Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३३०.
१७२२.
मौजे ढोकरी परगणे अकोले हा गाव चिंतो विठल यांसि इनाम दरोबस्त कवीजंग यांणी पेशजीं दिल्हा आहे. त्या गांवीं अंबराई लाऊन वगैरे कारकीर्द केली आहे. तेथील अमल चिंतो विठल यांचे पुत्र रे॥ त्रिंबकराव चिंतामण याजकडे सुदामतप्रें॥ देत जाणें ह्मणोन पेशजी मुकदम व जमीदार यांस ताकीद केली असतां अमल यथास्थित चालत नाहीं ह्मणोन हुजूर विदित जालें. त्याजवरून हें आज्ञापत्र सादर केलें असे तरी मौजे मारचे मुकदम व जमीदार व कवीजंग वगैरे कोणी दिकत करीत त्यास निक्षुन ताकीद करून अमल बसऊन देणें मौजे मारची वैवाट रे॥ त्रिंबकराव चिंतामण याजकडे सुरळीत चालें तें करणें पुन्हा बोभाट येऊं न देणें ह्मणोन पत्र किल्ले नगर येथील मामलेदरा नि॥ सिंदे याचे नांवें येक. मौजे हुकेरी पे॥ अकोलें हा गांव चिंतो विठल यासी इनाम, दरोबस्त पेशजी कवीजंग यांणी दिल्हा आहे त्या गांवी अबंराई लाऊन वगैरे कारकीर्द केली आहे तेथील अमल चिंतो विठल यांचे पुत्र रे॥ त्रिंबकराव चिंतामण याजकडे देत जाणें ह्मणोन पेशजी आज्ञा केली असतां मारनिलेकडे अमल सुरळीत चालत नाही ह्मणोन विदित जालें त्याजवरोन हे आज्ञापत्र सादर केलें असे तरी मौजे मजकूरचा अमल सुदामत प्रे॥ सुरळीत रे॥ त्रिंबकराव चिंतामण याजकडे देणें. पुन्हां बोभाट येऊं न देणें ह्मणोन पत्र किलेनगर येथील मामलेदार नि॥ सिंदे यांचे नावें १ मौजे ढोकरी पो अकोले हा गांव चिंतो विठल यासी ईनाम १ दरोबस्त पेशजी कवीजंग यांणीं दिल्हा आहे त्या गांवी आंबराई लाऊन वगैरे कीर्द केली आहे तेथील अंमल चिंतो विठल याचे पुत्र रो त्रिंबकराव चिंतामण याजकडे देत जाणे ह्मणोन पेशजी आज्ञा केली असतां मारनिलेकडे अमल सुरळीत चालत नाहीं ह्मणोन विदीत जाले त्याजवरून हे आज्ञापत्र सादर केलें असे. तरी मौजे मारचा अलम सुदामतप्रो सुरळीत त्रिंबकराव चिंतामण याजकडे देणें. पुन्हा बोभाट येऊं न देणें ह्मणोन मुलाद्यास पत्र सदरहू अन्वये जमीदार मौजे मारचे यास पत्र १ कवीजंग सवाने मोगल खालीबजंग बाहादर याचें नावें १ मौजे मार तुमचे तीर्थरूपांनीं चिंतो विठल यास दरोबस्त गाव ईनाम दिल्हा आहे तेथील अंमल चिंतो विठ्ठल याचे पुत्र रो।। त्रिंबकराव चिंतामण याजकडे चालवणें येविसी क॥दार व मोकदम व जमीदार यांस तुह्मीं आपली पत्रें देऊन निक्षूण ताकीद करून मौजे मार दरोबस्त मारनिलेकडे सुरळीत चालवणें. बोभाट फिरोन येऊं न देणें पत्र १
मौजे मार चिंतो विठल यासी ईनाम दरोबस्त पेशजी कवीजंग यांणीं दिल्हा आहे तेथें आंबराई वगैरे कीर्द केली आहे. तेथील अमल चिंतो विठल याचे पुत्र रो।। त्रिंबकराव चिंतामण याजकडे चालवावयाविसी आज्ञा मुकदम वगैरे यास करून हें पत्र तुह्मास लि।। असे. तरी किलेनगर येथील तुह्मी आपले कमावीसदारास निक्षूण ताकीद करून मौजे मारचा अंमल दरोबस्त इनाम त्रिंबकराव चिंतामण याजकडे सुरळीत चालवणे. फिरोन बोभाट येऊ न देणें. ह्मणोन अलीज्या बाहादर सिंदे यांस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३२९.
१७२२.
विनंती उपरि. श्रीमंतास चिठ्ठी लिहिली आहे ते पाहून दाखवून मजला काय आज्ञा करितात ते नंतर कळविणें. खासगत श्रीमंताचे माहाल आहेत तेथें गैरवाजवी लोकांची खेडी व असाम्या जप्त आहेत त्या सोडल्यास किती संकट पडते आणि अन्न खावयास नाही येथें चित्तास येईल तें ह्मणावें तेव्हां बाकी कोणती काय बोलावें ? बोलावें तरी अबरू गमवावी यास्तव अगोदर मजला निरोप होय असें करणें हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३२८.
सिका असल ब॥ नकल.
आज्ञा पत्र राजश्री पंतप्रधान त॥ मोकदम मौजे वागन त॥ करेपठार प्र॥ पुणें सु॥ इहीदे मयातैन व अलफ. मौजे मजकूर येथील मोकासा चिंतो विठल याजकडे सर लस्कर याजकडून इनाम चालत होता त्याची जप्ती पेशजी सरकारांतून जाहली आहे. ते हाली मोकली करून चिंतो विठल मृत्यु पावले त्याचे पुत्र राजश्री त्रिंबकराव चिंतामण याजवर मौजे मजकूरचा मोकासा ईनाम मशारनिलेकडे पेशजीप्रमाणें चालवावयाची आज्ञा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३२७.
१७२१ कार्तिक व॥ १४.
जबानी खेमचंद व॥ नारायणदास दाळवाले परदेशी पेठ गणेश शहर पुणें सु॥ मया तैन व अलफ. लेहून दिल्ही जबानी ऐसीजे पेठ मजकुरी आह्मीं जागा खरेदी केली. त्यांत आह्मी नांदत आहो. हाली ती जागा छटुभाई फरास याची बायको आपली ऐसे बोलोन सरकारांत विनंती करून आह्मास सरकारातून ढलाईताकडून घराबाहेर काढून दिल्हें. त्यास ही जागा रत्नोजी फरास नी॥। सरकार याची त्याजपासून खुशरजाबंदीनें आह्मी घेतली ते समयीं जाग्याविशीं रत्नोजी फरास याचे नावें सरकारचें पत्र आहे. ते पाहोन अडीचशें रुपये देऊन खरीदपत्र करून घेतलें तें पेठकरी यास दाखवून चावडी पेठ मजकूरीची येथे नेऊन पत्र चावडीचे पत्र करून घेतलें ते समयीं चौकशी पेठ चावडी येथून करून आमचे पत्र करून दिल्हें व कोतवालचावडीस खरेदीपत्र व चावडीचे पत्र दाखविलें त्याजवरून त्यांनीही चौकशी करून मोजणी करून पत्र करून सीरस्ता प्रें॥ कबज पत्राचे रुपये व कारकुनी घेऊन भोगवटी यास पत्रें करून दिल्हे आहेत तीं बजिन्नस स्वामीनीं पाहोन माझी जागा घर नांदतें माझें देवावें येविशीं आज्ञा जाहली पाहिजे रत्नोजी जवळ जागा खरेदी करून घेतली तो ही येथें आहे चौकशी येविशीं जाहली पाहिजे सरकारांतून रत्नोजीस खोटा असें करून द्यावें ह्मणजे स्वामी आज्ञा करतील त्यास मान्य आहे सदरहू लि॥ प्रें॥ खरें करून देईन हे लिहून दिल्हें. सई मी॥ कार्तिक शु॥ १४ बी॥ जनार्दन धोंडदेव कारकून दिम्मत मल्हार बाजी हुजूर गार्दी सरकार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३२६.
१७२१ कार्तिक व॥.
अर्जदास्त श्रीमंत महाराज साहेबास विनंती.
सेक आमद हाडीर श्रीमंत नि॥ तोफखाना. साहेबी अर्ज लिहिली की पूर्वी नाडवाले जुमाशा फकीर महाराज नाना भाऊ साहेबाचे आमलापासून होते. फकीर बावानें कुवरनकीटी तिची कन्या हाजीफा तिजला बाई बाई ह्मणून छटु फरास यांनी बसावयाचा ठिकाणा केला. पुढें येक दिवसीं त्या बाईची आबरू घेतली. बदकर्म केले. याची चर्चा जाली तेव्हां दहावीस लोक मिळाले. फकीरबावास ह्मणू लागले कीं तुह्मी फकीर थोराचे पेदे असतांनीं हें तुमचेंजवळ कर्म वर्तलें हें काय ? तेव्हा फकीरबाबा बोलले कीं ऐसे कर्म तुह्मीं करू नये. तेव्हा छटुराम यानें उत्तर केलें कीं तुह्मांस या गोष्टीचे कांही बोलावयाचें काम नाहीं. तेव्हा गरीब फकीर उगें राहिले, तेव्हां या गडची व छटुरामची दोस्ती दाहावरशे चाललीं. श्रीमंत महाराज नारायणराव साहेबाचे गरदीचे वेळेस पळून गेले. छटूवरहि गरदी जाली. आतां श्रीमंतानीं तिची तिजला जागा काईम ठेविली आहे. पुढें तिनें फंद केला आहे कीं फकिराची जागा घ्यावी. नाडेवाले फकीरबावा यांची पूर्वीपासून कबरी व मसीदा जागा आहे त्यांत ईणें फकीराचे जागेवर धमार्थ बावणें ठेविली होती ती उलटून फकीराची जागा घ्यावयास उभी राहिली आहे. ह्मणते कीं माझे नवऱ्याची दोशस्तीन होती ती माझीच जागा यावर महाराजास अर्ज आहे कीं, इचे नवऱ्यानें दाहा मिळीनी केल्या त्या मिळून लटकें कुफराणें करून फकीरबावाची जागा घ्यावयास उभ्या राहिल्या तर देवें कीं काय? महाराजास इचे अर्ज आपण धनी आहांत यातले अर्थ ध्यानास आणवे मग ज्या मार्ग लावले त्या मार्ग चालू. या गोष्टीचा साक्ष पुरऊन देऊं. न देऊं तर सरकारचा गुनेगार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३२५.
१७२१ कार्तिक शुद्ध २.
पे॥ छ ८ जमादिलाखर मया तैन व अलफ.
भूपलक्ष्माशोभित मित्रजनकार्य-करणे निरंतर-सुप्रसन्न-चित्त राजमान्य राजश्री रावजी स्वामीचे शेवेसी:-
मित्रवर्गांतरगत प्रियतम मित्र बलवंतराव सोनदेव देवस्थळी कृतानेक सां। नमस्कार विनंती येथील क्षेम त॥ कार्तीक श्रु॥ २ द्वितीयेपावेतों मुक्काम जानवले येथे सुखरूप असो. विशेष. चिरंजीव राजश्री राघोपंत दादा तेथें गेलेपासून त्याची पत्रें दोन च्यार आलीं परंतु आपलें पत्र न आलें. तेणेकरून चित्त साक्षांकित आहे. तरी असेंन करावें. निरंतर येणाराबरोबर स्वकीय स्वामिगौरवादि आनंदलेखनेकरून आनंदवीत असावें. हें परंपरागत स्नेहास व आपले चातुर्यादि गुणास उचित असे यानंतर चिरंजीव तेथें आहेत त्याजवर कृपा तीर्थस्वरूप कैलासवासी तात्या आमचे पितृव्यावर कनिष्ट बंधूप्रमाणें करीत होते तद्नुरूप असावी. आपण जो करीतच असतील. जो गुण ज्याजमध्यें असतो तो गुण सहजामध्यें उपदेशावाचून घडतो. याविषयीं श्लोक. संत्यज्य दोषं गुण एव दृष्टीर्विधेयतामित्य फलं वचो मे॥ विहाय नीरं सकलोपि हंस: पय: प्रगृण्हात्युपदेशत: किं॥ सारांश, आपली कृपा चिरंजीवावर असावी आणि आपले व चिरंजीवाचे मनोदयासारखी उभयताची कार्ये श्रीमंत यजमान स्वामीपासून व्हावी हा हेतु आहे. सुज्ञाप्रती विशेष काय लिहावें ? माघमासीं भेटीस येतो. कळावें. बहुत काय लिहिणें? कृपा लोभाची वृद्धी निरंतर करावी. हे विनंती. नारळ शाहाळीं व पोफळें पाठविलीं आहेत घेऊन पावली. याचे उत्तर रवाना करावें. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३२४.
१७२१
गांव वगैरे :-
१ मौजे साकेगांव पो सेवगांव.
१ मौजे चापडगांव पो सेवगांव.
१ मौजे विसापूर पो खटाव.
१ मौजे नहपतगांव पोल कोसगांव.
१ मौजे अंबेसल व लोचनगांव.
१ शहर बऱ्हाणपुरी.
१ अमिनी
१ तहवेलदारी
--
२
१ माज भादें पा सुलतानपुर.
१ मौजे चोपाळें पो नंदुरबार.
१ मुकासा मौजे कलमाड बु॥
ता तामसवाडी पो बाहाळ
१ मौजे दारणासांगवी पो नासीक येथें
मुकासाविशीं.
गोविंदराव विष्णुकडे
१ नंदुरबार.
१ मुलतानपूर.
१ नवापूर.
१ भामरें.
१ थालनेर.
१ सोनगीर.
१ नरें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३२३.
१७२१.
श्रीमंत दादासाहेब यांची सेवा चिंता विठ्ठल यांणी एकाग्र केली. फडणिसी व दिवाणगिरी करून मसलती केल्या व लढाया मारिल्या. नक्ष स्वामीचा बजावला. पस्ती (स) वर्ष बेरोजगार किल्लेकोट बेड्या बंदखाने विष घेऊन बायकामुले निवर्तली घरेंदारें सर्वस्वीं लुटली गेलीं. कसाला थोर गुदरला. लोकांचे कर्ज देणें बहुत आहे. सबब मारनिलेचे शेवेवर श्रीमंत महाराज राजश्री बाबासाहेब मेहेरबान होऊन अक्षई बक्षीस चिंतो विठ्ठल यांचे पुत्र रो।। त्रिंबकराव चिंतामण यास मौजे बोज व मौजे जिऱ्हाले व बेलगाव व पिपळोद व गोवे कृष्णातीर पांच गांव इनाम दिल्हे असेत त्याच्या सनदा व पत्रें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३२२.
१७२१ वैशाख वद्य १३.
यादि हिशेब जोहार जेठा वाणी याजकडे कर्व्येयांचे येणें. रु।।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
तो साहा घटका दिवस राहाता मु॥ मजकुरी दाखल जालें. यावर तलाव पाहून डेऱ्यास आलें. यावर दोन घटका रात्रीस आपण व कारभारी बसून तेथून पांच कोस चादगढीचा मु॥ नेमून दरबार बरकास जाला. साहेबास कळावें. छ २२ रोजी दो पाहारा कुच जालें. साहा घटका दिवस राहतां मु॥स आले. नंतर दोन घटका रात्रीस आपण व उभयता कारभारी व पांडुरंग व बापू हाळद्या ऐसे बसून बाळाजीपंत काळेकर याच्या मारफीतीने कमावीसदार आहेत. कमावीसदार कोण्ही भेटावयास आला नाहीं. याजकरितां मारनिले याजवर बहुत रागें भरले होते. मग आपण व कारभारी बसून तेथून साहा कोसावर क॥ पालुदरपलीकडे दो कोसावर त्तई म्हणून गांव आहे तेथील मु॥ नेमून दरबार बरकास जाला. साहेबास कळावें. छ २३ रोजीं प्रथमकाळी आपण व परसोजी भोसले ऐसे बसून कारभारी बोलाऊन आपण व कारभारी बसून बाकरदसिंग सिकाकुर राजबदरीं यास पत्रें लेहून सांडणीस्वार रवाना केला. दीड प्रहर दिवस येता गढी पाहून कूच जालें. तों च्यार घटका दिवस राहाता मुकाममजकुरी दाखल जालें. नंतर च्यार घटका रात्रीस आपण व कारभारी बसून तेथून आठा कोसावर क॥ पवानीचा मु॥ नेमून दरबार बरकास जाला. छ २४ रोजी दीड प्रहर दिवस आलियावर कूच जालें तों च्यार घटका दिवस राहता मुकाम मजकुरी दाखल जालें. राजश्री विठल बलाळ सुभेदार व बेनीसिंग व सखाराम आवधुत व त्रिवर्गाचा एक विचार होऊन राजश्री रघुनाथराव बुंधेले यांनी आपल्याकडील कोण्ही वकील याच्या लस्करांत पाठवून याचें व त्याचे बोलने होऊन बोनीसिंगास तिकडे घेऊन गेले. मारनिले याच्या व त्याच्या भेटी वगैरे बोलणे होऊन बोनीसिंग कटगीच्या मुकामी आला. मग बोनीसिंग व सखाराम अवधुत ऐसे विठल ?? सुभेदार याजपासी येऊन सईनासाहेब यास पत्रें लेहून पाठविली. साहेबास कळावें. चांदगढीचा मु॥ बाईसाहेब याची पत्रें आली जे. छ २० रोजी श्वार होऊन गेले तो मजल दरमजल बाजारीच्या मुकामी दाखल जाले. एका दो दिवसा रतनपुरास जातील. साहेबास कळावें. बाळाजीपंत कालेकर यानें डेरे किल्यांत दिल्हे होतें. आणि अवघे लशेकर बाहेर होते. याजकरिता मारनिले याजवर दोन घटका रागे भरले होते की अवघें लशेकर बाहेर राहिले आन आह्मी किल्यांत राहिलों हें काय ह्मणून बोलत होते. छ २५ रोजी प्रथकाळी कारभारी बोलाऊन मातोश्रीस पत्रें लेहून डाक रवाणा केली. दीड प्रहर दिवस येता सिवा बाळा हाजारी यास बोलाऊन सांगितले की बाहेर जाऊन डेरे देववायास जागा पाहून यावें. तिसरे प्रहरी डेरे बाहेर दिल्हे. साहेबास कळावें. छ २६ रोजी च्यार घटका दिवस येतां पुण्याकडोन डाकची पत्रें आली. नंतर कारभारी बोलाऊन पत्रें वाचून पाहिली नंतर च्यार घटका खलबत जालें. सिवरात्र होती. देवदर्शनास गेले. साहेबास कळावें. छ २७ रोजी बाळापुराहून सलाबतखान याची पत्रें आलीं नंतर पत्रें वाचून कारभारी बोलाऊन आपण व उभयतां कारभारी बसून पत्रें वाचून पाहिली. नंतर ह्ममद आली व महम मोहोशे वैरागडचा किलेदार या दोघांस विडे देऊन रवाना केले. कारण की कलकत्त्याच्या फिरंगियाचा वकील नागपुरास येत आहे. तो रतनपुरास येऊन दाखल जाले. ह्मणोन या दोघांस पुढें रवाना केले. साहेबास कळावें. व मग त्याचे तांबडे दान दिल्हे. छ २८ रोजी विठल बलाळ सुभेदार याजकडोन पत्र आलीं तीं वाचून पाहिली. पत्री वर्तमान कीं बगाजीपंत भातवाल्याचे गडावर होता तो त्यांनी सोडून दिल्हा. येसोबा पानतावने याच्या व किलेदाराच्या भेटी जाल्यां साहेबास कळावे. तेथून सईनासाहेब सुभा यांनी रामटेकच्या पानाचे बैल दर १५ रवाना केले आहेत. साहेबास कळावें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. जोडी रवाना छ २९ माहे रमजान.