पत्रांक २६.
इ. स. १७६५ ता. २३ नोव्हेंबर. श्री. १६८७ मार्गशीर्ष शुद्ध ११
पुरवणी राजश्री नारोपंत२ गोसावी यासिः-
विनंती उपरी. ‘सरकारांत ऐवज द्यावयाचा करार जाहला,’ त्याची तजवीज करून उजनीस ऐवज जमा करावा’ म्हणेन लिहिलें ऐसियासी येथील वोढीचा प्रकार तुम्हास दखलच आहे. परंतु तुह्मी मान्य केलें तें आम्हींहि कबूल केलें. तुमच्या लिहिल्यावरून तूर्त हप्तीयापैकीं कांहीं ऐवजाची तर्तूद येथून करून पाठवून देतों. संशय न धरावा. फडनिसी वगैरे कितेक मजकूर लिहिला आहे त्याचा बंदोबस्त करून घ्यावा. ऐवज पाठवून देऊं. रा। छ ९ जमादिलाखर हे विनंती.