पत्रांक २८.
इ. स. १७६६ ता. २४ अगष्ट श्री. श्रावण वद्य ५ शके १६८८
पुरवणी राजश्री केदारजी शिंदे गोसावी यांसिः
सकलगुणाळंकरणअखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने।। रघुनाथ१ बाजीराव आशीर्वाद. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. राजश्री मोरो२ विठ्ठल यासी तुह्मांकडील मुलकी व फौजदारी कुलडौलाची फडणिशी पेशजी प्रमाणें करार केली असे. तर याचे हातून कुलडौलाचे फडणिशीचें कामकाज घेत जाणें. जाणिजे छ १७ रबिलाखर सु॥ सबा सितैन मया व अलफ* बहुत काय लिहिणे ? हे आशिर्वाद.
बार