[ २१ ]
मुसौदा. शके १६४६.
सु॥ खमस अशरीन मया अलफ. सालगुदस्ता सन अर्बामध्यें तुह्मी स्वारी नर्मदेपलीकडे गुजराथ ब मवास व सांगवाडे वगैरे स्वारी करून आलेस, त्याचा हिशेब मनास आणून चौथाई व सरदेशमुखीचा ऐवज तुह्मांकडून करार करून घेतला, रुपये ३८,००० अडतीस हजार. याशिवाय तुह्मांस जे स्वारीशिकारी जाली असेल ते तुह्मांस माफ केली असे. सनमा।रच्या स्वारीच्या हिशेबाचा तगादा तुह्मांसी कांहीं राहिला नाहीं. जाणिजे.