Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३३९.
१७२२ मार्गशीर्ष शुद्ध ८.
राजश्री कासीराव होळकर गोसावी यांसि
सकलगुणालंकरणअखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ बाजीराव रघुनाथ प्रधान आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें विशेष प्रांत खानदेश येथील कानगोईचें वतन खंडो गंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्याची जफ्ती पेशजी सरकारांत जाहाली आहे त्यास चिंतो विठ्ठल आपले तीर्थरूप मृत्यु पावले ऐशास सदरहू वतनाची जफ्ती मोकळी करून वतन आपल्याकडे चालविलें पाहिजे ह्मणोन चिंतो विठल यांचे पुत्र राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांणी हुजूर विनंती केली त्याजवरून प्रातंजकुराचे कानगोईचे वतन पों।। चिंतो विठ्ठल यांचे हिश्शाची जफ्ती हाली मोकळी करून चिंतो विठ्ठल मृत्यु पावले त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण याजवर कृपाळू होऊन प्रांत मा॥ येथील कानगोईचे वतन यांचे यांजकडे चालवण्याची आज्ञा करून हें पत्र तुह्मास लिहिलें असे तरी तुह्मांकडे प्रांत मजकूरपैकी माहाल आहेत तेथील कमावीसदारास व जमिनदारांस ताकीद करून लिहिल्याअन्वयें वतन व हक्करुसूम इनाम व मानपान कानूकायेदसुध्धा चिंतो विठ्ठल याजकडे पेशजी सुदामत चालत आल्या प्रों।। त्रिंबकराव चिंतामण यांजकडे चालवणें व कानगोईचे वतनाचा शिरस्ता कागदपत्राचा पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्याप्रमाणें कागदपत्र मारनिल्हेचें दफ्तरीं पेशजी सनदेप्रमाणें देवीत जाणें जाणिजे छ ६ रजब सु॥ इहिदे मया तैन व अलफ बहुत काय लिहिणें हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३३८.
१७२२ श्रावण वद्य २.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री त्रिंबकराव चिंतामण गोसावी यांसि :-
सेवक अमृतराव रघुनाथ नमस्कार सु॥ इहिदे मया तैन व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. निष्ठेचा मजकूर लिहिला तो विदित जाहला. ऐशास तुह्मीं पहिल्यापासून पदरचेच आहां. तेथें चिरंजीव राजश्री बाबासाहेब याजवळ लागू होऊन राहाणें. राजश्री विठ्ठल बल्लाळ यांसहि एका दोहों रोजी तेथें पाठविलें जाईल. जाणिजे. छ १४ रबिलावल. बहुत काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३३७.
१७२२ आषाढ वद्य ३.
मयराळजी बीन सिवापा वाणी होणराव कोठवळे नि॥ श्रीमंत मातुश्री आनंदीबाई साहेब याचे तीर्थस्वरूप सिवापाकडे कर्ज लक्ष्मण भट दिवेकर यांचें येणें रुपये बाराशे, त्याचे खत भास्कर माहादेव काणीटकर याचें नावाचें शके १६९४ चे सालीं करून घेतलें. त्यास ऐवज याचे घर कसबे पुणें पेठ रविवारांत पुरातन नांदतें कवलारी. त्याची हमशाई. उत्तरेस दामोदरदास कोठारी. व दक्षनेस भिवजी कोठवळे. पश्चिमेस रस्ता. व पूर्वेस ++++ मुदत येका वर्शाची व्याज दरमहा दर शेकडा एकोत्रा प्रों।। अन्वयें खत लिहून घेतलें यावर मुदतीवर व्याजसुधा रुपयाचा फडच्या करून द्यावा आन आपलें घर सोडवून घ्यावें तों आह्मी तीर्थरूपसुधां श्रीमंतसाहेबाचे स्वारीसमागमें पुणियांतून गेलों पाठीमागें गर्दी जाली. वस्तभाव लुटली गेली. मूल लेकर गरीबतारीत येऊन परागदा जाहला. ते अवांतर जागीं जाऊन राहिली. श्रीमंत बाईसाहेबाची स्वारी धारेकडून सुरतेस आली. आवया तवया भोगिला तो अकस्मात तीर्थरूप सिवापा निवर्तले उपरातीक कालेकरून साहेब पुणियास आले. ते समयीं सेवक हि चाकरीस धणियाच्या पायापासीं आला. दिवेकर याजपासदीं जाऊन त्यास मतलें कीं ई॥पासून घराचें भाडें काय वसूल जाहलें तें आह्मांस समजावणें ऐसे बोलोन दोन तीन महिने केलें परंतु ते कांही आह्मांस समजाविना. मग कृष्णाजी परड हुजरे नि॥ सरकार याचे वि॥ साहेबास अर्ज केला तो धणियांनी मनास आणून दिवेकर यास हुजूर बोलाऊन सांगितले कीं याचा हिसोब ई॥पासून घराचें भाडें काय वसूल जालें हें सरकारांत समजावणें त्याजवरून दिवेकर यांणी आपला हिसोब आणून सरकारांत समजाविला. त्याची चवकसी करता घराचें भाड्याचे रुपये ४१०८ च्यार हजार एकसे आठ शके १७२० चे सालापावेतों वसूल जाहलें. त्याजपैकी घराकडे खर्च रु।। ३२५॥- तिनसे पंचवीस नऊ आणे जाहले बाकी ३७८२। तीन हजार सातसे बयासी रु।। सात आणे निकालस पावती घरापैकी दिवेकरास जाहली. येसें साहेबाचें ध्यानास येतांच होणराव याचे घरांतील भाडेकरी महंद हुशेन ताजभाई व विश्राम इसमायल बहुरियास सरकारांत बोलाऊण आणून ताकीद केली मीं दिवेकर यास भाडें न देणें. तवा बहुरी यानें अर्ज केला की दिवेकर यांणी आह्मापासून भाडेचिठी सिवराम नारायण आठवले या घराची यास लिहून देविली आहे. साहेबांनी त्यास सांगावें त्याजवरून आठवले यास हुजूर बोलाऊन सांगितलें की बहुरियास या घराचे भाड्याबद्दल तगादा तुह्मी आमचा परवाणीबिगर न करणें आयसें सांगून दिवेकर आठवले यांस सांगितले कीं तुह्मी सरकारांत येऊन चवघे सावकार व दिवेकर आठवले यास विचारलें की मुदल रुपये बारासें सावकाराचें कुलाकडे येणें- कुलाकडून पावती तीन हजार सातसे ब्यायेसी रु।। सात आणे वसूल सावकारास पावला असता सावकार कुळाचें घर सोडीत नाहीं त्यास तुह्मीं पंचावीत मतें सांगावे. तव चवघांनी साहेबास समजाविलें की कुलाकडे सावकाराचा कांही दावा राहिला नाहीं. कुळाचें घर व खत व बहुरियाची भाडेचिटी आयेसी सावकारांणीं द्यावी. आयेसें चवघांणीं साहेबास समजाविलें तें समईं दिवेकर व आठवले यांस सांगितले की चवघांचे मतें आयसें ठरले. तुह्मी या घराचें खत व भाडेचिठी बहुरियाची बहुरियास देणें तें समईं बहुरी याजकडे घराचें भाडें आटकाविलें होतें तें बहुरियास आठवले यांणी सांगितलें की तुह्मी मयराळ बीन सिवापा होणराव यास घराचें भाडें सरकारांतून तुह्मांस ताकीद देऊन आटकाविलें त्या दिवसापासून मारनिलेस देणें तुह्माकडे आमचा कांही ताबा राहिला नाहीं. तुमची भाडेचिठी या घराबद्दल आह्माजवळ आहे ती आह्मी तुह्मांस देऊ. आयेसें सरकारांत साहेबास हुजूर दिवेकरव आठवले यांणी प्रमाण करून गेले की मयराळ होणराव याच्या तीर्थरूपाचें नांवचें होतें त्याचे त्यास देतों व बहुरियाची भाडेचिठी बहुरियास देतों. येणेंप्रमाणें मयराळ बीन सिवापा वाणी होणराव याचा व दिवेकर याचा फडच्या करून घेऊन याचे घर याचें हवाला केलें. पुढें काही दावा या घरावर दिवेकर याचे कर्जाचा व सरकारचे नजरेचा राहिला नाहीं. मयराळ बीन सिवापा यांणी आपलें घर स्वसंतोसें अनभवावें. भोडेचिठी गयेविले पडली. सबब आठवले यांणीं बहुरियास फारखती लिहून दिली. मिती आशाड व॥ ३ शके १७२२ रुद्रनाम संवत्सरे हस्ताक्षरे भिकाजी सिवराम आठवले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक ३३६.
१७२२ ज्येष्ठ शुद्ध २.
राजश्री त्रिंबकराव चिंतामण गोसावी यांसी
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो।। यशवंतराव होळकर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकिय लिहित जावें विशेष तिकडून भागोजी गबारी आले त्यांनी तुह्माकडील स्नेह घरोब्याचे रितीस जमण्याचे प्रकार सांगितले. त्यावरून बहुत संतोष जाहाला चिरंजीव राजश्री खंडेराव तेथें आहेत त्याजवर श्रीमंतांनीं लोभ करून सर्व प्रकारे संरक्षण केलें पुढेंही बंदोबस्त करून देऊन सरकार चाकरी घडे तें करणार तेच आहेत तुह्मीं प्रसंगी आहा विनंती करून दरबारांत दौलतीचा बंदोबस्त सत्वर होऊन सरकार चाकरी घडे तें करावें सविस्तरें मानिले बोलतील रा॥ छ १५ मोहरम सु॥ इहिदे मया तैन व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३३५.
१७२२ वैशाख शुद्ध ५.
ती ॥ राजश्री रावजी स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्य गोपाल धोंडाजी शिरसा नमस्कार विनंति विज्ञापना. येथील कुशल ता।। वैशाख शु॥ ५ पो।। वडिलांचे आशिर्वादें सुखरूप असो. विशेष. वडिलांकडून बहुत दिवस जाहले पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. असो. रा।। वेंकाजी जयराम याजकडे गजीच्या संताचे वगैरे काम सांगितलें त्यास फार उत्तम केलें हालीं श्रीमंताचे स्वारी बरोबर रा।।. भिकाजीपंत आप्पा व माधोराव आले यांणीं आक्षेप केला आहे त्यास रा।। माधवराव भय्या राजे बाहाद्दर यांचे पत्र आन्या धुमाळ याचे नांवें आल्यास बंदोबस्त होईल. दुसरें आपण आह्मांस लिहिलें कीं आमचे हातची बाकी सर कानगोई संबंधी बागलाण प्रांतीची वसूल करून घ्यावी ह्मणून लि॥ त्यांस पदच्युत जाहल्यास कोणी उभे राहूं देत नाहीं. आपण वडील आहांत सर्व आपल्या ध्यानांत आहे परंतु बंदोबस्त राखावा. भिकाजी मोरेश्वर याचीं बोलणीं बहुत जाहलीं. भेटीनंतर सविस्तर निवेदन होईल. पत्रीं विस्तारे कोठवर लिहूं ? समक्ष भेटीस लवकरच येतो. कळावें बहुत काय लिहिणें? लोभ करावा हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीगजानन.
लेखांक ३३४.
१७२२.
यादि खां।। त्रिंबकराव चिंतामण सु॥ इहिदे मया तैन व अलफ. इनामगांव व वतनाची मोकलीक करून घेतली बद्दल खर्च. रु।।
४००० वे॥ संपन राजश्री अपासधि
अग्नीहोत्री.
४००० ऐन द्यावयाचे ते दिल्हे.
शिवाय वर्षासन मौजे अहिरे येथें
करार करून देण्याचा करार ठरला आहे.
दरसाल रुपये. २००
------------
४०००
२००० वे॥ राजश्री बाळशास्त्री बावा यास.
१५०० राजश्री चिंतो वामन.
७०० राजश्री भाऊ सरंजामी दाखले पाहावयासंबंधी वगैरे खासा वगैरे कारकून मिळोन.
१५०० नि॥ चिटणीस.
१००० खासा.
५०० तरेखसमंधी व लिहिण्यासमंधी.
----------
१५००
१३०० नि॥ मजमदार खासा व कारकून.
२००० नि॥ फडणीस खासा व कारकून.
३००० अंतस्त वि॥ अग्नीहोत्री.
१५० नि॥ दप्तरदार पत्रें बार करावयासमंधी.
५०० शागीर्द पेशा नि॥ श्रीमंत स्वामी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीगजानन.
लेखांक ३३३.
१७२२.
यादी -----------------------
नाशिक पैकी वाडे वगैरे
१ पंचवटीचा वाडा
१ पा।। दिंडोरी येथील
१ परगणें हरष येथील बेलगांवचे कुळकर्ण
१ आंबराई उन्हाळ्याची
१ आंबराई उन्हाळ्याची
१ पाटिलकी चहेडीची
१ मोकासा मौज दुगांव
१ आंबडीचे इनाम.
पुण्यापैकी वाडे वगैरे
१ पागेचा वाडा व गाडीखाना
१ पुलावरील वाडा.
----
२
रामाजी जनार्दन कारकून त्याजपासून हिशेब वगैरे पुसावयाचे सबब त्याची घरें वगैरे आहेत त्यास मारनिले गैरहजर जाले त्यास त्यांची घरें वगैरे आहेत तेथें अंमल आमचा असावा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीगजानन.
लेखांक ३३३.
१७२२.
यादी -----------------------
नाशिक पैकी वाडे वगैरे
१ पंचवटीचा वाडा
१ पा।। दिंडोरी येथील
१ परगणें हरष येथील बेलगांवचे कुळकर्ण
१ आंबराई उन्हाळ्याची
१ आंबराई उन्हाळ्याची
१ पाटिलकी चहेडीची
१ मोकासा मौज दुगांव
१ आंबडीचे इनाम.
पुण्यापैकी वाडे वगैरे
१ पागेचा वाडा व गाडीखाना
१ पुलावरील वाडा.
----
२
रामाजी जनार्दन कारकून त्याजपासून हिशेब वगैरे पुसावयाचे सबब त्याची घरें वगैरे आहेत त्यास मारनिले गैरहजर जाले त्यास त्यांची घरें वगैरे आहेत तेथें अंमल आमचा असावा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३३२.
१७२२.
साहेबाचे शेवेसी. कुसाजी पानसोडे पेठ शुक्रवार पुणें अर्ज विज्ञापना क॥ सखाराम गणेश आंबेडकर नि॥ लछीराम बखतनाल याणें पेठ बुधवारचे दुकान घर दरोबस्त भिवभट शार्दूल याज पाशीं गाहाण ठेऊन ऐवज घेतला. त्यास भिवभटजीस ऐवजाची गरज लागली सबब भटजी व सखाराम गणेश आह्मापाशीं येऊन पेशजीचे भटजीपाशील गाहाणखत व भटजीचे नांवें दुसरा कागद करून दोन्ही कागद आह्मांपाशीं देऊन माझा ऐवज नेला त्यास हालीं धटाई करून माझा ऐवज मजला देत नाहींत ना घर गाहाण ठेविल्याप्रों।। माझे स्वाधीन करीत नाही. घराच्या भाड्याचा ऐवज येतो तोदेखील दुसरीकडे नेतात. मी गरीब माणूस. म्या लोकाचा ऐवज घेऊन याजला दिल्हा. त्याचे व्याजें देतां मी बुडालों. इ॥
शके १७१८ चे चैत्र शु॥ । ता।। शके १७२१ श्रावणमास त्यास मजवर स्वामी कृपाळू होऊन सखाराम गणेश आंबेडकर यास धटाई करितो आणि शिंदे होळकर याची हिमायेत दाखवितो. त्यास शिंदे यांचे लष्करांत येविषयीं फड पडला तेथें माकुल होऊन आतां आंगबाकंचे माझ्या ऐवजाचा निकाल करून देत नाहीं ना गाहाण हि स्वाधीन करीत नाहीं. त्यास देवेधणार धनी समर्थ आहेत हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३३१.
१७२२.
राजश्री रावजी खासगिवाले गोसावी यांसि
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य श्नो।। माधवराव न॥ देशमुख प॥ नेवासे दंडवत विनंति उपरी येथील कुशल त॥ छ २१ रजब पावेतों मुक्काम पुणें येथें यथास्थित असो विशेष राजश्री त्रिंबकराव चिंतामण यांनीं सरकारची पत्रें तुमचे नांवे आणलीं आहेत त्याप्रमाणें मशारनिल्हेचे कामाकाजाचा बंदोबस्त करून घ्यावा पुन्हा बोभाट न यावा बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति.