लेखांक ४ १५४४ वैशाख शुध्द ५
सिधेश्वरु*
श्री सके १५४४ रुधीरोद्गारी सवत्छरे वैशाख सुदी पंचमी शुक्रवार ते दीसी राजश्री बाबदेभट जोसी धर्मादीकारणी कसबे सुपे यासि सीतोजी गोलाडा अतोजी गोलडा लीहून दीधले ऐसे जे आपण बहुत दुकळाकरिता तुटलो तरी आपणास खावयासी नाही आपला जीउ राखीला पाहिजे ह्मणउनु तुह्मास आपली खुसीने आपला घरवाडा नजीक पार चीरेबदी बैसकी केसो + + कुत पुर्व आग्नेसी आकारा व दक्षणेकडे हीरवे माली तो जागा आपला तो तुह्मास वीकत दीधला असे तुह्मापासुन आपण घेतले होन अडीचा व गला जोरी बाबेती दौलत भगलभेरी मण ३॥ साडे तीन दर मणे टके ८ नीष व भात मण टके
१॥ दीढ दर मणे टके ४॥।. पावणे पाच एकूण टके व पासोडी अर्ध जुनी येक ऐसे घेउन वाडा व घरठाण तुम्हास दीधले असे आपला कोण्ही वौसीचा उभा राहीला त्यास गाली असे आपण दुकळात जीउ वाचावाया अनाकारणे आत्मखुसीने दीधला असे तुह्मी खुसी घरवाडा बाधणे सुखे असणे हे लीहीले सही
गोही
गोमाजी बीन कुमाजी आकोजी गोळाडा
माहाजन क॥ सुपे क॥ म॥
जाउ माली घोडीमळकर बाळ माळी बारवकर
हे रतनोच्या गु॥ दिधले