श्रीसिद्धेश्वर.
लेखांक ३६८.
१७३६ अधिकभाद्रपद वद्य ३.
अजस्वरीं राजश्री बाळशास्त्री दीक्षित तो।। मोकदम मौजे जिल्हाळें पो।। संगमनेर सु॥ खमस अशर मयातैन व अलफ. मौजे मजकूरचे कुळकर्ण कैलासवासी त्रिंबकराव चिंतामण यांचे तें आपले तर्फेचे गुमास्ता ठेवून वहिवाट करीत असतां, साल गुदस्तांपासून तालुके पट्टा येथील मामलेदार गुमास्त्याचे हातून वहिवाट घेत नाहींत. तरी गुमास्त्याचे हातून वहिवाट घेण्याविसीं मामलेदार व मोकदम यांस ताकीद जाली पाहिजे; ह्मणोन माधवराव त्रिंबक यांनी समजाविले. त्याजवरून हें पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी मौजेमजकूर येथील कुळकर्णांची वहिवाट त्रिंबकराव याचे कारकीर्दीत गुमास्ता करीत असेल, त्याप्रमाणें हाली माधवराव त्रिंबक आपला गुमास्ता गांवी ठेवितील, त्याचे हातून कुळकर्णाचे कामकाज घेणे. दिक्कत न करणें. येविसीचा फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ १७ रमजान. मोर्तब सूद.