालें. आतां तुम्हांकडे कामाचा अधिकार आहे. वाजवी गैरवाजवी ध्यानांस आणून जैसे विल्हें लावायाचे असेल तैसें लावावें. तुमची हि शुक्रगुजरी नेकी गांवकरी यांणी फार सांगितली. आणि परस्परें ही ऐकिल्यांत आली. त्यास राहतां हेंच राहतें. वरकड कामकाज बरें वाईट होतच आहे. सूज्ञाप्रती विशेष काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३७५.
साहेब मेहेरबान अन्याबा साहेब व बाबा साहेब मेहेरबान सलामत हूं.
साहेब मुष्फक मेहेरबान अजी कमतरीन महमद जाफर व रजेबदीन व महमद इमान देसमुख पा।। पोटवदे दुवा सलाम महवद मकसूद आ की येथील खैर सला जाणोन साहेबीं आपली खैर अफीयत हमेशा कलमीं करीत जाणें. दिगर आम्ही साहेबाची वाट पाहतों परंतु आपले येणें होत नाहीं तर आतां आपण यावें तुम्हीं आलियावांचून येथील बंदोबस्त होत नाहीं. कितेक वर्तमान जबानीं खंडोजी वायकर सांगता मालूम होईल. विस्तार काय ल्याहावा ? र॥ मल्हारजी नाईक यांनीं पत्र लि॥ आहे त्याजवरून सर्व विदित होईल. आपण त्याजला पत्र एक लेहून पाठवावें, म्हणजे सर्व कामाचा बंदोबस्त होईल. ज्यादा काय लिहिणें ? हे किताबत.
गणराज गौरीसुत ।
लाल आंग मे बभुत ।
जिसके मुख पंच्यामृत ।
जमे दुत भागत ॥१॥
नामा दरजी जुलाम ।
विठूराजका गुलाम ।
हूवा दुनियामें बदनाम ।
उने नाम डुबाया ॥२॥
नामा माने नहीं । श्रीमार्गेश्वर वद्य ७.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३७४.
नकल.
राजाश्रियाविराजीत राजमान्य राजश्री परशराम भाऊ स्वामीचे शेवेसी:-
पोष्य हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता।। छ १६ सफर. जाणोन स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. रो।। आबाजी नाईक काबरास याजकडे मौजे कारजगे हा गांव करवीरकराकडून आपाजी शामराज याचे विद्यमानें इनाम आहे. त्याप्रों।। सरकारांतून करार आहे. त्याचा वसूल आपणाकडे गुदस्तापासून चिकोडीचे जफ्तीमुळें आला असेल तो ऐवज देवऊन पुढें नाईकाकडे गांव सुरळीत चालता केला पाहिजे. सरकारांतून गांव चालवावयाचा करार जाला आहे. त्याप्रों।। नाईकाचे आगत्य धरून चालवावा. याचा ऐवज घेतला असेल तो द्यावा. र॥ छ १७ सफर. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३७३.
तीर्थस्वरूप राजश्री तात्या स्वामीचे सेवेसी :-
अपत्य रघुपतराव याचे कृतानेक सां।। नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असावें. विशेष. रो।। बाबूराव अनंत आले. सर्व वर्तमान निवेदन केले. इकडील वर्तमान पत्रावरून ध्यानास येईल. सारांष येथील बंदोबस्ताविशई श्रीमंत बापूस विनंती करून आपण येथील बंदोबस्त करावा. येथील बंदोबस्ताविशईं श्रीमंत बापूस विनंती करून आपण येथील बंदोबस्त करावा. येथील वर्तणूक आपले आज्ञेविरहित नाहीं. दरबारसंमंधी ठराव करून बंदोबस्त करावा. आपण तेथील फडशा करितील त्या अन्वयें निभावणी होईल. आतां आपण संवशय न धरावा येथील लक्ष आपल्या पायांसी अथपर दुसरें नाहीं. आपण उपेक्षा केल्यास परिणाम नाहीं. सर्व भरवसा आपला आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती. माहालचे प्रगणियाचे वर्तमान रो।। राजाराम सांगितले X X X X .
(पुढील बंद गहाळ)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
रागुराज
लेखांक ३७२.
गुलाम मोहिदीनखान दाम-महबत-हूं शाहामत व अवालीमर्तबत रफाअत व मा-अलमं-जिलत व बा आदज षौक आंकी भिकाजी मोरेश्वर यांणीं जाहीर केलें कीं मौजे मखमलाबाद पो।। दिंडोरी येथें सरकारांतून आम्हास इनाम जमीन आहे त्यास येशवंतराव सिबाजी व पठाण यांणीं दंगा करून खंडणी घेतली त्याची पटी जाहागीरीचे कमावीसदार यांणीं करून ईनामाची जफ्ती केली आहे येविसी आज्ञा जाली पाहिजे म्हणोन त्याज तुम्हास कलमीं असे भिकाजी मोरेश्वर सरकारचे पदरचे याची ईनाम जमीन तुम्हाकडील कमावीसदार यांणीं जफ्त केली आहे त्यास ताकीद करून ऐवज न घेतां जमीनीची जफ्ती मोकळी करवणें. जमीन मोकळी होऊन यांची याजकडे सुदामत चालत आली आहे त्याप्रों।। चाले तें करावें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
लेखांक ३७१.
लेखांक ३७१ वाचण्यासाठी ईथे क्लीक करा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३७०.
१७४० ज्येष्ठ वद्य ५.
राजश्री भिकाजी मोरेश्वर पा।। मोकदम मौजे अनंदवल्ली पो।। नासिक
कबुलात बेशमी काशी हेंगडा मौजे मखमुलाबाद पो।। दिंडोरी सन १२२८ कारणें कबुलात लिहून दिल्ही ऐसीजे. तुमचा इनाम मजरे गंधारवाडी मौजे मजकर येथील आहे. त्याप्रमाणें सेताची लावणी आह्मी केली त्याचा सारा दर बिघा रु॥ एक प्रो।। देऊं. खेरीज पा।। कुलकर्णी यांचे हक्कदारीचे दाणे देत जाऊ. मि॥ शके १७४० बहुधान्य नाम संवत्सरे माहे ज्येष्ठ व॥ ५. नि॥ नांगर
रामचंद्र गोविंद कुळकर्णी.