[ २६ ]
श्रीशंकर. शके १६४९ मार्गशीर्ष शु० १३.
महाराज राजश्री महादाजीपंत पुरंधरे देशपांडेसाहेबाचे सेवेसीः--
अर्जदास्त शेरीकर मोकदम मोजै कोटीत, कर्यात सासवड, सु॥ समान असरैन मया अलफ. बंदगीस अर्ज ऐसाजे. साहेबी पूर्वी अभय दिलेंच होतें. त्यास, फौजदारीच्या शंभर रुपयाबद्दल वरातदार आला आहे. याबद्दल बदगीर यानें अर्जदास्त पाठविली तर अभय दिलें तें सिद्धि पावावयासी धनी समर्थ. वरातदार पाठविले ते यावांचून उठत नाहीं. बंदगीस अर्ज रोशण होय. हे अर्जदास्त. छ० ११ रबिलाखर.