[ ३० ]
श्री शके १६५० श्रावण वा। १.
राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासी.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। बाजीराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु॥ तिसा अशरीन मया अलफ. सालगुदस्ताचे बाकीचे ऐवजी रुपये ३०० तीनशे, गु॥ शामजी सोनार, पोता जमा जाले. मजुरा असेत. सालगुदस्ताचे तुह्मांकडील माहालींच्याऐवजी पावले. जाणिजे. छ० १४ मोहरम. बहुत काय लिहिणें ?
० श्री ँ लेखन सीमा.
राजाशाहू नरपति हर्षनिधान
+ बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.