[ ३४ ]
श्री. शके १६५० आश्विन शु॥ ६.
राजश्री सटवाजी जाधव गोसावी यासी :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सुरसन तिसा अशरीन मया आलफ. तुह्मांकडे मामला बाबती सरदेशमुखी बाबत सरंजाम रा। पिलाजी जाधवराउ याचा आहे. तेथील सालमजकूरचे रसदेचा ऐवज येणें, त्यापैकी गु॥ शामजी सोनार.
५० ऐन जमा पोता रोख आणून दिल्हे.
५० बाबत ऐवज पेठ व वासदे वगैरे येथील मख्ता
रुपये १७५० पौ। जाजती आले ते. या ऐवजी
मजुरा दिले पन्नास.
----------
१००
एकूण एकशें रुपये रास जमा जाले. मजुरा असत. जाणिजे. छ. ४ राबलावल. लेखन सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाळाजी बाजीराव मुख्य प्रधान. * *