लेखांक ५ १५४९ श्रावण
अज रख्तखाने खान फरादखान खुलीदौलतहू त॥ माहादो लखमदेऊ देसकुलकर्णी प॥ सुपा बिदानद सु॥ सन समान इ॥ अलफ अर्दास छ २२ जिलकादी व छ ४ माहे जिल्हेज मजमून की हुजरू पटीचा माही मख्ता केला ते बेरीजची पटी करुनु तहसील लाविली आहे माहाली दस्त काही कागदपत्र नाही याबदल नजर माजनापटी केली आहे तहसील हो तो जे गाव बहुत लावणीस होतील तेथे दाहा पाच होनु सोडी करुनु दिलासा करुनु वरकड उगवणी करुनु घेतली पाहिजे ह्मणौउनु लिहिले तरी पटीची झाडा सीताबीने होए पेस्तर सालमजकूर नख्ताची चाली लागे ऐसे करणे दिवाणकामासी तकसीर न करणे व रातीदिवस साहेबकामाखेरीज दुसरे काम करीत नाही साहेबाचा पटकर्मा आहे तेणे प्रमाणे वर्तणूक करितो ह्मणौउनु लिहिले तरी जे काही साहेबकामगारी कराल ते तुमचा फायदा आहे व माहाली मजमूदार कागदपत्र पुसताति माहाली कागद नाहीत कमाविसेचे काम चालिले पाहिजे तरी साहेबी नजर इनायती फर्माउनु आपला बिराजर हरिपत व कागद माहालास पाटविले पाहिजेत साहेब मायेबाप आहेती ह्मणौउनु लिहिले तरी नरहरी बिराजर त्याचे कागद पाहाणे बहुतेक जाहाले आहे लवकरी च माहालासी रवाना होईल व साल गु॥ लागवण जाले होते आजि पडि मुतलख होणे त्यास कौल देउनु जैसे लागवण होते तैसे लागवण करवितो पेस्तर लागवण जालिया हर कैसी कमावीस साहेल तैसी केली जाईल परि लागवण जाले पाहिजे गैरहगाम आहे परि लागवण करावयाचे ततबीर करितो तकसीर करीत नाही ह्मणौउनु लिहिले तरी जे काही दौलतखाही कराल तैसा नतीजा आहडेल मोर्तबू