लेखांक ३
श्री. पौ छ १३ रमजान
राजश्रिया गोविंदपंत गोसावि यांसि अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नेाा तुकोजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लिहीत असावें विशेष राजश्री रामचंद्रपंत यांसी हुजूर पाठवून तुम्हीं व राजश्री विसाजी कृष्ण एकविचारें चालोन सरकारकामें उमदीं करणें म्हणोन चार पांच आज्ञापत्रें श्रीमंताचीं आलीं त्यास आज्ञेप्रमाणें राजश्री विसाजीपंतांनीं राजश्री रामचंद्रपंत यांची रवानगी देशी केली आहे आमचें लक्ष पूर्वीपासून सरकार सेवेविरहित नवतें च आणि प्रस्तुत हि खावंदाचे आज्ञेनरूप पंतमशारनिले व आम्हीं एक असों सरकारकार्यासीं यावच्छक्ती अंतर होणार नाहीं रा। छ १० जमादिलाखर बहुत काय लिहिणें लोभ असो दीज हे विनंति