पत्रांक ३२.
इ. स. १७६७ ता. ५ जून श्री. १६८९ ज्येष्ठ शुद्ध ८
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। केदारजी२ सिंदे दंडवत विनंति उपरी एथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष तुम्हांकडे नालबंदी बा। ऐवज येणें रुपये २५००० पैकीं खाचरोदची वरात पावली नाहीं३ (?) रुपये ५००० बाकी वीस हजार येणें त्या पे।। रुपये
४००० खा। घोडे तुम्हांकडून घेतले त्याची किंमत
२००० राजश्री पाटिलबावाकडे
२००० राजश्री केदारजी सिंदे यांजकडे
---------
४०००
८००० सिलेदार यांची सालगुदस्ता चाकरी केली गागरे
व मावळे मिळोन आ।।५० चाकरीस होते त्यांस पावलें नाहीं.
५००० नालबंदी
३००० रोजमरे खर्चास
---------
८०००
४००० उसनवारी घेतले तुम्हांकडून
----------
१६०००
सोळा हजार बाकी रुपये ४००० च्यार हजार रुपये राहिले ते राजश्री विष्णु महादेव यांस रद्दकर्जी पाविले. तरी पावते करून कबज घेणें. रा। छ ८ मोहरम हे वि।।