Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.

लेखांक ३६९.

राजश्री बाबासाहे पेंडसे स्वा.

सा. नमस्कार विनंति विशेष रानगुचे रु।। ४०० चारशें जरूर आतांच पाहिजेत सबब विठूस पाला आहे व त्याजपाशीं द्यावें. कळावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

केशव खंडेराव.

२७॥ भार

पौ।। वजा दर रुपयास ७.॥ प्रो।। मासे १३॥।
तोले १305१॥।. बाकी तोळे २६।१॥।
वजाजती एक गुंजेची कमर .. मासे ३

एकंदर वजन तोळे २६॥१॥। याजवर
सु॥. शिरस्तेप्रो।। रु. ३८० पा।। आहेत.

श्रीसिद्धेश्वर.

लेखांक ३६८.

१७३६ अधिकभाद्रपद वद्य ३.

अजस्वरीं राजश्री बाळशास्त्री दीक्षित तो।। मोकदम मौजे जिल्हाळें पो।। संगमनेर सु॥ खमस अशर मयातैन व अलफ. मौजे मजकूरचे कुळकर्ण कैलासवासी त्रिंबकराव चिंतामण यांचे तें आपले तर्फेचे गुमास्ता ठेवून वहिवाट करीत असतां, साल गुदस्तांपासून तालुके पट्टा येथील मामलेदार गुमास्त्याचे हातून वहिवाट घेत नाहींत. तरी गुमास्त्याचे हातून वहिवाट घेण्याविसीं मामलेदार व मोकदम यांस ताकीद जाली पाहिजे; ह्मणोन माधवराव त्रिंबक यांनी समजाविले. त्याजवरून हें पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी मौजेमजकूर येथील कुळकर्णांची वहिवाट त्रिंबकराव याचे कारकीर्दीत गुमास्ता करीत असेल, त्याप्रमाणें हाली माधवराव त्रिंबक आपला गुमास्ता गांवी ठेवितील, त्याचे हातून कुळकर्णाचे कामकाज घेणे. दिक्कत न करणें. येविसीचा फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ १७ रमजान. मोर्तब सूद.

 

340 1

श्री.

लेखांक ३६७.

नकल.

१७३२ भाद्रपद व॥ ११.

राजश्री बनाजी बाबाजी गोसावी यांसि
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो।। मनोहरगीर सुभेदार तो।। त्रिंबक वगैरे नारायण सु॥ इसने अशर मयातैन व अलफ. राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांणीं पुण्याचे मुकामीं समजाविलें कीं संवस्थान पेठ व पो।। हरसुल येथील कानगोईचे वतन आमचे तीर्थरूप चिंतो विठ्ठल यांणी खंडो गंभीरराव याजपासून खरीद घेतलें त्याची जप्ती पेशजी सरकारांतून जाहाली होती त्याची मोकळीक होऊन आह्मांकडे चालवावयासी सरकारची सनद गोविंदराव सदाशिव सुभे प्रांत बागलाण वगैरे यांचे नांवे छ ४ रजब सन इहीदेयातैनांत सादर जाली परंतु हालीमाजी वगैरे दंग्यामुळे वहिवाटीस माहाली आह्माकडून कारकून गेला नाही. त्यास सरकार सनदेअन्वये संवस्थान व पों।। मजकूर येथील कानगोईचे वतन आमचें आह्माकडे चालविले पाहिजे ह्मणून त्याजवरून अलाहिदा सरकारच्या सनदा सनसीतसीतैन व स इहीदे मयातैनचे साली जाहल्या आहेत त्या पाहून सदरहू वतन मारनिलेकडे चालतें करून हे सनद तुह्मास सादर केली असे तरी संवस्थान पेठ व पो।। हरसूल येथील कानगोई वतनाचा हकरुसूम व इनाम व पानमान कानूकायदेसुध्धां चिंतो विठ्ठल याजकडे पेशजी सुदामत चालत आल्याप्रों।। त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण याजकडे सुरळीत देवऊन कानगोईचा सिरस्ता कागदपत्र मोगलाई अमलातील असेल त्याप्रो।। मारनिलेकडे चालवणे. र॥ छ २४ शाबान बहुत काय लिहिणे ? मोर्तब.

श्री.

लेखांक ३६६.

१७३२ आषाढ शुद्ध १०.

पैवस्ती श्रावण व॥ १ शके १७३२ सु॥ इ॥ अशर.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबक रावजी स्वामीचे शेवेसी :-
पोष्य गणेश उमाजी कृतानेक स॥ नमस्कार विनंति येथील कुशल त॥ आषाढ शुद्ध १० मुक्काम लष्कर नजीक सोपार येथे सुखरूप असो विशेष. श्रीमंत राजेबहाद्दर याचे प्रकर्णांत आपण वागतां. आह्मीं लष्करांत आहोंत उभयपक्षी स्नेह असावा ह्मणोन राजश्री कुशाबा जवळ बोलण्यांत त्रिवर्गांनी आणिलें त्याजवरून मारनिलेनी आह्मांस लिहिलें त्यास आपण व आह्मी दोन नाहींत. एक मानोन उभयपक्षीं स्नेहाची वृद्धिंगत चालवावी. परस्परें कामकाजाची पैरवी राजेबाहादरप्रकर्णी वगैरे राखीत जावी. वरकड मार कुशाबाचे पत्रीं लिहिला आहे. त्याजवरून कळेल. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. + + + + पंधराचा आहे. लोभ कीजे हे विनंति.

श्रीनाथ स॥

लेखांक ३६५.

१७३२ चैत्र शुद्ध १५.

राजश्री केसो शामराज व बाबूजी मल्हार व नारो केशव जोसी कुलकर्णी मौजे साकेगांव पो॥ सेवगांव. श्नो।। दौलतराव सिंदे दंडवत सु॥ अशर मया तैन व अलफ तुह्मी आपले जोसी कुलकर्णपणाचें वतन साहा गांवचें आपल्याले हिशाचे गाहण ठेऊन राजश्री त्र्यंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपापासून ऐवज घेतला त्याचें खत लेहून दिल्हे त्यांत करार लिहून दिल्हा की मुदतीस एवजाचा फडशा करून देऊं न करूं तर आमचें वतन तुह्मांस डुलेल बिलकुल वतनाची वहिवाट तुह्मी करावीं यांस तफावत अगर नवदीगर करूं तर आपले कुलस्वामीची शफत असें असतां मशारनिलेनीं वहिवाटीवर कारकून पाठविले त्यांस वहिवाट चाली न देता दिक्कत करिता ह्मणोन हुजूर विदित जालें त्याजवरून हे ताकीद सादर केली असे तरी तुह्मी गाहण लेहून खत लिहून दिल्हें त्यांत करार असतां दंडेली करणें कामाची नाही तर देखत पत्र तुमचे लेखाप्रमाणें वतनाची वहिवाट त्र्यंबकराव चिंतामण यांचे कारकुनाकडे सुरळीत चालों देणें याउपरी बोभाट आलियांस कार्यास येणार नाही. जाणिजे छ १४ रबिलावल बहुत काय लिहिणें.

357                                      340 1

श्रीनाथ स॥

लेखांक ३६४.

नकल.

१७३२ चैत्रशुद्ध १५.

राजश्री जनार्दन बलाल गोसावी यांसि :-
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो।। दौलतराव सिंदे दंडवत सु॥ अशर मया तैन व अलफ राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपापासून रुपये घेऊन केसो शामराज व बाबूजी मल्हार व नारो केशव जोशी कुलकर्णी मौजे साकेगांव पे॥ सेवगांव यांनी आपल्याले हिशाचे वतन गाहाण ठेऊन गाहण खत लिहून दिल्हे त्यांत करार की ऐवज मुदतीस न दिल्ह्यांस वतन डुलेल अनभव करावा या प्रमाणें आपले कुलदैवताचे शफथपूर्वक व कसबे तिसगांव पा॥ मजकूर येथील कुलकर्णपण चिमणाजी सदाशिव व आत्माराम सदाशिव कुळकर्णी यांनी आपल्याले वतन गाहणखत साकेगांवकराप्रमाणें करार लिहून दिल्हे त्याजवरून मुदती भरून गेल्या यांजकरितां त्र्यंबकराव चिंतामण यांनी आपले तर्फेनें वतनाचे वहिवाटीवर कारकून पाठविले असतां वतनाचे हक्कदस्तूर व वतनबाब मानपान त्यास सोपून न देतां दंडेली करीतात ह्मणोन विदित जाले त्याजवरून हें पत्र तुह्मांस लिहिलें असें तरी तुह्मी हरो गांवकरी यांसि बोलावून आणून त्र्यंबकराव चिंतामण यांजपासी खतें पत्रें आहेत ती आणवून पांच मेलवून उभयतांचे लेखाची चौकसी करून वाजवी पत्र व करार अन्वयें वतनाची (सिका) वहिवाट दो दोन गांवची त्र्यंबकराव चिंतामण यांजकडे सुरळीत चालतें करणें लेखपत्र असता दंडेली करीत असल्यास निक्षून ताकीद करून वहिवाटीस दिक्कत न पडेतें करणें जाणिजे छ १४ रबिलाबल बहुत काय लिहिणे हे विनंती मोर्तब.

श्रीनाथ स॥

लेखांक ३६३.

१७३२ चैत्रशुद्ध १५.

राजश्री जनार्दन बल्लाळ गोसावी यांसि
5 अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो।। दौलतराव शिंदे दंडवत सु॥ अशर मया तैन व अलफ र॥ त्र्यंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपापासून रुपये घेऊन केसो शामराज व बाबूजी मल्हार व नारो केशव जोशी कुळकर्णी मौजे साकेगाव प॥ शेवगाव यांनी आपल्याले हिश्शाचे वतन गाहाण ठेऊन गाहणखत लिहून दिल्हें त्यांत करार कीं ऐवज मुदतीस न दिल्ह्यास वतन डुलेल तुह्मी अनभव करावा याप्रमाणें आपले कुलदैवतांचे शफतपूर्वक व कसबे तिसगांव पा।। मजकूर येथील कुलकर्णपण चिमणाजी सदाशिव व आत्माराम सदाशिव कुलकर्णी यांनी आपल्याले वतन गाहणखत साके- गांवकरां- प्रमाणे करार लिहून दिल्हे त्याजवरून मुदती भरून गेल्या यांजकरितां त्र्यंबकराव चिंतामण यांनी आपले तर्फेने वतनाचे वहिवाटीवर कारकून पाठविले असतां वतनाचे हकदस्तूर व वतन बाब मानपान त्यांस सोपून न देतां दंडेली करितात पत्र ह्मणोन विदित जालें त्यांजवरून हे पत्र तुह्मास लिहिले असें तरी तुह्मी हरदो गांवकरी यांसी बोलाऊन आणून त्र्यंबकराव चिंतामण यांजपासी खतेंपत्रें आहेत ती आणवून पांच मेळवून उभयतांचे लेखाची चौकसी करून वाजवी पत्र व करारा अन्वये वतनाची वहिवाट दोनी गांवची त्र्यंबकराव चिंतामण याजकडे सुरळीत चालेतें करणें लेखपत्र असतां पडली करीत असल्यास निक्षून ताकीद करून वहिवाटीस दिक्कत न पडेतें करणें जाणिजे छ १४ रबिलाबल बहुत काय लिहिणे हे विनंती.

357                                      340 1

श्रीनाथ स॥

लेखांक ३६२.

नकल.

१७३२ चैत्रशुद्ध १५.

रो।। बाळाजी सखदेव गोसावी यांसि :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो।। दौलतराव शिंदे दंडवत विनंति उपरी त्रिंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपास हरी वल्लद पुंजाजी व नारायण वल्लद लोवजी ब्राह्मणजाई शेटे कसबे बिडकीणगांव यांनीं आपले शेटेपणाचे निमे वतन फुरोक्त करून दिल्हे त्याचा हक्क भुसांवर दर शेकडा बैलास च्यार रुपये व मीठ व तांदूळ वगैरे नकाशांत हक्कविकरी दर बैलास पैसा पक्का वहिवाटीला व घोडी व गाड्यास दर रुपयास पक्का पैशाप्रमाणे मागास येक शेला व चवळें येक व कडबा वगैरे विकरीस गाड्या मागें पैसे पक्के दोन व जमीन मळे बिघे बारा त्यांत विहिरी (सिका) सुमार च्यार सुध्धां व खंडेरायाचा माळ जमीन बिघे पाउणशें व निमे घर येणेंप्रमाणें दिल्हे त्याचे वहिवाटीस कारकून त्रिंबकराव चिंतामण यांनी पाठविला असतां शेटे मजकूर यांनी आपले खरीदखताप्रमाणें निमे वतनाचा दाखला न देतां दंडेली करितात ह्मणोन विदित जालें त्याजवरून हें पत्र तुह्मांस लिहिले असे तर हरी व नारायण शेटे यांचे भाऊबंदास निक्षून ताकीद करून खरीदखताप्रमाणें निम्मे वतनाची वहिवाट हक्कदक्क व जमीन विहिरी व घरासुध्धां त्रिंबकराव चिंतामण यांचे कारकुनास सोपून देवऊन निमें वतनाची वहिवाट घेत जाणें येविषयींचा फिरोन बोभाट येऊं न देणें र॥ छ १४ रबिलावल सु॥ अशर मया तैन व अलफ बहुत काय लिहिणें हे विनंति मोर्तब.

श्रीनाथ स॥

लेखांक ३६१.

१७३२ चैत्र शुद्ध १५.
 

357

राजश्री बाळाजी सखदेव गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ दौलतराव शिंदे दंडवत. विनंति. उपरि त्र्यंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपास हरी वल्लद पुंजाजी व नारायण वल्लद लोवजी ब्राह्मण जाई सेटे कसबें बिडकीणगांव यांनी आपले शेटेपणाचें निम्मे वतन प्रोक्त करून दिल्हे त्याचा हक भुसावर दरसद्दे बैलास रुपये दोन व किराणा दर शेकडा बैलास च्यार रुपये व मीठ व तांदूळ वगैरे व नकाशांत हक विकरी दर बैलास पैसा पक्का व बटीक व घोडी व गाड्यास दर रुपये ७ पका पैशाप्रे॥ व मागास येक सेला व चवाळें एक व कडबा वगैरे विकरीस गाड्यामागें पैसे पक्के दोन व जमीन मळे बिघे बारा त्यांत विहिरी सुमार चार सुद्धां व खंडेरायाचा माल जमीन बिघे पाउणशें व निम्में घर येणें प्रों।। दिल्हें. त्याचे वहिवाटीस कारकून त्र्यंबकराव चिंतामण यांनीं पाठविला असतांशेटेमार यांनी आपले खरीदखताप्रों।। निम्में वतनाचा दाखला न देता दंडेली करितात ह्मणोन विदित जाले त्याजवरून हे पत्र तुह्मांस लिहिले असे तरी हरी व नारायण शेटे व यांचे भाऊबंदास निक्षून ताकीद करून खरीदखताप्रों। निमे वतनाची वहिवाट हक्कदक्क व जमीनविहिरी व घरा सुद्धां त्र्यंबकराव चिंतामण यांचे कारकुनास सोंपून देऊन निम्मे वतनाची वहिवाट घेत जाणें. येविशीचा फिरोन बोभाट येऊं न देणें. र॥ छ १४ रावल सु॥ अशर मया तैन व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.

340 1

श्रीनाथ स॥

लेखांक ३६०.

१७३२ चैत्र शुद्ध १५.
 

357

अजसुभा राजश्री दौलतराव सिंदे त॥ हरीवलद पुंजाजी व नारायेण वलद लोवजी ब्राह्मण जाई सेटे कसबे बीडकिनगाव सु॥ अशर मया तैन व अलफ. तुह्मी आपले सेटेपणाचे निमे वतन आपले हिशाचे रो।। त्र्यंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपास प्रोख्त करून देऊन खरीदखत लेहून दिल्हें त्याचे वहिवाटीवर मारनिले यांणी आपले तर्फेनें कारकून पाठविला असता दंडेली करून वहिवाट चालू देत नाही ह्मणोन विदित जालें त्याजवरून हे ताकीद सादर केली असे तरी तुह्मी खरीदखत दिल्ह्याप्रों भुसावर शेकडा बैलावर सिरस्ता दोन रुपये व किराणा दर सद्दे बैलास च्यार रुपये व मीठ तांदूळ वगैरे व नकाशात हकविकरी दरबैलास पक्का पैसा व बाटीक घोड्या व गाड्यास दर रुपयेस पक्का पैशाप्रों।। व साळ्याचे मागास सालिना येक सेला व सणगराकडून सालिना येक चवाळे येक व कडबा वगैरे विकरीस गाड्यागमें पैसे पक्के दोन व जमीन मळे बिघे बारा त्यांत विहिरी सुमार च्यार सुध्धां व खंडेरायाची माळ जमीन बिघे पाउणशे व निमे घर येणेप्रों।। तुह्मी लिहून दिल्हे त्याप्रों।। बिनदिक्कत मारनिलेकडे वहिवाट चालूं देणें. वहिवाटीस तुह्मी व तुचे भाऊबंद तक्षीमदारांनी हरकत केलियास कार्यास येणार नाहीं. जाणिजे. छ १४ र॥वल मोर्तब सूद.

340 1