श्रीनाथ स॥
लेखांक ३६०.
१७३२ चैत्र शुद्ध १५.
अजसुभा राजश्री दौलतराव सिंदे त॥ हरीवलद पुंजाजी व नारायेण वलद लोवजी ब्राह्मण जाई सेटे कसबे बीडकिनगाव सु॥ अशर मया तैन व अलफ. तुह्मी आपले सेटेपणाचे निमे वतन आपले हिशाचे रो।। त्र्यंबकराव चिंतामण यांचे तीर्थरूपास प्रोख्त करून देऊन खरीदखत लेहून दिल्हें त्याचे वहिवाटीवर मारनिले यांणी आपले तर्फेनें कारकून पाठविला असता दंडेली करून वहिवाट चालू देत नाही ह्मणोन विदित जालें त्याजवरून हे ताकीद सादर केली असे तरी तुह्मी खरीदखत दिल्ह्याप्रों भुसावर शेकडा बैलावर सिरस्ता दोन रुपये व किराणा दर सद्दे बैलास च्यार रुपये व मीठ तांदूळ वगैरे व नकाशात हकविकरी दरबैलास पक्का पैसा व बाटीक घोड्या व गाड्यास दर रुपयेस पक्का पैशाप्रों।। व साळ्याचे मागास सालिना येक सेला व सणगराकडून सालिना येक चवाळे येक व कडबा वगैरे विकरीस गाड्यागमें पैसे पक्के दोन व जमीन मळे बिघे बारा त्यांत विहिरी सुमार च्यार सुध्धां व खंडेरायाची माळ जमीन बिघे पाउणशे व निमे घर येणेप्रों।। तुह्मी लिहून दिल्हे त्याप्रों।। बिनदिक्कत मारनिलेकडे वहिवाट चालूं देणें. वहिवाटीस तुह्मी व तुचे भाऊबंद तक्षीमदारांनी हरकत केलियास कार्यास येणार नाहीं. जाणिजे. छ १४ र॥वल मोर्तब सूद.