Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ११.
इ. स. १७६५ ता. १४ जून श्रीहेरंब. १६८७ ज्येष्ठ वद्य ११
राजश्री नानास्वामींचे सेवेसीः-
३ उभयेताचे सां नमस्कार विनंती उपरी आपण पत्र पाठविलें ते पावोन लि।। मा।र समजला. ऐसियासी अवघ्या मनसब्यांत मुख्य आबरू च आहे. तिची न्यूनता जाल्यानें मग फल काय ? अस्तु. आपण लौकर यावें. प्रथम येथें मनसब्याचा डौल झाला तो समक्ष च आपणांस समजला आहे. तेच मर्जी हा कालवर असे. ४गकार नामक आले. त्यांनी फार नरमपणें भाषण केलें. परंतु तात्पर्य श्रीमंताचें ध्यानांत आहे. त्यास सांप्रत इतकें च ठरलें कीं, ५उभयतांच्या भेटी व्हाव्या. जें बोलणें चालणें असेल तें परस्परें समक्ष च व्हावें. त्यांत कांही गोष्ट ठरोन रहस्य जालें तरी उत्तम नाहींतरी त्यांनी६ भीमा उतरून दक्षणतीरी जावें. ७यांनीं अनंदवल्लीस अथवा आसपास असावें. उपरांत परस्परें चित्तास येईल ते करावें. ऐसें जालें आहे. गकार फिरोन गेले. इकडीलही चिंतो अनंत पाठविले आहेत. ८त्यांनी येणें तरी पांचा सा स्वारा. नसीं यावें अधिक न यावें. ऐसे स्पष्ट जालें असे. ते येतील. यांची त्यांची समक्षता होईल. परंतु त्यांशीं यांनीं काय बोलावें हा इत्यर्थ अगोदर जाला पाहिजे. तरी आपल्या व्यतिरिक्त हें ठरत नाहीं. यास्तव अविलंबे यावें. राजश्री ९बापू विंचुराहून रविवारीं त्रयोदसीस च दर्शनास येणार. तेच वेळेस वस्त्रेंहि होतील. आपले भेटीअंती आजपावेतों जालें वृत्त सविस्तर निवेदन होईल. स्वकीय कार्याचा मा।र लि।। त्यास जो करार आपल्यास ठरोन त्याविसीं यादीहि जाली आहे. त्यांत कोणेविसीं गुंता नसे. त्या यादी पाठवाव्या तेणेंप्रों। निर्गम होईल. सनदापत्र हातास येऊन कराराची यादी हि पाहिजे तरी ते हि आपल्यापासींच राहील. चिंता नाहीं. भेटीअंती सविस्तर कळेल. लौकर यावें. बहुत काय लिहिणें ? कृपेची वृद्धी करावी. पहिल्या यादी कराराच्या आहेत त्या पाहून सनदा द्यावयाची आज्ञा आहे. या हि पाठवून द्याव्या. आपण हि लौकर यावें. बापूचें वस्त्रासमई आपण असावें. उत्तम आहे. रविवारी दोन प्रहरा भेटीचा मुहूर्त त्याचा आहे. वस्त्राचा हि तो च. याजकरतां आपण लौकर यावें. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १०.
इ. स. १७६५ ता. २० मे श्रीराम. १६८७ ज्येष्ठ शुद्ध १
श्रीमंत राजश्री नाना३ स्वामीचे सेवेसीः-
सेवक राघो४ मल्हार व बाजी नरसीव्ह कृतानेक सा नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल ता। छ २९ जिलकाद मु॥ उजेन जाणोन स्वामींनी स्व-कुशल लिहीत आसलें पाहिजे. विशेष. स्वामींकडेस दोन तीन वेळां विनंतिपत्रे लि।। होतीं त्यास एक हि उत्तर आलें नाहीं त्यास कृपा करून सदैव पत्रीं लेखन करीत जावें. यानंतर आह्मांकडील सांप्रत्य सरदारीचा मजकूर तर बंदोबस्त आहे. राजश्री माहादजी५ गोविंद याचें आमचें चित्त शुद्ध नाही. सर्व भरवसा स्वामीचा आहे. दरबारचा बंदोबस्ताचा गुंता स्वामीकडेस आहे. त्यांस तेथील बंदोबस्त तीन चार निदान पांचपर्यंत१ करार ठराऊन निमेच्या ऐवजाच्या हुंड्या कराव्या आणि निमे सा महिनियाचा वायदा ठरावून कामकाजाचा गुंता उरकून घ्यावा. दिवसगतीवर न पडों द्यावें. स्वामीच्या वचेनावर इतका प्रकार जाहला हें येश स्वामीचें. दुसरा अर्थ नाहीं. ऐवजाची (चा?) चितांत कांहीं कल्पविकल्प येईल, तर न येऊं द्यावा. वस्त्रें२ आणि हुंड्या निमेच्या बरोबर कराव्या. फडशा केला जाईल. सारांश हेच विनंति कीं तेथ दरबारीं स्वामींनीं निशा करून सर्व गुंता वस्त्रें आदिकरून उरकून घ्यावा. रुाोविसी चिंता तिळतुल्य न करावी. आम्हीं सर्वप्रकारें सेवक दरबारचे आहोंत. दुसरा अर्थ नाहीं. वरकड कचा प्रकार राजश्री रावजीनीं लि।। आहे. त्यावरोन कळों येईल. सेवेस श्रुत होय हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९.
इ. स. १७६५ ता. २९ मार्च श्री. १६८७ चैत्र शुद्ध ८
पा।छ ९ सवाल सोमवार
वडिलांचे२ सेवेसी कृतानेक सीर सां नमस्कार विनंती. येथील कुशल ता। छ ७ सवाल मंदवार मुकाम असीउमरी वर्तमान यथास्थित असे. विशेष. श्रीमंताचे आज्ञापत्र व आपली पत्रें येण्याविषई आलीं, त्याजवरून जनस्थानीहून१ कुच करून येथपर्यंत आलों. पुढें दरमजल येत असों. प्रस्तुत वर्तमान ऐकिलियांत आलें कीं आह्मी फौजसुद्धां आलीकडे आलों. पुंरदरीहून आंबेकर प्रहस्तास निरोप देणार. ते नाशकास जाणार. सत्य मिथ्या नकळे. आपल्यास बातमी असेल. आम्ही सरकारच्या आज्ञेनुरूप आलो. दरबारांत२ हा प्रकार. ते गोष्ट ठीक नाहीं. यास्तव आपण तेथें पुर्तेपणीं बळकटी करून हा प्रसंग होऊं न द्यावा. आम्हाकडून कोणेविषई दुसरा अर्थ नाहीं. सरकार चाकरीस सांगतील त्याप्रमाणें हाजीर असों. फौजेचा जमाव भारी जाला आहे. देण्यास ऐवज पाहिजे. येथील अर्थ आहे तों आपल्या ध्यानांत आहे. याचा प्रकार ध्यानांत असावा. यानंतर उभयतांसी बोलणें लावावें कीं पूर्व (व?)तप्रों आमचा बंदोबस्त करून ( द्यावा ? ) सर्व गोष्टींस हजर आहों. उभयतांकडील साधनेस त्यांचे मर्जीप्रों असतील, त्या द्वारें बोलणें लावावें. आह्मी सरकारचे, आपले, आज्ञेप्रां। येत असो. कृष्णाजी गोपाळ याजला दोन मजली अलीकडे आम्हांकडे पाठवावें. तेथील सर्व अर्थ समजतील. पूर्वी पत्रें पो। आहेत. त्यास त्यांत मजकूर लिहीला त्यास त्याचा सला लेहून पाठवावा. त्या आजवर (?) वर्तणूक घटेल. येण्याचा विलंब नाहीं. वरकड वर्तमान रो। कृष्णाजी गोपाळ यांनी सांगितलें असेल. उत्तर सत्वर पाठवावें. बहुत काय लिहीणें ? लोभ करावा हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ८.
१७६४ ता. १८ आक्टोबर श्रीपांडुरंग. १६८६ अश्विनवद्य ८
मा। अनाम देशमुख व देशपांडे पा। एदलाबाद यांसी मानाजी१ सिंदे खमस सितैन मया व अलफ. पा। मजकूरची मनमू पेशजीपासून राजश्री रामचंद्र हरी यांजकडे चालत असतां हालीं तुह्मीं कमाविसदारासीं मिळोन घसघस करितां ह्मणोन हुजूर विदित जाहलें. तरी ही गोष्ट उपयोगी पडणार नाहीं मशार-निलेसी रुजू राहने. पेशजी-प्रमाणे यांच्या इतल्यानें काम-काज करीत जाणें. जाणिजे छ २२ रबिलाखर मोर्तबसुद
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ७.
१७६४ ता. २८ मे श्री वैशाख वद्य १३ शके १६८६
राजश्री रामचंद्र हरी गोसावी यांसिः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो। माधवराव शिंदे दंडवत सु।। अर्बा सितैन मया व अलफ. तुम्हीं पत्र पाठविलें तें पावलें. लेखनार्थ अवगत जाहला. ‘खासा स्वारी या प्रांतास आल्यावरील माहलचें वर्तमान साहेबांस पुढें येऊन निवेदन करूं’ म्हणोन लिहिले ऐसियासि एक मजलीच्या मुकामास तुम्हीं भेटीस येणे. वर्तमान मनास आणिलें जाईल जाणिजे छ २६ जिलकाद बहुत काय लिहिणे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६.
१७६४ ता. १० मार्च श्री फाल्गुन१ शुद्ध ७ शके १६८५
राजश्री जगंनाथ गणेश दि।। कृष्णराव गोविंद कमाविसदार पा। येदलाबाद गोसावी यांसिः-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य नेता माधवराव सिंदे दंडवत सु।। अर्बा सितैन मया व अलफ. राजश्री रामचंद्र हरी नि।। चिंतो विठल यांची मजमू प।। मजकूरी आहे. त्यास मजमूचे काजकाम मशार-निलेचे होतें सुरळीत घेत नाहीं म्हणोन मशार-निले यांनीं हुजूर लेहून प।।. त्यावरून हें पत्र तुम्हांस सादर केलें असे तर सुदामत-प्रमाणें मशार-निलेचे हातें मजमूचें काज-काम यथास्थित घेणें. जाणिजे छ ६ माहे रमजान बहुत काय लिहिणें हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ५.
१७६४ ता. १४ जान्युआरी श्री पौष शुद्ध ११ शके १६८५
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री नारो१ विठ्ठल गोसावी यांसिः--
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सु।। अर्बा सितैन मया व अलफ तुह्मास२ राजश्री केदारजी सिंदे व माहादजी सिंदे यांजकडील हुजूरची फडणिसी रामाजी अनंत याजकडे होती ते व पथकाची फडणिसी चिंतो कृष्ण याजकडे होती ते दूर करून साल-मजकुरापासून तुम्हास सांगोन पेशजीचे फडणिसाप्रमाणें सरंजाम वगैरे नेमणूक करार केली असे, तर इमानें इतबारें वर्तोन दोन्ही फडणिशांची सेवा एकनिष्ठेनें करून नेमणूक घेत जाणें व माहालाकडील फडणीस पहिले असतील त्यांत उपयोगी असतील ते करार करून घेणें, गैर-उपयोगी असतील ते दूर करून तुम्हीं आपले तर्फेने माहालोमाहाल कारकून ठेऊन त्यांचे हातें फडणिसीचें कामकाज घेत जाणे. *जाणिजे छ १० रजबु बहुत काय लिहिणे.
बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४.
१७६३ ता. १३ फेब्रुअरी श्री फाल्गुन शुद्ध १ शके १६८४
श्रीमंत महाराज३ राजश्री दादासाहेब महाराजांचे सेवेसीः--
आज्ञाधारक केदारजी सिंदे व महादजी सिंदे दंडवत विज्ञापना ऐसीजे आह्मीं साहेब-भेट रुपये १००००० येक लक्ष करार करून गेलों ते राजश्री अंताजी माहादेव यांचे मार्फतीन पाठऊन देऊं. यासी अंतर पडणार नाहीं. (स)दरहू येवज दो महिन्यानीं खासगी खर्चांस पाठऊन देतो. छ २९ माहे रजब मु।। चिकोडी कृष्णातीर शके १६८४ चित्रभानुनाम संवतछरे फाल्गुन शुद्ध १ प्रतिपदा बहुत काय लिहिणें हे विज्ञापना. हस्त-अक्षर अंताजी माहादेव.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ३.
श्री
राजश्रियाविराजीत राजमान्य राजश्री रामचंद्रपंत१ स्वामी गोसावी यांसिः-
पो चिंतो विठल सां। नमस्कार प॥ येदलाबाद येथील कमाविसदारास मुजमूविसीं सिंद्याचे ताकीदपत्र घेऊन पाठविलें आहे. कमावीसदाराचें नांव लिहिले नाहीं. तुह्मी नांव ठिकाणीं लावून कागदांत भरून पत्र कमावीसदारास देणें. अमल चालेल. चिंता नाहीं. आपलेकडील वर्तमान वरचेवरी लिहीत जाणें. बहुत काय लिहिणें ? हे२ विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २.
१७६३ ता. २४ जान्युआरी श्री माघ शुद्ध १० शके १६८४
राजश्री चिमाजी नारायण कमावीसदार पा। येदलाबाद गोसावी यांसीः-
अखंडित लक्ष्मी अलंकृतराजमान्य स्ने।। जनकोजी५ सिंदे दंडवत सु।। सलास सितैन मया व अलफ राजश्री रामचंद्र६ हरी यांस प।।७ -मजकूर येथील मजमूची८ असामी करार करून पाठविले असेत तरी यांचे हातें प।।-रचें मजमूचें कामकाज घेत जाणे. यांसी वेतन सालिना रुपये ५०० पांचसे रुपये करार केले असेत प॥-मजकूरच्या ऐवजीं पावते करून स्वामिसेवा घेणें.
जाणिजे छ ९ रजब बहुत काय लिहिणे हे विनंती.