लेखांक ८
श्री
राजश्री त्रिंबकपत
गोसावी यास
अखडितलक्ष्मीप्रसन्न महामेरु राजमान्य राजश्री सेवक अताजी दतो अजहत सामराज काटे देसमुख प॥ सुपे नमस्कार विनति उपरि सबाजी मोहिता रामाजी बाबाजीच्या गला पडिला आहे की विठलसेटीच्या गुजारतीने पचवीस होनु देणे यास रामाजी बाबाजी ह्मणताति की सबाजी मोहिता याने होनु पंचवीस उसणे दिधले होते याचे कलान्तर देखील होनु २७ गुजारती त्रिंबक विश्वनाथ सदरहू पैके दिधलेयावरी वेड लागलियावरी मागता दुबारा पचवीस होनु लाविले ते वेळेस आपणास पैके न मिळती च मग विठलसेटी सेटियाचे गुजारतीने त्यापासुनु मागता कर्ज काहाडूनु होनु २५ दिधले ते त्याने वळखिले की हे पैके आपले च की हे हि सबाजी बोलिला तरी सदरहू हकीकती कैसी आहे ते आपले पूर्वज स्मरोनु लेहुनु पाठवणे हे विनति