Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

                                                       पुस्तक पहिलें.

                                                                                          पत्रांक १.

१७६३ ता. २० जान्युआरी.                                              श्री                                                       माघ शुद्ध ६ शके १६८४


रा. चिंतोपंत फडणीस गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी शिंदे व महादजी शिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल ता। छ५ माहे रजब मुक्काम मिरज कृष्णातीर येथें राजश्री अंताजी माहादेव यांनीं तुह्मांपासून रुपये २५००० पंचवीस हजार घेतले आणि खर्च केले असत तरी हा ऐवज सत्वरच पोहचतां करून देऊं. बहुत काय लिहिणें हे विनंति.

हस्ताक्षर अंताजी माहादेव द॥ म॥ कु॥ (?)

स्वस्थानीं आल्यावर त्यांनी पेशवाईच्या वांटणीचा प्रश्न काढला. पण रावसाहेब पेशवे या वेळी फौजबंद असून त्यांच्या शहाणपणाची व शूरत्वाची कीर्ति सर्वत्र पसरली होती. त्यांची दूरदृष्टी, आटोकाट शहाणपण, त्यांची आवर-शाक्ति इत्यादि गोष्टी व त्यांची कदर हीं अशीं कांहीं विलक्षण होतीं कीं, रावसाहेबांची छाप ‘तेथे कांहीं चाड नाहीं वयाची’ या न्यायानें सर्वत्र बसली. रावसाहेबांचें ठासून बोलणें व करारी स्वभाव पाहिल्याबरोबर दादासाहेब शरमले. व ‘आपलें २५ लक्ष रुपये कर्ज वारलें ह्मणजे आपण स्नानसंध्या करून राहूं’ असें त्यांनी आपल्या क्षणैकभंगुरवृत्तीनें रावसाहेबांस वचन दिलें. ही गोष्ट १७६७ च्या मे-जून मध्यें झाली.

इकडे महादजी शिंद्यांनीं दादासाहेबांच्या पाठीमागे ‘आपलें सरदारीचें काम पुरें करून द्या’ असा लकडा लावला. रावसाहेबांनींही रायरीकरांच्या फडणीशीचे हिशोब तपासले. याच समयी तुकोजी होळकर दक्षिणेस आले होते. त्यांच्या बरोबर गंगाधर यशवंत ऊर्फ गंगोबातात्या चंद्रचूड आले. त्यांचें व अहल्याबाईचें पटेना म्हणून त्यांनीं तेथील दिवाणगिरी सोडून शिंद्यांच्या राज्याची दिवाणगिरी करावी असा हेतु धरिला व महादजींस न कळवितां ( त्यांच्या परोक्ष ) रावसाहेबांजवळून महादजीच्या सरदारीची व्यवस्था लावण्याचा उपक्रम सुरू केला. गंगोबा तात्यांनी राज्याच्या व स्वतःच्या फायद्यासाठीं ज्या शर्ति महादजीच्या तर्फे कबूल करण्याचा घाट घातला, त्या महादजीसारख्या अभिवृद्धीच्छु पुरुषास कशा पसंत पडणार? त्यांनीं रायरीकरांस ‘आपलें वचन पूर्ण करा’ व पंत प्रधानांस व बापूंस ‘आपली फार गरीबी आहे’ अशा पत्रांची झोड उठविली व ‘रायरीकर मात्र आपल्या तर्फेनें बोलतील इतरांस बोलण्याचा अखत्यार नाहीं’ असें रावसाहेबांस स्पष्ट कळविलें. रायरीकरांस खुष करण्यासाठीं त्यांनी स्वदेशच्या सर्व शिंद्याकडील महालांचे सरसुभे नेमून त्यांनीं पाठविलेल्या सदाशिव केशव या नांवाच्या गृहस्थाच्या नांवें सनदा करून दिल्या. पेशव्यांनीं ही गंगोबातात्यांस शिंद्यांची मुतालकी देऊन दिवाणगिरी बाजी नरसिंह यांस दिली. पण गंगोबांचे प्रस्थ महादजीस नको होते. १७६७ च्या अक्टोबरमध्यें हा कारभार झाला. पुढें महादजी स्वतः १७६८ च्या ज्यूनच्या सुमारास दक्षिणेंत आले व त्यांनी आपल्या मनाप्रमाणे सर्व कारभार उरकून घेतला.

नंतर हिंदुस्थानचे स्वारींत त्यांनी होळकरासह रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या हाताखालीं राहून रोहिले व पठाण यांचा खासा समाचार घेतला, पातशाहीची व्यवस्था लाविली आणि सुजाउद्दवला व इंग्रज यांच्याशीं दोन हात व्हावयाचा खासा प्रसंग ते आणणार तों सर्व महाराष्ट्राच्या दुर्दैवानें थोरले माधवरावसाहेब मरण पावले आणि नानासाहेब पेशव्यांचे व रावसाहेबांचे विचार मनच्या मनींच राहून गेले. तसेंच, येथें माझें शिंदे प्रकरणाचा विषयप्रवेशही संपला.

पण दादासाहेबांचा शिंद्यांवर मनस्वी राग होता. कारण काकड्याच्या मरणास शिंदे कारण झाले होते. यावेळी शिंद्यांनी व त्यांच्या कारभा-यांनीं नारोशंकरास जी पत्रें लिहिलीं आहेत, ती किती लीनतेची व आर्जवाचीं आहेत, हें आतांच प्रसिद्ध झालेल्या या खंडांतील पत्रांवरून स्पष्ट दिसेल. या वेळी सर्व ऐवजाच्या निशेसाठीं शिंद्यांनीं सर्व दक्षिणेंतील महालही नारोशंकरास लाऊन दिले होते ! असो; चिंतोपंत तात्यांचे बंधु मोरोविठ्ठल यांस शिंद्यांनीं रिक्तहस्त परत पाठविले होते, म्हणून रायरीकरांचाही राग शिंद्यावर होताच. पण नारोशंकरांनीं मध्ये पडून व सहालक्षापर्यंत सरकारांत नजराणा, रायरीकरास फडणिशी, इत्यादि कबूल करून दादासाहेबांस पल्लयावर आणिले.

हा वेळपर्यंत शिंदे कांहीं स्वस्थ बसलें नव्हतें. त्यांनी कोटेकरांची मामलत करून व मारवडची मामलत रगडून टाकून मल्हारराव सुभेदारांचा उपराळा करण्यासाठीं दिल्लीकडे प्रयाण केले होतें. इतकें व्हावयास १७६५ चा आगस्ट उजाडला. इकडे गणोजी कदम या नांवाच्या मनुष्यानें महादजीचें नांव सांगून रावसाहेब पेशव्यांपाशीं वाटतील ते करार-मदार कबूल केले होते. अर्थातच हे करार शिंद्यांस पसंत नव्हते व नारोशंकरांनींही आपलें औदासिन्य सोडून व गणोजीस फजीत करून ते करार मोठ्या कष्टानें नाहींसे केले. शेवटीं शिद्यांची सरदारी कायम झाली, व शिंद्यांनी नारोपंतनाना राजेबहादरांस हिंदुस्थानांत १७६५ च्या अखेर बोलाविलें, व ते दादासाहेबांबरोबर गेलेही.

राघोबादादासाहेब हिंदुस्थानांत पाऊल ठेवून काम करावयास आरंभ करणार तों मल्हारराव सुभेदार वैशाख शु॥ ११ (ता. २० मे १७६६ ) स दिवंगत झाले. मल्हारराव म्हणजे कर्ता पुरुष. अव्वल पासून मराठ्यांचा उत्कर्ष पाहिलेला व उत्कर्षास स्वतःच्या मर्दुमकीनें साहाय्य केलेला पुरुष मल्हारराव काका! गनिमी लढाई खेळावी अशी त्यानेंच. त्याला पातशाही सकट सर्व हिंदुस्थान चळवळा कांपत असें. तो मेला ह्मणजे मराठाबादशाहीचा उजवा हात गेला ! राघोबादादांची हिम्मतच खचली. तथापि त्यांनी उद्दिष्ट कामास हात घालून प्रथम गोहदेस वेढा दिला. इकडे शिंदेही उदेपूरच्या वगैरे मामलती आटपून गोहदेस आक्टोबरच्या सुमारास आले. तेव्हां रायरीकरांनी आपली फडणिशी पुनः कायम करून घेतली. इकडे जनकोजीचा तोतया आपल्या आश्रितांस सनदा देतच होता व त्यायोगें शिंद्याच्या मुलुखांत थोडीफार दंडेलगिरी होतच होती.

तथापि महादजीची व थोरल्या श्रीमंताची गांठ पडली तेव्हां सरदारकीचा मुख्य मान आपल्यास मिळावा असा त्यानें बूट काढला. या खलबतांत नारोशंकरची दिवाणगिरी निघाली, त्याची झांशी शिंद्यांस मिळाली व देशी परत गेल्यावर केदारजीस वजा करून महादजींस सरदारींची वस्त्रे द्यावयाचीं असें गुप्तपणें ठरलें. रायरीकरांची फडणिशी सनद शिंद्यांची व हुजूरची होऊन त्यांचा शिंद्यांकडील कर्जाचा फडशा झाला व रायरीकरांस शिंदखेड, येदलाबाद येथील दरकाच्या असाम्या करार झाल्या. तर्क आहे कीं अबापुरंद-यांनीं या वेळीं शिंद्यांचे तर्फेनें मदत केली असावी. पुढें दादासाहेबांनीं कसाबसा गोहदचा कारभार आटपून आपली आक्रमशक्ति नाहींशी झाली, असे दाखविलें; व नंतर इंदुरास येऊन त्या प्रसिद्ध साध्वी अहिल्याबाईच्या हातानें आपली नाचक्की करून घेतली ! याप्रमाणें माधरावसाहेब कर्नाटकांतून यश मिळवून परत येतात तों दादासाहेब आपली अपेशी मूर्ति घेऊन परत आले.

या दादासाहेबांच्या आग्रहावरून प्रथम दोनतीन वर्षांपर्यंत शिंदे घराण्याच्या सरदारीचा निकाल झाला नाहीं. दादासाहेबांच्या मनांतून ही सरदारी मानाजी काकडे या नांवाच्या एका शिंद्यांच्या लांबचे पण शूर नातेवाईकास द्यावी, असें होतें. यामुळें शा. शके १६८४-८५ पर्यंत (इ. स. १७६२।६३ पर्यंत ) या सरदारीचें घोंगडे तसेंच भिजत पडलें होतें. पुढें केदारजी व महादजी या उभयतांनीं जेव्हां चिंतोविठ्ठल ऊर्फ तात्या रायरीकराकडे संधान बांधिलें, एका किंवा अन्यरूपानें तात्यांच्या घरी २५००० रु. पोहोंचविले, शिंदेसंस्थानची कुल फडनीशी दिली, दादासाहेबांपुढें खासगत खर्चासाठी १ लाख रुपये ओतले, तेव्हां केदारजीस सरदारी मिळण्याचा संभव दिसूं लागला. पण ‘अंतस्थ’ देणें हा शिंद्यांचा मुख्य वशिला नव्हता. ते उभयतां-पण विशेषतः महादजी-पराक्रमी सरदार ! त्यांच्याकडे रजपुतान्यांतील मामलतींचा कारभार विल्हे लावण्याचें काम आलें होतें ते त्यांनीं सफाईनें पार पाडले. इ. स. १७६३ च्या मेच्या सुमारास जानोजी भोसल्याच्या मुलखावर स्वारी करण्याचा त्यांस हुकुम झाला होता. कारण भोसले या वेळीं निझामाच्या कच्छपी होते. महादजी खालीं उतरणार तों भोसले सावध होऊन पुनः मराठ्यांच्या कक्षेंत अंतःप्रविष्ट झाले. असो; शिंदे उज्जनी, नर्मदातीर वगैरे करून थेट गंगातीरीं आले व तेथें श्रीमंतांच्या व त्यांच्या गांठी पडल्या. याच वेळीं जनकोजी शिंद्याचा तोतया पुढें येऊन त्याचेंच कांहीं वेळ खुळ माजलें. शेवटीं तो 'थोरात' हें ठरलें ! पुढें श्री. नारोशंकर राजे बहादर यांनी महाप्रयत्न करून शिंद्यांची सरदारी उभी केली व आपण त्यांची दिवाणगिरी पत्करून नजराणा, दरबारखर्च इत्यादिकांची व्यवस्था लावण्यास आरंभ केला. राजेबहादर यांनी शिंद्यांसाठीं आपल्या जामीनकीवर कर्ज काढून शिंद्यांची ६४ च्या ज्यान्युआरीमध्यें उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली आणि आपण माधवरावसाहेबांच्या कर्नाटकच्या स्वारीत सामील झाले.

हिंदुस्थानांत जातांना शिंद्यांच्या बरोबर महादेव गोविंद काकडे या नांवाचे दादासाहेबांच्या व रायरीकरांच्या प्रीतींतले एक श्रीमान गृहस्थ व मोरोविठ्ठल रायरीकर-तात्यांचे बंधु-पेशव्यांनी दिले होते. सरासरी वर्षसव्वाबर्षपर्यंत शिंदे व काकडे-रायरीकरांची जोडी. यांनी कसाबसा कारभार करून उदेपूर वगैरे मामलतींचा निकाल काढिला. पण उभयतांची चित्तशुद्धि नव्हती. १७६५ च्या मे अव्यलीस तर ही चुरस विकोपास गेली व माहदाजी गोविंद निराळे झाले. काकड्यास शिंद्यांची दिवाणगिरी हवी होती. ही गोष्ट नारोशंकरास (नानांस) कशी सहन होणार ! त्यांनीं शिंद्यांस सूचक पत्रें लिहिलीं. तेव्हां नारोशंकरांच्या ह्या सूचनेनुसार राघोराम, राघोमल्हार व बाजी नरसिंह (शिंद्यांचे हितचिंतक ) यांनीं काकड्यास धरण्याच्या हेतूनें त्यांच्यावर हल्ला केला तों काकडें युद्धांत मारिले गेले ! त्यांचा एक मुलगाही जखमी झाला. मोरोपंतांसही शिंद्यांच्या बाईनें हाकून दिलें !

याच सुमारास पेशवे व दादासाहेब कर्नाटकची स्वारी आटपून परत आले. चुलता-पुतण्यांत वांटणीच्या गोष्टीचा ऊहापोह झाला. पण रावसाहेबांच्या युक्तिशुद्ध बोलण्यापुढें भोळ्या राघोबाचें कांहीं चाललें नाहीं. पुनः ते उभयतां एकमतानें वांगू लागले. दादासाहेबांनीं हिंदुस्थानांत जाऊन पातशाहीचा बंदोबस्त करण्याचें व पानिपतच्या पूर्वी उत्तर हिंदुस्थानांत मराठ्यांचा जितका अमली मुलुख होता तितका पुनः सोडविण्याचें कबूल केलें. उभयतां श्रीमंतांनी भोसल्यास वठणीला आणिले आणि मग १७६६ च्या ज्यान्युआरींत दादासाहेब भोसल्यांची चार पांच हजार फौज घेऊन व विठ्ठल शिवदेव, गायकवाड इत्यादि सरदार घेऊन रायरीकरांसह उत्तरेस गेले.

विषयप्रवेश.

पुढील श्री. रायरीकर यांचे संग्रहांतील पत्रें रा. रा. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांस श्रीमंतांच्या कृपेनें सांपडलीं. या रायरीकरांच्या घराण्याचा मान पेशवाईतील उत्तरार्धात पुष्कळच मोठा होता. इ. स. १७६०-१७७४ ( शके १६८२-१६९६ ) पर्यंत पेशव्यांच्या दरबारांत जे काय पुण्यास कारभार झाले, त्यांत चिंतो विठ्ठल रायरीकरांचे अंग नव्हतें, असें झालेच नाहीं. या तात्या रायरीकरांवर दादासाहेबांची अखंड कृपा असे व तेही दादासाहेबांच्या पक्षाला एकनिष्ठ असत.

असो; यापेक्षां आणखी पुष्कळ पत्रसंग्रह श्री. रायरीकरांकडे असावा. रायरीकर संग्रहांतील आज मी जो पत्रव्यवहार छापीत आहें, तो फक्त श्री. थोरले माधवरावसाहेब यांच्या आमदानींतींल आहे. त्यांतही प्रथमतः शिंदे प्रकरण घेतलें आहे. अर्थातच सर्व पत्रांचा अनुक्रम कालमर्यादेनें ठेवितां आला नाहीं व येणें शक्य नाहीं. शिंदेप्रकरणांत कालानुक्रम राहील; पण एकंदर सर्व पत्रें कालकमानें न छापितां मिळालेलीं पत्रें प्रकरणवार लावून प्रत्येक प्रकरणांत मात्र कालानुक्रम ठेवावा, असें मी ठरविले आहे. प्रत्येक पत्राला पत्रांक, सालासह महिन्याची मित्ती व सनासह महिन्याची तारीख देणार आहें व प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी त्या प्रकरणीचा गोषवारा व इतर अवश्य माहिती देणार आहें, वगैरे गोष्टी प्रसिद्ध झालेल्या जाहीर विनंतीपत्रांत नमूद केल्याच आहेत.

आतां शिंदे प्रकरणाचा विचार मला मिळालेल्या रायरीकरांचें पत्रान्वयें करावयाचा. सर्व मराठी इतिहासाच्या भक्तांस विदितच आहे कीं, पानिपतच्या घोर व घातकी संग्रामांत इतर सरदारी घराण्याबरोबर शिंद्याच्या घराण्याचा भयंकर नाश झाला दत्ताजी व जनकोजीच्या मागे शिंदे घराण्याची फारच हलाखी झाली. राणोजी शिंद्याचा नातु केदारजी व त्याचा रक्षापुत्र महादजी ( पुढें जगप्रसिद्ध झालेले पाटिलबावा ) हे कायते म्हणण्यासारखे पुरुष अवशिष्ट होते. पानिपतानंतर सर्व महाराष्ट्राची सत्ता आमच्या शूर पण भोळ्या दादासाहेबांच्या हातांत आली. त्या वेळचे लोक यांस ‘सांब’ म्हणत असत. चमत्कार हा आहे कीं, यास उपासनाही शंकराची असे! अथवा ‘यो यच्छूद्धः स एव सः’ या न्यायानें हें ठीकच होतें. दादासाहेब जितके शूर होते, तितकेंच जर बुद्धीचे खंबीर व लेखणीचे धड असते, आनंदीबाई, बापू, रायरीकर, राजेबहाद्दर, मल्हारराव होळकर, इत्यादि मंडळी सांगतील तेंच खरें व नानासाहेबांच्या पक्षाची राष्ट्राभिमानी मंडळी सांगतात तें खोटें, असा जर यांनी आपला पूर्वग्रह करून घेतला नसता, हे जर भोळे नसते, तर मराठी राज्यास सकुटूंब सपरिवार यांनीं जो कायमचासा अपाय केला, तो त्यांच्या हांतून झाला नसता. असो; यांचा भोळेपणा, यांचा तापट स्वभाव, यांची महत्वाकांक्षा, यांची बाहेरख्याली व यांच्या शूरत्वामुळें यांस ओघानें प्राप्त झालेली यांची मान्यता, हींच महाराष्ट्राच्या मुळावर येऊन त्यांनीं पेशवाईचा विध्वंस केला, ही गोष्ट मात्र खरी आहे.

लेखांक ८                                                                                                                                                                                                                                                                                  

                                                                                                  श्री

                                                                                        राजश्री त्रिंबकपत
                                                                                           गोसावी यास

2 1 अखडितलक्ष्मीप्रसन्न महामेरु राजमान्य राजश्री सेवक अताजी दतो अजहत सामराज काटे देसमुख प॥ सुपे नमस्कार विनति उपरि सबाजी मोहिता रामाजी बाबाजीच्या गला पडिला आहे की विठलसेटीच्या गुजारतीने पचवीस होनु देणे यास रामाजी बाबाजी ह्मणताति की सबाजी मोहिता याने होनु पंचवीस उसणे दिधले होते याचे कलान्तर देखील होनु २७ गुजारती त्रिंबक विश्वनाथ सदरहू पैके दिधलेयावरी वेड लागलियावरी मागता दुबारा पचवीस होनु लाविले ते वेळेस आपणास पैके न मिळती च मग विठलसेटी सेटियाचे गुजारतीने त्यापासुनु मागता कर्ज काहाडूनु होनु २५ दिधले ते त्याने वळखिले की हे पैके आपले च की हे हि सबाजी बोलिला तरी सदरहू हकीकती कैसी आहे ते आपले पूर्वज स्मरोनु लेहुनु पाठवणे हे विनति


           8

लेखांक ७                                                                                                                          १५५८                                                                                                                                                        

इनामती कृस्णभट बिन हिरण्यभट व रुद्रभट बिन रघुनाथभट
कृस्णभट बिन हिरण्यभट मालूम
केले जे आपणास इनाम दर सवाद        

इनाम दर वाचण्यासाठी ईथे क्लीक करा

लेखांक ६                                                                                                                          १५५१ वैशाख शुध्द ३                                                                                                                                                        


                                                                            6

खुदायवद मलिक से॥ मलिक अबर खुलीदयामदौलतहू बजानेबू कारकुनानि हाल व इस्तकबाल व देशमुखानि प॥ सुपे बिदानद सुहुरसन तिसा असरीन अलफ शरफअली हेजीब बजारतमाब खान अजम याकूदखान मालूम केले जे माहादो लखमदेऊ देसकुलकर्णी प॥ मजकूर याच्या बडियाने यारेदी ठेविला होता त्याणे सळासिरी करुनु यासि हकलाजिमा नेदी मग नफरमजकुराचा बाप लखमोवा खाने अजम दस्तुरखानास मालूम करुनु त्यास सजा देउनु बाहेर घालविला नफरमजकुरास खुर्द खत करुनु दिधले हाली यारेदीमजकूराचा फर्जद कोतोवा खानाचे बदगीस उभा राहिला आहे मग माहादो लखमदेऊ देसकुलकर्णी तलब करून आणउनु मुनसफी करिता कोतोवा खोटा जाला माहादो लखमदेऊ देसकुलकर्णी बदगीस आणला असे खातिरेस आणउनु खुर्द खत द्यावया रजा होए मालूम केले तरी देसकुलकर्णीमजकुराची हकीकत खातिरेस + + + + + खाने अजम दस्तूरखानाचे खुर्द खत पाहोन कोतोवा + + + + + + + उनु बाहेर घातला माहादे लखमदेऊ देसकुलकर्णी + + + + + र यासि माहालास पाठविले असे तमाम + + + + + + यासि माहाली महजर करुनु देणे पेस्तर + + कोण्ही उभा राहिला तरी ताकीद फर्माविणे तालीक लेहुनु घेउनु असल देसकुलकर्णीमजकुरापासी परतोनु दीजे मोर्तबु

                                                                                                                                                          5 2

तेरीख १ माहे                                                                   रमजानु

रमजानु

                                  

लेखांक ५                                                                                                                          १५४९ श्रावण                                                                                                                                                        


5 1


अज रख्तखाने खान फरादखान खुलीदौलतहू त॥ माहादो लखमदेऊ देसकुलकर्णी प॥ सुपा बिदानद सु॥ सन समान इ॥ अलफ अर्दास छ २२ जिलकादी व छ ४ माहे जिल्हेज मजमून की हुजरू पटीचा माही मख्ता केला ते बेरीजची पटी करुनु तहसील लाविली आहे माहाली दस्त काही कागदपत्र नाही याबदल नजर माजनापटी केली आहे तहसील हो तो जे गाव बहुत लावणीस होतील तेथे दाहा पाच होनु सोडी करुनु दिलासा करुनु वरकड उगवणी करुनु घेतली पाहिजे ह्मणौउनु लिहिले तरी पटीची झाडा सीताबीने होए पेस्तर सालमजकूर नख्ताची चाली लागे ऐसे करणे दिवाणकामासी तकसीर न करणे व रातीदिवस साहेबकामाखेरीज दुसरे काम करीत नाही साहेबाचा पटकर्मा आहे तेणे प्रमाणे वर्तणूक करितो ह्मणौउनु लिहिले तरी जे काही साहेबकामगारी कराल ते तुमचा फायदा आहे व माहाली मजमूदार कागदपत्र पुसताति माहाली कागद नाहीत कमाविसेचे काम चालिले पाहिजे तरी साहेबी नजर इनायती फर्माउनु आपला बिराजर हरिपत व कागद माहालास पाटविले पाहिजेत साहेब मायेबाप आहेती ह्मणौउनु लिहिले तरी नरहरी बिराजर त्याचे कागद पाहाणे बहुतेक जाहाले आहे लवकरी च माहालासी रवाना होईल व साल गु॥ लागवण जाले होते आजि पडि मुतलख होणे त्यास कौल देउनु जैसे लागवण होते तैसे लागवण करवितो पेस्तर लागवण जालिया हर कैसी कमावीस साहेल तैसी केली जाईल परि लागवण जाले पाहिजे गैरहगाम आहे परि लागवण करावयाचे ततबीर करितो तकसीर करीत नाही ह्मणौउनु लिहिले तरी जे काही दौलतखाही कराल तैसा नतीजा आहडेल मोर्तबू

                                                                                                                                                          5 2

                                  

लेखांक ४                                                                                                                          १५४४ वैशाख शुध्द ५                                                                                                                                                        

                                                                                                                   सिधेश्वरु*

श्री सके १५४४ रुधीरोद्गारी सवत्छरे वैशाख सुदी पंचमी शुक्रवार ते दीसी राजश्री बाबदेभट जोसी धर्मादीकारणी कसबे सुपे यासि सीतोजी गोलाडा अतोजी गोलडा लीहून दीधले ऐसे जे आपण बहुत दुकळाकरिता तुटलो तरी आपणास खावयासी नाही आपला जीउ राखीला पाहिजे ह्मणउनु तुह्मास आपली खुसीने आपला घरवाडा नजीक पार चीरेबदी बैसकी केसो + + कुत पुर्व आग्नेसी आकारा व दक्षणेकडे हीरवे माली तो जागा आपला तो तुह्मास वीकत दीधला असे तुह्मापासुन आपण घेतले होन अडीचा व गला जोरी बाबेती दौलत भगलभेरी मण 305३॥ साडे तीन दर मणे टके ८ नीष व भात मण टके 305१॥ दीढ दर मणे टके ४॥।. पावणे पाच एकूण टके व पासोडी अर्ध जुनी येक ऐसे घेउन वाडा व घरठाण तुम्हास दीधले असे आपला कोण्ही वौसीचा उभा राहीला त्यास गाली असे आपण दुकळात जीउ वाचावाया अनाकारणे आत्मखुसीने दीधला असे तुह्मी खुसी घरवाडा बाधणे सुखे असणे हे लीहीले सही

                                  गोही

गोमाजी बीन कुमाजी                    आकोजी गोळाडा
माहाजन क॥ सुपे                         क॥ म॥
जाउ माली घोडीमळकर                 बाळ माळी बारवकर
                                                हे रतनोच्या गु॥ दिधले