लेखांक १८१
श्री १६२३ वैशाख वद्य १३
तपोनिधी राजश्री भवानगीर बावा गोसावी मठ श्री सदानंद बावा स्वामीचे सेवेसी
सेवक गिरजोजी यादव दंडवत येथील कुशल जाणऊन आशिर्वादपत्र पाठवावे उपर तुह्मी लिहिले की मौजे इडमिडे हा गाव रो। कैलासवासी स्वामीनी चदीचे मुकामी अनछत्राबदल दिला हा कालपावेतो चालिला आहे त्यास महालचे कारकून नाना दड ताजे ठेऊन रो। माणको गोविंद व रो। आणाजी जनार्दन सुभेदार रोखा करून उपसर्ग देताती ह्मणून लिहिले त्यावरून मातुश्री आईसाहेबास विदित करून राजश्री स्वामीची आज्ञापत्रे आणणार आहेत त्यावरून कळो येईल वरकड तुमच्या कार्यास अतर पडणार नाही बहुत लिहिणे नलगे छ २६ जिल्हेज हे विनंती
इरमाडे जमीन चावर .।.