लेखांक २
२९ आक्टोबर १७६३ श्री. आश्वीन व. ७ शके १६८५
राजश्री मल्हारजी होळकर गोसावी यांसि सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने।। माधवराव बल्लाल प्रधान आशिर्वाद उपारि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें विशेष मौजे दोडी ता। देपूर हा गांव खासगीकडे पेषजीपासोन आहे त्यास तुम्हांकडील अंमलदारांनीं जफ्ती केली आहे म्हणोन हुजूर विदित जालें त्यावरून हें पत्र लिहिलें असे तरी मौजे मजकूर खासगीकडे असतां कमाविसदारानें जफ्त करावयासी प्रयोजन काय तरी आपण यास उत्तम रीतीनें ताकीद करून जफ्ती उठवणें पुढें मौजे मजकुरास कोण्हेके विसीं उपसर्ग न लावीत तें करावें जाणिजे छ २१ रबिलाखर सु।। अर्बा सितैन मया अलफ बहुत काय लिहिणें हे आशिर्वाद