Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३४९.
१७२३ श्रावण वद्य ११.
विज्ञापना_
सेवेसी विज्ञापना. तागाईत छ २३ रबिलाखर रोज गुरुवार सायंकालपर्यंत वर्तमान तर राजश्रीकडील दरगदार यांणीं किल्याचा झाडा वगैरे कागदपत्र झाडे आणून दाखविले. रो।। माधवराव रास्ते यांणी पाहून ठेविले कंपूचें धरणें आज उठोन लस्करांत गेले. वरकड बंदोबस्त रास्ते करीत आहेत. खर्चास आह्मांस नाही. याची आज्ञा असावी. सेवेसी श्रुत होय विज्ञप्ती.
साहित्यपत्र.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३४८.
यादी श्रीमंत यांस मेजमानीस पोषाख
श्रीमंत खासे.
१ तिवट.
१ दुपट्टा.
२ महमुद्या.
.॥. किनखाप.
--------------
४॥ २५०
श्रीमंत अप्पासाहेब.
१ तिवट.
१ दुपट्टा.
२ महमुद्या.
.॥. किनखाप.
--------------
४॥ १५०
---------
४००
३० मालि.
५७२
--------
९७२
भोजनखर्च १००
देहनगीखर्च. १००
-------------
११७२
श्रीमंताबरोबर गृहस्थ मंडळी.
मेजमानीस येणार.
१ बाळशास्त्री. ५०
१ गोपिनाथभटबाबा. २०
१ वैजनाथ भट भागवत. २५
१ बाळाजीपंत पटवर्धन. २५
१ आप्पाजीपंत सहस्त्रबुध्दे. २०
१ आबा काळे. २५
१ मोरोबा दादा फडणीस. १००
१ रामचंद्र गोसावी ५०
१ सदाशिव माणकेश्वर. ४०
१ गोपाळराव मुनशी. २५
१ बाळोजी कुंजर. ५०
१ शिवाजी बल्लाळ. १५
१ गोविंदपंत. १५
१ नारोबा आवटी. १२
५ पोशाख दर १० प्रे॥ ५०
१० पागोटी १० दर ५ प्रे॥ ५०
--------- --------
३० ५७२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक ३४७.
१७२२ पौष वद्य ८.
मशरुल अनाम देशमुख व देशपांडे पो। रावेर यांसि कासीराव होळकर सु॥ इहिदे मया तैन व अलफ राजश्री त्रिंबकराव चिंतामण यानीं श्रीमंतांचें पत्र रजबचे आणिलें कीं प्रांत खानदेश येथील कानगोईचे वतन खंडोगंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्याची जफ्ती पेशजी सरकारांत केली होती त्यास चिंतो विठ्ठल निधन पावले त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण यांजवर कृपाळू होऊन यांचे हिश्शाचे वतनाची मोकळीक आसे तरी तुह्माकडील महालानिहायचे मामलेदार व जमीनदार यांस ताकीद करून पूर्वी चिंतो विठ्ठल यांजकडे वतन चालत होतें त्याप्रमाणें यांजकडे चालवणें ह्मणोन त्यावरून हें पत्र सादर केले असें तरी तुह्मी सरकारसनदेप्रों।। पा।। -मजकूर येथील कानगोईचें वतनाचा हक्क रुसू व इनाम वगैरे व पानपान कानू- कायदेसुध्धा पेशजी चिंतो विठ्ठल याजकडे सुदामत चालत आल्या बा।। मशार-निलेकडे चालवणें व कागदपत्राचा शिरस्ता पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्या अन्वयें यांचे दफ्तरी देत जाणें जाणिजे छ २२ साबान मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक ३४६.
१७२२ पौष वद्य ८.
राजश्री केसो कृष्ण गु ।। व देशपांडे पा।। गाळणा गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ कासीराव होळकर देशमुख पो। मा।। दंडवत सु॥ इहीदे मया तैन व अलफ. राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांनी श्रीमंताचें पत्र छ ६ रजबचें आणिलें कीं प्रांत खानदेश येथील कानुगोईचें वतन खंडोगंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्यांची जफ्ती पेशजी सरकारांत केली होती त्यास चिंतो विठ्ठल निधन पावले त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण यांजवर कृपाळू होऊन त्यांचे हिश्शाचें वतनाची मोकळीक केली असे तरी तुह्माकडील महालानिहायचे मामलेदार व जमीनदार यांस ताकीद करून पूर्वी चिंतो विठ्ठल यांजकडे वतन चालत होतें त्याप्रों।। यांजकडे चालवणें ह्मणोन त्यावरून हें पत्र सादर केलें असें तरी तुह्मी सरकार सनदे प्रों।। मा।। येथील कानगोईचें वतनाचा हक्क रुसूम व इनाम व घरें व मान-पान कानूकायदे सुध्धा पेशजी चिंतो विठ्ठल यांजकडे सुदामत चालत आल्याप्रों।। मशारनिलेकडे चालवणें व कागदपत्राचा सिरस्ता पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्या अन्वये यांचे दप्तरी देत जाणें जाणिजे छ २२ साबान बहुत काय लिहिणें.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक ३४५.
१७२२ पौष वद्य ८.
राजश्री आपाजीराव निंबाळकर क॥दार पें॥ रावेर गोसावी यांसि अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ कासीराव होळकर राम-राम विनंती उपरी राजश्री त्रिंबकराव चिंतामणयानीं श्रीमंताचें पत्र छ ६ रजबचें आणिलें कीं प्रांतखानदेश येथील कानगोईचें वतन खंडोगंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्याची जफ्ती पेशजीसरकारांत केली होती त्यास चिंतो विठ्ठल निधन पावले. त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामणयांजवर कृपाळू होऊन यांचे वतनाची मोकळीक केली आहे तरी तुह्माकडील माहाला निहायचे मामलेदार व जमीनदार यांस ताकीद करून पूर्वी चिंतो विठ्ठल याजकडे वतन चालत होतें त्या णों।। यांजकडे चालवणें ह्मणोन त्यावरून हें पत्र लिहिलें असे तरी तुह्मीं सरकारसनदेप्रमाणें पे॥ मार येथील कानगोईचे वतनाचा हक्करुसू व इनाम व घरे व मानपान कानूकायदे सुध्धां पेशजी चिंतो विठ्ठल यांजकडे सुदामत चालत आल्याप्रमाणें मशारनिल्हेकडे चालवणें व कागदपत्राचा सिरस्ता पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्या अन्वयें यांचे दफ्तरी देत जाण र॥ छ २२ साबान इहिदे मया तैन व अलफ बहुत काय लिहिणें हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक ३४४.
१७२२ पौष व॥ ८.
मशरुल अनाम देशमुख व देशपांडे, पो।। उत्राण यांसी
कासीराव होळकर सु॥ इहिद्दे मया तैन व अलफ राजश्री त्रिंबकराव चिंतामण यानी श्रीमंताचें पत्र छ ६ रजबचे आणिलें की प्रांत खानदेश येथील कानगोईचे वतन खंडोगंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्याची जफ्ती पेशजी सरकारांत केली होती त्यास चिंतो विठ्ठल निधन पावले त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण याजवर कृपाळू होऊन यांचे हिश्शाचे वतनाची मोकळीक केली आहे तरी तुह्माकडील मामलेदार व जमिनदार यांस ताकीद करून पूर्वी चिंतो विठ्ठल यांजकडे वतन चालत होतें त्याप्रों।। यांजकडे चालवणें ह्मणोन त्यावरून हें पत्र सादर केले आहे तरी तुह्मी सरकारसनदेप्रों।। परगणे मजकूर येथील कानगोईचे वतनाचा हक्क रुसू व इनाम व घरे व मानपान कानूकायदे सुध्धा पेशजी चिंतो विठ्ठल यांजकडे सुदामत चालत आल्याप्रमाणें मशारनिल्हेकडे चालवणें व कागदपत्राचा सिरस्ता पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्या अन्वये यांचे दफ्तरी देत जाणें जाणिजे छ २२ साबान मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३४३.
१७२२ पौष वद्य ४.
राजश्री अतांजी हरी ठाणे निऱ्हाळे स्वामी गोसावी यांसि :-
सेवक बळवंतराव नागनाथ नमस्कार सुमा ईहिदे मया तेन व अलफ. मौजे निऱ्हाळें ता।।. देपूर पा।। संगमनेर येथील कुळकर्ण चिंतो विठ्ठल याचे आहे त्याची जप्ती पेशजी सरकारांतून होऊन तालुके पट्याकडे सांगितली आहे. हाली मोकळी करून चिंतो विठल मृत्यु पावले त्यांचे पुत्र राजश्री त्रिंबकराव चिंतामण याजकडे मौजे मजकूरचे कुळकर्ण पेशजीप्रों।। मारनिलेकडे चालवावयाची हुजूरून सनद छ २६ जमादिलाखरची सादर जाहाली त्याजवरून तुह्मांस लिहिलें असे तरी मौजे मजकूरचे कुळकर्ण मारनिले अनुभवितील तुह्मी दखलगिरीं न करणे. मारनिले यांनी बापूजी शामराज यांस कुळकर्णाचे गुमस्तगिरीचे काम सांगोन पाठविले आहेत याचे हातें कुळकर्णाचे कामकाज घेणें. रवाना छ. १८ साबान. बहुत काय लिहिणे ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३४२.
१७२२ पौष वद्य ४.
अजू स्वारी राजश्री बळवंतराव नागनाथ सुभेदार ता॥ पट्टा ता॥ मोकदम मौजे निऱ्हाळे ता।। देपूर पो।। संगमनेर सुमा ईहिदे मया तेन व अलफ. मौजे मजकूर येथील कुलकर्ण चिंतो विठ्ठल याचे आहे त्याची जप्ती पेशजीं सरकारांतून होऊन तालुके मजकुराकडे सांगितली आहे. हाली मोकळी करून चिंतो विठ्ठल मृत्यु पावले त्याचे पुत्र राजश्री त्रिंबकराव चिंतामण याजकडे मौजे मजकूरचे कुळकर्ण पेशजी प्रो।। मारनिलेकडे चालवावयाची हुजुरून छ २६ जमादिलाखरची सनद सादर जाहाली त्याजवरून हे चिठी सादर केली असे तरी मौजे मजकूरचे कुळकर्ण मारनिले अनुभवितील. कुळकर्णाचे गुमस्तगिरीचे कामावर बापूजी शामराज यांस मारनिलेनीं पाठविले आहेत. कुळकर्णाचे कामकाज करितील. जाणिजे. छ १८
साबान. मोर्तब सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३४१.
१७२२ पौष.
राजश्री त्र्यंबक रावजी गोसावी यांसि :-
स्नो।। विठलराव होळकर दंडवत. विनंति. उपरी तुह्मी हरिपंतांचे नावें चिठी पाठविली की अकरा गोण्या गोविंदा बराट याच्या हवाला करणें. न केल्यास कामास पडणार नाही ह्मणून लिहिलें त्यास गोण्यास आज तीन रोज जाले तेव्हाच अशी निक्षून चिठी पाठविली असती तर गोण्या माघारा दिल्हे असत्या. तुह्मांखेरीज दुसरा विच्यार नाहीं. परंतु काल सगळा वीळ वाट पाहिली. कोणीच न आलें तेव्हां लोकांच्या गवगव्यामुळें गोण्या फोडून वाटून दिल्हे. तुह्मांस कळावें. आता जैसे तुह्मांस कळेल तैसी रावसाहेबांस विनंति करून सांगावें. पूर्वी आह्मांस असेच कळलें असतें तर गोण्या न फोडतों. दुसरे मुलास देवी निघाल्या आहेत. तर कनाता दोन जरूर पाठवणें. बहुत काय लिहिणें ?* हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३४०.
१७२२ मार्गशीर्ष वद्य ४.
राजश्री बखत रामभाई आगरवाले गोसावी यांसि
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्ने॥ गोपाळराव त्र्यंबक राजेबहादर आशिर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित गेलें पाहिजे विशेष बहुत दिवस जाले तुह्माकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं त्यास असें न करावें तर हमेशा पत्र पाठऊन स्वकुशल वर्तमान कळवित जावें तुमची बडती ऐकोन बहुत संतोष आहे ऐशास राजश्री त्रिंबकराव चिंतामण सर-कानगोईचें वतन प्रांतमजकुरी आहे त्यास राजश्री सुभेदार यांजकडून सुभा आपलेकडे आहे हें जाणोन सरकानगो याचें वतना बंदोबस्त माहालानिहाय बितपसिल
१ सरकार बिजागडचे खरगोण बतीसी
ए॥ महाल.
ए॥ कलमें. ३३
१ पो।। आडावद.
१ पो।। सुलतानपुर.
१ नंदुरबार.
१ पो।। उत्राण.
१ पो।। आंबेपोतडे
१ दुमालेगांव फुट जागिर तुमचे यजमानाचे सरकारांत आहेत. ते कलमें.
एकूण सात महाल सरकार विज्यागड खरगोण बत्तीशी महाल तेहतीस व फुटजागिरीचें गांव सिवाय सदरहू येथील हकरुसू दर सद्दे रु॥ १ व गाव- गन्ना सालिना दर गावीं रुपया १ जगात भुसार व किराणा व कापड सुध्धा व मोहतर्फा व शेव-संबजी वगैरे व परगणे सुलतान-पूर येथील हवालदारी बाब येणें प्रों।। आहे ये विशई यांजकडून आह्माकडे कारकून येतील ते तुह्मांस वर्तमान वतनाचें निवेदन करतील त्याप्रों।। बंदोबस्त करून देवावयाचे वत्नाचें कामकाज सुरळीत चालऊन हक्करुसू पावित जावे रा॥ छ १७ रजब बहुत काय लिहिणें हा आशिर्वाद.