Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ५
श्री.
श्रीमंत राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचें सेवेसी
पोष्य नारो गंगाधर व हरि बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ १८ मोहरम मु।। नजीक गजेंद्रगड आपले कृपेंकरून सुखरूप असो विशेष आपणांकडून बहुत दिवस पत्र येऊन परामर्ष होत नाहीं तेणेंकडून चित्त सचिंत्य आहे तर ऐसें नसावें सदैव पत्रीं कुशलवृत्त लिहून संतोषवीत असावें आपलीं पत्रें येथें हमेशा सर्वांस येतात त्यास एका हि पत्रांत आमचे स्मरण न जालें तस्मात आम्ही शेरामधीं पडिलों असें दिसोन येतें इकडील वर्तमान तर श्रीमंतास श्रीमंत लिहितात त्यावरून कळत च असेल हैदर नाईक सावनुरा पलीकडे साकोस छपरबंदी करून छावणी करून राहिला श्रीमंत मुदगल सरकाराकडे गेले होते त्यास हैदर नाईक सावनुरास येतो निकड करून घेणार असें वर्तमान येतां च माघारे फिरोन गजेंद्रगडपर्यंत आले पुढें दरमजल जावें तर बातमी आली जे बंकापुरास आला होता परंतु माघारे फिरल्याची बातमी येतां च माघारा फिरोन लिहिल्या ठिकाणीं छावणी केली जमियत आहे त्यांतील राउत व पायदळ फुटोन येतें कोणी मनावर धरून हें च काम करितील तर या च तजविजेनें दसरापर्यंत अर्धा सहजांत होतो परंतु तसें होत नाहीं काहीं काहीं होतें आपले फौजेचें वर्तमान तर चाळीसपर्यंत चैत्र वैशाखमासी होती आतां पंधरा राहिली आहे पंचवीस उठोन देशास गेली लष्करांत महर्गता दोन पायली दीड पायलीची धारण नेहेमीं च आहे ज्या दिवशीं एखादा गांव मोडावा त्या दिवशीं तीन चार पाइली होतात महर्गतेमुंळे लोक बहुत हैराण जाले हुजरातचे लोकांस निम्मे नालबंदी पावली निमें लोकांस कांहीं च नाहीं एक वर्ष चाकरीचें जाहालें दुसरें लागलें पैसा नाहीं काय माणसानें करावें परंतु आपलें इमान राखोन लोक आहेत पैक्याचा तोटा पुढें हंगामशीर देशीहून फौज आली तर सर्व हि ठीक च होईल याप्रों। इकडील वर्तमान आहे पुढें होईल तें लिहून पाठवूं तिकडील वर्तमान सदैव लिहित जावें श्रीमंत राजश्री दादासाहेब फौज तोफखाना घेऊन इकडे कधीं येणार हें लिहून पाठवावें तात्या आमचें विस्मरण न व्हावें आम्हांस शे-याच्या लोकांत न घालावें आम्हीं पहिल्यापासून तुमच्या लोभाची वांच्छा करितों आपण हि त्याचप्रकारें ममता अंतःकरणापासून करित आले त्याचप्रकारें दिनप्रति वृद्धि व्हावी सारांश आपले कृपेचे असो तिकडील वर्तमानें नाना प्रकारचीं आइकतों तत्वता कांहीं च कळत नाहीं तर सर्वदा स्वकीय परिच्छिन्न अर्थविस्तारें ल्याहावयास आज्ञा करावी बहुत काय लिहिणें कृपा केली पाहिजे हे विनंति राजश्री नारोपंत दाजी पोंकशे स्वामीस सा।। नमस्कार प्रविष्ट करावे हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ४
श्री.
राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पे।। १ बाळजी जनार्दन सा। नमस्कार विनंति उपर येथील कुशल ता। छ ९ सफर पावतों वर्तमान यथास्थित असे विशेष २श्रीमतांचें पत्र दुसरें लकरष्रांतून आलें कीं ३नारो बाबाजी कबूल न-च करितील तर विष्णु४ महादेव यांचे गळीं स्थळ सुद्धा खामखाय घालणें एतद्विषयी विस्तारयुक्त लिहून पाठविलें त्यावरून विष्णुपंतांसीं बहुतां प्रकारें बोलोन ठीक केलें कीं दीड लक्ष त्याणीं रसद करार केली त्याहून पाऊण लक्ष जाजतीं देतात किल्ल्यासुद्धां मामलत सांगावी त्यावरून आपणास लिहिले आहे तर मीं लिहिलें हें कोठें हि न दर्शवितां श्रीमंतांस विनंति करावी कीं पाऊण लक्ष रुपये ज्याजती रसद एक गृहस्त बोलतो जी मामलत वगैरे लक्षुमण कोनरीकडे असेल तितकें यांजकडे द्यावें लक्षुमण कोनेराचें फाजील सात लाख म्हणून गप्पा मारतात परंतु शोध केल्यास चार लाख पावतों होईल या फाजिलाचा कदाचित् अडथळा करितील तर मुरादखानाची जहागीर त्यास कैद केलें सबब जफ्त करावयास सांगितली ती अदमासें सत्तर ऐशीं हजार पावेतों आहे त्यापैकीं पंचवीसतीस निदानी चाळीस हजार पावेतों त्याचे रद्दकर्जी द्यावी श्रीमंतास समजवावें अशा प्रसंगी पाऊण लक्ष येतात अशा चार गोष्टी समजावून निदान पांचसा लाख पावेतों खाशास अंतस्त तुमचे विचारें देणें पडलें तरी कबूल करून आमचे नावें सरकारचें पत्र आमचा लेख न दर्शवितां पाठवावें कीं पाऊण लाख रुपये जाजती घेऊन विल्हे लावणें किल्यासुद्धां श्रीमंत अंतस्तास फार खुष आहेत यास्तव पांच सात हजार निदानीं अंतस्त देऊं करुन पक्की बळकटी श्रीमंताची करून घ्यावी कीं १रावसाहेबानीं २बापूनीं लिहून पाठविलें तरीं घालमेल करूं नये याप्रमाणें पक्का करार करून घेऊन गोपाळराव बर्व्याचा अभिमान धरला याप्रमाणें धरीत अशी तुमची निशा जालियावर यादीवर खासदस्तुरी करार करून घेवून सनद द्यावयाचे समयीं विष्णुपंताचें नांव प्रकट करवावें नाहींतर मध्ये च कळलियास सर्वांचा द्वेष त्याशीं पडून पेचांत आणितील यास्तव चांगले पक्की बळकटी करून घेऊन लिहून पाठवावें नाहींतर सुमार पाहून श्रीमंताची मर्जी नसली च तर तितकें च राहून द्यावें खामखा उलटावें असें च करून ठेविलें आहे पत्र फाडून टाकावें बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति किल्ला आला तर च याप्रमाणें नाहीं तर कबूल नाहीं हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
लेखांक ३
श्री. पौ छ १३ रमजान
राजश्रिया गोविंदपंत गोसावि यांसि अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नेाा तुकोजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लिहीत असावें विशेष राजश्री रामचंद्रपंत यांसी हुजूर पाठवून तुम्हीं व राजश्री विसाजी कृष्ण एकविचारें चालोन सरकारकामें उमदीं करणें म्हणोन चार पांच आज्ञापत्रें श्रीमंताचीं आलीं त्यास आज्ञेप्रमाणें राजश्री विसाजीपंतांनीं राजश्री रामचंद्रपंत यांची रवानगी देशी केली आहे आमचें लक्ष पूर्वीपासून सरकार सेवेविरहित नवतें च आणि प्रस्तुत हि खावंदाचे आज्ञेनरूप पंतमशारनिले व आम्हीं एक असों सरकारकार्यासीं यावच्छक्ती अंतर होणार नाहीं रा। छ १० जमादिलाखर बहुत काय लिहिणें लोभ असो दीज हे विनंति
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
लेखांक २
२९ आक्टोबर १७६३ श्री. आश्वीन व. ७ शके १६८५
राजश्री मल्हारजी होळकर गोसावी यांसि सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने।। माधवराव बल्लाल प्रधान आशिर्वाद उपारि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें विशेष मौजे दोडी ता। देपूर हा गांव खासगीकडे पेषजीपासोन आहे त्यास तुम्हांकडील अंमलदारांनीं जफ्ती केली आहे म्हणोन हुजूर विदित जालें त्यावरून हें पत्र लिहिलें असे तरी मौजे मजकूर खासगीकडे असतां कमाविसदारानें जफ्त करावयासी प्रयोजन काय तरी आपण यास उत्तम रीतीनें ताकीद करून जफ्ती उठवणें पुढें मौजे मजकुरास कोण्हेके विसीं उपसर्ग न लावीत तें करावें जाणिजे छ २१ रबिलाखर सु।। अर्बा सितैन मया अलफ बहुत काय लिहिणें हे आशिर्वाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
श्री. खासगीवाले यांचे दप्तर
लेखांक १
मिरासीपत्र सके १६०३ दुर्मती नाम संवछरे वैशाख वदि पंचमी बुधवार ते दिवसी सिदोजी व त्रींबकजी कावंदेऊ कुलकर्णी व जोशी मोजे पाटेगौ पा।। पैठण यासि दारकाई कोम तानाजी वलद बाळ पाटील म्हैसका मोकदम व दाडजी वलद गुडजी नवला मोकदम व साबाजी वलद गोमाजी म्हैसका मोकदम व बरवजी वलद दसमाजी म्हैसका व बजाजी वलद गोमाजी म्हैसका व रानोजी बलद सेखजी म्हैसका व अपाजी वलद रामजी गटखल व समस्त मोकदम मौजे चनकवाडी परगने पैठण सु।। सन १०८८ कारने लेहोन दिधले ऐसेजे आपले गावीं पुरातन वतनदार कुलकर्णी नवता उपरी येउनु काम चालवीत होतो वतनदारा वेगळी आपली बेहबुदी नव्हे म्हनउनु समस्त मायवत् बैसोन विचार केला आजी तुम्हापासी येउनु तुमच्या गळा पडोन बदल हिसा नबाबखानजादा बहादूर सन १०८७ आपनास लागला म्हनुनु घेऊनु रुपये १५० दीडसे घेतले आनी त्यास दिधले तुम्हांस कुलकर्ण व घरटा ताजेल दिधला असे सुखें लेकराचे लेकरी वतन तवरक बाद करून खरीदीखत दिधलें असे लेंकाराचेलेकरी अर्जानी करनें यास कोन्ही उभा राहेल त्यास आपन निवारून तुम्हांसी समध नाहीं व तुम्हांस कुलकर्णास हक वगैरा बि ता। देत जाऊनु घर करुनु नांदनें हद बित।।
कुलकर्णी याचे हक बिता ऐन नकद दर गला बीलम असामीस सा। खंडी १ रुपया निमे .।।. मागनी रानांत हुर्डा व घुगरी व खलीचा तवा नवला असामी पाहोन घेनें |
घराची हद मधली दपधरख दो घर व पडसाल व त्याचे आंगन दिधलें असे बिता। पूर्वेस राजबीद दक्षनेस बडजी जवले मोकदम पछिमेसी उत्तरेसी दाऊजी गावकुसूं म्हैसका |
सदर्हूप्रमाणें तुम्हास वतन लेकराचे लेकरीं दिधलें असें कमावीस करून खाने (नि.नां.) दारकाई म्हैसकी (नि. नां.) बडजी नवले (नि. नां.) साबजी म्हैसके
मोकदम मोकदम मोकदम
भगवंतजी वा। यादोजी वा। रंगोजी व विसाजी दामोधर
निलोजी देसमुख पा। मा। बिकलम देसपांडिये पा। मजकूर बीकलम गिरमाजी
विठ्ठल कोन्हेर गुमास्ते मशारनइले माजी दुकार गुमास्ते मशारनइले
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
ते पत्रें पावतील न पावतील याजकरितां हालीं हि सेवेसी लेखन केलें असे. रोज गुदस्त राजश्री विष्णुपंतबाबांची पत्रें आलीं तेथ मजकूर कीं ‘श्रीमंत नानांनी व आम्हीं उलेख करून श्रीमंत स्वामीस देहावरी आणिलें आहे. परंतु तूर्त द्रव्य साहा लक्षपर्यंत द्यावें लागतें. आणि फडणिसीचा प्रकार हि द्रव्यद्वारा केला पाहिजे.’ ऐसें विस्तारें लेखन केलें त्यास आपण स्वताच प्रसंगीं असलिया आम्हांस सेवक लोकांस काळजी किमर्थ असावी ? परंतु त्यांचें लिहिल्यांत आलें कीं ‘तुम्हाकडील पत्र आलियावर नाना व आम्ही हा उद्योग करूं’ त्यास पुर्ता पक्का विचार श्रीमंत स्वामीकडील करून घ्यावा आणि सरदारांची वस्त्रें वरकड बंदोबस्त करून घेऊन साहा लक्ष परियंत करार करून साऊकारी निशा द्यावी. आणि आम्हांवरी चिठ्या कराव्या. फडणिसीचा हि प्रकार द्रव्यद्वारें होईल तेथवर करावा. आणि बंदोबस्त करून घ्यावा. यांत कमीजास्त थोडें बहुत असलें तरी आपण करावें. हा सावधगिरीचा अधिकारहि आपणांस आहे. केवळ आम्ही ल्याहावें ऐसाहि प्रकार नाहीं. दुसरे रा। विष्णुपंत आबांनीं व शिवाजी विठ्ठल यांणा लिहिलें होते कीं, ‘देशीचे महाल आहेत, ते नानाकडे सोपून द्यावें, त्याजवरून देशीं माहाल आहेत त्याचीं पत्रें पाठविलीं आहेत. ते सेवेसी शिवाजी विठ्ठल प्रविष्ट करितील. त्यास देशीं कमावीसदार जुने आहेत त्यांणीं मागील बाकी झाडून व साल मजकूराच्या रसदा दिल्या तरी घेऊन तेच कमावीसदार ठेवून आपुलें कार्य करावें. तो प्रकार न जाला तरी नवे कमावीसदार ठेऊन स्त्रो घ्यावे आणि सरकारची सरबरा करावी. बाकी राहील त्याच्या चिठ्या आह्मांवरी कराव्या. आम्ही येथें तर्तूद करून देऊं. मात्र दरबारचा बंदोबस्त उभय पक्षीहि चांगला करून घ्यावा. येविशई श्रीमंत राजश्री माहादजीबावाचेंहि पत्र आपणांस आहेच. येथ सर्व प्रकार स्वामीचा आहे. दुसरा अर्थ किमपिहि नाहीं. हें जाणून या सरदारीची किफायत हरयेकविशी करावी, हें आपणांस विहित असे. वारंवार लेखन करावें ऐसें नाहीं. कितेक प्रकार राजश्री शिवाजी विठ्ठल हे विनंती करतील ते मान्य करून कर्तव्य ते करावें. सारांश उभयतां* श्रीमंतांची कृपा संपादून घेऊन सरदारीची वस्त्रें घ्यावीं. यांत आपला नक्ष आहे. कदाचित देशचे माहालांत ऐवजाची सरबरा न जाली तरी क्षेप-निक्षेप तुह्मीं साउकारी निशा देऊन आम्हांवरी हुंड्या कराव्या. ऐवजाची सरबरा येथें करून देऊं. कोणेहि गोष्टीचा चित्तांत याउपर दुसरा अर्थ न आणतां हे कार्य करावें. वरकड इकडील सरदारीचा प्रकार येथास्थीत जाला असे. अगोधर हजार फौज होतीच आणिक दाहाबारापर्यंत फौज मागाहून आली. शिवाय पागा वगैरे मिळोन वीस हजार फोज बरोबरी आहे. त्यास नालबंदी व समजाविशीहि करोन कोटियानजीक आलों आहो. कोटेकराकडील१ हि मातबर माणूस आले आहेत. येथील मामलत जालियावर होळकराकडे जावें लागतें. तिकडीलहि पत्रें आलींत कीं फिरंगियांची व यांची लढाई जाली-होळकर माघारीं कालपीस येऊन दाखल जालें. त्याजकडेहि त्वरेनें जावे लागतें. तिकडीलहि राजकारण भारी आहे, तेहि आपले कृपेकडोन साधून नक्ष आपलाच होईल. चिंता नाही. आपण अभिमान न सोडावा यांत उत्तम असे. स्वामींनी++ लिहिल्याप्रमाणें पारपत्य केलें, याउपरीं दरबारचा बंदोबस्त जो करणें तो करून घ्यावा. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १५.
इ. स. १७६५. जून. श्रीशंकर. १६८७ आषाढ
श्रीमंत राजश्री नाना स्वामींचे शेवेसी पोष्य राघो राम व राघो मल्हार व बाजी नरसिंह कृतानेक सां। नमस्कार विनंती येथील कुशळ तागाईत छ माहे जिल्हेज मुकाम नजीक मुकुंदबारी येथें स्वामीचें कृपावलोकनेंकरून क्षेमरूप जाणून स्वकीय कुशलोत्तर पत्रीं आनंदवीत असावें. बहुत दिवस जाले. आपलेकडून पत्र येऊन परामृष२ होत नाहीं, तेणेंकडोन चिंतातुर आहोंत. तरी आपुल्याकडील साकल्य अर्थलेखन करून आज्ञापत्र प्रेरणा करीत असावें. यानंतर इकडील वर्तमान तरी श्रीमंत मातुश्री३ बाई व राजश्री माहादजीबावाचे सख्य जालींयाचें वर्तमान आपणास कळलेंच असेल, आणि शेवेसी तो। शिवाजी विठल पाठविलेत त्यांणीही निवेदन केलेंच असेल. अलिकडे वर्तमान तरी माहादाजी गोविंद याजला मुजमू देऊन ठेवावें हा इत्यर्थ केला होता. त्यास त्याचा अति आग्रह कीं दिवाणगिरी श्रीमंत स्वामींनी आम्हांस दिल्ही असतां येथें मुजमू करून रहावें हा प्रकार उत्तम नाहीं, देशास जावें, म्हणोन याजपासोन निरोप घ्यावा आणि हे कोटयाकडे आणिक दोन चार मजली गेलियावर अवंतिकेस येऊन धामधूम करावी, सावकारा मारावा, ऐसा चित्तांत भाव आणून आड घातली की दिवाणगिरी स्थापलियाखेरीज आमचें राहणें होत नाहीं. तेव्हां प्रसंगास सेवकाखेरीज सख्त ज्वाबसाल कोणी ही न करीत तेव्हां ज्वाबसाल करावासा जाला त्या ज्वाबसालामुळें अगोदर आम्हावर च परम श्रमी होते ते कोठवर ल्याहावें ? त्याजवर निरोप घेऊन x x x x होते उज्जनींत रा। अच्युतराव व आह्मीं हि होतो. त्यास सावेरीचे आसपास उज्जन वगैरे परगणियाचे गांव लुटू लागले. खंडण्या हि घेतल्या. ऐसी धामधूम केली. त्याजवरोन रावजींनीं व आह्मी पत्रें त्याजकडे पाठविलीं कीं हें कर्म आपणायोग्य नाहीं. येकदों गांवचे पारिपत्य केले तें उत्तम केलें. परंतु याउपर हे गोष्ट कामाची नाहीं. ऐसीं पांच सात वेळां पत्रें पाठविलीं परंतु एकंदर न ऐकत. आणि कासिदास मारून वाटे लावीत. तेथें पत्राचें उत्तर येणें कळत च आहे. ऐसा विचार जाहलियावर उज्जनींत हजार बाराशें लोक होते. त्यास रावजींनीं आम्ही विचार केला की याजला दबाव देऊन इंदूरापावेतो पाहोचावून द्यावें म्हणून फौज तयार करोन गेलों. कोसावर उभे राहून दबाव दाखविला, परंतु न ऐकत. नजीक गेलों तेव्हां कांहीं पळून गेलें. कांहीं उभे राहिलें, आणि गोळागोळी करूं लागले. तेव्हां आम्हांकडील लोकांनीं चाल केली, तेव्हां झाडोन पळोन गेले. पेंढारी लुटारे होते त्यांनी राहोट्या वगैरे होत्या त्या लुटून नेल्या. तशांत लुटारियांनी कोणीकडे माहादजीपंतास धरिलें हें न कळे. जखमा लागून सात आठ रोजा मृत्यु पावले. होणारास विलाज नाहीं. अगोदर आमचे नांवें श्रमी होते च. त्यांत हा प्रकार जाला ! त्यामुळें सर्वत्र दरबारीं आमचें च नांव बदु करून दुर्निमित्य आम्हांवरी ठेवतील. आम्हीं तों एकनिष्ठ सेवक आहों हें स्वामीही जाणत आहेत. सारांश दिवाणगिरीमुळें हा प्रकार जाला. येविसीं पूर्वी हि पत्र आपणाकडे पाठविलें आहे, कीं साकल्य कच्चें वर्तमान आपणांस कळावें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १४.
इ. स. १७६५ ता. १८ जून श्रीशंकर. १६८७ ज्येष्ठ वद्य ३०
सेवेसी चिंतो विठल सां। नमस्कार विनंति. येथील वर्तमान सविस्तर राजश्री कृष्णाजी गोपाळ व गोविंद माहादेव आपल्यास सांगतील. श्रीमंतांना१ अकृत्रिम कृपेचे भाव व खातरजमेचीं अक्षरें मा।रनिलेजवळ सांगितली आहेत. मजला पुढें यावयाची आज्ञा केली आहे. ऐश्यास आपण स्वार होऊन पुढें यावें. पिंपळगांवपरियंत मी इकडून येतों. याउपरीं कोण्हे गोष्टीविसीं लढा राहिला नाहीं. किल्ल्याची चिठी आह्मांजवळ श्रीमंतांनी दिल्ही आहे. सर्व प्रकारें निखालस होऊन यावयाचें करावें. बहुत काय लिहिणे ? हे विनंति. रा। मंगळवार तिसरा प्रहर.
हें पत्र शिंद्यांच्या दरबारांत प्रमुखत्वानें वागणा-या राघोराम इत्यादि कारभा-यांनीं नारोशंकरांस लिहिलें आहे. यांत महादेव गोविंद काकडे यानें आततायीपणा करून कसा स्वघात करून घेतला, याचें वर्णन आहे. हें वर्णन त्याचा नाश करणाच्या कारभा-यांनी केलें आहे, तेव्हां यावर जपूनच विश्वास ठेविला पाहिजे. मात्र शिंद्यांच्या दरबारांत व पेशव्यांच्या दरबारांत शिंद्यांच्या सरदारीबद्दल कोण उलाढाली चालल्या होत्या, घावडाव कसे चालत होते, यांचें बरेंच स्पष्ट चित्र या पत्रांत रेखाटले आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १३.
इ. स. १७६५ ता. १७ जून श्री. ज्येष्ठ वद्य १४
राजश्री कृष्णाजी गोपाल स्वामी गोसावी यांसिः
सेवक चिंतो विठल नमस्कार विनंति. उपरी. आम्ही काल रवीवारीं दोन प्रहरी निघोन थेरगांवास आलों. आज प्रातःकाळीं स्नानसंध्या उरकून चांदवडास तुह्मी लिहिल्याप्रों संध्याकाळी दाखल होतों. राजश्री नानास३ विनंति करून मंगळवारीं नानाचा मुहूर्त आहे, त्या मुहूर्ते निघोन लौकर चांदवडास आले पाहिजे. मंगळवारचा मुकाम चांदवडास करूं नये. पांच सात कोस अलीकडे यावयाची सला देणें. याउपरी गुंता राहिला नाहीं. पागा लौकर बोलाऊन तयारी करावी. आम्ही चांदवडीं वाट पहातो. हें च पत्र नानास दाखवणें. बहुत काय लिहिणें ? रा। सोमबार प्रहर दिवस सकाळचा हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १२.
इ. स. १७६५ ता. १७ जून श्रीसांब. १६८७ ज्येष्ठ वद्य १४
राजश्री चिंतो विठ्ठल यांसि:-
उपरी१. राजश्री नारोशंकर राजे बहादर याचे आर्जीवर दसकत२ करून दिल्हें. तुह्मी चांदवडपावेतों जाऊन घेऊन येणें. ‘दिरंग न लावणें. उद्यां चांदवडास जावें. परवां बुधवारी घेऊन येणें. दिरंगाचा समय नव्हे. रा। सोमवार दीड प्रहर रात्र.