[ २९ ]
श्री. शके १६५० आषाढ वा। ११
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीरावबल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु॥ तिसो अशरीन मया अलफ. सालगुदस्ताचे बाकीचे ऐवजीं गु॥ शामजी सोनार, रुपये १००० हजार रुपये जमा पोता जाले. मजुरा असेत. छ. २४ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ! लेखन सीमा.
० श्री ँ
* राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.