[३३]
श्री.
शके १६५० आश्विन शु॥ ५.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो बाजीराऊ बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सुमा तिसा अशरीन मया अलफ. तुह्माकडील मामलाबाबती सरदेशमुखीचा आहे. फुलबरी वगैरे पौ। बद्दल देणें रदकर्ज, राजश्री अंतोबा नाईक भिडे यांस रुपये २०,००० वीस हजार देविले असेत. पावते करणें. जाणिजे. छ० ३ रबिलोवल + बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा
* ० श्री ॅ
राजा शाहूनरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.