[ ३२ ]
श्री शके १६५०, भाद्रपद शु॥ ५. मा। अनाम देशमुख व मोकदम व देशकुलकर्णी का। सासवड यांसिः–
नारो शंकर सचीव सुहूरसंन तिसा अशरैन मया अलफ. राजश्री अंबाजी त्र्यंबक कुलकर्णी कसबे मजकूर व देशकुलकर्णी कर्यात मजकूर यांणीं हजूर किले सिंहगडच्या मुकामी येऊन विनंति केली जेः- कसबे मजकूरची मोजणी रा। गोपजीपंत यांणीं पेशजी केली. ती जबर जाली. याकरिता रयतीनें दहशत घेऊन कीर्दी करावयास उमेदवार होत नाही. याकरितां हाली कीर्दीवरी नजर देऊन कसबे मजकूरची रास्ती मोजणी दोरीनें पांचाचे पांच हात व एक घोडेमूट याप्रमाणें दोरी करून जमीन मोजणी केलिया उमेदीनें लावणी होईल. ह्मणून विनंति केली. त्यावरून हें पत्र तुह्मांस सादर केलें असे. तरी तुह्मीं, व मख्तेसर थळकरी कुणबी-कसबा मजकूरचे- बरोबर घेऊन, हुजूर येणें. हुजरून कारकून देऊन रास्ती मोजणी करून, अभय दिल्हें जाईल. जाणिजे. छ० ३ सफर. पा। हुजूर.
श्री पत्रावधि
शंकराजी रयंभाति
नारायण
बार सुरु सुद बार