श्री.
लेखांक ३६६.
१७३२ आषाढ शुद्ध १०.
पैवस्ती श्रावण व॥ १ शके १७३२ सु॥ इ॥ अशर.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबक रावजी स्वामीचे शेवेसी :-
पोष्य गणेश उमाजी कृतानेक स॥ नमस्कार विनंति येथील कुशल त॥ आषाढ शुद्ध १० मुक्काम लष्कर नजीक सोपार येथे सुखरूप असो विशेष. श्रीमंत राजेबहाद्दर याचे प्रकर्णांत आपण वागतां. आह्मीं लष्करांत आहोंत उभयपक्षी स्नेह असावा ह्मणोन राजश्री कुशाबा जवळ बोलण्यांत त्रिवर्गांनी आणिलें त्याजवरून मारनिलेनी आह्मांस लिहिलें त्यास आपण व आह्मी दोन नाहींत. एक मानोन उभयपक्षीं स्नेहाची वृद्धिंगत चालवावी. परस्परें कामकाजाची पैरवी राजेबाहादरप्रकर्णी वगैरे राखीत जावी. वरकड मार कुशाबाचे पत्रीं लिहिला आहे. त्याजवरून कळेल. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. + + + + पंधराचा आहे. लोभ कीजे हे विनंति.